Maharashtra

Bhandara

CC/13/26

Snehalkumar Shivdas Madame - Complainant(s)

Versus

Jaimal TVS Pvt. ltd. - Opp.Party(s)

Adv. D.N. Kamble

15 Nov 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/13/26
 
1. Snehalkumar Shivdas Madame
R/o. New Friends Colony, Khat Road, Bhandara
...........Complainant(s)
Versus
1. Jaimal TVS Pvt. ltd.
Near Indralok Sabhagruha, Bhandara
2. General Manager, TVS Motor Co. Ltd.
P.O.Box No. 4, Harita Hosure
Hosur
Tamilnadu 635109
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Nov 2016
Final Order / Judgement

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

आ दे श -

      (पारित दिनांक – 15 नोव्‍हेंबर, 2016)

 तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये   दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण खालीलप्रमाणे.

1.                 वि.प.क्र. 2 हे टी.व्‍ही.एस. कंपनीच्‍या वाहनाचे निर्माते असून वि.प.क्र. 1 त्‍यांचा अधिकृत विक्रेता आहे. तक्रारकर्त्‍याने दि.20.10.2011 रोजी रु.46,680/- किंमतीची टी.व्‍ही.एस. स्‍कुटी पेप (बबली) हे वि.प.क्र. 2 निर्मित दुचाकी वाहन क्र. MH 36 N 4618 इ.क्र.  OG3KA2260564, Ch.No. MD626 वि.प.क्र. 1 कडून खरेदी केले.    

                  सदर वाहनाला एक वर्षाची वारंटी वि.प.ने दिलेली होती. वारंटी काळात दि.24.09.2012 रोजी तक्रारकर्त्‍याचे वरील दुचाकी वाहन अचानक बंद पडले आणि प्रयत्‍न करुनही चालू झाले नाही.  तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 ला फोन केल्‍यावर त्‍यांचा मेकॅनिक येऊन वाहन दुरुस्‍तीसाठी घेऊन गेला. वि.प.क्र. 1 ने सदर वाहन तीन दिवसांनी सर्विसिंग व दुरुस्‍ती करुन तक्रारकर्त्‍यास परत केले. परंतू दि.27.09.2012 रोजी पुन्‍हा सदर वाहन बंद पडले असता तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 ला फोनद्वारे संपर्क केला असता त्‍यांच्‍याकडून कोणताही प्रतिसाद मिळाली नाही म्‍हणून तक्रारकर्ता सदर वाहन दुरुस्‍तीसाठी स्‍वतः वि.प.क्र. 1 कडे घेऊन गेला. वि.प.क्र. 1 ने वाहनाची दुरुस्‍ती करुन दिली परंतू त्‍यांनतर पुन्‍हा दि.29.10.2012  रोजी वाहन बंद पडले. तक्रारकर्त्‍याने वाहन दुरुस्‍तीस वि.प.क्र. 1 कडे नेले असता त्‍यांनी दुरुस्‍ती करुन देण्‍यास टाळाटाळ केली.

                  वरीलप्रमाणे तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले वाहन वारंटी काळातच सतत बंद पडून दुरुस्‍तीस न्‍यावे लागत असल्‍याने सदरचे वाहनात निर्मिती दोष असल्‍याचे सिध्‍द होते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता आर. जी. शहारे यांचेमार्फत वि.प.क्र. 1 व 2 यांना दि.01.11.2012 रोजी नोटीस पाठवून  तक्रारकर्त्‍यास विकलेले सदोष वाहन बदलवून द्यावे किंवा वाहनाची किंमत रु.46,680/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह परत करावी, तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान द्यावी म्‍हणून मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.क्र.. 1 व 2 यांनी नोटीसची पूर्तता केली नाही  सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

1)    वि.प.क्र. 1 व 2 यांचेविरुध्‍द तक्रारकर्त्‍यास विकलेले सदोष वाहन बदलवून देण्‍याचा      किंवा वाहनाची किंमत रु.46,680/- ऑक्‍टोबर 2011 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचा  आदेश व्‍हावा.

2)    शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- मिळावी.

3)    तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा.

 

                  आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने टॅक्‍स इनव्‍हाईस, रजिस्‍ट्रेशन इनव्‍हाईस, अॅसेसरीज इनव्‍हाईस, पावती, फॉर्म टी.सी., मोटार वाहन विभागाची पावती, रजिस्‍ट्रेशन, सर्विस इनव्‍हाईस, रजि. नोटीस, पोस्‍टाच्‍या पावत्‍या आणि पोचपावती या दस्‍तऐवजांच्‍या प्रती तक्रारीसोबत जोडलेल्‍या आहेत.

2.                वि.प.क्र. 1 ला नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा मंचाने आदेश केलेला आहे. वि.प.क्र.  2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे वि.प.क्र. 2 निर्मित वाहन वि.प.क्र.1 कडून खरेदी केल्‍याचे मान्‍य केले आहे. मात्र सदर वाहनात कोणतेही निर्मिती दोष असल्‍याचे नाकबूल केले आहे.

                  तक्रारकर्त्‍याने ग्राहक पुस्तिकेतील सुचनांप्रमाणे वाहनाची योग्‍य काळजी घेतली नाही, त्‍यामुळे वाहनात जर दोष निर्माण झाला असेल तर त्‍याची जबाबदारी निर्मात्‍यावर किंवा विक्रेत्‍यावर नसल्‍याचे म्‍हटले आहे.

                  त्‍यांचे पुढे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने वाहनाची सर्वीसिंग वेळोवेळी करुन घेतली नाही.  वि.प.क्र. 1 कडे तक्रारकर्त्‍याने ज्‍या-ज्‍यावेळी वाहन दुरुस्‍तीकरीता आणले त्‍यांनी ते तज्ञ व्‍यक्‍तीकडून दुरुस्‍त करुन दिले आहे आणि तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत समाधान व्‍यक्‍त केले आहे. त्‍यामुळे वि.प.क्र. 1 किंवा 2 कडून सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार झालेला नाही. वि.प.ने म्‍हटले आहे. वि.प.क्र. 2 कंपनी वाहन बाजारात पाठविण्‍यापूवी ते निर्दोष असल्‍याची सर्वतोपरी चाचणी करुन घेते. तक्रारकर्त्‍याला विकलेले वाहनात निर्मिती दोष असल्‍याचा कोणताही पुरावा तक्रारकर्त्‍याने सादर केलेला नाही.  वि.प.क्र. 2 यांनी वि.प.क्र. 1 ला वाहन विक्री केले असून त्‍यांनी ते तक्रारकर्त्‍यास विकलेले आहे त्‍यामुळे वि.प.क्र. 1 हे वि.प.क्र. 2 चे एजंट नाही आणि त्‍यामुळे वि.प.क्र. 1 च्‍या कोणत्‍याही कृतीस वि.प.क्र. 2 कायद्याने जबाबदार नाही. तक्रारकतर्याने दि.20.10.2011 रोजी वाहन खरेदी केल्‍यानंतर प्रथम सर्विसिंगसाठी वि.प.क्र. 1 कडे 25.11.2011 रोजी आणिले होते आणि त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे समाधान होईल अशाप्रकारे सर्विसिंग करुन दिली होती. त्‍यानंतर दुसरी व तिसरी सर्विसिंग दिलेल्‍या कालावधी न करता दि.21.07.2012 रोजी तक्रारकर्त्‍याने वाहन सर्विंसिंगकरीता वि.प.क्र. 1 कडे आणले होते. वेळ निघून गेल्‍यानंतरही वि.प.क्र. 1 ने सदर सर्विसिंग मोफत करुन दिली होती. तक्रारकर्त्‍याने वाहन बंद पडले म्‍हणून वि.प.क्र.र. 1 ला फोन केल्‍यानंतर वि.प.क्र. 1 ने ती विनामुल्‍य दुरुस्‍त करुन दिली होती. त्‍यानंतर 03.08.2012 रोजी किकमध्‍ये समस्‍या निर्माण झाली म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र.1 कडे गाडी आणली असता त्‍या समस्‍येचे देखिल विनामुल्‍य निवारण करण्‍यात आले. दि.19.09.2012 रोजी स्‍टार्टींग प्रॉब्‍लेमची तक्रार घेऊन तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 कडे गाडी नेली असता त्‍यांनी ती दुरुस्‍त करुन दिली आणि त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने समाधान व्‍यक्‍त केले होते आणि दहापैकी आठ गुणांचे रेटींग दिले होते. प्रत्यक्षात गाडीचे काम करणा-या मेकॅनिककडे चौकशी केली असता गाडीत कोणताही स्‍टार्टींग प्राब्‍लेम नव्‍हता तसेच निर्मिती दोष नसल्‍याची माहिती मिळाली आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी असल्‍याने एक वर्षापेक्षा अधिक काळ चाललेले वाहन बदलवून मिळण्‍यास किंवा पर्यायी मागणीप्रमाणे गाडीची किंमत परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र नाही म्‍हणून तक्रार खर्चासह खारिज करण्‍याची वि.प.क्र. 1 ने विनंती केलेली आहे.

3.                तक्रारीच्‍या निर्णितीसाठी खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.            

            मुद्दे                                              निष्‍कर्ष

1)    वि.प.क्र. 1 व 2 यांनी सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?     होय.                2)    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?                अंशतः.           3)     आदेश काय ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे.

- का र ण मिमां सा  -

4.         मुद्दा क्र.1 नुसार सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 निर्मित तक्रारीतील स्‍कूटी पेप (बबली) वि.प.क्र.1 कडून दि.20.10.2011 रोजी रु.46,680/- ला खरेदी केल्‍याबाबत पावतीची प्रत दस्‍तऐवज क्र. 1 ते 3 वर दाखल केली असून सदर बाब वि.प.क्र. 2 ला मान्‍य आहे. वि.प.क्र. 1 ने देखिल लेखी जवाब दाखल करुन सदरची बाब नाकबूल केलेली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, तक्रारीतील वाहन खरेदी केल्यानंतर  लगेच त्‍यांत बिघाड झाल्‍याने वारंटी काळात दि.24.09.2012 रोजी बंद पडल्‍याने वि.प.क्र.1 ने मेकॅनिक पाठवून दुरुस्‍तीसाठी नेले आणि जुजबी दुरुस्‍ती करुन दिली. परंतू पुन्‍हा दि.27.09.2012 रोजी सदर वाहन बंद पडल्‍याने तक्रारकर्त्‍याने ते पुन्‍हा वि.प.क्र. 1 कडे दुरुस्‍तीसाठी नेले. वाहन पूर्णपणे दुरुस्‍त झाले असे सांगून वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्‍यास ते परत केले परंतू  पुन्‍हा 29.10.2012 रोजी ते बंद पडले. तक्रारकर्त्‍याने दुरुस्‍तीसाठी सदर वाहन पुन्‍हा वि.प.क्र. 1 कडे नेले असता त्‍यांनी ते दुरुस्‍त करुन देण्‍यास टाळाटाळ केली. वारंटीच्‍या काळात तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले वाहन वेळोवेळी बंद पडणे आणि वि.प.क्र. 1 ने प्रयत्‍न करुनही ते पूर्णपणे दुरुस्‍त न होणे यावरुन सदर वाहनात निर्मिती दोष असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. वि.प.क्र. 1 व 2 यांनी निर्मिती दोष असलेले वाहन तक्रारकर्त्‍यास विकले आणि वारंटी काळातदेखिल ते पूर्णपणे दुरुस्‍त करुन दिले नाही आणि  तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 व 2 ला दि.01.11.2012 रोजी दस्‍तऐवज क्र. 9 प्रमाणे नोटीस पाठवून सदोष वाहन बदलवून देण्‍याची मागणी केली. परंतू ते बदलवून दिले नाही किंवा वाहनाची किंमत परत केली नाही. सदरची बाब ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे.  

                  तक्रारकर्त्‍याच्‍या नविन वाहनाला एक वर्षाच्‍या कालावधीत त्‍याच-त्‍याच दुरुस्‍तीसाठी 3 वेळा वि.प.क्र. 1 कडे नेऊनही दोष पूर्णपणे दुरुस्‍त झाले नाही ही वस्‍तूस्थिती वाहनात निर्मिती दोष असल्‍याचे सिध्‍द करण्‍यास पूरेशी असून त्‍यासाठी वेगळया तज्ञ अहवालाची आवश्‍यकता नाही. सदर मुद्यावर खालील न्‍यायनिर्णय प्रकाश टाकणारे आहेत.  

1)         II (2010) CPJ 39 (NC), Wipro Limited vs Toppers Multimedia Pvt. Ltd. & ors.

सदर न्‍याय निर्णयात खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“Repeated failure of key components, frequently visits of engineer to rectify defective components proved. Manufacturing defects in system proved. Manufacturer and Dealer jointly and severally held liable for replacement/refund of cost.”

2)         IV (2010) CPJ 311 (NC), Jagrut Nagrik & anr. vs Baroda Automobiles Sales and Service. & ors.

सदर न्‍याय निर्णयात खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“Complainant had not produced any automobile engineer or expert to establish that defects are manufacturing ones.

            However, car suffered from one or other defects, some of which persisted even after repairs, causing inconvenience and harassment to complainant. Respondents to pay jointly and severally to complainant expenses incurred in repairs alongwith compensation.”

3)         IV (2010) CPJ 160 (Gujrat State Consumer Disputes Redressal Commission), Makwana Bharatkumar Jethalal vs Panjab Automobiles & ors.

सदर न्‍याय निर्णयात खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“Complainant had proved that the motor cycle was defective from very beginning. Onus shifts on O.P. to prove by expert evidence that there is no defect or defect is repaired.

            Inherent manufacturing defect is not established but non establishment of manufacturing defect does not mean that vehicle was not otherwise defective.”  

4)         II (2005) CPJ 519 (Chattisgarh State Consumer Disputes Redressal Commission, Raipur), Mahindra & Mahindra Limited & anr. vs Najim Khan. & anr.

सदर न्‍याय निर्णयात खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“Vehicle developed faults. Gear box started malfunctioning during period of warranty. The defects continued despite repairs manufacturing defects in vehicle proved.”

5)         II (2001) CPJ 210 (Kerala State Consumer Disputes Redressal Commission), M/s. HCL Limited  vs Reji K. Varghese

सदर न्‍याय निर्णयात खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“The defects arose during the warranty period had continues recurring and if defects still persist, even though the warranty period expired since the defect originated during warranty period and the same could not be successfully cured, it can not be maintain that the complainant is not a consumer as the warranty period expired.”

                   याउलट, वि.प.क्र. 2 ने आपल्‍या लेखी जवाबात म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍यास विकलेले वाहन निर्मितीचे वेळी आणि बाजारात पाठविते वेळी पूर्णपणे चाचणी केलेले आणि कोणतेही निर्मिती दोष नसलेले होते. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन 11 महिने चालविल्‍यानंतर त्‍यात काही किरकोळ स्‍वरुपाच्‍या तक्रारी उद्भवल्‍या आणि त्‍यांचे योग्यप्रकारे निवारण वि.प.क्र. 1 ने करुन दिलेले आहे. सदर वाहनात निर्मिती दोष असल्‍याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नाही. त्‍यामुळे वि.प.कडून सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब घडलेला नाही.  

                  तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद, वर नमूद केलेले न्‍यायनिर्णय  तसेच वि.प.क्र.2 च्‍या लेखी जवाबाचा विचार करता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले वाहन वारंटी काळात नादुरुस्‍त झाल्‍यामुळे वि.प.क्र. 1 कडे  ते 24.09.2012, दि.27.09.2012 व 29.10.2012  तीन वेळा दुरुस्‍तीस न्‍यावे लागले. मात्र तरीही ते पूर्णपणे दुरुस्‍त झाले नाही हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे वि.प.क्र. 1 ने लेखी जवाब दाखल करुन नाकारलेले नाही.  वारंटी काळात नादुरुस्‍त झालेले वाहन पूर्णपणे दुरुस्‍त करुन न देणे आणि तक्रारकर्त्‍याने सदोष वाहनाऐवजी नविन वाहन देण्‍याची किंवा वाहनाची किंमत परत देण्‍याची नोटीसद्वारे मागणी करुनही त्‍याची पूर्तता न करणे ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

5.                मुद्दा क्र.  2 व 3 बाबत तक्रारकर्त्‍याने शपथपत्रावरील तक्रारीत असे कथन केले आहे कि, तक्रारीतील वाहन दुरुस्‍तीसाठी वि.प.क्र. 1 कडे 24.09.2012, दि.27.09.2012 व 29.10.2012 रोजी दिले तरीही ते पूर्णपणे दुरुस्‍त झाले नाही, त्‍यामुळे सदरचे वाहन बदलवून मिळावे. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर वाहन दुरुस्‍तीवर कसा व किती खर्च केला आहे याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्ता किंवा वि.प. यांनी दिलेला नाही. सदर वाहनाची तज्ञामार्फत तपासणी करुन घेतली नसल्‍याने वाहनाची सद्यस्थिती काय आहे याबाबत अंदाज करता येत नाही म्‍हणून वाहनात असलेले निर्मिती दोष किंवा वारंटी काळात निर्माण झालेले दोष दूर करुन वाहन नविन वाहनाप्रमाणे दोषमुक्‍त  करुन देण्‍याची संधी वि.प.ला देणे आणि ते वाहन नविन वाहनाप्रमाणे दोषमुक्‍त होऊ शकत नसेल तर तक्रारकर्त्‍यास वि.प.ने विकलेल्‍या सदोष वाहनाचे बदली नविन वाहन देण्‍याचा किंवा तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली वाहनाची किंमत देण्‍याचा वि.प.ना आदेश देणे न्‍यायोचित होईल. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश परित करीत आहे.

-        आ दे श

तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालील तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द वैयक्तिक व संयुक्‍त रित्‍या खालीलप्रमाणे  अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

1.  वि.प.नी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत नमुद टी.व्‍ही.एस. स्‍कुटी पेप (बबली) हे वाहन नोंदणी क्र. MH 36 N 4618 ची विनामुल्‍य संपूर्ण दुरुस्‍ती करुन सदर वाहन  दोषविरहित  असल्‍याबाबत तक्रारकर्त्‍यास मान्‍य असलेल्‍या वाहन तज्ञ व्‍यक्‍तीचे प्रमाणपत्र व पुढील एक वर्षाच्‍या वारंटीसह तक्रारकर्त्‍यास सुपुर्द करावे.

 

किंवा                                                                             

            वाहनातील निर्मिती दोष दूर होऊ शकत नसेल तर तक्रारकर्त्‍यास वि.प.ने विकलेल्‍या        सदोष   वाहनाचे बदली नविन वाहन द्यावे.

किंवा

तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली वाहनाची किंमत रु.46,680/- दि.20.10.2011 पासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह परत करावी. सदर रक्‍कम मिळाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 ला तक्रारीतील वाहन आहे त्‍या स्थितीत परत करावे.                 

            2. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई       रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- वि.प.नी तक्रारकर्त्‍यास द्यावी.                                                      3. आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावी.                             4.  निर्णयाची प्रत उभय पक्षांना विनामुल्‍य पुरवावी.

 

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.