Maharashtra

Nagpur

CC/355/2020

SHRI. KAILAS KANIPANATH GABHANE - Complainant(s)

Versus

JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR - Opp.Party(s)

ADV. SHRI. PRABHAKAR G. DOBLE

13 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/355/2020
( Date of Filing : 16 Sep 2020 )
 
1. SHRI. KAILAS KANIPANATH GABHANE
R/O. PLOT NO.334, CHANDAN NAGAR, KRIDA CHOWK, BEHIND SOUTH POINT SCHOOL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU. MANDA KAILAS GABHANE
R/O. PLOT NO.334, CHANDAN NAGAR, KRIDA CHOWK, BEHIND SOUTH POINT SCHOOL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR
OFF. AT, PLOT NO.48, NEAR S.D. HOSPITAL, GANESH NAGAR, NAGPUR-24
NAGPUR
MAHARASHTRA
2. PRESIDENT- SHRI. KHEMCHAND SITARAM MEHARKURE, JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR
R/O. PLOT NO.10, SHIV NAGAR, NEAR SANGAM TAKIG, NAGPUR-24
NAGPUR
MAHARASHTRA
3. VICE PRESIDENT- SHRI. YOGESH MANOHAR CHARDE, JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR
R/O. BHAGYESHRI NAGAR, NEAR DEVI MANDIR, RAMNA-KHARBI ROAD, NAGPUR-24
NAGPUR
MAHARASHTRA
4. SECRETORY- SHRI. BABLU MAHADEVRAO CHIKTE, JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR
R/O. PLOT NO.1, ANMOL NAGAR, NEAR WATHODA CHOWK, NAGPUR-24
NAGPUR
MAHARASHTRA
5. MANAGER- SUNITA KESHAVRAO POL, JAI SHREERAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD. NAGPUR
R/O. NEAR LAXMINARAYAN MANDIR, KOTHI ROAD, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. PRABHAKAR G. DOBLE , Advocate for the Complainant 1
 
Dated : 13 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश  पारित  व्दारा -  मा. श्रीमती चंद्रिका बैस .सदस्या.

 

  1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९, च्या कलम ३५ अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 5 हे जय श्रीराम अर्बन क्रे.को.ऑप.सोसा.ली.नागपूर असून या पैकी वि.प क्र.1 ही सहकारी पतसंस्‍था असून वि.प क्र.2 ते 5 हे मुख्‍य कार्यकारी अधिकारी/प्रबंधक आहेत. ही संस्‍था गरजू लोकांना सोसायटीच्‍या नावाखाली व्‍याज दराने ठेवी स्विकारून त्‍यावर व्‍याज देतात. तसेच ही संस्‍था ठेवीदारांकडून बचत खाते,आर.डी खाते, दैनदिन खातेमुदत ठेव खाते, चालू खाते चालवून पत पुरवठा करणे असा आहे. तक्रारदारांनी या संस्थेमार्फत मुदत ठेव योजने अंतर्गत मुदत ठेवी ठेवल्या होत्या त्याचे विवरण खालील प्रमाणे आहेः –

 

 

अ.क्रं.

पावती क्रमांक

मॅच्युरिटी

तारीख

मुद्दल रक्कम

व्याज

व्याजासह देय रक्कम

1

000218

02/03/2019

1,43,000/-

15,730/-

1,58,730/-

2

000523

03/08/2019

80,000/-

7,992/-

87,992/-

3

000915

06/10/2019

2,50,721/-

25,072/-

2,75,793/-

4

000013

02/06/2019

1,24,320/-

12,432/-

1,36,752/-

5

000708

20/10/2019

2,77,500/-

27,750/-

3,05,250/-

6

000546

04/04/2019

1,09,410/-

10,941/-

1,20,351/-

7

000329

07/07/2019

3,00,000/-

33,000/-

3,33,000/-

8

000377

14/03/2019

70,000/-

7,700/-

77,000/-

 

 

 

 

 

एकुण मुद्दल रक्कम रुपये 13,54,951/-

एकुण व्याज रुपये 1,40,617/-

एकूण व्याजासह रक्कम रुपये 14,95,568/-

 

  1. पुढे तक्रारदार नमूद करतात की, त्‍यांनी सन-2006 पासून वि.प क्र.1 ते 5 यांचेकडे आर.डी खाते उघडून सन-2019 पर्यंत वेळोवेळी रक्‍कमेची गुंतवणूक केलेली आहे. परंतु वि.प यांनी संस्‍थेची रोख रक्‍कम वैयक्तीक वापराकरीता केला अशी माहीती इतर खातेदारांकडून कळल्‍यानंतर तक्रारदाराने वि.प कडे यथाशक्ती मुदत ठेव योजने अंतर्गत जमा केलेली रक्‍कम परत मागीतली. परंतु वि.प ने त्‍यांची जमा रक्‍कम परत केली नाही. अंदाजे एक वर्षापर्यत तक्रारदारांनी वि.प च्‍या कार्यालयात जावून वारंवार रक्‍कम मिळण्‍यासंबंधी विनंती केली परंतु वि.प ने तक्रारदाराची जमा रक्‍कम परत केली नाही. तक्रारदाराने वि.प. कडे यथाशक्ती मुदत  ठेव योजनेअंर्तगत जमा केलेली रक्‍कम एकदा सुध्‍दा काढलेली नाही. कारण त्‍यांनी ती रक्‍कम त्‍यांच्‍या मुलीच्‍या लग्‍ना करीता ठेवलेली होती व आता त्‍यांना त्‍याची आवश्‍यकता आहे. तक्रारदार हे वि.प बॅकेंचे/संस्‍थेचे ग्राहक आहेत. ग्राहकांना सेवा पुरविणे हे संस्‍थेचे कर्तव्‍य  आहे.त्यामूळे वि.प हे भारतीय दंड विधान चे कलम 406, 420 506 च्‍या नुसार गुन्‍हयास पात्र असून कायदयातील तरतुदी नुसार शिक्षेस व दंडास पात्र असुन वि.प. ने तक्रारदाराच्‍या सेवेत त्रुटी केलेली आहे असे तक्रारदाराने नमुद केले आहे. तक्रारकर्ते क्रं. 1 व 2 यांचे मागणीप्रमाणे तक्रारीत नमूद असलेल्‍या परिच्‍छेद क्रमांक-5 मधील यथाशक्‍ती मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत देण्‍याचा आदेश वि.प क्रमांक 1 ते 5 यांचे विरूध्‍द व्‍हावा व तक्रारदारांना मानसीक, शारिरीक व आर्थीक  त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
  2. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1,2,3,4,5 यांना नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प.कं. 1,2,4,5नोटीस मिळुनही आयोगात हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द दिनांक 8.2.2021 रोजी तसेच वि.प.3 यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिल्‍यामुळे आयोगाने त्यांचे विरुध्‍द दिनांक 29.11.2021 रोजी तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. 
  3. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत दस्त क्रं.1 ते 16  दाखल करुन त्यांत  विरुध्‍द पक्षाला अदा केलेल्या रक्कमेच्या पावत्या, फिक्‍स डिपाजीट प्रमाणपत्र, पोलीस स्‍टेशन मध्‍ये दाखल केलेले एफ.आय.आर तसेच  विरुध्‍द पक्षाला पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, पोचपावती इत्यांदी दस्तावेज दाखल केलेले आहे.

मुद्दे                                                                          निष्‍कर्ष

1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                होय.

2.  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे प्रती न्युनतम

  सेवा दर्शविली आहे काय ?                                                    होय.

3.   काय आदेश   ?                                                                अंतिम  आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा

  1. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते हे जय श्रीराम अर्बन क्रे.को.ऑप.सोसा.ली.नागपूर असून या पैकी वि.प क्र.1 ही सहकारी पतसंस्‍था असून वि.प क्र.2 ते 5 हे मुख्‍य कार्यकारी अधिकारी/प्रबंधक आहेततक्रारदारांनी या संस्थेत यथाशक्ती मुदत ठेव योजने अंतर्गत वरील तक्त्यात नमुद मुदत ठेवी ठेवल्या होत्या.  तक्रारदारांनी सन-2006 पासून वि.प क्र.1 ते 5 यांचेकडे आर.डी खाते उघडून सन-2019 पर्यंत वेळोवेळी रक्‍कमेची गुंतवणूक केलेली होती, परंतु वि.प यांनी संस्‍थेच्या रोख रक्‍कमेचा वैयक्तीक वापर करीत असल्याची माहीती इतर खातेदारांकडून कळल्‍यानंतर तक्रारदारांनी वि.प कडे यथाशक्ती मुदत ठेव योजने अंतर्गत जमा केलेली रक्‍कम परत मागीतली. परंतु वि.प ने त्‍यांची जमा रक्‍कम परत केली नाही. तक्रारदारांनी वि.प.च्‍या कार्यालयात जाऊन वारंवार रक्‍कम मिळण्‍यासंबंधी विनंती केली परंतु वि.प ने तक्रारदारांना मुदत ठेवीची रक्‍कम परत केली नाही. तक्रारदाराने वि.प. कडे यथाशक्ती मुदत  ठेव योजनेअंर्तगत जमा केलेली रक्‍कम त्यांचे गरजेकरिता एकदा सुध्‍दा काढलेली नाही. तक्रारदारांनी वि.प.क्रं. 1 ते 5 संस्थेकडे यथाशक्ती मुदत ठेव योजने अंतर्गत रक्कम ठेवली असल्याने तक्रारदार हे वि.प बॅकेंचे/संस्‍थेचे ग्राहक आहेत. ग्राहकांना सेवा पुरविणे हे संस्‍थेचे कर्तव्‍य आहे. परंतु वि.प. क्रं. 1 ते 5 यांनी यथाशक्‍ती मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत दिली नाही व  तक्रारदारांचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.   
  2. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

 

अंतीम   दे 

  1. तक्रारदार क्रं.1 व 2 यांनी तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते. 
  2. वि.प.क्रं. 1 ते 5 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्ते क्रं. 1 व 2 यांना परिच्छेद क्रं. 2 मध्‍ये नमुद तक्त्यानुसार व्याजसह देय असलेली रक्कम तक्रारकर्ते यांना अदा करावी. तसेच सदर परिपक्वता रक्कमेवर  द.सा.द.शे. 14 टक्के दराने व्याज त्या त्या परिपक्वता तारखेपासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावतो तक्रारकर्ते क्रं. 1 व 2 यांना अदा करावी. 
  3. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 5 यांनी तक्रारकर्ते क्रं.1 व 2 यांना शारिरीक व मानसिक  त्रासाबाबत   नुकसान भरपाई दाखल  रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.50,000/- ( रुपये पंन्नास हजार फक्त) द्यावेत.
  4. वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45  दिवसांचे आंत करावे.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्तीला प्रकरणाची फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.