ग्राहक तक्रार क्रमांकः-232/2009 तक्रार दाखल दिनांकः-23/04/2009 निकाल तारीखः-30/03/2010 कालावधीः-0वर्ष11महिने07दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.विल्सन गाबरेल रिबेलो रा-ए/103,जय कांचनगंगा को.ऑप. हौसिंग सोसायटी.जे.बी.सी.नरोना रोड, भाईंदर(प) ता.जि.ठाणे. ...तक्रारकर्ता विरुध्द 1)जय कांचनगंगा को.ऑप. हौसिंग सोसायटी.तर्फे चेअरमन/सेक्रेटरी, जे.बी.सी.नरोना रोड, भाईंदर(प) ता.जि.ठाणे. ...वि.प.नं.1(एकतर्फा) 2)श्रीमती झरीना वाय.खाबती रा-ए/203,जय कांचनगंगा को.ऑप. हौसिंग सोसायटी लि.,जे.बी.सी.नरोना रोड, भाईंदर(प) ता.जि.ठाणे.401 101 ... वि.प.2(एकतर्फा) उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.डी.बी.पाटील विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.एम.एन.राठोड(वि.प.गैरहजर) गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -एकतर्फा निकालपत्र - (पारित दिनांक-30/03/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार श्री.विल्सन रिबेलो यांनी जय कांचनगंगा को.ऑप हाऊसिंग सोसायटी व इतर यांचेविरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकार नं.1 यांनी विरुध्दपक्षकार नं.2 यांना त्यांची सदनिका ए-203 योग्य व चांगल्या अवस्थेत ठेवावी. त्यामुळे आरोग्य चांगले राहू शकेल अशी समज देण्याची मागणी केली आहे. 2)तक्रारदार हे सदर विरुध्दपक्षकार नं.1 सोसायटीचे सभासद व शेअर होल्डर आहेत. ते या सोसायटीत सदनिका नं.ए-103, पहिला मजला येथे राहतात. व विरुध्दपक्षकार नं.2 हे देखील सदनिका नं.ए-203 मध्ये सभासद म्हणून रहातात. परंतु 2/- त्यांनी त्यांच्या सदनिकेत बरेच स्ट्रक्चरल बदल करुन घेतले आहेत. त्यामुळे स्लॅबला तडे जाऊन सिलींगमधून पाण्याची गळती सुरु झाली आहे. व त्यामुळे तक्रारदाराच्या सदनिकेतील इलेक्ट्रीक वायरींग,फर्निचर,यांना नुकसान पोहोचले आहे. तसेच इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. विरुध्दपक्षकार नं.2 यांनी सदरचे स्ट्रक्चरल बदल करतांना कोणत्याही अधिका-याची किंवा तत्सम खात्याची परवानगी घेतलेली नव्हती. तक्रारदार हे विरुध्दपक्षकार नं.1 यांना नियमित मेंटेनन्स चार्जेस देत आहेत त्यांना तक्रारदार यांनी वकीलाची नोटीसही पाठविली. परंतु विरुध्दपक्षकार नं.1 हे दुर्लक्ष करत आहेत. तक्रारदार यांच्या सदनिकेत होणा-या पाण्याच्या गळतीच्या दुरुस्तीची जबाबदारी विरुध्दपक्षकार नं.1 यांचेवर आहे. तसेच कोणत्याही सदनिकेतील स्ट्रक्चरल बदल करण्याआधी अधिकृत अधिका-याची, म्युनीसीपार्टीची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार होणा-या गळतीची दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे आर.सी.सी, प्लास्टरींग व इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. 3)विरुध्दपक्षकार नं.1व2 यांना मंचाने नोटीस बजावणी करुनही ते मंचासमोर हजर राहीले नाहीत व लेखी कैफियत दाखल केली नाही. म्हणून या मंचाने विरुध्दपक्षकार नं.1व2 विरुध्द दिनांक28/10/2009 रोजी ’’नो डब्ल्यु एस’’ आदेश पारीत केला. तदनंतर एकतर्फा चौकशी करुन हे मंच पुढील एकतर्फा अंतिम आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 232/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून या तक्रारीचा खर्च रुपये 500/-(रुपये पाचशे फक्त) विरुध्दपक्षकार नं.1 यांनी तक्रारदार यांस द्यावा. 2)विरुध्दपक्षकार नं.1यांनी सोसायटीतील तक्रारदार यांच्या सदनिकेची पाण्याच्या गळतीची निष्णात गवंडी वापरुन व सर्व्हे रिपोर्ट काढून सिव्हील इंजिनियरच्या देखरेखीखाली दुरुस्ती करुन द्यावी. 3)विरुध्दपक्षकार नं.1 यांनी तक्रारदार यास मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी रुपये500/-(रुपये पाचशे फक्त)द्यावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-30/03/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|