Maharashtra

Kolhapur

CC/09/379

Ramesh Krishna Patil and others - Complainant(s)

Versus

Jay Jawan Nagri Sahakari Patsanstha Ltd and others - Opp.Party(s)

Adv. A.R.Shinde.

06 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/379
1. Ramesh Krishna Patil and othersR.K.Nagar, Shahapur,Near Yadrav Sutgirni, Ichalkaranji.Kolhapur.Maharastra2. Sou.Kalpana Ramesh PatilR.K.Nagar.Shapur.Opp Sut Girani.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur3. Vikaram Ramesh PatilR.K.Nagar.Shapur.Opp Sut Girani.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur4. Prasad Ramesh PatilR.K.Nagar.Shapur.Opp Sut Girani.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Jay Jawan Nagri Sahakari Patsanstha Ltd and othersIchalkaranji.Kolhapur.Maharastra2. Shivaji Mahadev KhavareShantinagar Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur3. Rajendra Devappa SalunkheShantinagar.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur4. Vilas Pandurang KumbharShantinagar.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur5. Bapuso Dhondiba KhamkaarMukat Sainik Vasahat.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur6. Rajeandra bandu LoharMukt Sainik.Vasahat.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur7. Sudam Dadu KambaleMukt Sainik Vasahat.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur8. Prakash Lahu GaiykwadMukt Sainik Vasahat.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur9. Sou,Suvarna Suresh ChavanMukt Sainik Vasahat.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur10. Babaso Baburao ManeKoravi Galli.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur11. Dattatray Krishna More.Krishna Nagar,Shapur.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur12. Rajgopal Bhawarlal LoyaBhoara Market.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur13. Ramchandra Sakharam DawareVikarmnagar.Ichalkaranji.Tal-Hatkangale.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.A.R.Shinde for the complainants
Adv.R.R.Wayangankar for the Opponent No.2, 4 to 9, 11 to 13

Dated : 06 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष) 

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 4 ते 9, 11 ते 13 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या व सामनेवाला क्र.2, 4 ते 9, 11 ते 13 यांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.1, 3 व 10 हे गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे कॉल डिपॉझिट ठेवींच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
दि.30.06.09 पर्यन्‍त व्‍याज
एकूण रक्‍कम
1.
000422
20000/-
30.11.2005
4300/-
24300/-
2.
000618
20000/-
17.06.2006
4251/-
24251/-
3.
000571
20000/-
08.04.2006
4520/-
24520/-
4.
000570
20000/-
28.04.2006
4442/-
24442/-
5.
000420
20000/-
30.11.2005
4300/-
24300/-
6.
000421
20000/-
30.11.2005
4300/-
24300/-
7.
000616
25000/-
15.06.2006
5323/-
30323/-
8.
000513
20000/-
06.03.2006
3983/-
23983/-
9.
000512
20000/-
06.03.2006
3983/-
23983/-

 
(3)        तक्रारदारांना सदर रक्‍कमांची त्‍यांच्‍या मुलांच्‍या शिक्षणाच्‍या खर्चाकरिता आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.11.05.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
 
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.2, 4 ते 9, 11 ते 13 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सौ.सुवर्णा भाऊसो चव्‍हाण नांवाची कोणीही महिला संचालक नाही. सामनेवाला यांनी केंव्‍हाही बेजबाबदारपणा व निष्‍काळजीपणा केलेला नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे केंव्‍हाही ग्राहक नव्‍हते व नाहीत. उपनिबंधक, सहकारी संस्‍था, हातकणंगले यांनी सदरची संस्‍था अवसायानात काढलेने आर्थिक व्‍यवहार बंद आहेत. अवसायक यांस पक्षकार केलेले नाही. तक्रारदारांचा तक्रार अर्ज बेकायदेशीर असल्‍याने तो चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.  
 
(6)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तसेच, तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावत्‍यांच्‍या स्‍वरुपात रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सदर कॉल डिपॉझिट पावत्‍यांची रक्‍कम ही त्‍यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि. 11.05.2009 रोजीच्‍या वकिलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसीने मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कमा ठेव तारखेपासून 11.05.2009 रोजीपर्यन्‍त ठेव पावत्‍यांवर नमूद व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील कॉल डिपॉझिटच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात.  सदर रक्‍कमांवर ठेव तारखेपासून दि. 11.05.2009 रोजीपर्यन्‍त कोष्‍टकात नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
000422
20000/-
2.
000618
20000/-
3.
000571
20000/-
4.
000570
20000/-
5.
000420
20000/-
6.
000421
20000/-
7.
000616
25000/-
8.
000513
20000/-
9.
000512
20000/-

 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER