सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
दरखास्त क्रमांक 29/2014
दरखास्त दाखल दिनांक- 24/12/2014
दरखास्त निकाल दिनांक- 18/06/2015
श्री चंद्रसुभाष दत्ताराम परब
वय 45 वर्षे, व्यवसाय – नोकरी,
मु.पो. मठ, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग ... फिर्यादी
विरुध्द
1) जागृत मोटर्स,
आउटलेट, बी.के.जी. रोड,
उदयमनगर, कुडाळ – 416 520
2) जागृत मोटर्स,
डी-25, एम.आय.डी.सी.मिरजोळे,
रत्नागिरी – 415 612 ... आरोपी पक्ष
आदेश नि.1 वर
सदर प्रकरण फिर्यादी यांनी मुळ तक्रार 12/2014 निकाल तारीख 13/10/2014 मध्ये झालेल्या आदेशाप्रमाणे पूर्तता झाली नसल्याने आरोपी क्र. 1 व 2 यांचे विरुध्द ग्रा.सं.कायदा 1986 कलम 27 प्रमाणे दाखल केले होते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर आरोपी क्र. 1 व 2 हजर होऊन त्यांनी आदेशाप्रमाणे रक्कम रु 5270/- दिनांक 20/11/2014 रोजी मंचामध्ये भरणा केली असल्याचे मंचास कळविले. तसेच सदर कामी अपील केले असल्याचे ही सांगितले. दरम्यान मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडील पहिले अपील नंबर A/14/953 दिनांक 18/12/2014 रोजी अपीलकाराचे उपस्थिती अभावी निकाली काढण्यात आले. त्या विरुध्द मा. राष्ट्रीय आयोगाकडे अपील दाखल करणेची कार्यवाही सुरु असल्याचे आरोपीतर्फे नि. 18 वर कळविणेत आले.
फिर्यादी यांनी नि. 19 वर अर्ज दाखल करुन मंचाचे आदेशाची पूर्तता करण्याचे आदेश आरोपी यांना व्हावेत अशी विनंती केली. सदर प्रकरणात वरीष्ठ न्यायालयाचा स्थगिती आदेश आरोपी यांनी सादर केलेला नाही. नि. 20 वर आरोपीने पुरशीस दाखल करुन अद्याप अपील दाखल झालेले नाही असे कळविले आहे. तसेच मुळ तक्रार क्र. 12/2014 मधील आदेशाप्रमाणे दरखास्त दाखल तारखेपूर्वी म्हणजे दिनांक 20/11/1014 रोजी आदेशीत रक्कम जमा केली असल्याचे कळविले. सबब नि. 20 ला अनुसरुन पुढील प्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
- दरखास्त अर्ज निकाली करणेत येतो.
- रजिस्ट्री विभागाने तक्रार क्र. 12/2014 मध्ये दिनांक 20/11/2014 रोजी मुळ विरुध्द पक्ष/आरोपी यांनी भरलेली रक्कम व्याजासहित मुळ तक्रारदार/फिर्यादी यांना अदा करावी.
- आरोपीचे बेल बॉड रद्द करण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 18/06/2015
Sd/- Sd/-
(के. डी. कुबल) (व्ही.जे. खान)
प्रभारी अध्यक्ष सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग