Maharashtra

Jalgaon

CC/08/1507

Sunil Sudhakar Fegade - Complainant(s)

Versus

Jay Ganaraya urban co.op society - Opp.Party(s)

Adv. Bhoge

12 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1507
 
1. Sunil Sudhakar Fegade
Bamnod
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Jay Ganaraya urban co.op society
Faizpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                  तक्रार क्रमांक 1507/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 18/11/2008
                  सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 06/01/2009.
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-12/10/2009
 
 
1.     श्री. सुनिल सुधाकर फेगडे,
2.    सौ.योगिता सुनिल फेगडे,
उ.व. सज्ञान, धंदा –
दोघे रा.मु.पो.बामणोद, ता.यावल,जि.जळगांव.            ..........      तक्रारदार
      विरुध्‍द
1.     जय गणराया अर्बन क्रेडीट को.ऑप.सोसायटी लि.,
फैजपुर, ता.यावल, जि.जळगांव.
(सदरील अर्जाची नोटीस मॅनेजर यांच्‍यावर बजवावी.)
2.    मॅनेजर, ललीत मधुकर पाटील,
जय गणराया अर्बन क्रेडीट को.ऑप.सोसायटी लि.फैजपूर,
ता.यावल,जि.जळगांव.
3.    श्री.मधुकर तुकाराम पाटील,चेअरमन,
रा.मु.पो.फैजपुर, डी.एन.कॉलेज समोर, फैजपुर,
ता.यावल,जि.जळगांव.
4.    श्री.प्रभाकर विश्‍वनाथ चौधरी,संचालक,
रा.मु.पो.फैजपुर, राजबागच्‍या मागे, फैजपुर,
ता.यावल,जि.जळगांव.
5.    श्री.अतुल मधुकर वायकोळे,संचालक,
रा.मु.पो.फैजपुर, देविवाडा, फैजपूर, ता.यावल,जि.जळगांव.
6.    श्री.भोजराज श्रीधर पाटील,संचालक,
रा.मु.पो.फैजपुर, लक्ष्‍मीनगर, फैजपूर,ता.यावल,जि.जळगांव.
7.    श्री.मनोज उमाकांत पाटील, संचालक,
रा.मु.पो.फैजपूर,देविवाडा, फैजपूर, ता.यावल,जि.जळगांव.
8.    श्री.संदीप अशोक बेंडाळे, संचालक,
रा.मु.पो.बामणाद,ता.यावल,जि.जळगांव.
9.    श्री.प्रदीप विष्‍णु चौधरी, संचालक,
रा.मु.पो.फैजपुर स्‍टॅण्‍ड मागे, ता.यावल,जि.जळगांव.
10.   श्री.कीशोर देवराम राणे,संचालक,
रा.मु.पो.यावल, ता.यावल,जि.जळगांव.
11.    श्री.राजेश रामदास फेगडे, संचालक,
रा.मु.पो.यावल,ता.यावल,जि.जळगांव.
12.   श्री.सुनिल रघुनाथ जोगी, संचालक,
रा.विद्यानगर, फैजपुर, ता.यावल, जि.जळगांव.
13.   वृशाली ललीत पाटील, संचालीका,
रा.डी.एन.कॉलेज समोर, फैजपूर, ता.यावल,जि.जळगांव.
14.   पल्‍लवी तुषार सराफ, संचालीका,
रा.सराफ गल्‍ली, फैजपूर, ता.यावल,जि.जळगांव.
15.   श्री.डी.व्‍ही.कदम, प्रशासक,
सहायक निबंधक, सहकारी संस्‍था मर्यादीत, यावल,
ता.यावल,जि.जळगांव.                         .......सामनेवाला.
        
 
 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 12/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदार तर्फे श्री पी.ई.नेमाडे वकील हजर
            सामनेवाला क्रं. 2,3 व 13 तर्फे श्री.प्रदीप एम.महाजन वकील हजर.
           सामनेवाला क्र.4 तर्फे नितीन आर. पाटील वकील हजर.
            सामनेवाला क्र.5 ते 12 व 14 तर्फे श्री.प्रवीणचंद जंगले वकील हजर.
            सामनेवाला क्र.6 व 15 स्‍वतः  
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्‍हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्‍या ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्‍था असल्‍याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
000154
03/02/2006
50,000/-
06/02/2007
2
000155
03/02/2006
50,000/-
06/02/2007
3
000156
03/02/2006
50,000/-
06/02/2007
4
000500
09/12/2006
25,000/-
12/12/2007
5
000501
09/12/2006
25,000/-
12/12/2007
6
000502
09/12/2006
25,000/-
12/12/2007
7
000503
09/12/2006
25,000/-
12/12/2007
8
000337
07/09/2006
50,000/-
10/09/2007
9
000213
18/05/2006
50,000/-
21/05/2007

 
            तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.    
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आल्‍यानंतर , सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी प्रस्‍तुतकामी हजर होऊन म्‍हणणे सादर केलेले आहे.
            3.    सामनेवाला क्र. 2,3 व 13 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   तक्रारदाराची तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात नाही.    सामनेवाला क्र. 15 यांनी सामनेवाला पतसंस्‍थेचा ऑगष्‍ट,2007 पासुन प्रशासक म्‍हणुन कारभार स्विकारलेला असुन त्‍यांनी सदर संस्‍थेचा कारभार व रेकॉर्ड इत्‍यादी चार्ज घेतल्‍या तारखेपासुन ताब्‍यात घेतलेले असुन सदर संस्‍थेचा संपूर्ण कारभार व व्‍यवहार सध्‍या सामनेवाला क्र. 15 हेच बघत असुन तेव्‍हापासुन सामनेवाला क्र. 2 हे सदर संस्‍थेवर मॅनेजर म्‍हणुन कार्यरत नाहीत.   त्‍यामुळे तक्रारदाराने ठेव ठेवलेल्‍या तथाकथीत ठेवीबाबत सामनेवाला यांना काहीएक माहिती नाही.   सबब तक्रारदाराचा अर्ज नामंजुर करावा व विकल्‍पे करुन जर कोर्टाने तक्रारदाराची मागणी मंजुर केलीच तर सदरच्‍या रक्‍कमा प्रशासक म्‍हणुन सामनेवाला क्र.15 यांचेकडुन वसुल करण्‍याबाबतचे आदेश व्‍हावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 2,3 व 13 यांनी केली आहे.
            4.    सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जास मिस जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीची बाधा येते.   तक्रारदाराने वेगवेगळया पाच पावत्‍यांचे अनुषंगाने दाखल केलेली तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे.    तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नाही तसेच सामनेवाला ही सहकार कायदयाअंतर्गत नोंदलेली पतसंस्‍था असुन ती ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक संज्ञेत येत नाही.   सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालण्‍यास पात्र नाही.   सामनेवाला क्र. 4 यांना फसवणुक करुन प्रस्‍तुत कामी सहया घेऊन त्‍यास कागदोपत्री व्‍हाईस चेअरमन दाखविण्‍यात आलेले होते.   सद्यस्‍थीतीत फसवणुकीचा दावा न्‍यायप्रविष्‍ट आहे.   सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्‍यात यावा.    अधिकार क्षेत्राचा मुद्या गठीत करुन त्‍यावर प्रथम निर्णय घेण्‍यात यावा.   सामनेवाला क्र. 4 यांनी वरीष्‍ठ न्‍यायालयात रे.मु.नं.141/09 दाखल केला असुन तो न्‍यायप्रविष्‍ठ असल्‍याने सामनेवाला क्र. 4 यांना वगळण्‍यात यावे तसेच विनाकारण त्रासात टाकलेबद्यल तक्रारदाराकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती सामनेवाला क्र. 4 यांनी केली आहे. 
            5.    सामनेवाला क्र. 6 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   सामनेवाला यांनी कोणत्‍याही कागदपत्रांवर सहया केलेंडर नाहीत तसेच दि.22/12/2005 रोजी संचालक पदाचा राजीनामा मंजुर करणेबाबत संस्‍थेच्‍या चेअरमन यांना कळविले आहे.   त्‍यानंतर संस्‍थेच्‍या मिटींग अथवा इतर कामात सामनेवाला यांच्‍या खोटया सहया करुन कामे केलेली आहेत त्‍याबाबत चेअरमन / व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍द खोटया सहया केल्‍याबाबत फौजदारी स्‍वरुपाचा गुन्‍हा दाखल करणेबाबत पत्र पोलीस स्‍टेशनला दिलेले आहे.   संस्‍थेत ठेवी घेणे तसेच कर्ज देणे इत्‍यादी कामे चेअरमन व व्‍यवस्‍थापक यांनी केलेली आहेत.   सबब तक्रार अर्जातुन सामनेवाला यांचे नांव वगळण्‍यात यावे अशी विनंती सामनेवाला क्र. 6 यांनी केली आहे.
            6.    सामनेवाला क्र. 5 ते 12 व 14 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   सामनेवाला क्र. 5 ते 12 व 14 यांनी सामनेवाला सोसायटीत चाललेल्‍या गैर कारभार निर्दशनास येताच संचालक पदाचे राजीनामे दिलेले आहेत.   सामनेवाला क्र. 5 ते 12 व 14 यांना आपले राजीनामे डिसेंबर,2005 ते 19/2/2007 या कालावधीत दिलेले असल्‍याने त्‍यानंतर त्‍यांचा सामनेवाला यांचेशी काहीही संबंध राहीलेला नाही.    गैर व्‍यवहाराबाबत सहायक निबंधक यांनी सहकार कायदयानुसार कारवाई केलेली आहे.    सबब तक्रारदाराची तक्रार कायदेशीर मुद्यांचे आधारे फेटाळुन लावावी, तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्‍याचा काहीएक अधिकार नसल्‍याचे घोषीत होऊन मिळावे, सामनेवाला हे तक्रारदार व अन्‍य कोणाचीही कोणत्‍याही प्रकारे व कायदयान्‍वये ठेवी परत करण्‍यास जबाबदार नाहीत असे घोषीत होऊन मिळावे अशी विनंती सामनेवाला क्र. 5 ते 12 व 14 यांनी केली आहे.  
            7.    सामनेवाला क्र. 15 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   लेखा परिक्षण अहवालाचे अवलोकन करता अष्‍ठचक्र ठेव योजनेत रक्‍कम रु.30,49,260/- इतकी रक्‍कम जमा दर्शविलेली असुन ती रक्‍कम सोबत जोडलेल्‍या यादी प्रमाणे 1 ते 186 व्‍यक्‍तींनी ठेवलेली आहे.   सदर यादी संस्‍थेच्‍या दि.31/3/2006 रोजीचे ताळेबंदाशी जुळती आहे.   तथापी यादीत तक्रारदार सुनिल सुधाकर फेगडे व सौ.योगीता सुनिल फेगडे यांच्‍या ठेवी पावती क्रमांक 154, 155, 156 दि.3/2/2006 चा समावेश असल्‍याचे दिसुन येत नाही.   संस्‍थेच्‍या रेकॉर्डवर अधिकृत नोंद नसल्‍यामुळे सदर रक्‍कम प्रदानास पात्र ठरु शकत नाही. सदर संस्‍थेचे महत्‍वाचे रेकॉर्ड गहाळ झालेले असुन उपलब्‍ध रेकॉर्ड अद्ययावत लिहीणेत आलेले नाही म्‍हणुन सहकार कायदयानुसार फौजदारी कारवाई सुरु आहे.   सबब पावती क्रमांक 500, 501, 502, 503 दि.9/12/2006 व पावती क्र.337 दि.7/9/2006 पावती क्र.213 दि.18/5/2006 बाबत अधिकृत नोंद संस्‍थेच्‍या दत्‍परी झालेली नसल्‍याने सदर रक्‍कम प्रदानास पात्र ठरत नाही अशी विनंती सामनेवाला क्र. 15 यांनी केली आहे.
8.    तक्रारदार यांची तक्रार व त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व तक्रारदार यांचे वकील यांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
                  प्रमाणे ग्राहक आहे काय ?                     .......होय
 
            2.    सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             9.  मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत  दाखल केलेल्‍या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्‍कम सामनेवाला यांचे पतसंस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की,   तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
            10.   मुद्या क्रमांक 2   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्रा दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे.
            11.    उचित सेवा न देणे किंवा सेवेतील त्रुटी / कुचराई याबाबतीत सामनेवाला यांचा विचार करावयाचा झाल्‍यास, सामनेवाला किंवा त्‍यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांची प्राथमिक जबाबदारी ठरते की, त्‍यांनी तक्रारदार काय किंवा इतर ठेवीदारांच्‍या ठेवी, संबंधीतांच्‍या ठेवीच्‍या मुदती संपल्‍यानंतर किंवा संपण्‍याआधी मागणी केल्‍यास त्‍या वेळचेवेळेवर परत करणे हे सामनेवाला यांचे नैतिक किंवा आवश्‍यक कर्तव्‍य आहे. कारण ठेवीदारांनी सदरील ठेवी हया सामनेवाला किंवा त्‍यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांचेवर विश्‍वास ठेऊन ठेवलेल्‍या असतात. म्‍हणून आम्‍ही या निष्‍कर्षाप्रत पोहोचलो आहेत की, सामनेवाला किंवा त्‍यांचे कार्यकारी संचालक मंडळ हे स्‍वतंत्ररित्‍या व संयुक्‍तरित्‍या तक्रारदार यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा व्‍याजासह परत करणेस जबाबदार आहेत.    सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
            सामनेवाला क्र. 4 ते 9 यांना मा.विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्‍था, नाशिक विभाग, नाशिक यांचे आदेशानुसार तसेच मा.राज्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य, मंत्रालय, मुंबई यांचे आदेशान्‍वये सामनेवाला क्र. 4 ते 9 यांची संचालक पदाच्‍या जबाबदारीतुन मुक्‍तता केलेली आहे म्‍हणुन सदरच्‍या सामनेवाला क्र. 4 ते 9 यांना या तक्रारीतुन वगळण्‍याचे निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 3,10 ते 15 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक आदेश क्रमांक 1 मध्‍ये नमुद केलेप्रमाणे मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 3,10 ते 15 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये2000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 3,10 ते 15 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 3,10 ते 15 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 3,10 ते 15 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
            ( फ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 12/10/2009
                  (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )        ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.