Complaint Case No. CC/185/2021 | ( Date of Filing : 08 Mar 2021 ) |
| | 1. SMT. SUDHAN WD/O RAJENDRA BHASME | R/O. FLAT NO. F/101, YOGIRANA COMPLEX, PLOT NO.1, & 16-A, SHRISHIVSHAKTI HOUSING SOCIETY LTD., NAGPUR, CHIKHALI (KH), NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. JAIAMBE DEVELOPERS THROUGH PROPRIETOR AVINASH TUKARAMJI YAWALKAR | R/O. 182, NEW SUBHEDAR LAY-OUT, NAGPUR-440034 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. बाळकृष्ण चौधरी यांच्या आदेशान्वये- - तक्रारकर्ता यांनी ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, विरुध्द पक्ष हे बिल्डर व डेव्हलपर्स’ असून ते ‘जयअंबे डेव्हलपर्स’ या नावाने व्यवसाय करतात वी.प.यांनी “योगिराज कॉम्प्लेक्स” या नावाने मौजा चिखली (खुर्द) शिवशक्ती हाऊसिंग सोसायटी प्लॉट नं.1 व 16 A ख. नं. 17/2, सिटी सर्वे नं.35, प.ह. नं. 39 तह. व जिल्हा नागपुर येथे फ्लॅटची योजना सुरू केली होती. तक्रारकर्त्याने फ्लॅट नं. 101 चे वी.प. यांचे कडून नोंदनीकृत विक्रीपत्र दी. 19.03.2016 रोजी करून घेतले व वी.प. यांनी तक्रारकर्त्याला लवकरात लवकर राहण्याकरिता सुव्यवस्थित अपार्टमेंट तयार करण्याचे हमी दिली होती. तक्रारकर्त्याने वी.प. यांना फ्लॅटची पूर्ण रक्कम देवून सुद्धा बिल्डिंग चे काम पूर्ण केले नाही. तक्रारकर्त्याने आपली आयुष्याची पूर्ण कमाई वी.प. यांना देवून सुद्धा बिल्डिंग चे काम केले नाही म्हणून तक्रारकर्त्याने वी.प. यांना बिल्डिंगचे काम करण्याची विनंती केली असता वी.प. यांनी अपूर्ण बाधकाम असलेल्या बिल्डिंग मधील फ्लॅटचे ताबा घेण्यास संगितले व त्यानंतर फ्लॅटचे काम पूर्ण करून देवू असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याला राहण्यासाठी घर आवश्यक असल्याने अपूर्ण बांधकाम असलेले फ्लॅटचा ताबा घेतला. त्यानंतर वी.प यांनी त्या फ्लॅटचे काम व इतर सुख सुविधा पुरविल्या नाही. वी.प. यांनी फ्लॅटची योजना आखून जवळपास 10 वर्ष उलटून सुद्धा फ्लॅटचे पूर्ण बांधकाम व कोणत्याही सुख सुविधा पूर्ण केल्या नाही. त्याच प्रमाणे वी.प. यांनी बिल्डिंगचे बांधकाम हे निकृष्ट प्रकारचे केले व कोणत्याही प्रकारच्या ब्राउचर प्रमाणेसुख सुविधा करारा प्रमाणे पुरविल्या नाही.
- विरुद्ध पक्ष यांचे या वागण्यावरून तक्रारकर्त्याने व इतर फ्लॅट धारकांनी वी.प. यांना कायदेशीर नोटिस दी. 30.12.2019 रोजी दिला व मागणी केली की,ब्राउचर प्रमाणे पार्किंग करिता फ्लोरिंग, कव्हर पार्किंग लिफ्टची सुविधा, 24 तास वीज पुरवठा, NMC पाणीपुरवठा, भिंतीला पेंटिंग, बेकायदेशिर लोकांचे पार्किंग हटविणे, मोबाइल टावर हटविणे इ.सुविधा ची मागणी केली होती. परंतु वी.प. यांनी कोणतेही लक्ष दिले नाही व तक्रारकर्त्याने पुन्हा दी. 06.01.2021 रोजी वी.प. यांना नोटिस दिला परंतु वी.प. यांनी त्या सुविधा पुरवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष तक्रार दाखल करून मागणी केली की, विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्या सोबत अनुचित व्यापार प्रथेचा भंग करून त्यांना त्रुटि पूर्ण सेवा दिली असे घोषित करावे व वी.प. यांनी तक्रारकर्त्याला ब्राउचर प्रमाणे पार्किंगकरिताफ्लोरिंग,कव्हर पार्किंग लिफ्टचीसुविधा, 24 तास वीजपुरवठा, NMC पाणीपुरवठा, भिंतीला पेंटिंग, बेकायदेशिर लोकांचे पार्किंग हटविणे,मोबाइल टावर हटविणे इ. सुविधा पुरवाव्या तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल मोबदला म्हणून रक्कम रुपये 5,00,000/- विरुध्द पक्ष यांनी द्यावे असा आदेश पारित करण्यात यावा व तक्रारीचा खर्च देण्याच्या आदेश द्यावा अशी मागणी केली.
- विरुध्द पक्ष यांना आयोगा मार्फत नोटिसची बजावणी होऊन वी.प. हे हजर झाले परंतु त्यांनी आपला लेखी जबाब विहित मुदतीत दाखल न केल्याने प्रकरण वी.प. यांचे विरुद्ध बिना लेखी जबाब चालवण्याचा आदेश दी.28.09.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेले दस्तऐवजांचे, व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता पूढील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा
देवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत - आम्ही तक्रारकर्त्याचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी थोडक्यात असे नमुद केले की, वि.प. यांना प्लॉटची पूर्ण किंमत दिल्यानंतरही फ्लॅट मध्ये सुखसूविधा पुरविल्या दिल्या नाही, म्हणुन तक्रारकर्त्याचे प्रती सेवेत त्रुटी केलेली आहे म्हणुन तक्रार मंजूर करण्यात यावी आणि नुकसान भरपाई म्हणुन रु.5,00,000/- देण्याचे आदेश द्यावे.
- तक्रारकर्त्याने फ्लॅट नं.101चे वी.प.यांचे कडून नोंदनीकृत विक्रीपत्र दी. 19.03.2016 रोजी करून घेतले व वी.प. यांनी तक्रारकर्त्याला लवकरात लवकर राहण्याकरिता सुव्यवस्थित अपार्टमेंट तयार करण्याचे ब्राउचर प्रमाणे हमी दिली होती. तक्रारकर्त्याने वी.प. यांना फ्लॅटची पूर्ण रक्कम देवून सुद्धा बिल्डिंग चे काम पूर्ण केले नाही. तक्रारकर्त्याने आपली आयुष्याची पूर्ण कमाई वी.प. यांना देवून सुद्धा बिल्डिंग चे काम केले नाही म्हणून तक्रारकर्त्याने वी.प. यांना बिल्डिंगचे काम करण्याची विनंती केली असता वी.प. यांनी अपूर्ण बाधकाम असलेल्या बिल्डिंग मधील फ्लॅटचे ताबा घेण्यास संगितले व त्यानंतर फ्लॅटचे काम पूर्ण करून देवू असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याला राहण्यासाठी घर आवश्यक असल्याने अपूर्ण बांधकाम असलेले फ्लॅटचा ताबा घेतला. त्यानंतर वी.प यांनी त्या फ्लॅटचे काम व इतर सुख सुविधा पुरविल्या नाही. वी.प. यांनी फ्लॅटची योजना आखून जवळपास 10 वर्ष उलटून सुद्धा फ्लॅटचे पूर्ण बांधकाम व कोणत्याही सुखसुविधा पुरविल्या नाही. त्याच प्रमाणे वी.प. यांनी बिल्डिंगचे बांधकाम हे निकृष्ट प्रकारचे केले व कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा करारा/ब्राउचर प्रमाणे पुरविल्या नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचे कडून deed of declaration व विक्री पत्रा प्रमाणे फ्लॅट धारकांना सर्व सुख सुविधा पुरविण्याची हमी दिली होती. यावरुन तक्रारकर्ता हे वी. प. यांचे ग्राहक आहे हे सिद्द होते.
- तक्रारकर्त्याने व इतर फ्लॅट धारकांनी वी.प. यांना कायदेशीर नोटिस दी. 30.12.2019 रोजी दिला व मागणी केली की, ब्राउचर प्रमाणे पार्किंगकरिता फ्लोरिंग, कव्हर पार्किंग लिफ्टची सुविधा, 24 तास वीजपुरवठा,NMC पाणीपुरवठा, भिंतीला पेंटिंग, बेकायदेशिर लोकांचे पार्किंग हटविणे, मोबाइल टावर हटविणे इ.सुविधा ची मागणी केली होती. परंतु वी.प. यांनी कोणतेही लक्ष दिले नाही व तक्रारकर्त्याने पुन्हा दी. 06.01.2021 रोजी वी.प. यांना नोटिस दिला परंतु वी.प. यांनी त्या सुविधा पुरवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे निष्पन्न होते असे आमचे मत आहे. वरिल सर्व कारणास्तव आम्ही मुद्दा क्रं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना वारंवार फ्लॅट मध्ये सर्व सुविधा ब्राउचर प्रमाणेदेण्याची विनंती केली असता वि.प. यांनी टाळाटाळ केली. वि.प. यांनी रक्कम देऊनही या कुठलीही सेवा विरुध्द पक्ष यांचे कडून तक्रारकर्ता यांना प्राप्त झालेल्या नाही,म्हणून वि.प. हे ब्राउचर प्रमाणे पार्किं गकरिता फ्लोरिंग, कव्हर पार्किंग लिफ्टची सुविधा, 24 तास वीजपुरवठा, NMC पाणीपुरवठा, भिंतीला पेंटिंग, बेकायदेशिर लोकांचे पार्किंग हटविणे, मोबाइल टावर हटविणे इ. सुविधा तक्रारकर्त्यास पुरवण्यास बाध्य आहे असे आमचे मत आहे. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीबाबत रक्कम रुपये 15,000/- मंजूर करणे व तक्रार खर्च रु.10,000/- मंजूर करणे न्यायोचित आहे असे आमचे मत आहे.
सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- वि.प.यांनी तक्रारकर्त्यास ब्राउचर प्रमाणे पार्किंग करिता फ्लोरिंग, कव्हर पार्किंग लिफ्टची सुविधा, 24 तास वीजपुरवठा, NMC पाणीपुरवठा, भिंतीला पेंटिंग, बेकायदेशिर लोकांचे पार्किंग हटविणे, मोबाइल टावर हटविणे इ. सुविधा पुरवाव्या.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 15,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
| |