Maharashtra

Gondia

CC/08/61

Ghanshamdas Udayram Agrawal - Complainant(s)

Versus

Janta Sahakari Bank Ltd - Opp.Party(s)

Adv. Khanted

24 Sep 2008

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/08/61
 
1. Ghanshamdas Udayram Agrawal
Gaushala Ward, Gondia
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Janta Sahakari Bank Ltd
Sabji Mandi, Gondia
Gondia
Maharastra
2. Special Recovery Officer
Janta Sahakari Bank Ltd, Branch Office Gondia
Gondiya
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 
PRESENT:
MR. KHANTED, Advocate
 
 
NONE
 
ORDER

 

--- आदेश---
(पारित दिनांक 24 सप्‍टेंबर 2008)
 
द्वारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्‍यक्षा
 
  1. तक्रारकर्ता श्री. घनश्‍यामदास उदयराम अग्रवाल त्‍यांच्‍या ग्राहक तक्रारीत म्‍हणतात की, मे. राठी प्रतिष्‍ठान, गोंदिया यांनी वि.प.यांचेकडून घेतलेल्‍या लोनचे ते गॅरेंटर होते म्‍हणून ते ग्राहक या व्‍याख्‍येत बसतात तयांनी मागणी केली आहे की, वन टाईम सेटलमेंट करिता देण्‍यात आलेले धनादेश वि.प.यांनी न वठविल्‍यामुळे त्‍यांच्‍या सेवेत न्‍यूनता आहे असे ठरविण्‍यात यावे व मे. राठी प्रतिष्‍ठान यांचे लोन खाते क्रं. 174/4 व 170/2 याचे पूर्ण पैसे मिळाले आहे असे घोषित करण्‍यात यावे व ते खाते बंद करण्‍यात यावे.
  2. तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्‍या वि.प.क्रं. 2 च्‍या दि. 02/05/08 च्‍या पत्रावरुन असे दिसून येते की, वन टाईम सेटलमेंटकरिता धनादेश हे तक्रारकर्ता यांनी नाही तर श्री. जितेंद्रकुमार घनश्‍यामदास अग्रवाल यांनी दिलेले आहेत. श्री. जितेंद्रकुमार अग्रवाल अथवा मे. राठी प्रतिष्‍ठान यांनी तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रार चालविण्‍याचे अधिकारपत्र दिल्‍याचे रेकॉर्डवरुन दिसून येत नाही.
  3. मे. राठी प्रतिष्‍ठान यांच्‍या लोनची पूर्ण परतफेड करण्‍यात आली अशी घोषणा करण्‍यात यावी अशी मागणी तक्रारकर्ता यांचेतर्फे करण्‍यात आली आहे. अशी घोषणा सविस्‍तर पुरावे तपासल्‍यानंतरच करता येवू शकते जे विद्यमान न्‍यायमंचाच्‍या संक्षिप्‍त कार्यपध्‍दतीद्वारा शक्‍य नाही.
  4. दि. 16/09/08 रोजी विद्यमान ग्राहक मंचात ग्राहक तक्रार क्रं. 60/08 ही दाखल करण्‍यात आली होती व ती दि. 17/09/08 रोजी मागे घेण्‍यात आली.या तक्रारीत सदर तक्रारकर्ता हे वि.प.क्रं. 3 असे दाखविण्‍यात आले होते. त्‍या तक्रारीत परिच्‍छेद क्रं. 4 मध्‍ये वि.प.क्रं. 1 यांनी वि.प.क्रं.3यांचे विरोधात को-ऑपरेटिव्‍ह कोर्ट, नागपूर येथे प्रकरण क्रमांक 1698 व 1703 हे दाखल केले व कोर्टाने अनुक्रमे रु.3,27,853/- व रु.58,133/- चा अवार्ड दिला असे लिहीले आहे. ग्राहक तक्रार क्रं. 60/08 व क्रं.61/08 मध्‍ये वि.प.क्रं. 1 व 2 हे सारखे आहेत हे येथे उल्‍लेखनीय आहे.
  5. तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्‍या शासन निर्णय क्रमांक युआरबी-1807/प्र.क्र.459/7-स दिनांक 10/03/08 च्‍या नागरी सहकारी बँकासाठीच्‍या एक रकमी कर्ज परतफेड योजनेच्‍या मार्गदर्शक सुचना परिशिष्‍ट ‘ अ’ (क) मध्‍ये म्‍हटले आहे की. जाणीवपूर्वक थकविलेल्‍या कर्जांना ही योजना लागू होणार नाही.
  6. वि.प.यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ कोणत्‍या प्रकरणांमध्‍ये द्यावा व त्‍यांच्‍या पॉलिसी मॅटरचा भाग आहे. विद्यमान मंचाला त्‍यामध्‍ये हस्‍तक्षेप करता येत नाही.
  7. सदरी तक्रार ही मंचात चालण्‍याच्‍या उद्देशाने तक्रारकर्ता यांनी माहिती लपविल्‍याचे वा तोडमोड करुन सादर केल्‍याचे दिसते. तक्रारकर्ता हे स्‍वच्‍छ हाताने विद्यमान मंचासमोर आलेले नाहीत. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या ‘ग्राहक’ या व्‍याख्‍येत बसत नाहीत. सदर विवाद हा ग्राहक वाद नाही. अश्‍या स्थितीत सदर ग्राहक तक्रार ही प्राथमिक अवस्‍थेत खारीज करण्‍यात येत आहे.
 
 
 
 
[HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.