::: आ दे श :::
( पारित दिनांक : 24/02/2015 )
आदरणीय सदस्या, श्रीमती जे.जी.खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर फीर्याद प्रकरणात, तक्रारकर्ता/अर्जदार यांनी दिनांक
16/02/2015 रोजी लेखी पुर्सीस, रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे ः
सदर प्रकरण या न्यायमंचात दाखल असून, सदर प्रकरणाची संपूर्ण रक्कम मला मिळाली. करिता सदर प्रकरण मला पुढे चालविणे नाही. सदर प्रकरण काढून टाकण्यांत यावे.
अशास्थितीत, सदर फीर्याद प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर फीर्याद प्रकरण, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व सदर फीर्याद प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
गिरी एस.व्ही.