आदेश :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख) (1) अर्जदारांनी प्रस्तुतचा अर्ज हा ग्राहक वसुली अर्ज क्र.13/2010 यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25(3) अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे पाठविलेला वसुली दाखला रद्द करणेत यावा याबाबत आहे. सदर अर्जात अर्जदार पुढे सांगतात, या मंचाने दि.09.04.2010 रोजी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25(3) अन्वये वसुली दाखला जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे पाठविणेबाबत आदेश झालेला आहे. तदनंतर, सामनेवाला यांचेबरोबर तडजोड झालेली आहे. तरी, या कामी के.डी.सी.सी.बँकेचे डिमांड ड्राफट नं.167466 व 167467 प्रत्येकी रक्कम रुपये 2,15,000/- मिळालेबाबत अर्जदारांनी पुरसिसही दाखल केली आहे. त्या अनुषंगाने अर्जदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. युक्तिवादाचेवेळेस अर्जदारांचे अॅड.व्ही.ए.करवीरकर यांनी प्रस्तुत प्रकरणी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 (3) अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे पाठविलेला दाखला रद्द करणेत यावी अशी विनंती केली आहे. (2) सामनेवाला संस्थेचे चेअरमन, श्री.सुजाउद्दीन बाळासो सयद हे हजर आहेत. त्यांनी प्रस्तुत अर्जास नाहरकत दर्शविली आहे. तसेच, तडजोड झाली असल्याचे प्रतिपादन केले आहे. (3) अर्जदारांचा प्रस्तुतचा अर्ज, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यांचा विचार करता या मंचाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दि.15.04.2010 रोजी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 (3) अन्वये जा.क्र. कोजिमं/कलम-25/वसुली/179/10 द्वारे पाठविलेला वसुली दाखला रद्द करणेत यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) ग्राहक वसुली अर्ज क्र.13/2010 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25(3) अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे पाठविलेला वसुली दाखल रद्द करणेत येतो. (2) या मंचाचे प्रबंधक यांनी सदर आदेश जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना कळवावा व त्या अनुषंगाने पाठविलेला वसुली दाखला परत मागवावा. (3) सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |