Maharashtra

Nanded

CC/15/337

Prakash urf Sangappa S/o,Mahalingappa Ghade, - Complainant(s)

Versus

Jain Finance, Through, Manager, - Opp.Party(s)

Adv.Bhura B.V.

07 Aug 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/337
 
1. Prakash urf Sangappa S/o,Mahalingappa Ghade,
R/o,Islapur Tq,Kinwat Dist,Nanded
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Jain Finance, Through, Manager,
Ayesha Complex, Bafana Road,Nanded
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                 निकालपत्र

(दि.07.08.2015)

(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्‍यक्ष)

 

1.           अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द ऑटो क्रमांक एमएच 26/जी 3837 चे आरसी बुक,एनओसी व इंशुरन्‍सची कागदपत्रे द्यावीत.  तसेच अर्जदारास झालेल्‍या मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/-, व्‍यवसाय बुडाल्‍यापोटी रक्‍कम रु.20,000/- व दावाखर्च रक्‍कम रु.5,000/- यासाठी सदरील तक्रार दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.          अर्जदाराचे म्‍हणणे असे आहे की, अर्जदाराने संजय तुमाने यांचेकडून वरील क्रमांकाचा ऑटो दिनांक 23.07.2011 रोजी खरेदी केलेला आहे.  संजय तुमाने  यांनी ऑटो खरेदीसाठी गैरअर्जदार जैन फायनान्‍स  कंपनी यांचेकडन कर्जाची रक्‍कम घेतलेली आहे. अर्जदाराने ऑटोचा सौदाचिठठी(विक्री करारनामा) तक्रारीसोबत जोडलेला आहे.  ऑटोचे मुळ मालक संजय तुमाने यांनी अर्जदारास ऑटो विक्री केल्‍यानंतर गैरअर्जदार यांचेकडून घेतलेल्‍या कर्जाचे †òग्रीमेंट अर्जदाराचे नावावर ट्रान्‍सफर केले असल्‍याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेला नाही.  तसेच अर्जदाराने जैन फायनान्‍स  कंपनी यांचेकडे भरलेल्‍या पावत्‍या गहाळ झालेल्‍या असल्‍याबद्दलचा पुरावा दाखल केलेला नाही.  तसेच वर्तमानपत्रामध्‍ये कागदपत्रे हरविलेली असल्‍याबद्दलची नोटीसीची प्रत तक्रारीसोबत दिलेली आहे.  अर्जदाराचा प्राथमिक युक्‍तीवाद ऐकला, त्‍यानंतर अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे आहे काय ?  हा प्राथमिक मुद्या उपस्थित होतो.  अर्जदाराने संजय तुमाने यांचेकडून ऑटो खरेदी केलेला आहे.  सदरील ऑटोचे मुळ मालक संजय तुमाने यांनी गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेतलेले असल्‍याने संजय तुमाने हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे.  अर्जदार यांचे म्‍हणणेनुसार अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे करारानुसार रक्‍कम जमा केलेली आहे.  परंतु त्‍याच्‍या पावत्‍या अर्जदाराकडून गहाळ झालेल्‍या आहेत. त्‍यासाठी अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्राची झेरॉक्‍स प्रत लावलेली आहे.  मुळ शपथपत्र तक्रारीसोबत अर्जदाराने दाखल केलेले नाही किंवा गैरअर्जदार व अर्जदार यांचेत रक्‍कम परतफेडीचा करार झालेला असल्‍याबद्दलचा कुठलाही पुरावा अर्जदाराने मंचासमोर दिलेला नाही.  त्‍यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन अर्जदार यांची तक्रार प्राथमिक अवस्‍थेत फेटाळण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.