Maharashtra

Nagpur

CC/79/2020

GUNWANT WAMANRAO TUMSARE - Complainant(s)

Versus

JAI SHRI RAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH ATHORIZE OFFICER - Opp.Party(s)

ADV SHRIKANT SAOJI

16 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/79/2020
( Date of Filing : 05 Feb 2020 )
 
1. GUNWANT WAMANRAO TUMSARE
PLOT NO 7, AMBA SHIV SHAKTI NAGAR, MANEWADA BESA ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. JAI SHRI RAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH ATHORIZE OFFICER
49, ROKDE BHAVAN NEAR S. D. HOSPITAL GANESH NAGAR, NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
2. JAI SHREE RAM URBAN CREDIT CO-OPERATIVE SOCEITY LID NAGPUR THROUGH ITS PRESIDENT KHEMCHAND SITARAMJI MEHERKURE
49, ROKDE BHAVAN NEAR S. D. HOSPITAL GANESH NAGAR, NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
3. JAI SHRI RAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH VICE PRESIDENT YOGESH MANOHARRAO CHARDE
49, ROKDE BHAVAN NEAR S. D. HOSPITAL GANESH NAGAR, NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
4. JAI SHRI RAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH SECRETARY VIJAY MADHAVRAO CHIKTE
49, ROKDE BHAVAN NEAR S. D. HOSPITAL GANESH NAGAR, NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
5. JAI SHRI RAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH MANAGER SUNITA POL
49, ROKDE BHAVAN NEAR S. D. HOSPITAL GANESH NAGAR, NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV SHRIKANT SAOJI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Feb 2023
Final Order / Judgement

मा. सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैसयांच्‍या आदेशान्‍वये.

  1. वि.प.क्रं.1 ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटिव्ह कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था असुन तिचा नोंदणी क्रमांक- 447/92 असुन ते बॅंकींग सबंधीचा व्यवसाय करतात. तसेच वि.प.क्रं.2 ते 5 हे वि.प.क्रं.1-संस्थचे अनुक्रमे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, सचिव व मॅंनेजर आहेत. तसेच वि.प.क्रं.1 संस्थेचा कार्यभार वि.प.क्रं.2 ते 5 हे बघतात. वि.प.क्रं.1 ते 5 हे जनतेकडुन मोठया प्रमाणात ठेवी स्व‍िकारतात व त्यावर ग्राहकांना व्याज देतात. तकारदाराने वि.प.क्रं.1 ते 5 यांचेकडे दिनांक 26.2.2018 रोजी 10,000/- आवर्ती ठेव अंतर्गत दिनांक 26.2.2019 पर्यत दरमहा रुपये 10,000/- जमा करण्‍याचे निश्‍चीत केले होते. तक्रारदाराने दरमहा रुपये 10,000/- याप्रमाणे दिनांक 27.12.2018 पर्यत एकुण रक्कम रुपये 1,10,000/- जमा केले होते.
  2.  वि.प.ने तक्रारदाराला आवर्ती ठेव रक्कम मुदती नंतर परत केली नाही. तसेच वि.प.ने परिपक्वतेनंतर सुध्‍दा तक्रारदाराची आवर्ती ठेव अंतर्गत गुंतविलेल्या रक्कम परत केली नाही. तक्रारदाराने वारंवार मागणी करुनही मुदत ठेवीची रक्कम परत केली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प.1 ते 5 यांनी तक्रारदाराने मुदत ठेव अंतर्गत गुंतविलेली रक्कम रुपये 1,10,000/- व त्यावर 24 टक्के व्याजदाराने परत करावी. तसेच वि.प.1 ते 5 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी, तक्रारीचे खर्च देण्‍याची मागणी केली.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. क्रं.1 ते 5 यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. परंतु वि.प.क्रं.1 ते 5 यांना नोटीस तामील न झाल्याने तक्रारदाराने वि.प.1 ते 5 यांना दिनांक 24.09.2021 रोजी दैनिक वृत्तपत्रातुन नोटीस प्रसिध्‍द केली. परंतु नोटीस प्रसिध्‍द करुनही वि.प.क्रं.1 ते 5 आयोगात हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार दिनांक 13.10.2021 रोजी वि.प.क्रं. 1 ते 5 विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

   मुद्दे                                                       उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. वि.प.क्रं.1 ते 5 तक्रारदाराला सेवेत त्रुटी केली आहे काय ?   होय
  3. काय आदेश  ?                                                      अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.  तकारदाराने वि.प.क्रं.1 ते 5 यांचेकडे दिनांक 26.2.2018 रोजी 10,000/- आवर्ती ठेव अंतर्गत दिनांक 26.2.2019 पर्यत दरमहा रुपये 10,000/- जमा करण्‍याचे निश्‍चीत केले होते. तक्रारदाराने दरमहा रुपये 10,000/- याप्रमाणे दिनांक 27.12.2018 पर्यत एकुण रक्कम रुपये 1,10,000/- जमा केले आहे. तक्रारदाराने आवर्ती ठेव अंतर्गत रक्कम जमा केल्याबाबतचे आवर्ती ठेव पासबुकची फोटोप्रत अभिलेखावर नि.क्रं.2 वर दाखल केली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक असल्याचे स्पष्‍ट होते. वि.प.क्रं.1 ते 5 यांनी तक्रारदाराची आवर्ती ठेव अंतर्गत जमा असलेली रक्कम परिपक्वता दिनांक 26.2.2019 नंतर सुध्‍दा परत न केल्याने वि.प.क्रं.1 ते 5 यांनी तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्‍ट होते. सबब आदेश खालील प्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 ते 5 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारदाराला त्यांची मुदत ठेवीपोटी परिपक्वतेनंतर येणारी रक्कम रुपये 1,10,000/- परत करावी. तसेच सदर रक्कमेवर मुदत ठेव परिपक्वता दिनांक 26.2.2019 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदाराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेता येणारी रक्कम अदा करावी.  
  3. वि.प.ने तक्रारदाराला शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- द्यावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.  
  4. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.