मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र.118/2011 निकाल तारीख – 14/10/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) श्री. किरण संभाजी बर्गे व इतर रा. मु. पो. कोरेगांव, ता. कोरेगांव जि. सातारा ------- अर्जदार विरूध्द
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लि. चिमणगांव सध्याचा गुरू कमॉडिटीज् प्रा. लि. चिमणगांव, ता. कोरेगांव, जि. सातारा -------- जाबदार आदेश नि.1 वर 1. तक्रारदारांच्या ठेव पावत्यांची रक्कम विरूध्द पक्षाच्या सहकारी साखर कारखान्याने न दिल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. सदरची तक्रार मंचासमोर अडमिशन हिअरिंगसाठी दि. 16/9/11 रोजी ठेवण्यात आली होती परंतु सदर तक्रार प्रकरणात काही त्रुटी असल्यामुळे त्रुटीच्या मुदयावर युक्तीवाद करण्यासाठी अर्जदार यांचे वकीलांनी मुदत मागीतली व मंचाने मुदत देवून दि. 7/10/11 रोजी प्रकरण सुनावणीसाठी ठेवले व त्यानंतर आज प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. 3. आज मंचासमोर तक्रारदारांचे वकील हजर असून सदर तक्रारीमध्ये काही तांत्रिक दोष असल्यामुळे सदरची तक्रार काढून घेण्याची परवानगी दयावी व नव्याने वेगवेगळे तक्रार अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी नि. 8 वर अर्ज दाखल केला. तक्रारीचे स्वरूप पाहता मंचाने त्यांचा अर्ज मंजूर केला असून त्यानुसार आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत. आदेश 1. तक्रारदाराचे नि. 8 वरील अर्जानुसार तक्रार अर्ज मागे घेण्याची परवानगी देण्यात येते. 2. तसेच नव्याने तक्रारी दाखल करण्याची देखील परवानगी देण्यात येते. 3. तक्रारदाराने दाखल केलेली मूळ कागदपत्र त्यांना परत करण्यात यावीत. 4. खर्चाबाबत काही आदेश नाही. 5. प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 14/10/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |