तक्रार क्र. 36/2013 दाखल दि. 01.02.2014
आदेश दि. 13.08.2014
तक्रारकर्ता :- अरुण नामदेवराव बावनकर
वय 42 वर्षे, व्यवसाय—वकिली
रा. प्लॉट क्र.21, विदर्भ हाऊसिग कॉलनी,
तकिया वॉर्ड,भंडारा
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
भंडारा मार्फत अध्यक्ष
2. जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
भंडारा मार्फत सचिव,
1 ते 2 चा पत्ता – विदुयत कॉम्प्लेक्स,
राजीव गांधी,भंडारा
ता.जि.भंडारा
3. हिवराज रमेश उके (मंडल),
रा.कारधा, ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्ता स्वतः
विरुध्द पक्ष एकतर्फी.
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 13 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष सहकारी पत संस्था यांच्याकडे नित्य नीधी ठेव ची रक्कम जमा केली होती. ती Maturity झाल्यावर परत मागितली असता ते न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण न्यायमंचात दाखल केले आहे.
2. तक्रारकर्त्याच्या तक्रारीमधील आशय खालीलप्रमाणे
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे नित्य नीधी ठेव (Daily Recuring Deposit) म्हणुन विरुध्द पक्ष क्र.3 जे हिवराज उके एजन्ट आहेत, त्यांच्या मार्फत ठेव योजना काढली होती. तक्रारकर्त्याने दिनांक 9/1/2012 पासून 100/- प्रतिदिन प्रमाणे नित्य नीधी ठेव काढली होती. तक्रारकर्त्याचे नित्य नीधी ठेव खाते क्र.166/12 मध्ये असलेल्या नित्य नीधी ठेव वर द.शा.द.शे. 6% टक्के दराने व्याज देण्याचे विरुध्द पक्षाने कबुल केले. सदर खात्याची Maturity दिनांक 8/1/2013 ला होती.
3. तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये दिनाक 8/1/2013 ला 26,000/- जमा झाले. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने ग्राहक या नात्याने 26,000/- रुपये 6% टक्के दराने देण्यासाठी विनंती करुन सुध्दा तक्रारकर्त्याला रक्कम न दिल्यामुळे विरुध्द पक्षाला दिनांक 29/6/2013 ला नोटीस पाठविली. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात 26,000/- रुपये ही मुळ रक्कम व त्यावरील 6% टक्के दराने व्याज दिनांक 8/1/2013 पासून मिळण्यासाठी सदर प्रकरण दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 1/2/2014 ला दाखल होवून विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या.
5. विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 3 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 1/7/2014 ला पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत नित्य नीधी ठेव खात्याच्या पासबुकच्या प्रमाणित प्रती दाखल केल्या आहेत. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकिला मार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पान क्र.10 वर दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकिल व्ही.एस.बांते यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे नित्य नीधी ठेव खात्याद्वारे रुपये 100/- प्रती दिन 6% टक्के व्याजासह दिनांक 9/1/2012 पासुन ते 8/1/2013 पर्यंत जमा केले होते. सदरहू खाते क्रमाक 166/12 चा खाता उतारा सदरहू प्रकरणात दाखल केला आहे. विरुध्द पक्षाला वारंवार विनंती करुन सुध्दा त्यांनी जमा असलेली रक्कम परत न केल्यामुळे विरुध्द पक्षाला दिनांक 26/8/2013 ला नोटीस पाठविण्यात आली. तरी सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची रक्कम न दिल्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द नुकसान भरपाई आदेश पारीत करण्यात यावा असे म्हटले आहे.
8. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व कागदपत्रे तसेच तक्रारकर्त्याच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
- तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का?– होय
कारण मिमांसा
9. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे विरुध्द पक्ष 3 यांच्यातर्फे नित्य नीधी ठेव योजनेद्वारे प्रतीदिन 100/- रुपये दराने रक्कम जमा केली होती. तक्रारकर्त्याने नित्य नीधी ठेव खाते क्रमांक 166/12 चा खातेउतारा सदरहू प्रकरणात दाखल केला आहे. सदरहू नित्य नीधी ठेव Passbook मध्ये विरुध्द पक्षाचे व्यवस्थापक यांची स्वाक्षरी आहे. तसेच दिनांक 9/1/2012 पासून ते 8/1/2013 पर्यंत प्रतीदिन जमा केलेले रुपये 100/- याबद्दल नोंद असून त्यावर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे नोंद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे नित्य नीधी ठेव योजनेअंतर्गत 100/- रुपये प्रतीदिन 6 टक्के दराने गुंतवले होते हे सिध्द् होते.
10. तक्रारकर्त्याने 8/1/2013 ला नित्य नीधी ठेव पासबुक अंतर्गत Maturity झाल्यावर विरुध्द पक्षाकडे जमा रक्कमेची मागणी केली तसेच विरुध्द पक्षाला दिनांक 26/6/2013 च्या नोटीस प्रमाणे खात्यातील रक्कम 26,000/- रुपये 6 टक्के दराने परत मिळण्यासाठी नोटीस पाठविली तरी रक्कम परत दिली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 14/7/2014 च्या शपथपत्राद्वारे नित्य नीधी ठेव योजनेची रक्कम विरुध्द पक्षाने व्याजासह देण्यास टाळाटाळ केल्याचे सुध्दा म्हटले आहे, त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याची रक्कम व्याजासह न देणे म्हणजेच सेवेतील त्रृटी होय, असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने नित्य नीधी ठेव योजनेअंतर्गत जमा केलेले रुपये 26,000/- (सव्वीस हजार) हे 6% टक्के व्याज दराने दिनांक 9/1/2013 पासून ते संपुर्ण रक्कम तक्रारकर्त्यास मिळेपर्यंतचे व्याजासह दयावे.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- (दहा हजार) दयावे.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चासाठी रु.5,000/-(पाच हजार) दयावे.
- गैरअर्जदाराने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
- प्रबंधक,जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी अर्जदार/तक्रारीकर्तीस सदर आदेशाची प्रमाणित प्रत नियमानुसार त्वरीत उपलब्ध्ा करुन दयावी.