जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 20/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 10/01/2011
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 09/08/2012
प्रभावती किशोर भोळे, ..........तक्रारदार
वय वर्षे सज्ञान धंदा घरकाम,
रा.48, गणेशवाडी,जळगांव.
विरुध्द
1. जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सो.लि , ..........विरुध्दपक्ष.
जळगांव,
रा.राजेंद्र निवास,33 नवीपेठ,जळगांव.
2. श्री.दिलीप राजमल झंवर(चेअरमन)
रा.111, पोलमपेठ,द्वारा-झंवर ब्रदर्स,जळगांव.
3. श्री.प्रभाकर वामन कोल्हे (व्हा.चेअरमन)
रा.प्रगती मेडीकल्स स्टोअर्स,राधाकिसनवाडी,जळगांव.
4. शाकीर अब्दुल सत्तार चित्तलवाला (संचालक)
रा.भारत डिस्ट्रीब्युटर्स, राधाकिसनवाडी,जळगांव.
5. श्री.निततीन मुन्नालाल लालापुरे (संचालक)
रा.गजानन मेडी.स्टोअर्स,पुष्पलता बेंडाळे चौक,
जळगांव.
6. अशोक आसकरण जैन (संचालक)
रा.अशोक एजन्सीज, बी.जे.मार्केट समोर,जळगांव.
7. शिरीष रामदास पाटील (संचालक)
रा.लक्ष्मी मेडीकल स्टोअर्स,नवीपेठ,जळगांव.
8. सुभाष फुलचंद चांदीवाल (संचालक)
रा.चांदीवाल ब्रदर्स,जुने बी.जे. मार्केट,जळगांव.
9. सुधीर गोपाळ बेडाळे (संचालक)
रा.बेंडाळे मेडिकल स्टोअर्स,नेहरु चौक,जळगांव.
10. सुनिल हरीभाऊ महाजन (संचालक)
11. दत्तात्रय हरीभाऊ महाजन (संचालक)
रा.दत्त मेडिकल स्टोअर्स,सावदा,
.रावेर जि.जळगांव.
12. श्री.उखा हिरामण महाजन (संचालक)
रा.महाजन मेडिकल स्टोअर्स,यावल ता.यावल,जि.जळगांव.
13. श्री.राजेश चांदमल काबरा (संचालक)
रा.काबरा मेडिकल स्टोअर्स,भुसावळ, ता.भुसावळ,
जि.जळगांव.
14. सौ.ज्योती तुषार वाघ (संचालीका)
रा.अनुश ट्रेड लिंक,नुतन मराठा समोर,जळगांव.
15. ज्योत्स्ना नंदकीशोर पाटील (संचालीका)
रा.नंदादिप मेडिकल स्टोअर्स, जिल्हापेठ,जळगांव.
( अ.क्र. 10 यांचेसमन्सची बजावणी अ.क्र. 1 वर बजवावी)
कोरम –
श्री. डी.डी.मडके. अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.डी.बी.सुर्यवंशी
विरुध्दपक्ष तर्फे अड.दिलीप बी.मंडोरे
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदतठेव गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सो.लि (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदतठेव रक्कम गुंतविली होती त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
पावती क्र. | जमा रक्कम | ठेव तारीख | देय तारीख | देय रक्कम |
23349 | 13,969 | 15/02/06 | 10/03/07 | 15,632 |
3. तक्रारदार यांनी सदर रक्कमेची मागणी पतसंस्थेत केली असता त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन बचत खात्यातील रक्कम व व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. परंतु विरुध्दपक्ष क्र. 10 ते हजर झाले नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश करण्यात आला. संस्था व इतर संचालक यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या खुलाशामध्ये तक्रारदार यांच्या मुदतठेव पावत्यांचा कालावधी संपलेला आहे व तक्रारदार यांनी त्यांच्याकडे रक्कमेची मागणी केली हे नाकारले आहे. सहकार क्षेत्रातील पतसंस्था व बँका यांचे पडझड झाल्यामुळे ठेवीदारांनी सप्टेंबर 2007 पासुन ठेवी परत मागण्यास सुरुवात केली त्यामुळे एकाच वेळी सर्वांना रक्कमा देणे शक्य नव्हते. तसेच कर्जदार यांनी ही हप्ते भरण्यास बंद केले त्यामुळे संस्थेने वसुलीसाठी अथक पयत्न चालु केले आहे. तसेच संचालक मंडळा विरुध्द महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये चौकशी होऊन जबाबदारी निश्चित झालेली नाही. त्यामुळे त्यांना व्यक्शिः रक्कम देण्यास जबाबदार ठरवता येणार नाही. शेवटी तक्रारदार व सोसायटीकडे घेणे असलेल्या इसमांना वसुलीनुसार रक्कम देण्यास संस्थेने कधीही नकार दिलेला नाही. त्यामुळे तक्रार रद्य करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये बचत खात्यात रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या बचत खात्यामधील व्याजासह जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सो.लि व संचालक मंडळ यांचेकडुन वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
8. वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सो.लि यांचेकडुन पतसंस्थेत जमा असलेली व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द पक्ष जळगांव जिल्हा मेडिसीन डिलर्स अर्बन को ऑप क्रेडीट सो.लि यांनी तक्रारदार यांना वरील आदेश कलम 2 मध्ये नमुद केलेल्या बचत खात्यातील रक्कमेवर देय तारखेनंतर एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत तसेच दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.500/- अदा करावेत.
(3) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव