Maharashtra

Nagpur

CC/10/579

Avinash Rajendrakumar Kalraiya - Complainant(s)

Versus

Jaina Marketing and Associates and other - Opp.Party(s)

Adv. M.S. Wakil

26 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/579
 
1. Avinash Rajendrakumar Kalraiya
Block No. 11, 2nd floor, Amar Apartment, Opp.VMV College, Wardhmannagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jaina Marketing and Associates and other
112-B, Sant Nagar, East of Kailash, New Delhi 110065
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. M.S. Wakil, Advocate for the Complainant 1
 Adv.Smt.S.S.Joshi, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्‍यक्ष)
(पारीत दिनांक 26 एप्रिल, 2012 )
1.   अर्जदार/तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली प्रस्‍तूत तक्रार गैरअर्जदार विरुध्‍द वि.न्‍यायमंचासमक्ष दाखल केली आहे.
 
2.   अर्जदार/तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, यातील गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे कॉर्बन भ्रमणध्‍वनीचे आयातक व  विक्रेते आहेत तर गैरअर्जदार/वि.प.क्रं 2 हे कॉर्पोरेट ऑफीस आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचेकथनावर विश्‍वास ठेऊन कॉर्बन भ्रमणध्‍वनी महाल, नागपूर येथील विक्रेते सौंदर्य संसार यांचे कडून कॉर्बन-के-332 हा भ्रमणध्‍वनी हॅन्‍डसेट दिनांक-03.03.2010 रोजी खरेदी केला.
 
3.    तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, भ्रमणध्‍वनी खरेदी करण्‍याचे दोन दिवसा नंतरच भ्रमणध्‍वनीचा टॉर्च बंद पडला. तक्रारकर्त्‍या जवळ अन्‍य भ्रमणध्‍वनी होता. भ्रमणध्‍वनी खरेदी केल्‍याचे प्रथम दिवसा पासून                  सदर भ्रमणध्‍वनी बंद दिसत असून तो प्रत्‍येक वेळेस सुरु करावा लागत होता.
 
 
                                              ग्राहक तक्रार क्र- 579/2010
 
भ्रमणध्‍वनीचा टॉकटाईम खूप कमी होता व रोज चॉर्ज करावा लागत होता. तसेच भारत संचार निगमचे सिमकॉर्ड नेटवर्क बरोबर नसल्‍याने बरोबर काम करीत नव्‍हते.
 
4.    त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराचे हिस्‍लॉप कॉलेज, नागपूर येथील अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशनवर तक्रार केली असता त्‍यांनी सांगितले की, या मॉडेलचा मूळातच (In Built) प्रॉब्‍लेम आहे कारण बॅटरी कम्‍पार्टमेंट मध्‍ये बॅटरी बरोबर बसत नाही व पॅकींग लावल्‍या शिवाय भ्रमणध्‍वनी काम करणार नाही, अन्‍य तक्रारी विषयी काहीही उत्‍तर दिले नाही.
5.    त.क. ने गैरअर्जदार क्रं 2 ला दिनांक 18.06.2010 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस कंपनी अस्तित्‍वात नाही या पोस्‍टाचे शे-यासह परत आली. जेंव्‍हा की, त.क.ने युजर मॅन्‍युअल वरील पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली होती. अशाप्रकारे वि.प.ने युजर मॅन्‍युअलवर खोटा पत्‍ता छापून फसवणूक केलेली आहे व वि.प.ने दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे त.क.ने नमुद केले.
 
6.    त्‍यानंतर त.क.ने वि.प.क्रं 1 ला दि.06.07.2010 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता ती दि.18.06.2010 रोजी मिळाली. त्‍यानंतर  वि.प.क्रं 1 तर्फे श्री गिरीश यांनी भ्रमणध्‍वनी क्रं 9310036555 वरुन त.क.शी संपर्क साधून भ्रमणध्‍वनी संबधाने विचारणा करुन बदलवून देण्‍याची हमी

 
                                                    ग्राहक तक्रार क्र- 579/2010
दिली. परंतु काहीही कारवाई न झाल्‍याने दिनांक-03.08.2011 रोजी पुन्‍हा वि.प.क्रं 1 ला  रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली परंतु उपयोग झाला नाही म्‍हणून शेवटी वि.मंचात प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असल्‍याचे नमुद केले.
 
7.    म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे त.क.यास झालेल्‍या गैरसोयी बद्यल व मानसिक त्रासा बद्यल रुपये-50,000/- नुकसान भरपाई मिळावी. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-50,000/- मिळावेत व नोटीस खर्च म्‍हणून रुपये-2000/- तसेच  तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/-  गैरअर्जदार कडून मिळावेत अशी मागणी केली.
8.    प्रस्‍तुत प्रकरणात यातील गैरअर्जदारांना रजिस्‍टर पोस्‍टाने न्‍यायमंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली.
 
9.    गैरअर्जदार/वि.प.क्रं 1 व 2 यांनी एकत्रितरित्‍या प्रतिज्ञालेखावर लेखी उत्‍तर पान क्रं-27 ते 30 वर दाखल केले. त्‍यांनी त.क.यांनी त्‍यांचे विरुध्‍द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत.  त.क.यांनी तक्रारीत नमुद केल्‍या प्रमाणे वि.प. चे सर्व्‍हीस स्‍टेशन मधून सदरचे भ्रमणध्‍वनीमध्‍ये मूळातच प्रॉब्‍लेम असल्‍याचे सांगण्‍यात आल्‍याची बाब नाकबुल केली. त.क.ची तक्रार पूर्णतः खोटी व चुकीची असल्‍याचे नमुद केले. त.क.ने कॉर्बन भ्रमणध्‍वनी विरुध्‍दपक्षाच्‍या अधिकृत विक्रेत्‍याकडून खरेदी केलेला नाही व त.क.ने कधीही वि.प.चे नागपूर येथील हिस्‍लॉप कॉलेज येथील अधिकृत सर्व्‍हीस स्‍टेशनवर तक्रारीची नोंद केली नाही. त.क.ने प्रस्‍तुत तक्रार खोटी दाखल केल्‍यामुळे ती
                                                    ग्राहक तक्रार क्र- 579/2010
 
रुपये-10,000/- दंडासह खारीज करण्‍यता यावा. त.क.ने तक्रारीतच मान्‍य केले की, वि.प.क्रं 1 यांनी त्‍याचेशी संपर्क केला व वि.प.क्रं 1 यांनी अधिकृत            सर्व्‍हीस  सेंटरमध्‍ये  भ्रमणध्‍वनी  देण्‍यास  सांगूनही  तो दिला नाही. वॉरन्‍टीचे काळात दुरुस्‍ती व बदल करु शकतात पण नुकसान भरपाई ते देऊ शकत नाही कारण यात वि.प.ची कोणतीही चुक नाही. सबब त.क.ची तक्रार खारीज करण्‍यात यावी, असा उजर वि.प.क्रं 1 व 2 यांनी घेतला.
 
10.   वि.प.क्रं 3 यांनी लेखी पुरसिस पान क्रं 37 वर दाखल करुन तीद्वारे वि.प.क्रं 1 व 2 चा लेखी जबाब हाच त्‍यांचा जबाब समजावा असे कळविले.
 
11.    त.क.ने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 9 वरील यादी नुसार एकूण 05 दस्‍तऐवज दाखल केले असून, त्‍यामध्‍ये देयक, नोटीस, नोटीसचा परत आलेला लिफाफा, परत दिलेली नोटीस, पोस्‍टाची पोच पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. त.क.ने पान क्रं 40 ते 46 वर आपले शपथपत्र दाखल केले.
 
12.   वि.प.क्रं 1 व 2 यांनी एकत्रित लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. अन्‍य दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या नाहीत. वि.प.क्रं 3 ने लेखी पुरसिसद्वारे वि.प.क्रं 1 व 2 यांचा लेखी जबाब हाच त्‍यांचा जबाब समजावा असे कळविले.


 
ग्राहक तक्रार क्र- 579/2010
13.   तक्रारकर्त्‍याची लेखी तक्रार, गैरअर्जदार/विरुध्‍दपक्षाचा लेखी जबाब आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज व उभय पक्षांचा  युक्‍तीवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्‍कर्ष ::
14. तक्रारदाराने निर्विवादपणे सौंदर्य संसार, महाल, नागपूर यांचे कडून कॉर्बन-K-332 हा भ्रमणध्‍वनी दि.03.03.2010 रोजी एकूण रक्‍कम                    रुपये-1650/- एवढया किंमतीत खरेदी केला होता.
15.   तक्रारदाराचे म्‍हणण्‍या नुसार सदर भ्रमणध्‍वनी हॅन्‍डसेट खरेदी केल्‍या नंतर त्‍यामधील हेड टॉर्च दोन तीन दिवसातच बंद पडला. तसेच तो वारंवार बंद पडत होता व त्‍यास वारंवार सुरु करावे लागत होते . सदर भ्रमणध्‍वनीचा टॉक टाईम सुध्‍दा कमी होता व तो वारंवार चॉर्ज करावा लागत होता कारण त्‍यातील चॉर्जींग लवकर उतरुन जात होते व भारत संचार निगमचे सिमकॉर्ड त्‍यामध्‍ये नेटवर्क बरोबर नसल्‍याने व्‍यवस्‍थीत काम करीत नव्‍हते.
16.   दाखल दस्‍तऐवजांचे व दोन्‍ही पक्षांचे शपथे वरील म्‍हणणे पाहता, निर्विवादपणे तक्रारदाराने सदर भ्रमणध्‍वनीमध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाल्‍या बाबत व तो बदलवून देण्‍या बाबतची गैरअर्जदार यांना दिनांक 18.06.2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये विनंती केली होती. तसेच गैरअर्जदार यांच्‍या प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाबा मध्‍ये त्‍यांनी त.क.चे तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 16 मधील मजकूर मान्‍य केलेला आहे. सदर परिच्‍छेदातील मजकूरात असे नमुद  केलेले आहे की, गैरअर्जदार क्रं 1 यांना तक्रारदाराने दिनांक-18.06.2010 रोजीचे पत्र पाठविले
 
ग्राहक तक्रार क्र- 579/2010
असता ते पत्र वि.प.क्रं 1 ला प्राप्‍त झाले, त्‍यांचेकडून श्री गिरीश यांनी त.क. सोबत संपर्क केला व भ्रमणध्‍वनीमधील त्रृटीचे संदर्भात विचारणा केली व त्‍यानंतर श्री गिरीश यांनी सदरचा भ्रमणध्‍वनी  हॅन्‍डसेट  बदलवून  देण्‍याची  हमी  दिली, हे तक्रारदाराचे विधान त्‍यांनी मान्‍य केलेले आहे. यावरुन तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या भ्रमणध्‍वनी हॅन्‍डसेट मध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला होता, ही बाब गैरअर्जदार यांनी मान्‍य करुन दुसरा हॅन्‍डसेट देण्‍याचे कबुल केले होते, त्‍याप्रमाणे गैरअर्जदार त.क.ला दुसरा नविन हॅन्‍डसेट बदलवून देण्‍यास जबाबदार आहेत.
17.      तक्रारदाराचे म्‍हणण्‍या नुसार त्‍यांनी, गैरअर्जदार क्रं 2 यांना त्‍यांचे  युजर मॅन्‍युअल वरील नमुद पत्‍त्‍यावर पत्र पाठविले असता “No such company” या पोस्‍टाचे शे-यासह पोस्‍टाचे पॉकीट  परत आले. त्‍यामुळे युजर मॅन्‍युअल वर गैरअर्जदार यांनी खोटा पत्‍ता नमुद करुन एक प्रकारे फसवणूक केलेली आहे आणि ही एक अनुचित व्‍यापारी प्रथा आहे व त्‍यापोटी झालेल्‍या मानसिक त्रासाबद्यल नुकसान भरपाईची मागणी तक्रारदाराने केलेली आहे.
 
18.     या संदर्भात स्‍पष्‍ट करण्‍यात येते की,  तक्रारदाराचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने गैरअर्जदार क्रं 2 ला पाठविलेल्‍या पत्‍त्‍यावर “No such company” या पोस्‍टाचे शे-यासह पॉकीट परत आले परंतु सदरची कंपनीच अस्तित्‍वात नाही या बाबत तक्रारदाराने सुस्‍पष्‍ट असा पुरावा न्‍यायमंचा समक्ष सादर केलेला नाही. तसेच प्रस्‍तुत तक्रारीत गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी त्‍यांचा शपथेवरील लेखी जबाब न्‍यायमंचा समक्ष दाखल केलेला  आहे, त्‍यामुळे तक्रारदाराची या मुद्यावरील नुकसान भरपाईची मागणी या न्‍यायमंचास मान्‍य करता येत नाही.
 
 
ग्राहक तक्रार क्र- 579/2010
19.     गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांचे असे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार क्रं 3 हे त्‍यांचे अधिकृत विक्रेता नाहीत परंतु सदरचा भ्रमणध्‍वनी हा गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी निर्माण केलेला असल्‍यामुळे त्‍यातील दोषा करीता निश्‍चीतच ते जबाबदार आहेत.
20.   गैरअर्जदार क्रं.3 यांनी दिलेल्‍या सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रं.3 यांना तक्रारदाराच्‍या नुकसानभरपाईस जबाबदार धरता येणार नाही.
21.. वरील सर्व वस्‍तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श 
 
1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार गैरअर्जदार क्रं 1 व 2 विरुध्‍द वैयक्तिक आणि
      संयुक्तिक स्‍वरुपात अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात  
      दि.03.03.2010 चे बिलात वर्णनातीत कॉर्बन के-332 त्‍याच मॉडेलचा
      व त्‍याच किंमतीत नविन सुयोग्‍य  भ्रमणध्‍वनी तक्रारदारास परत
      करावा व त्‍यानंतर त.क. कडील जुना वादातीत भ्रमणध्‍वनी परत
      घ्‍यावा.
4)   गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक
      त्रासा बद्यल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) आणि
      तक्रारखर्च म्‍हणून रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) द्यावे.
ग्राहक तक्रार क्र- 579/2010
5)    गैरअर्जदार क्रं 1 व 2 ने आदेशाचे अनुपालन, सदर निकालपत्राची प्रत
      प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे.
6)   गैरअर्जदार क्रं 3 यांना मुक्‍त करण्‍यात येते.
7)    निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्‍या द्याव्‍यात.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.