निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 469/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 11/04/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 12/05/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 05/10/2009
सौ.अलका प्रभाकर कोष्टी,
उ.व. 42 वर्षे, धंदाः घरकाम,
रा.वर्धमान नगर, सुराणा मिल कंपाऊंड,
जामनेर रोड, भुसावळ, ता.भुसावळ, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. जय मातादी अर्बन को-ऑप.क्रे.सोसा.लि.भुसावळ.
भुसावळ, ता.भुसावळ, जि.जळगांव.
2. श्री.विजय मोतीराम चौधरी, (चेअरमन) प्रोफेसर कॉलनी, भुसावळ.
3. श्री.दिलीप रघुनाथ बरकले (व्हा.चेअरमन) कु-हा पानाचे,ता.भुसावळ.
4. श्री.भागवत परशुराम पाटील, (संचालक) आनंद नगर, भुसावळ.
5. श्री.बळीराम माधव चौधरी, (संचालक) व्ही.एम.वार्ड, भुसावळ.
6. श्री.शंकर शिवराम चौधरी, (संचालक) शनीमंदीर वॉर्ड, भुसावळ.
7. श्री.अर्जुन राजाराम पाटील, (संचालक) कु-हा पानाचे,ता.भुसावळ.
8. श्री.रुपेश वसंत बाविस्कर, (संचालक) कंडारी, ता.भुसावळ.
9. (श्री.डिगंबर कान्हु खिल्लारे, (संचालक) नारायण नगर,)(वगळले)
भुसावळ. ............. सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 05/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच सदस्य श्री. चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.संतोषकुमार पी.चोपडा वकील हजर
सामनेवाला क्रं. 3 ते 8 एकतर्फा.
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे श्री.डी.के.चौधरी वकील हजर.
सामनेवाला क्र.9 वगळले.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | सेव्हींग खाते क्रमांक | | रक्कम रुपये | |
1 | 23/1222 | | 41,590/- | |
तक्रारदार यांना सदर सेव्हींग खात्यावर जमा असलेल्या रक्कमेची आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची सेव्हींग खात्यावरील शिल्लक रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या सेव्हींग खात्यावरील शिल्लक रक्कम व्याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रमांक 3 ते 8 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला. सामनेवाला क्र. 9 यांना तक्रारदाराने दि.22/9/2008 रोजीचे अर्जानुसार तक्रार अर्जातुन वगळलेले आहे.
3. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली असुन सामनेवाला क्र. 2 हे सोसायटीचे संचालक पदी राहीलेले नाहीत. त्यांचे ठिकाणी नवीन संचालक निवडुन आलेले आहेत व आता संचालक म्हणुन सामनेवाला यांची जबाबदारी राहीलेली नसल्याने सामनेवाला क्र. 2 यांचे नांव तक्रारीतुन कमी करण्यात यावे अशी विनंती सामनेवाला क्र. 2 यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 2 चे लेखी म्हणणे, तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता व उभयतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या सेव्हींग खात्याचे पासबुकाकडे वेधले असता असे दिसून येते की, सेव्हींग खात्यावरील रक्कमेची ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील सेव्हींग खात्यात शिल्लक रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. म्हणून तक्रारदार सेव्हींग खात्यात शिल्लक रक्कम व त्यावरील व्याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 8 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांचे सेव्हींग खाते क्रमांक 23/1222 मध्ये शिल्लक असलेली रक्कम रु.41,590/- सदर खात्यावरील प्रचलीत व्याजदरानुसार तक्रारदारास देण्यात यावी.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 8 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 8 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 8 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 05/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव