Maharashtra

Nagpur

CC/11/234

Shankarrao Anandrao Gid - Complainant(s)

Versus

Janata Gruha Nirman Sahakari Sanstha Maryadit - Opp.Party(s)

Adv.WADALKAR

17 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/11/234
1. Shankarrao Anandrao Gid673, New Subhedar Layout,NagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Janata Gruha Nirman Sahakari Sanstha Maryadit7, Madhur Milan Apartment, Raghuji NagarNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv.WADALKAR, Advocate for Complainant

Dated : 17 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 17/08/2011)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 02.05.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.                     प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार त्‍याने गैअर्जदार यांचेकडून मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, खसरा क्र.37/अ, तह. जिल्‍हा नागपूर येथील लेआऊट मधील भुखंड क्र.20 क्षेत्रफळ 1500 चौ. फूट एकूण रु.75,000/- एवढया मोबदल्‍यात खरेदी करण्‍याचा सौदा केला होता. उभय पक्षांमध्‍ये दि.07.04.2003 रोजी झालेल्‍या करारानुसार सदर रकमेपैकी तक्रारकर्त्‍याने बयाणापोटी रु.10,000/- तसेच दि.30.04.2003 रोजी रु.40,000/- गैरअर्जदाराला अदा केले. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला उर्वरित रक्‍कम रु.25,000/- स्विकारुन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याची विनंती केली असता गैरअर्जदारांनी सदरचे लेआऊट गैरकृषी झालेले नाही व नग रचना कार्यालयात लेआऊटचा नकाशा मंजूर व्‍हायचा असल्‍याचे कारण सांगून विक्रीपत्र करुन देण्‍यांस असमर्थता दर्शवून विक्रीपत्र करुन देण्‍याची मुदत दि.30.06.2006 पर्यंत वाढवुन दिली. त्‍यानंतर पुन्‍हा 30.05.2007 ते 30.10.2007 पर्यंत वाढवुन दिली, त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांची भेट घेतली असता त्‍यांनी विक्रीपत्राची मुदत सदरचे भुखंड गैरकृषी व टि.पी. झाल्‍यानंतर लेखी सुचना दिल्‍यापासुन एक महिन्‍याच्‍या आत विक्रीपत्र करुन घ्‍यावे से लिखीत स्‍वरुपात लिहून दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्ष भेटून गैरअर्जदारांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे म्‍हणून नोटीस पाठविला, परंतु त्‍यांनी नोटीस मिळूनही प्रतिसाद दिला नाही व तक्रारकर्त्‍यास विक्रीपत्र करुन दिले नाही. ही गैरअर्जदारांचे सेवेतील कमतरता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचात दाखल करुन गैरअर्जदारांनी रु.25,000/- घेऊन भुखंड क्र.20 चे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा रु.50,000/- दि.30.04.2003 पासुन द.सा.द.शे.18% व्‍याजासह परत करावे, मानसिक, शारीरिक त्रासाकरीता रु.25,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
3.                     सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍याची पोच प्रकरणात दाखल असुन ते मंचात उपस्थित न झाल्‍यामुळे मंचाने त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.01.07.2011 रोजी पारित केला.
4.                     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात करार बयाणापत्र, पावती, करार रशिद पावती, नोटीस, पोष्‍टाची रशिद, पोच पावती, इत्‍यादींच्‍या छायांकीत प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
5.                     सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्‍तीवादाकरीता दि.05.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्‍यातर्फे त्‍यांचे वकील हजर त्‍यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी आदेश पारित. सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                                           -// निष्र्ष //-
 
 
 
 
6.                     तक्रारकर्त्‍याची शपथेवरील तक्रार तसेच तक्रारीसोबत दाखल करार बयाणापत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे असे मत आहे की, निर्वीवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेसोबत झालेल्‍या करारानुसार त्‍यांचे मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, खसरा क्र.37/अ, तह. जिल्‍हा नागपूर येथील लेआऊट मधील भुखंड क्र.20 क्षेत्रफळ 1500 चौ. फूट एकूण रु.75,000/- एवढया मोबदल्‍यात खरेदी करण्‍याचा सौदा केला होता. सदर रकमेपैकी तक्रारकर्त्‍याने बयाणापोटी रु.10,000/- दि.14.12.2002 रोजी गैरअर्जदाराला दिले होते, तसेच उर्वरित रकमेपैकी पहिला हप्‍ता रु.40,000/- दि.25.04.2003 पूर्वी किंवा पर्यंत व दुसरा हप्‍त्‍यापोटी रु.25,000/- दि.11.12.2003 पूर्वी किंवा पर्यंत देण्‍याचे उभ पक्षात ठरले होते. त्‍यापैकी रु.40,000/- तक्रारकर्त्‍याने दि.30.04.2003 रोजी गैरअर्जदाराला अदा केलेले होते व उर्वरित रक्‍कम घेऊन विक्रीपत्र करुन देण्‍याची तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला वारंवार मागणी केल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरील कथन व इतर दस्‍तावेजांवरुन दिसुन येते. उभय पक्षांत झालेल्‍या करारानुसार विक्रीपत्र करुन घेण्‍याची मुदत दि.14.12.2002 ते 12.12.2003 पर्यत ठरलेली होती, ही बाब दस्‍तावेज क्र.1 ते 3 वरुन दिसुन येते, तसेच सदर भुखंडाचे विकीची मुदत वारंवार वाढवुन दिल्‍याचे दिसुन येते. सदर करारानुसार असेही ठरलेले होते की, गैरअर्जदारांनी भुखंड विक्रीचा नोटीस द्यावयाचा व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या मुदतीत भुखंडाचे विक्रीपत्र करुन घ्‍यावे. तसेच सदर भुखंडाची जागा गैरकृषी झाल्‍यावर संस्‍थेमार्फत विक्रीपत्र नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावयाचे होते, परंतु दाखल दस्‍तावेजांवरुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास विक्रीपत्राची नोटीस दिल्‍याचे दिसुन येत नाही, वरील भुखंड गैरकृषी झाल्‍याचा कुठलाही पुरावा सादर केला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारण्‍याकरीता गैरअर्जदाराने मंचात हजर होऊन आपला जबाबही सादर केलेला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे तक्रारीत तथ्‍य आहे, असे मंचाचे मत आहे.
 
7.          अश्‍या परिस्थितीत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास विक्रीपत्राची नोटीस देऊन त्‍याचेकडून उर्वरित रक्‍कम घेऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देणे संयुक्तिक राहील. तसेच कायदेशिर व तांत्रिक मुद्यांमुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसेल तर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली रक्‍कम त्‍यास व्‍याजासह परत करणे न्‍यायोचित राहील.
            वरील सर्व बाबी लक्षात घेता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंति दे //-
 
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारानी तक्रारकर्त्‍यास सदर मौजा-हुडकेश्‍वर, प.ह.क्र.137, खसरा क्र.37/अ,       तह. जिल्‍हा नागपूर येथील लेआऊट मधील भुखंड क्र.20 क्षेत्रफळ 1500 चौ. फूट     चे विक्रीपत्र करुन द्यावे. तसेच विक्रीपत्राचे वेळी तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना  भुखंडाची उर्वरित रक्‍कम रु.25,000/- द्यावी व विक्रीपत्राचा संपूर्ण खर्च, विकास      खर्च देण्‍यास तक्रारकर्ता जबाबदार राहील.
                             किंवा
      जर गैरअर्जदारास कायदेशिर व तांत्रिक मुद्यांमुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देणे     शक्‍य नसेल तर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून भुखंडा दाखल स्विकारलेले रु.50,000/-       दि.30.04.2003 पासुन द.सा.द.शे. 12% दराने रक्‍कम अदा होईपर्यंत व्‍याजासह     परत करावे.
3.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT