Maharashtra

Nagpur

CC/223/2017

Ravikant Baburao Gawai - Complainant(s)

Versus

Jalpraday Vibhag (Water Department), Nagpur Municipal Corporation - Opp.Party(s)

SELF

02 Jul 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/223/2017
( Date of Filing : 12 May 2017 )
 
1. Ravikant Baburao Gawai
R/o. Plot No. 7, Avdhoot Nagar, Near New Amar Nagar, Manewada, Nagpur 440034
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jalpraday Vibhag (Water Department), Nagpur Municipal Corporation
Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:SELF, Advocate
For the Opp. Party: ADV. NANDESH DESHPANDE, Advocate
Dated : 02 Jul 2019
Final Order / Judgement

 

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

          तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये                     प्रस्‍तुत तक्रार  दाखल केलेली आहे.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने तक्रारीत असे कथन केले आहे की,  तक्रारकर्ता हा प्‍लॉट क्रं. 7, अवधूत नगर, नागपूर येथे राहत असून तो नागपूर महानगरपालिकेचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याचा  ग्राहक क्रं. 10052179 असून नळ जोडणीचा मीटर क्रं.2012A2280129 असा आहे. त.क.च्‍या वापरात 15 एम.एम. नळ जोडणी असून नळ जोडणीचा प्रकार हा घरगुती आहे. विरुध्‍द पक्षाने  पाण्‍याचे वाटप आणि देयकाचे काम ऑरेंज सिटी नागपूर (O C W) यांच्‍या नियंत्रणात दिलेले आहे. तक्रारकर्त्‍याला दि. 01.10.2015 ते 30.09.2016 या कालावधीकरिता अवाजवी व अयोग्‍य पाण्‍याचे देयक दिली असल्‍याबाबतची ऑरेंज सिटी नागपूर (O C W) यांच्‍याकडे तक्रार आहे.
  2.       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला देयक दि. 11.10.2016,  दि. 01.07.2016 ते 30.09.2016 या तीन महिन्‍याच्‍या कालावधीकरिता एकूण वापर 113 युनिटकरिता थकबाकीसह एकूण रुपये 14,246/- चे देयक आकारले. त्‍यामध्‍ये मुदत पूर्वीची थकबाकी रुपये13,086/- व चालू देयक रुपये 1160/- चा समावेश आहे.  तक्रारकर्त्‍याला यापूर्वी 3 महिन्‍याची 2 देयके अ.क्रं. देयक दि. 16.10.2015, दि. 01.07.2015 ते 30.09.2015 या कालावधीकरिता 112 युनिट पाणी वापराचे देयक रुपये 1070/- व देयक दि. 10.04.2016 दि. 01.07.2016 ते 30.09.2016 या कालावधीकरिता 113 युनिट पाणी वापराचे देयक रुपये 1160/- असे देण्‍यात आले. वरील नमूद देयकापैकी तक्रारकर्त्‍याने देयक दिनांक 16.10.2015 रुपये 1070/- च्‍या देयकाचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याला दि.01.07.2015 ते 30.09.2016 पर्यंत विरुध्‍द पक्षाकडून वरील नमूद तीन देयका व्‍यतिरिक्‍त कोणतेही पाण्‍याचे देयक प्राप्‍त झाले नाही. तक्रारकर्त्‍याला देयक दि. 11.10.2016 अन्‍वये रुपये 14,246/- एवढया अवाजवी रक्‍कमेचे पाण्‍याचे देयक देण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या हनुमाननगर येथील कार्यालयाला दि. 25.10.2017 ला भेट दिली व अवाजवी दिलेल्‍या देयकाचा पुनर्विचार करण्‍याबाबत अर्ज सादर केला. तक्रारकर्त्‍याच्‍या सदरच्‍या अर्जाचा विचार करुन विरुध्‍द पक्षाने दि. 01.01.2015 ते 30.09.2016 या कालवधीचे रुपये11,396/- चे देयक दिले. ज्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार देयकामध्‍ये दर्शविण्‍यात आलेला कालावधी हा दि. 01.10.2015 ते 30.09.2016 असा पाहिजे होता. तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आलेले वरील नमूद देयक ही अवाजवी असल्‍यामुळे त्‍याने पुनःश्‍च दि. 30.11.2016 ला विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात देयकाचा पुनर्विचार करण्‍याबाबत अर्ज सादर केला असता त्‍यावर विरुध्‍द पक्षाच्‍या अधिका-यांनी मीटरच्‍या तपासणीबाबत  सल्‍ला दिला. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक शुल्‍क भरुन त्‍याच्‍या वापरात असलेले मीटर तपासणीकरिता दिले. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने दि. 02.01.2017 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या मीटरच्‍या जागी मास्‍टर मीटर लावले आणि त्‍यावेळी त्‍याचे मीटर वाचन क्रं. 1650.48 युनिट असे होते. त्‍यानंतर दिनांक 11.01.2017 ला सदरचे मास्‍टर मीटर काढून त्‍याठिकाणी तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेले जुने मीटर पुनःश्‍च लावण्‍यात आले. त्‍यावेळी मास्‍टर मीटरचे वाचन 1654.34 युनिट असे होते. यावरुन तक्रारकर्त्‍याचा दिनांक 02.01.2017 ते 11.01.2017 या 9 दिवसाच्‍या कालावधीचा पाण्‍याचा वापर हा 3.86 युनिट असा होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडून दि. 13.01.2017 ला त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या मीटरचे तपासणी प्रमाणपत्र प्राप्‍त झाले. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या मीटरमध्‍ये दोष नसल्‍याचे लक्षात आले.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याला देण्‍यात आलेल्‍या मीटर टेस्‍टींग प्रमाणपत्राबाबत तो समाधानी नव्‍हता. त्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाचे कार्यकारी अभियंता महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग यांच्‍याकडे वादातीत देयकाबाबत पुनःश्‍च विचार करण्‍याबाबत दि. 24.01.2017 ला अर्ज सादर केला. त्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पाठविलेल्‍या दि. 01.03.2017 च्‍या पत्रानुसार कळविले की, त्‍याच्‍या पाण्‍याच्‍या मीटरच्‍या वाचनानुसार देयक सुधारित करुन देण्‍यात आलेले आहे, मीटरची तपासणी केली असता मीटर हे योग्‍य आहे, त्‍यामुळे देण्‍यात आलेले देयक बरोबर असून त्‍याचा भरणा करुन सहकार्य करावे.
  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याच्‍या घरी वापरात असलेल्‍या मीटर ऐवजी विरुध्‍द पक्षाने मास्‍टर मीटर 9 दिवसाकरिता लावलेले होते. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचा रोजचा पाण्‍याचा वापर हा 0.42 युनिट असा दाखविण्‍यात आला व विरुध्‍द पक्षाने दि. 11.11.2016 रोजीचे दिलेल्‍या रिव्‍हाईज बिलानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या मीटरनुसार रोजचा पाणी वापर हा 1.79 युनिट आहे. जो की, मास्‍टर मीटरच्‍या रिडींगच्‍या 4 पट आहे. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या वापरात असलेले मीटरमधून दररोज पाण्‍याचा पुरवठा सुरु होण्‍यापूर्वी त्‍यामधून हवा निघते त्‍यावेळेसच पाण्‍याचे मीटर अतिवेगाने फिरण्‍यास सुरुवात होते व त्‍यानंतर पाण्‍याच्‍या पुरवठयामुळे मीटर फिरते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अनेक वेळा सूचना देऊन विनंती करुन ही त्‍याला देण्‍यात आलेले अवाजवी देयक कमी न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  2.       तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे दर त्रिमासिक रुपये 350/-प्रमाणे एकूण रुपये1400/- वादग्रस्‍त कालावधीकरिता आकारण्‍यात यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.
  3.          विरुध्‍द पक्ष यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8  वर दाखल केला असून तक्रारकर्त्‍याने तक्रारीत लावलेले आरोपाचे खंडन केलेले आहे. त्‍यात पुढे नमूद केले की, त्‍याने दि.01.10.2015 ते 30.09.2016 या कालावधीकरिता तक्रारकर्त्‍याला अवाजवी देयक आकारलेले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याच्‍या वापरात असलेले मीटर तपासणीकरिता अर्ज केला असता त्‍याने तक्रारकर्त्‍याचे मीटर बदलवून त्‍याऐवजी मास्‍टर मीटर लावले व मास्‍टर मीटर लावून त्‍याद्वारे देण्‍यात आलेला रिपोर्ट हा बरोबर आहे. तक्रारकर्त्‍याने कार्यकारी अभियंता महानगरपालिका यांच्‍याकडे दि. 24.01.2017 ला पाणी देयक दुरुस्‍ती करिता अर्ज केला होता व  त्‍यावर तक्रारकर्त्‍याला दि. 01.03.2017 रोजी पत्र देऊन तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आलेले पाणी देयक रिव्‍हाईज दराप्रमाणे देण्‍यात आल्‍यामुळे ते भरावे असे कळविले असल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे. विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आलेले पाणी देयक योग्‍य  असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  4.      उभय पक्षानी दाखल केलेले दस्‍तावेज,  लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारा‍र्थ घेऊन त्‍यावर खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविले.

 

मुद्दे                                             उत्‍तर

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ           होय
  2. काय आदेश ॽ                                    अंतिम आदेशाप्रमाणे   

 

                                                                                                 निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक – 1 व 2 बाबत -  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष नागपूर महानगरपालिकेचा ग्राहक असून त्‍याचा ग्राहक क्रं. 10052179 असा असून नळ जोडणीचा मीटर क्रं.2012A2280129 असा आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात 15 एम.एम. नळ जोडणी असून नळ जोडणीचा प्रकार हा घरगुती आहे. विरुध्‍द पक्षाने दि. 11.11.2016 रोजी तक्रारकर्त्‍याला दि. 01.10.2015 ते 30.09.2016 या कालावधीकरिता रुपये 11,396/- चे अवाजवी बिल दिले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे देयकाबाबत तक्रार केली व मीटर तपासणी करिता अर्ज सादर केला होता. त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या मीटरच्‍या जागी मास्‍टर मीटर बसविले, त्‍यावेळी मास्‍टर मीटरचे रिडिंग 1650.48 असे होते व दिनांक 11.01.2017 ला मास्‍टर  मीटर काढते वेळी मास्‍टर मीटरचे रिडिंग 1654.34 होते. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याचा 9 दिवसाचा पाणी वापर हा 3.86 युनिट असा होता. म्‍हणजेच तक्रारकर्त्‍याचा प्रति दिवस पाणी वापर हा 0.43 होता. यावरुन तक्रारकर्त्‍याचा त्रिमासिक पाण्‍याचा वापर 38.70 युनिट असल्‍याचे निदर्शनास येते. तसेच विरुध्‍द पक्षाने दि. 01.03.2017 रोजी तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या पत्रात तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेले मीटर हे योग्‍य असल्‍याचे नमूद केले आहे.
  2.      विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त वादग्रस्‍त कालावधीकरिता दिलेले रुपये 11,396/- चे देयक हे कोणत्‍या आधारावर दिले याबाबत काहीही खुलासा केलेला नाही किंवा त्‍यावेळेचे दरपत्रक ही अभिलेखावर दाखल केलेले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेले अवाजवी देयक हे रद्द करणे योग्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तसेच विरुध्‍द पक्षाने वादातील  कालावधीकरिता तक्रारकर्त्‍याला त्रिमासिक कालावधीकरिता 38.70 युनिट प्रमाणे पाण्‍याचे देयक द्यावे. त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याने देयक दि. 16.10.2015  दि. 01.07.2015 ते 30.09.2015 या कालावधीकरिता विरुध्‍द पक्षाकडे भरलेले पाण्‍याचे देयक रुपये 1070/- वजा करुन उर्वरित देयक तक्रारकर्त्‍याला कोणतेही अतिरिक्‍त शुल्‍क, व्‍याज न आकारता  द्यावे.

                  सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                                     अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वादग्रस्‍त कालावधी दि. 01.01.2015 ते 30.06.2016 पर्यंतचे दिलेले देयक दि.11.11.2016, रुपये 11,396/- या आदेशान्‍वये रद्द करण्‍यात येत आहे. 
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वादग्रस्‍त कालावधी दि. 01.07.2015 ते 30.09.2016 करिता त्रिमासिक 38.70 युनिट पाण्‍याच्‍या वापराप्रमाणे त्‍यावेळेसच्‍या प्रचलित दराने देयक द्यावे व त्‍यावर कोणतेही अतिरिक्‍त शुल्‍क, व्‍याज आकारण्‍यात येऊ नये.
  4. तक्रारकर्त्‍याने पाणी वापरापोटी विरुध्‍द पक्षाकडे दि.01.07.2015 ते 31.10.2015 या त्रिमासिक कालावधीकरिता जमा केलेले रुपये 1070/- चे देयक नव्‍याने देण्‍यात येणा-या देयकात समायोजित करावे.  
  5. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- द्यावा.
  6. वरील आदेशाची पूर्तता विरुध्‍द पक्षाला आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  7. उभय पक्षांना अंतिम आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  8. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’  व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.