निकालपत्र :- (दि.13.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला 2 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.1 यांनी लेखी युक्तिवाद दाखल केले आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, मौजे कोगे, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील भूमापन क्र.1165,एकूण क्षेत्र हे.0.19.2 आर, आकार रु.2.69 पै., पैकी क्षेत्र हे.0.12 ही जमीन तक्रारदारांच्या वाटणीस आली आहे. सदर क्षेत्रामध्ये तक्रारदारांनी भात पीक घेणेचे ठरविले. त्यानुसार दि.08.06.2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित केलेले भोगावती जातीचे 7 किलो बियाणे खरेदी केले व त्याची लागवड दि.10.06.2009 रोजी केली. तक्रारदारांनी योग्य ती पूर्वमशागत तसेच लागवडीनंतर खते, शेणखते, औषधे यांचा वापर केलेला आहे. भोगावती जातीच्या भाताची वाढ समाधानकारक होती. पंरतु, 2 ते अडीच महिन्यांनी भात पिकाच्या वाढीमध्ये असमानता दिसून आली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.07.09.2009 रोजी कृषि विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेकडे बियाणात भेसळे असलेबाबत लेखी तक्रार केली. दि.10.09.2009 रोजी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने भेट देवून भात पिकाची पाहणी केली व सदर भात पिकामध्ये 54 टक्के भेसळ असलेबाबतचा अहवाल दि.14.10.2009 रोजी दिलेला आहे; सदर भात बियाणामध्ये भेसळ असलेमुळे तक्रारदारांचे उत्पन्न रुपये 15,000/- बुडाले आहे. तसेच, मशागत व रासायनिक खते यांचा रुपये 3,000/- खर्च आलेला आहे. तसेच, सामनेवाला यांनी मानसिक त्रासापोटी रुपये 12,000/- अशी एकूण रक्कम रुपये 30,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावी. तसेच, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत कृषि विकास अधिकारी यांचेकडे दि;07.09.2009 रोजी दिलेली तक्रार, कृषि विभाग जि.प. यांनी दिलेला अहवाल, 7/12 उतारा, बियाणे खरेदी पावती इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर कंपनी हे बियाणे पॅक व सीलबंद करुन विक्री करते. तसेच, संपूर्ण बियाणांची खात्री करुन बियाणे विक्रीस पाठविले जातात. तक्रारदारांनी लागवड केलेल्या भात पिकामध्ये अन्य बियाणे मिसळून भात पिक लावले होते. सदर सामनेवाला यांच्या उत्पादित भोगावती जातीच्या लॉट क्र.1251 या भात पिकाची पाहणी दि.10.09.2009 रोजी केलेल्या कमिटीमध्ये क्षेत्रिय अधिकारी हजर होते. सदर लॉट क्र.1251 मध्ये जिल्हयातील इतर कोणत्याही शेतक-याकडून तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून 7 किलो सुटे बियाणे विकत घेतल्याचे निदर्शनास येते. सदर बियाणांमध्ये इतर बियाणांच्या भेसळीमुळे झालेल्या नुकसानीस सदर सामनेवाला हे जबाबदार नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकून घेतले आहेत. तक्रारदारांची तक्रार ही सामनेवाला कंपनीने उत्पादित केलेल्या बियाणांमध्ये भेसळ असलेबाबतची तक्रार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालाचे अवलोकन या मंचाने केला आहे. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने सामनेवाला कंपनीच्या बियाणांमध्ये भेसळ असलेबाबत शास्त्रीयदृष्टया नोंदी करुन निष्कर्ष काढलेचे दिसून येत नाही. तसेच, तक्रारदारांनी सुटे बियाणे घेतले असल्याने सदर बियाणांचा नमुना तक्रारदारांनी ठेवणे आवश्यक असते व त्या दृष्टीकोनातून प्रयोगशाळेचा चाचणी अहवाल घेता आला असता. बियाणांच्या भेसळीबाबत प्रयोगशाळेती चाचणी अहवाल दाखल नाही. तसेच, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने तसा अहवाल घेतलेचे दिसून येत नाही. सबब, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल निर्णायक पुरावा म्हणून वाचता येणार नाही. याबाबत पूर्वाधार म्हणून पुढील पूर्वाधार हे मंच विचारात घेत आहे :- 1. Appeal No.945/2006 M/s. Nirmitee Biotech Vs. R.N.Sankpal & Others, decided on 30.04.2008 - State Commission, Mumbai. 2. 2005 (II) CPJ (SC) Page No.13 - Hariyana Seeds Dev. Corp. Ltd. Vs. Sadhu & Others. 3. Appeal No. 1207/2008 Golden Seeds Pvt. Ltd. Vs. B.N.Bhavnath & Others, decided on 18.02.2009 - State Commission, Mumbai. 4. 2009 (II) CPJ Page No.414, Somnath Kashinath Ghodse Vs. Vilas G. Jagtap & Others. 5. CPJ II (2000) (SC) Page No.1 - Chanran Singh Vs. Healing Touch Hospital. (6) उपरोक्त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता सामनेवाला कंपनीच्या बियाणे सदोष आहेत हे सिध्द होत नाही. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |