(मंचाचे निर्णयान्वये, अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,प्रभारी)
(पारीत दिनांक : 29 ऑक्टोंबर 2010)
अर्जदार यांनी, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयद्याचे कलम 25 व 27 अन्वये, गैरअर्जदारांचे विरुध्द तक्रार क्र.9/2009 आदेश दि.24/12/2009 च्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दाखल केली असून, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 नुसार कारवाई करावी, अशी प्रार्थना केले आहे. सदर दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदाराविरुध्द समन्स काढण्यात आला. दरखास्त, न्यायप्रविष्ठ असतांना, गैरअर्जदार यांनी, ग्राहक तक्रार क्र.9/09 आदेश दि.24/12/09 च्या आदेशाची संपूर्ण पुर्तता केली आहे. गैरअर्जदार यांनी, आदेशाची पुर्तता केले आहे, त्यामुळे अर्जदार सदरहू दरखास्त चालवू इच्छित नाही, या आशयाची पुरसीस नि.18 नुसार दि.29.10.2010 रोजी मंचात दाखल केली. अर्जदारास, पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, त्यांनी गैरअर्जदाराने आदेशाची पुर्तता केल्यामुळे दरखास्त काढून टाकण्यात यावे, असे सांगीतले.
... 2 ... (चौ.अ.क्र.2/2010)
अर्जदार यांनी, नि.18 नुसार पुरसीस दाखल केल्यामुळे, दरखास्त अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे खारीज.
(By way of withdraw)
(2) गैरअर्जदाराचा बेल बॉंड या आदेशाव्दारे रद्द करण्यात येत आहे.
गडचिरोली.
दिनांक :- 29/10/2010.