श्री. मिलींद केदार, सदस्य यांचे आदेशांन्वये. - आ दे श - (पारित दिनांक : 28/03/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याने सदर तक्रार गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द दाखल केलेली असून, तक्रारकर्त्याचे नुसार त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज दि.17.06.2010 ला सादर केला. सदर अधिनियमानुसार आवेदन प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक असूनसुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने सदर नियोजित कालावधीत माहिती तक्रारकर्त्याला पुरविली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने माहिती अधिकार अधिनियम 2010 अन्वये प्रथम अपील दाखल केले. परंतू तक्रारकर्त्याचे अपील दाखल केल्यानंतरसुध्दा निराकरण केले नाही व सेवेत त्रुटी दिली. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदार क्र. 1 ने मागितलेली माहिती पूरवावी, मानसिक, शारिरीक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी उत्तरासोबत तक्रारीवर काही प्राथमिक आक्षेप घेतले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याने द्वितीय अपीलाची तरतूद असतांना मंचाकडे तक्रार दाखल केली म्हणून खारीज होण्यास पात्र असल्याचे नमूद केले आहे. तसेच गैरअर्जदार कार्यालय हे शासकीय कार्यालय असल्याने सेवा देणारे कार्यालय या सदरात मोडत नाही. तसेच तक्रारकर्त्याने 30 दिवसाचे आत माहिती मिळण्याकरीता रितसर शुल्काचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही व तक्रारकर्त्याने घेतलेले इतर आक्षेप हे नाकारलेले आहेत आणि तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी पूरसिस दाखल करुन गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी उत्तर गैरअर्जदार क्र. 2 चेही ग्राह्य धरण्यात यावे असे नमूद केले. 5. सदर तक्रार युक्तीवादाकरीता मंचासमोर दि.14.03.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता गैरहजर. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील हजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याचे नुसार त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये दि.16.06.2010 रोजी अर्ज केला होता. त्याकरीता त्यांनी आवश्यक शुल्क भरले नाहीत. तक्रारकर्त्याने राष्ट्रीय आयोगाचे निवाडयानुसार तो ग्राहक संज्ञेत येतो असे म्हटले आहे. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात मा. राज्य आयोग मध्यप्रदेश 2002 (2) CPR 70 आणि इतर न्याय निवाडयाचा उल्लेख करुन तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत येत नाही असे नमूद केले आहे. रीव्हीजन पीटीशन क्र. 1975/05 , डॉ. एस. पी. थिरुमला राव वि. म्युनसिपल कमिश्नर, मैसूर सिटी म्युनिसीपल कॉर्पोरेशन नवि दिल्ली मध्ये राष्ट्रीय आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, माहिती मागविणारी व्यक्ती ही ग्रा.सं.का.चे ग्राहक संज्ञेत येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. गैरअर्जदार क्र. 2 हे अपीलीय अधिकारी आहेत व ते न्यायिक पध्दतीने अपीलाची सुनावणी करतात, त्यामुळे तक्रारकर्त्याला त्यांचा ग्राहक समजता येत नाही. तक्रारकर्ता हा फक्त गैरअर्जदार क्र. 1 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 कडे दि.16.06.2010 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज सादर केला होता ही बाब दस्तऐवज क्र. 1 वरुन स्पष्ट होते. परंतू गैरअर्जदाराने त्याचे उत्तरासोबत दाखल दस्तऐवज पृष्ठ क्र. 19 ते 26 वरुन माहिती घेऊन जाण्याकरीता आवश्यक शुल्क भरावे ही बाबसुध्दा गैरअर्जदार क्र. 1 ने सुचविलेली होती हे स्पष्ट होते. सदर पत्र हे तक्रारकर्त्यास 30 दिवसाच्या मुदतीत दिलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ची सदर प्रकरणात कुठलीही सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होत नाही. मंचास फक्त माहिती 30 दिवसात देण्याचा प्रयत्न केला किंवा नाही एवढेच ठरविण्याचा अधिकार आहे व या प्रकरणात गैरअर्जदाराची माहिती देण्याची मनिषा स्पष्ट होते व त्याकरीता तक्रारकर्त्याने आवश्यक शुल्क भरण्याकरीता सुचित केले होते. परंतू तक्रारकर्त्याने आवश्यक शुल्क भरले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराची सेवेत त्रुटी सिध्द होत नाही. 9. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 च्या विरुध्द अपील सादर केले होते, तेसुध्दा खारीज झालेले आहे असे दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे सिध्द होते व तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक ठरत नाही. त्यामुळे वरील सर्व निष्कर्षांच्या आधारे सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे, म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |