Maharashtra

Nagpur

CC/11/612

Baiju Satyanarayan Verma - Complainant(s)

Versus

Janrao R. Bhoyar (Contractor) - Opp.Party(s)

Adv. R.G.Barai

10 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/612
 
1. Baiju Satyanarayan Verma
Railway Qtr.No.MAP-199-D, Ajani,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Janrao R. Bhoyar (Contractor)
49, Jat Tarodi No.1, Opp. Vaibhav Medical,
Nagpur
Maharashtra
2. Shridhar Tulsiram Suryawanshi
Railway Qtr.No. RBI-400-A, Ajani
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती गीता बडवाईक- सदस्‍यायांचे आदेशांन्‍वये)
 
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 10/12/2012)
 
1.          तक्रारकर्त्‍याच्‍या मालकीचा मौजा-बेसा, प्‍लॉट नं.128, डोबीनगर सोसायटी, नागपूर या प्‍लॉटवर घर बांधण्‍यासाठी दि.21.01.2001 ला विरुध्‍द पक्ष क्र.1 सोबत रु.5,75,000/- मधे करार केला. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने साक्षीदार म्‍हणून स्‍वाक्षरी केली, कराराप्रमाणे 5 महिन्‍यांत विरुध्‍द पक्ष क्र.1 ने बांधकाम पूर्ण करण्‍याचे कबुल केले, त्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.2 ने जबाबदारी घेतली. तक्रारकर्त्‍याने दि.22.01.2011 ते 11.08.2011 पर्यंत वेळोवेळी विरुध्‍द पक्ष क्र.1 ला रु.6,70,000/- दिले त्‍याची पावती म्‍हणून करारनाम्‍याच्‍या मागील बाजूला विरुध्‍द पक्ष क्र.1 ने लिहून दिले. दि.11.08.2011 पासुन विरुध्‍द पक्ष क्र.1 ने बांधकाम केले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांशी संपर्क साधला परंतु विरुध्‍द पक्षांनी बांधकाम पूर्ण करुन दिले, तसेच केलेल्‍या बांधकामाचा दर्जा बरोबर नाही, स्‍ल्‍ॅबची उंची कराराप्रमाणे 10 फूट नसुन 9 फूट आहे. संडास, बाथरुमला उत्‍तम प्रतिची टाईल्‍स लावली नाही, तसेच हॉलमधील टाईल्‍स व्‍यवस्थित फिट केलेली नाही. विरुध्‍द पक्षाने कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण केले नाही तसेच जास्‍तीची रक्‍कम प्राप्‍त करुन फक्‍त रु.2,42,608/- चे बांधकाम केलेले आहे व उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत केली नाही, या विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटींबाबत तक्रारकर्त्‍याने मंचात तक्रार दाखल केली आहे.
 
2.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीमधे घराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्‍याचे तसेच जास्‍तीची रक्‍कम रु.4,27,392/- व्‍याजासह परत करण्‍याची व शारीरिक, मानसिक नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चाची मागणी केली आहे.
3.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पृष्‍ठयर्थ दस्‍तावेज दाखल करण्‍याच्‍या यादी प्रमाणे एकूण 7 दस्‍त तक्रारीच्‍या पृष्‍ठ क्र. 8 वर दाखल केले.
            विरुध्‍द पक्षाला मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी त्‍याचे लेखी उत्‍तर दाखल केले. विरुध्‍द पक्षांचे लेखी उत्‍तर खालिल प्रमाणे...
4.          विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ता व त्‍यांचेमधे ऑगष्‍ट-2010 मध्‍ये घर बांधणीबाबत तोंडी करार केला व तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्ष पैसे देण्‍यांस दि.21.01.2011 ला सुरवात केल्‍यावर त्‍याच दिवशी करारनामा तक्रारकर्त्‍याच्‍या सांगण्‍याप्रमाणे तयार करण्‍यांत आला परंतु 5 महिन्‍यांत बांधकाम पूर्ण करणार हे करारनाम्‍यात नमुद नाही. तसेच वस्‍तुच्‍या किंमती वाढल्‍याने करारनाम्‍यात ठरविलेली रक्‍कम विरुध्‍द पक्षाला मंजूर नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून करारनाम्‍यात नमुद नसलेली जास्‍तीची कामे केली, परंतु त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केले नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या पसंतीप्रमाणे संडास, बाथरुम व किचनच्‍या टाईल्‍स लावण्‍यांत आल्‍या आहेत. तसेच हॉलमधील टाईल्‍स लावल्‍यावर ओल्‍या कामावर तक्रारकर्ता चालल्‍यामुळे त्‍या कोठे-कोठे खालीवर झाल्‍या आहेत. स्‍लॅबची उंची भुपृष्‍ठापासुन 10 फूटावर आहे, परंतु भुपृष्‍ठावर टाईल्‍स लावतांना मास कॉंक्रीटने फिटींग करतांना उंची ही कमी जास्‍त होत असते. करारनाम्‍या अंतर्गत घराचा मुळ आधार व कॉलम भराई वगैरेबाबत तक्रारकर्त्‍याने 30% पेक्षा रक्‍कम कमी दिली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या आर्किटेक्‍टचा रिपोर्ट हा करारनाम्‍यातील शर्ती व अटींचा तसेच वस्‍तुच्‍याबाजारभाव किंमतीचा विचार न करता केलेला आहे. त्‍यामुळे रिपोर्ट अविश्‍वसनीय असुन नामंजूर आहे. तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्यान्‍वये ‘ग्राहक’ नाही, तसेच तक्रार अपरिपक्‍व असल्‍यामुळे खर्चासह तक्रार खारिज करण्‍यांत यावी.
 
5.          विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी उत्‍तराच्‍या समर्थनार्थ दि.05.12.2011 च्‍या दस्‍तावेज दाखल करण्‍याच्‍या यादीप्रमाणे एकूण 4 दस्‍त पृष्‍ठ क्र.30 वर दाखल केलेले आहे.
6.          तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद, विरुध्‍द पक्षांचा लेखी उत्‍तर, दाखल केलेले दस्‍तावेज, तसेच विरुध्‍द पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर मंचासमोर पुढील प्रश्‍न उपस्थित होतो.
            तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यांस पात्र आहे काय ?
 
-          // कारणमिमांसा // -
 
7.       तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 यांच्‍यामधे तक्रारकर्त्‍याचे मौजा-बेसा, प्‍लॉट नं.128, डोबीनगर सोसायटी, नागपूर येथील घराचे बांधकाम करण्‍याचा लेखी करारनामा झाला असुन त्‍याअन्‍वये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ला रु.6,70,000/- वेळोवेळी नगदी दिले, याबाबत दोन्‍ही पक्षांना वाद नाही. मंचाने करारनाम्‍याचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, त्‍यामध्‍ये आर्थीक व्‍यवहार की स्‍टेज यांचा उल्‍लेख आहे, ज्‍यामधे फाऊंडेशन पूर्ण झाल्‍यावर 30% स्‍लॅब पूर्ण झाल्‍यावर 40% व फिनीशींग पूर्ण झाल्‍यावर 30% रक्‍कम देण्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने प्रत्‍येक टप्‍प्‍यावर एकमुस्‍त रक्‍कम दिली नसुन 15 वेळा रक्‍कम दिलेली आहे, हे स्‍पष्‍ट होते. तसेच करारनाम्‍यामध्‍ये अट क्र.7 मधे नमुद आहे की, ‘करारनामे मे लिखे हुये काम के व्‍यतिरीक्‍त ज्‍यादा का अलग टाईप का काम करना हो तो घरमालक और ठेकेदार चर्चा करके उसका अलगसे मार्केट रेट से भुगतान करना पडेगा’, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केले नाही की, ठरलेल्‍या रकमेपैकी त्‍यांनी विरुध्‍द पक्षाला जास्‍तीची रक्‍कम का दिली. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने जास्‍तीची रक्‍कम जास्‍तीच्‍या कामासाठी विरुध्‍द पक्षाला दिलेली आहे. तसेच करारनाम्‍यामधे नकाशाप्रमाणे तळमजल्‍यावर तीन कमरे व प्रथम मजल्‍यावरील दोन कमरे यांचाच बांधकामात समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने श्री. आर. बारई या आर्कीटेक्‍टचा रिपोर्ट दाखल केला आहे, तसेच विरुध्‍द पक्षाने श्री. डी. आर. खराबे, आर्कीटेक्‍टचा रिपोर्ट दाखल केला आहे. परंतु दोन्‍ही पक्षांनी संबंधीत आर्कीटेक्‍टचे शपथपत्र दाखल केले नाहीत. शपथपत्राशिवाय दोन्‍हीही अहवाल मान्‍य करता येत नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. यासाठी मंच मा. राष्‍ट्रीय आयोगाचा 2012 (1) CPR 42 NC Indian Institutes of Professional Studies –v/s- Smt. Rekha Sharma, “ Submission made without affidavit cannot be accepted in evidence”.  या निकालपत्राचा आधार घेत आहे.
 
8.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला रु.6,70,000/- देऊनही विरुध्‍द पक्षाने फक्‍त रु.2,42,608/- एवढयाच रकमेचे कार्यपूर्ण केले आहे, हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे मंचाला समर्थनीय वाटत नाही. विरुध्‍द पक्षाने संबंधीत बांधकामाचे फोटोग्राफ दाखल केले आहे. तक्रारकर्त्‍याने फोटोग्राफ्स अमान्‍य केले नाही, त्‍यामुळे उपरोक्‍त फोटोग्राफ्स वरुन विरुध्‍द पक्षाने कराराप्रमाणे बहुतांश कार्य पूर्ण केले आहेत. परंतु संपूर्ण बांधकाम पूर्ण केले नाही. दोन्‍ही पक्षांमध्‍ये झालेल्‍या कराराला पुन्‍हा लिहीण्‍याचा मंचाला अधिकार नाही, यासाठी मंच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या (I) 2006 (625) Supreme Court, LIC -V/s- Sindhu “The courtand Tribunal can not rewrite contracts”,  या निकालपत्राचा आधार घेत आहे.
9.          वस्‍तुंच्‍या किमती वाढल्‍या म्‍हणून करारनामा मंजूर नाही हे विरुध्‍द पक्षांचे म्‍हणणे समर्थनीय नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यासोबत घर बांधण्‍याचा करारनामा केला त्‍याअन्‍वये त्‍यांच्‍याकडून संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त करुनही त्‍यांना घराचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही, ही विरुध्‍द पक्ष क्र.1 ची कृती त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
10.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने लेखी उत्‍तरामधे मान्‍य केले आहे की, हॉलच्‍या टाईल्‍सची व्‍यवस्‍थीत फिटींग झालेली नाही, कारण तक्रारकर्ता ओल्‍या कामावरुन चालला असेल हे विरुध्‍द पक्ष क्र.1 चे म्‍हणणे मंचास समर्थनीय वाटत नाही, घराचा हॉल हा घराचा दर्शनीय भाग असतो व तेथील टाईल्‍सच्‍या दर्जावर घराचे सौंदर्य अवलंबुन असतो. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मेन हॉलमधील टाईल्‍स व्‍यवस्‍थीत लावुन द्याव्‍यात, तसेच करारनाम्यानुसार शिल्‍लक राहीलेले बांधकाम पूर्ण करुन द्यावे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
11.         विरुध्‍द पक्ष क्र.2 ने बांधकामाच्‍या करारनाम्‍यावर सही केली या कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या विरोधात तक्रार खारिज करण्‍यांत यावी, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, करीता आदेश.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.                  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.                  विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍याच्‍या मौजा-बेसा, प्‍लॉट नं.128, डोबीनगर सोसायटी, नागपूर येथील घराचे दि.21.01.2011 च्‍या कराराप्रमाणे शिल्‍लक राहीलेले बांधकाम पूर्ण करुन द्यावे. तसेच मेन हॉलमधील अव्‍यवस्‍थीत लावलेल्‍या टाईल्‍स व्‍यवस्थित व निटनेटक्‍या करुन द्याव्‍यात.
2.
3.                  विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई दाखल रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्च रु.2,000/- द्यावे.
3.
4.                  विरुध्‍द पक्ष क्र.2 विरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यांत येते.
4.
5.                  विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांच्‍या आंत करावी.
 
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.