जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.182/2008. प्रकरण दाखल दिनांक – 16/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 11/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र). मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. 1. सतीश गणपतराव जहागीरदार, अर्जदार. वय वर्षे 53, व्यवसाय नौकरी, 2. सौ.संध्या भ्र.सतीश जहागीरदार, वय वर्षे 84, व्यवसाय घरकाम, दोघे रा.सावजी अपार्टमेंट,स्वामी नारायणनगर, पुर्णा रोड, नांदेड. विरुध्द. मॅनेजर, गैरअर्जदार. जय शिवराय नागरी सहकारी बॅक लि, शाखा आनंदनगर, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.अर.बी.कव्हाळे. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.एच.आर.जाधव. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष प्र.) गैरअर्जदार जय शिवराय नागरी सहकारी बँक लि यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदाराचे बँक खाते क्र.10369 मधील बाकी रक्कम रु.1,01,742/- दि.09/03/2007 पासुन 18 टक्के गैरअर्जदाराकडुन मिळावेत व मानसिक त्रासाबद्यल व नुकसान भरपाई रु.25,000/- दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. दि.31/10/2007 रोजी अर्जदार हे आपल्या आर्थीक अडचण सोडविण्यासाठी जमा असलेली रक्कम अनेक वेळा बॅकेमध्ये गेले परंतु गैरअर्जदाराने टाळाटाळ करुन आजपर्यंत ती रक्कम दिलेली नाही. अर्जदाराना दोन मुले असुन त्यांच्या पुढील शिक्षणांसाठी त्यांना रक्कमेची आवश्यकता आहे व त्यामुळे सदरील रक्कम मागणीप्रमाणे त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली नोटीस तामील होऊनही ते हजर न झाल्या कारणाने एकर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांन पुरावा म्हणुन आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे त्यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी आपले खाते क्र.10369 जे की, त्यांनी अर्जदाराच्या नांवाने ज्वॉईंट खात्याचा पुरावा म्हणुन पासबुक दाखल केले आहे. यावर दि.09/03/2007 अखेरीस रु.1,01,742/- असल्यचे दिसुन येते. गैरअर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे संधी दिली असता त्यांनी ती घेतली नाही म्हणुन पासबुकावर दिसणारी रक्कम ही गैरअर्जदाराकडे जमा आहे असेच गृहीत धरावे लागेल. अर्जदाराच्या मागणी प्रमाणे ती रक्कम न देऊन गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना रु.1,01,742/- व त्यावर बँक खात्यावरील असणारे व्याजाप्रमाणे व्याजासह पुर्ण रक्कम अर्जदारास द्यावे, असे न केल्यास दंडनिय व्याज म्हणुन 9 टक्के व्याजाने जी काही रक्कम होईल ती व्याजासह अर्जदारास देण्यात यावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा पोटी रु.1,000/- अर्जदारास द्यावे. 4. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |