Janata Nagari Sah Pat Sanstha Maryadit, V/S Sou Akkatai Balgonda Patil through Authority Holder-Shri Balgaonda Bhau Patil
Sou Akkatai Balgonda Patil through Authority Holder-Shri Balgaonda Bhau Patil filed a consumer case on 13 Aug 2010 against Janata Nagari Sah Pat Sanstha Maryadit, in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/154 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/154
Sou Akkatai Balgonda Patil through Authority Holder-Shri Balgaonda Bhau Patil - Complainant(s)
Versus
Janata Nagari Sah Pat Sanstha Maryadit, - Opp.Party(s)
S.M.Potdar
13 Aug 2010
ORDER
monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/154
1. Sou Akkatai Balgonda Patil through Authority Holder-Shri Balgaonda Bhau PatilAt Post Alate.Tal-Hatkanangale.Kolhapur
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होवूनही सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :-
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्कम
1.
436
16000/-
20.03.2007
20.03.2008
22560/-
2.
437
16000/-
20.03.2007
20.03.2008
22560/-
3.
438
12000/-
20.03.2007
20.03.2008
16300/-
4.
317
18000/-
22.12.2005
22.12.2009
26900/-
(3) सदर ठेवींपैकी काही ठेवींची मुदत संपलेली आहे तर काहींची अद्याप संपलेली नाही. तक्रारदारांना सदर ठेवींच्या रक्कमांची प्रापंचिक अडीअडचणी, मुलांचे शिक्षण- संगोपन, औषधोपचार व इतर कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी आवश्यकता असल्याने सामनेवाला यांचेकडे मागणी केली. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.29.12.2007, दि.12.03.2008 व दि.16.05.2009 रोजी लेखी अर्ज देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
(4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, ठेव मागणी अर्ज व संचालक मंडळाची यादी इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.1 ते 14 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 14 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(6) सामनेवाला क्र.15-श्री.बाबुराव मारुती माळी व सामनेवाला क्र.16-श्री.आण्णासो विठ्ठल पाटील यांना तक्रारदारांच्या विनंतीनुसार या मंचाच्या दि.15.06.2010 रोजीच्या आदेशान्वये प्रस्तुत प्रकरणांतून कमी करणेत आले आहे.
(7) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(8) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
436
16000/-
20.03.2007
20.03.2008
2.
437
16000/-
20.03.2007
20.03.2008
3.
438
12000/-
20.03.2007
20.03.2008
4.
317
18000/-
22.12.2005
22.12.2009
(4) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.