Maharashtra

Satara

CC/09/507

shivajoraw shirngaraw shinde - Complainant(s)

Versus

janae knstrkshn shri snjay jadhav - Opp.Party(s)

shinde

12 Feb 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

                      मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                         मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 507/2009.

                                                                                                           तक्रार दाखल दि.9-11-2009.

                                                                                                               तक्रार निकाली दि.12-2-2015. 

श्री.शिवाजीराव श्रीरंगराव शिंदे,

रा.5 सिध्‍देश्‍वर प्‍लाझा,

विसावा पार्क, सातारा.                ....  तक्रारदार 

         विरुध्‍द

श्री.संजय जाधव,

जानाई कन्‍स्‍ट्रक्‍शन्‍स,

रा.जनाई-मळाई मंदिराजवळ,

कोडोली, ता.जि.सातारा.               ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.शर्मिला शिंदे.

                 जाबदारातर्फे अँड.ए.ए.वाळिंबे.                

                                      न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

 

      तक्रारदारांनी त्‍यांचे मालकीची मौ.कोडोली येथील मिळकत विकसित करुन त्‍यावर बांधकाम करणेचे ठरविले.  त्‍यानुसार तक्रारदाराने श्री.मोने यांचकडून तळमजल्‍याचे स्‍लॅबचे सेंट्रींग काम करुन घेतले.  श्री.मोने यांनी काही कारणास्‍तव तेथून पुढे ते काम करणे शक्‍य नसल्‍याने तक्रारदारानी प्रस्‍तुत जाबदार संजय जाधव यांचेकडून उर्वरित बांधकामाचे सेंट्रींग व मजुरी काम करुन घेणेचे ठरविले.  जाबदाराने संमती दिलेनंतर जाबदाराने बांधकामास सुरुवात केली. जसजसे बांधकाम पूर्णत्‍वाकडे जाईल तसतशी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने तक्रारदाराने जाबदारास काही वेळा चेकने तर काही वेळा रोखीने रक्‍कम अदा केली आहे व त्‍याचे कच्‍चे टिपण वहीमध्‍ये करुन ठेवले आहे.  प्रस्‍तुत जाबदाराने ग्राऊंड फ्लोअरचे काम दोन महिन्‍यानी पूर्ण केले.  परंतु प्रस्‍तुत कामात बरेच दोष होते.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामात असलेल्‍या उणीवा दोष काढून देणेबाबत तक्रारदाराने जाबदारास वारंवार सूचना देऊनही जाबदाराने त्‍याकडे दुर्लक्ष केले व दोष दूर करुन दिले नाहीत.  तक्रारदाराने जाबदारास एकूण रक्‍कम रु.47,250/- (रु.सत्‍तेचाळीस हजार दोनशे पन्‍नास मात्र) अदा केली. तदनंतर तक्रारदाराचे कोणत्‍याही बांधकाम साहित्‍याचे दरपत्रक नाही ही बाब जाबदाराचे लक्षात आलेवर जाबदाराने रक्‍कम रु.45/-प्रति चौ.फुट प्रमाणे हि शोब करण्‍यास तक्रारदाराला जाबदाराने भाग पाडले, त्‍यानुसार तक्रारदाराने जादा रक्‍कम रु.5,000/- जाबदारास अदा केले परंतु त्‍यानंतरही वरील बांधकाम करणेसाठी वाढीव 10 टक्‍के दरवाढ दयावी असा आग्रह जाबदाराने धरल्‍याने तक्रारदाराने ते मान्‍य केले.  त्‍यानंतर जाबदाराने तक्रारदाराचे उर्वरित काम विलंबाने केले.  तक्रारदारानी जाबदारांना वेळोवेळी एकूण रक्‍कम रु.72,250/- अदा केले आहेत.  सदरचे काम करताना एक कॉलम वळंब्‍याचे बाहेर आल्‍याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले.  तो तक्रारदाराने स्‍वखर्चाने दुरुस्‍त करुन घेतला.  तदनंतर जाबदारांनी बांधकाम बंद ठेवले त्‍यामुळे तक्रारदारांची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे. पुन्‍हा तक्रारदाराने जाबदाराबरोबर तडजोडीची भूमिका घेऊन पुन्‍हा हिशोब केला, त्‍यानुसार रक्‍कम रु.23,533/- तक्रारदाराने जाबदाराला देणेचे ठरले.  परंतु जाबदाराने तरीही काम चालू केले नाही.  तक्रारदाराने जाबदाराना नोटीस पाठवली परंतु जाबदार हे तक्रारदारास भेटले नाहीत.  सबब तक्रारअर्ज कलम 12 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.8,09,860/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च मिळावा यासठी तक्रारदारानी सदर तक्रारअर्ज दाखल केला आहे. 

2.      सदर कामी तक्रारदारानी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/11 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे गट क्र.298/1, प्‍लॉट क्र.1, या मिळकतीचा 7/12 चा उतारा, तक्रारदार व जाबदाराचे दरम्‍यान काम करणेबाबत फायनल दराचे ठरलेले कच्‍चे टिपण, तक्रारदाराने जाबदाराला कामासाठी वेळवेळी दिलेल्‍या रकमांची व्‍हौचर्स, तक्रारदाराने जाबदाराना कामापोटी चेकने दिलेल्‍या रकमांचा हिशोब, तक्रारदाराच्‍या पासबुकमधील नोंदी, तक्रारदाराने घेतलेले कर्जमंजुरी पत्र, जाबदारानी तक्रारदाराना वेळोवेळी वेगवेगळया रकमांची दिलेली बिले व कामाची आयटम यादी, तक्रारदाराने जाबदाराना दिलेली नोटीस, जाबदाराला नोटीस मिळाल्‍याच्‍या पोहोचपावत्‍या, तक्रारदारानी पोलिस स्‍टेशन सातारा यांचेसमोर केलेली तक्रार, तक्रारदारानी श्री.उमेश भोसले शासकीय मान्‍यताप्राप्‍त मूल्‍यांकनकार यांचा अहवाल, नि.20 कडे जाबदाराने दाखल केलेले म्‍हणणे/कैफियत तक्रारदाराने दिलेले प्रतिउत्‍तर, नि.22 चे कागदयादीसोबत नि.22/1 ते नि.22/13 कडे अनुक्रमे तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या स्‍टीलचे डिलीव्‍हरी चलन, तक्रारदाराने जाबदाराच्‍या सांगण्‍यावरुन  खरेदी केलेल्‍या सिमेंटचे पोत्‍याचे डिलीव्‍हरी चलन, तक्रारदार भाडयाच्‍या घरात रहात असलेबाबत भाडयाच्‍या पावत्‍या, श्री.मोने यांची रेट लिस्‍ट, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेले पत्र, तक्रारदाराने जाबदाराविरुध्‍द दाखल केलेल्‍या पोलिस केसची प्रत, रविकिरण शिंदे, अभियंता यांचे प्रतिज्ञापत्र, श्री.जनार्दन कदम आर.सी.सी.डिझायनर यांचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदारांचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे इमारतीचा कॉलम नं.8 बाहेर आलेले तोडून काढताना घेतलेले फोटो, तक्रारदाराने जाबदाराचे खोलून ठेवलेले सेटींग मटेरियलचा फोटो, नि.25/1 कडे नि.25/1 कडे फोटोग्राफरचे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे मे.तत्‍कालीन मंचाने सदर तक्रारअर्जामध्‍ये दिलेला आदेश, नि.31 कडे  मे.राज्‍य आयोगाकडे दाखल पहिले अपील क्र.186/2010 च्‍या आदेशाची सहीशिक्‍कयाची नक्‍कल, नि.32 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.23 कडे तक्रारदारातर्फे श्री.उमेश भोसले व्‍हॅल्‍युएटर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.30 चे कागदयादीसोबत नि.30/1 कडे जाबदाराने रे.दि.मु.नं.15/10 मध्‍ये दिलेले सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, व सदर प्रतिज्ञापत्राला उलटतपास नि.30/2 कडे, नि.32 कडे जाबदाराने केलेल्‍या बांधकामाचा श्री.जनार्दन कदम, स्‍ट्रक्‍चरल इंजिनियर यांचा नकाशा, नि.33 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.37 कडे तक्रारदाराचा उपस्थित मुद्दयाबाबत युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत. 

3.     जाबदाराने सदर कामी नि.16 कडे म्‍हणणे/कैफियत, नि.17 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.19 चे कागदयादीसोबत नि.19/1 ते 19/4 कडे अनुक्रमे जाबदारामार्फत फोटोग्राफरने काढलेले फोटो, तक्रारदाराना जाबदाराने पाठवलेली नोटीस, पोस्‍टाच्‍या पोचपावत्‍या, फोटोग्राफरचे प्रतिज्ञापत्र, नि.25 कडे फोटोग्राफर श्री.जाधव यांचे प्रतिज्ञापत्र, नि.27 चे कागदयादीसोबत नि.27/1 व 27/2 कडे तक्रारदाराने जाबदाराविरुध्‍द मे.कोर्टात दाखल केलेले कॅव्‍हेटची प्रत, जाबदारांवर पोलिसांनी केलेल्‍या प्रतिबंधक कारवाईची प्रत, नि.34 कडे जाबदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.38 कडे जाबदारांचा संबंधीत लेखी युक्‍तीवाद, नि.28चे कागदयादीसोबत नि.28/1 ते 28/8 कडे अनुक्रमे इंजिनियर व गव्‍हर्नमेंट व्‍हॅल्‍युअर सुहास कान्‍हेरे यांनी दिलेला अहवाल, वाद मिळकतीचे फोटो, जाबदारानी दिलेले पहिल्‍या मजल्‍याचे कच्‍चे टिपण, जाबदाराने दिलेले पुढील मजल्‍याचे कच्‍चे टीपण, तक्रारदाराचे मिळकतीचा 8 अ चा उतारा, वाद मिळकतीचे फोटो, इस्‍माईल मकबूल शेख यांचा सरकारी बांधकाम परवाना, वगैरे कागदपत्रे जाबदाराने सदर कामी दाखल केली आहेत.  जाबदाराने त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतीत तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत.  त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत- तक्रारदारांनी त्‍यांचे घराचे काम पूर्वी श्री.रवी मोने यांस दिले परंतु तळमजल्‍याचे काम झालेनंतर तक्रारदार व श्री.मोने यांचेत व्‍यवहारावरुन भांडण झाल्‍यामुळे मोने अर्धवट काम सोडून निघून गेले.  त्‍यानंतर तक्रारदाराना स्‍लॅबचे उर्वरित काम करुन घेणेचे होते म्‍हणून तक्रारदाराने जाबदारांचा बांधकामातील अनुभव पाहून अर्धवट राहिलेले स्‍लॅबचे सेंट्रींग काम पूर्ण करुन देणेची विनंती केली त्‍यावेळी तक्रारदारास 10 फूट उंचीच्‍या स्‍लॅबचे सेंट्रींगसाठी रक्‍कम रक्‍कम रु.45/- प्रति चौ.फूट व 12 फूट ऊंचीच्‍या स्‍लॅब सेंट्रींगसाठी रु.54/- प्रति चौ.फूट असा दर जाबदाराने सांगितला होता. जाबदाराने पहिल्‍या स्‍लॅबसाठी 10 टक्‍के तर दुस-या स्‍लॅबसाठी 20 टक्‍के दर वाढ दयावी लागेल असे तक्रारदारास सांगितले होते, तसेच काम सुरु असताना काही रक्‍कम अँडव्‍हान्‍स दयावी लागेल असे सांगितले होते व काम पूर्णत्‍वाकडे जाईल तसे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पैसे दयावे लागतील असेही तक्रारदारास सांगितले होते.  तसेच बांधकाम मटेरियल तुम्‍ही उपलब्‍ध करुन देणेवर व पुढे येणा-या पावसावर कामाचा कालावधी अवलंबून असेल असेही जाबदाराने तक्रारदारास सांगितले होते.  तसेच या सर्व बाबी करारपत्रात नोंदवून घेऊ असे जाबदाराने तक्रारदारास सांगूनही तक्रारदाराने करारपत्र आज उदया करु असे कथन केले नाही.  जाबदाराने कामात जाणुनबुजून विलंब केलेला नाही.  त्‍यानंतर जाबदाराने तक्रारदारांकडे झालेल्‍या कामाचा हिशोब करुन  रक्‍कम सांगितल्‍यावर तक्रारदाराने जाबदाराला पैसे देणेस टाळाटाळ केली तरीही जाबदाराने दुस-या मजल्‍यावरील कॉलमचे व जिन्‍याचे काम तक्रारदाराचे देखरेखीखालीच व सूचनांनुसारच केले परंतु तक्रारदाराने कधीही ठरल्‍याप्रमाणे वेळेवर रक्‍कम जाबदारास दिली नाही त्‍यामुळे तक्रारदारानेच जाबदारांची फसवणूक केली आहे.  जाबदाराने ब-याचवेळी पदरमोड करुन कामगारांना पैसे दिले आहेत, सबब जाबदारांचे अतोनात नुकसान झाले आहे.  तसेच तक्रारदार हे जाबदारांचे बांधकामात काही माहीत नसताना अकारण चुका काढून पैसे देणेचे टाळत होते.  वस्‍तुतः सर्व काम जाबदाराने तक्रारदारांचे सूचनेनुसार व देखरेखीखाली  केलेले आहे त्‍यामुळे जाबदाराने केलेल्‍या कामात त्रुटी राहिल्‍या आहेत, ते सदोष आहे असे तक्रारदाराचे कथन खोटे असून मान्‍य नाही, या सर्व प्रकाराला कंटाळून तक्रारदाराचे काम जाबदाराने ऑक्‍टोबर 2009 मध्‍ये झाले कामाचा तक्रारदाराना हिशोब देऊन काम सोडण्‍याचे ठरवले.  यावर दि.8-10-2009 रोजी तडजोउ होउुन झालेने कामापोटी बाबी असलेले व दुस-या मजल्‍याचे बेडरुमचे स्‍लॅबसाठी कामाचे असे रक्‍कम रु.23,533/- तक्रारदाराने जाबदाराला देणेचे ठरले परंतु सदरचे काम दि.15-10-2009 पूर्वी पूर्ण करुन दयायचे कधीच ठरलेले नव्‍हते.  तसेच तक्रारदाराने लागणारे मटेरियल वेळेवर न पुरवलेने नाईलाजास्‍तव काम जाबदाराने बंद ठेवले.  अशी वस्‍तुस्थिती असतानाही तक्रारदाराने खोटी नोटीस पाठवली व सेंट्रींगचे साहित्‍य तक्रारदाराने सोडून ठेवले ते घेउुन जा असे जाबदारास कळविले.  दरम्‍यान दि.31-10-2009 रोजी तक्रारदाराचे पत्‍नीने जाबदाराविरुध्‍द खोटी फिर्याद दाखल केली.  अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदाराने दिले आहे.

4.    वर नमूद तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.              मुद्दा                                           उत्‍तर

 1. तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय?     होय.

 2. जाबदारानी तक्रारदाराला सदोष सेवा पुरवली आहे काय?                 होय.

 3. तक्रारदार नुकसानभरपाई रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय?             होय

 4. अंतिम आदेश काय?                             खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

विवेचन-

5.      वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी त्‍यांचे मालकी वहिवाटीचे मौ.कोडोली येथील सि.स.नं.298/1 फ्लॅट क्र.1 ही मिळकत विकसित करणेचे ठरवले त्‍याप्रमाणे श्री.मोने यांचेकडून तळमजल्‍याचे स्‍लॅबचे सेंट्रींग काम व त्‍यावरील ग्राऊंड फ्लोअरवर 8 फूट कॉलमचे सेंट्रींग मजुरी काम पूर्ण करुन घेतले होते.  श्री.मोने यानी पुढील काम करणे शक्‍य नसल्‍याने तक्रारदाराने उर्वरित बांधकामाचे सेंट्रींग मजुरी काम करणेसाठी प्रस्‍तुत जाबदाराना विचारणा केली, त्‍यास जाबदारानी संमती दिली व तक्रारदारांकडून अँडव्‍हान्‍स घेऊन प्रस्‍तुतचे काम जाबदाराने करणेचे मान्‍य केले.  प्रस्‍तुत कामी तक्रारदारानी सदर कामापोटी जाबदाराला वेळोवेळी चेकने व रोखीने रक्‍कम अदा केली आहे ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/11 कडील रोख रकमांचे व्‍हौचर्स तसेच नि.5/4 कडे दाखल पासबुकमधील नोंद यावरुन जाबदाराला तक्रारदाराने प्रस्‍तुत कामासाठी रकमा अदा केलेचे शाबीत होते.  म्‍हणजेच तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान तोंडी करार झाला असून प्रस्‍तुत करारास जाबदाराने संमती दिली आहे.  म्‍हणजेच भारतीय करारकायदयाप्रमाणे offer (प्रस्‍ताव)  Acceptance (स्विकृती)  consideration (प्रतिफळ) या बाबी पूर्ण झालेल्‍या असल्‍याने तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान सदरचा झालेला व्‍यवहार हा करार समजणेस योग्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब प्रस्‍तुत बाबी पूर्ण होऊन कागदोपत्री सिध्‍द झालेने तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत हे सिध्‍द होते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

6.         वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे बांधकामाचे काम जाबदाराने व्‍यवस्‍थीत दर्जेदारपणे केलेले नाही तर जाबदाराने केलेल्‍या कामात भरपूर त्रुटी आहेत असा टेक्निकल रिपोर्ट तक्रारदारातर्फे उमेश व्‍ही भोसले गर्व्‍ह.रजि.इन्‍कमटॅक्‍स व्‍हॅल्‍युअर व इंजिनियर यांनी मे.मंचात नि.22/4 कडे दाखल केला आहे.  तसेच प्रस्‍तुत रिपोर्ट सोबत वाद मिळकतीचे फोटो दाखल आहेत, ते ही स्‍वतः उमेश भोसले यांनी काढलेले असून सदर बांधकामात जाबदाराने केलेल्‍या त्रुटींबाबतचा सविस्‍तर उल्‍लेख प्रस्‍तुत टेक्निकल रिपोर्टमध्‍ये नमूद आहे व त्‍याचे पृष्‍टयर्थ प्रस्‍तुत उमेश भोसले इंजिनियर व्‍हॅल्‍युअर यांचे प्रतिज्ञापत्र/पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र नि.23 कडे दाखल आहे.  सदरचा टेक्निकल अहवाल हा स्‍वतः जागेवर जाऊन बांधकामाची पहाणी करुन दिल्‍याचे प्रतिज्ञापत्रात म्‍हटले आहे, म्‍हणजे प्रस्‍तुत अहवाल योग्‍य व बरोबर आहे असे म्‍हणणे मंचास योग्‍य वाटते कारण नि.28/1 कडे जाबदाराने सुहास कान्‍हेरे यांचा अहवाल दाखल केला आहे. त्‍यांनी प्रस्‍तुत अहवाल प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन बांधकामाची प्रत्‍यक्ष पहाणी केली नसल्‍याचे त्‍यांचे अहवालावरुन स्‍पष्‍ट होते.  त्‍यांनी बांधकामाचे फक्‍त फोटो पाहून, उमेश भोसले यांचे रिपोर्टबाबत व प्रतिज्ञापत्रावरुन अहवाल दाखल केला आहे. सबब प्रस्‍तुत अहवाल योग्‍य व बरोबर आहे असे म्‍हणता येणार नाही व विश्‍वासार्ह मानता येणार नाही.  सबब तक्रारदाराने दाखल केलेला नि.22/4 कडील रिपोर्ट हा विश्‍वासार्ह असून प्रस्‍तुत अहवालात बांधकाम दर्जेदार नसून त्‍यातील त्रुटींचे स्‍पष्‍टीकरण केलेले आहे.  तसेच प्रस्‍तुत अहवाल हा बांधकामाचे प्रत्‍यक्ष पहाणी करुन दिला असल्‍याने तो योग्‍य व विश्‍वासार्ह आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  सदर अहवालावरुन व प्रतिज्ञापत्रावरुन तसेच तक्रारदाराने नि.22/18 कडे दाखल फोटोवरुन तक्रारदारास बांधकामाचा कॉलम नं.8 हा ब्रेकरने फोडून काढावा लागला हे दिसून येते, तसेच नि.22/17 कडे श्री.दत्‍तात्रय बाळकृष्‍ण शिंदे यांचे प्रतिज्ञापत्रामध्‍ये हिशोबाचे वहीमध्‍ये सही केलेचे तसेच जाबदारानेही त्‍यांचे समक्ष सही केलेचे म्‍हटले आहे.  वरील सर्व कागदपत्रावरुन तक्रारदाराचे बांधकामात जाबदाराने त्रुटी केल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

 

7.    वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान मुद्दा क्र.1 मध्‍ये उल्‍लेख केलेप्रमाणे भारतीय करार कायदयानुसार तोंडी करार झाला व प्रस्‍तुत करारात ठरल्‍याप्रमाणे तक्रारदाराचे बांधकाम जाबदारांनी बहुतांशी पूर्णत्‍वास नेणेचा प्रयत्‍न केलेला आहे मात्र थोडया प्रमाणात काही अंशी त्रुटी या बांधकामात राहून गेलेल्‍या आहेत, परंतु या थोडया चुकांमुळे तक्रारदाराला नुकसान सोसावे लागले आहे.  बांधकामातील त्रुटींचे स्‍पष्‍टीकरण व दर्जा यांचे विश्‍लेषण श्री.उमेश भोसले यांनी नि.22/4 कडे दाखल टेक्निकल अहवालात नमूद आहे, परंतु तक्रारदाराने तक्रारअर्जात मागणी केलेल्‍या व उल्‍लेख केल्‍याप्रमाणे तक्रारअर्ज कलम 12 मध्‍ये उल्‍लेख केलेप्रमाणे तक्रारदाराचे रक्‍कम रु.8,09,860/- चे नुकसान झाले ही बाब सर्व कागदपत्रांचा उहापोह करता विश्‍वासार्ह वाटत नाही.  तरीही काही अंशी तक्रारदारांचे नुकसान झालेले आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच मे.दिवाणी न्‍यायालयात झालेल्‍या निकालाचा कोणताही आधार या कामी घेता येणार नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराना बांधकामातील कॉलम वळंब्‍यात न आल्‍याने फोडून काढून घ्‍यावा लागला, त्‍याबाबत रक्‍कम रु.2,500/- नुकसानभरपाई, तसेच पुन्‍हा कॉलम उभा करणेसाठी रक्‍कम रु.5,000/-, तक्रारदाराचे बांधकाम जाबदाराने थांबवल्‍याने तक्रारदाराला घरभाडे दयावे लागले.  त्‍या घरभाडयाच्‍या पावत्‍या नि.22/6, 22/7 व 22/8 कडे दाखल आहेत.  प्रस्‍तुत घरभाडे रक्‍कम रु.9,000/- तसेच तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- जाबदारांकडून तक्रारदारास मिळणे न्‍यायोचित होणार आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तक्रारदाराने तक्रारअर्ज कलम 12 मध्‍ये मागणी केलल्‍या नुकसानीबाबत योग्‍य तो पुरावा मे.मंचासमोर आणलेला नाही त्‍यामुळे इतर मागण्‍या सिध्‍द झालेल्‍या  नाहीत, सबब तक्रारदाराना जाबदारांनी नुकसानभरपाईपोटी वर नमूद केलेप्रमाणे कॉलम फोडून काढणेसाठी झालेला खर्च रु.2,500/-, पुन्‍हा कॉलम बांधकामासाठी झालेला खर्च रु.5,000/- तसेच तक्रारदारास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व घरभाडे रक्‍कम रु.9,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- असे एकूण रक्‍कम रु.29,500/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

8.    सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                          आदेश

1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदारांनी तक्रारदारांस वर नमूद केलेप्रमाणे एकूण रक्‍कम रु.16,500/-, नुकसानभरपाईची रक्‍कम अदा करावी.

3.  तक्रारदारास झालेल्‍या शारिरीक मानसिक त्रासापोटी जाबदाराने रक्‍कम रु.10,000/- अदा करावेत तसेच अर्जाचा खर्च रक्‍कम रु.3,000/- अदा करावा.

4.    सदर आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

5.   सदर आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.

6.   सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

7.   सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि.12-2-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

   

 

 

 

 

 

                      

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.