Maharashtra

Nagpur

CC/228/2020

SHRI. ANILKUMAR SHYAMRAO PANTAVANE - Complainant(s)

Versus

JAGDAMBA REALTORS PVT. LTD., THROUGH DIRECTOR GOPAL KONDAVAR - Opp.Party(s)

ADV. ASHOK RAGHUTE

23 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/228/2020
( Date of Filing : 09 Jul 2020 )
 
1. SHRI. ANILKUMAR SHYAMRAO PANTAVANE
R/O. E-7/7 MINAL APARTMENT, PUNJABI BAG, BHOPAL (M.P.)
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. JAGDAMBA REALTORS PVT. LTD., THROUGH DIRECTOR GOPAL KONDAVAR
OFF. AT, 6TH FLOOR, NIKALAS TOWERS, CENTRAL BAZAR ROAD, RAMDASPETH, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. ASHISH BHAGWAM BALPANDE
R/O. PLOT NO.5, SAI KRUPA SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Sep 2021
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा  श्री. एस आर आजने , मा . सदस्‍य)

  1. वि.प क्रं.1 ही प्रायवेट लिमीटेड कंपनी असुन त्यांचा रिअल इस्टेट डेव्हल्प्मेटचा व्यवसाय आहे. वि.प. क्रं.2 हा वि.प.1 चे कंपनीशी संलग्न असुन वि.प.क्रं.1 यांचेशी  वि.प. क्रं. 2 यांनी विकसीत केलेल्या भुखंडाचा विक्री करण्‍याचा करार केलेला आहे. तक्रारदाराने वि.प. चे मौजा- मंगरुळ, ख.नं. १०६/१, १०७/१, प.ह.न.७३ ता.जि.नागपूर येथील जगदंबा प्राईड मधील भुखंड क्रं.६५७(बी) एकुण क्षेत्रफळ १५०० चौ.फुट एकुण रुपये ८,२५,०००/- एवढया रक्कमेत विकत घेण्‍याचा करार दिनांक ६.४.२०१६ रोजी केला. तक्रारदाराने दिनांक 11.1.2016 रोजी वि.प.ला भुखंड खरेदी पोटी आगाऊ रक्कम रुपये 1,00,000/- नगदी स्वरुपात दिले. त्यानंतर धनादेश क्रं.९५९१९६ दिनांक २१.६.२०१६ अन्वये रुपये 2,00,000/- व धनादेश क्रं.९५९१९९ दिनांक ४.७.२०१६ अन्वये रुपये ५०,०००/-, धनादेश क्रं. ९५९२०० दिनांक २१.७.२०१६ अन्वये रुपये ५०,०००/- धनादेश क्रं. ९५९२०१ दिनांक १२.३.२०१७ अन्वये रुपये 1,00,000/- असे एकुण रुपये 5,00,000/- भुखंडाचे खरेदीपोटी वि.प ला वेळावेळी अदा केलेले आहे. तसेच उर्वरित रक्कम रुपये 3,25,000/- वेळोवेळी अदा करण्‍याचे ठरले. करारानुसार भुखंडाचे विक्रीपत्र नोंदणी दिनांक ३०.८.२०१७ ला किंवा त्यापूर्वी करुन देण्‍याचे ठरले व भुखंडाचे विक्रीपत्राकरिता लागणारा पूर्ण खर्च तक्रारदारास करावा लागेल असे करारात नमुद करण्‍यात आले व तक्रारदारास भुखंडाचा ताबा मोकळया स्वरुपात देण्‍याचे ठरले.
  2. तक्रारकर्ता नमुद करतो की, वि.प. क्रं.1 व 2 यांचेत आपसात कारस्थान दिसते. वि.प. क्रं. 1 यांनी जगदंबा प्राईड विकसित केली आणि वि.प. क्रं.2 यांनी विक्रीचा करारनामा केला व तो स्वतःला भुखंडाचा विक्रेता दर्शवितो. करारपत्रात नमुद मजकुरानुसार वि.प.क्रं.2 चे म्हणण्‍यानुसार त्यांने करारपत्रात नमुद केल्यानुसार भुखंडासंबंधी सर्व दस्तऐवज, गैरकृषी आदेश व मंजूर नकाश इ. पुरविले परंतु संपूर्ण करारनाम्यात वि.प.क्रं.2 ने हे नमुद केले नाही की, त्यांनी भुखंडाची जमीन कोणाकडुन खरेदी केली अथवा जमिन खरेदी केल्याचे खरेदी नोंदणीपत्र किंवा तो सदर भुंखडाचा मालक असल्याचे करारात नमुद केले नाही.
  3. तक्रारदाराने भुखंड खरेदीपोटी रुपये 5,00,000/- वि.प. ला अदा केल्यानंतर तक्रारदाराने वि.प.ला उर्वरित रक्कम रुपये 3,25,000/- स्व‍िकारुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याबाबत विनंती केली परंतु वि.प.ने दिनांक 30.8.2017 पर्यत कोणतेही प्रयत्न न करता तक्रारदाराला भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही व प्रत्येक वेळी टाळाटाळ करीत आले. तक्रारदाराला दिनांक 21.1.2020 च्या लोकसत्ता दैनिक वर्तमानपत्रातुन कळले की, असंख्‍य भुखंड खरेदी करणा-यांनी जगदंबा रिअलेटर्स चे मालक श्री गोपाल कोंडावार यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली असुन त्यांनी मौजा महरुल, ता.जि. नागपूर तेथील विकसन झालेल्या ले-आऊटमधील भुखंड एकापेक्षा जास्त लोकांना विकुन लोकांना फसविले आहे. वर्तमान पत्रातील बातमी वाचल्यावर त्यांचे मौजा- मंगरुल ता.जि.नागपूर येथील वि.प.चे जबदंबा रिअलटर्स येथील विकत घेतलेल्या भुखंड क्रं. ६५७ (बी), बाबत चौकशी केली असता त्यांचे निर्देशनास आले की वि.प.ने सदर भुखंड अन्य व्यक्तीला विकला आहे. तक्रारदाराने वि.प.चे कार्यालयाला भेट दिली असता ते बंद असुन त्यास कुलुप असल्याचे आढळून आले. तक्रारदाराने वि.प. क्र.2 ला भेटण्‍याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्याचे टाळले करिता तक्रारदाराने मा. मंचासमोर ही तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

  1. वि.प. 1 व 2 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन त्रुटी पूर्ण सेवा दिल्याचे घोषीत करावे.
  2. वि.प. 1 व 2 यांना निर्देशीत करण्‍यात यावे की वि.प. क्रं. 1 व 2 यांनी तक्रारदाराला भुखंड क्रं. ६५७(बी) एकुण क्षेत्रफळ १३९.५८ चौ.मि. ख.क्र.१०६/१ व १०७/१, मौजा-मंहगुल, प.ह.न.७३, ता.जि.नागपूर चे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा वि.प.ला कायदेशीर विक्रीपत्र करुन देणे शक्य नसल्यास वि.प.ने भुखंडाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 18टक्के व्याजासह प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यत मिळुन येणारी रक्कम तक्रारदारास अदा करावी किंवा  त्याच परिसरात असलेल्या बाजारभावानुसार विकसित भुखंडाची किंमत अदा करावी.
  3. तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटीस खर्च अदा करावा अशी मागणी केलेली आहे.

 

  1. वि.प.क्रं.1 व 2 यांचे नावे दैनिक वर्तमानपत्रातुन जाहिर नोटीस काढुन मंचात उपस्थीत राहण्‍याबाबत सुचित करण्‍यात आले होते. परंतु वि.प. क्रं.1 व 2 मंचात हजर झाले नाही म्हणुन प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ५.३.२०२१ पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारदाराने तक्रारीत दाखल दस्तऐवज व लेखी युक्तीवाद याचे वाचन केले असता व तोंडी युक्तीवाद ऐकल्यावर मंचासमक्ष खालील मूद्दे उपस्थित होतात.

मुद्दे                                       उत्तरे 

  1. तक्रारकर्ता हा वि.प. चा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?

         तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ?                होय

  1. आदेश                                  अंतीम आदेशाप्रमाणे 

 

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प. चे मौजा-मंगरुल, ख.नं. १०६/१, १०७/१, प.ह.न.७३, ता.जि. नागपूर येथील जगदंबा प्राईड मधील भुखंड क्रं.६५७ (बी) एकुण क्षेत्रफळ १५०० चौ.फुट, (१३९.५८ चौ.मि.) एकुण रुपये ८,२५,०००/-एवढया रक्कमेत विकत घेण्‍याचा करार दिनांक १६.४.२०१६ रोजी केला. तक्रारदाराने वि.प.ला भुखंड खरेदीपोटी आगाऊ रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 11.1.2016 रोजी नगदी स्वरुपात दिले. त्यानंतर धनादेश क्रं.९५९१९६ दिनांक २१.६.२०१६ अन्वये रुपये 2,00,000/- व धनादेश क्रं.९५९१९९ दिनांक ४.७.२०१६ अन्वये रुपये ५०,०००/-, धनादेश क्रं. ९५९२०० दिनांक २१.७.२०१६ अन्वये रुपये ५०,000 धनादेश क्रं. ९५९२०१ दिनांक १२.३.२०१७ अन्वये रुपये 1,00,000/- असुन एकुण रुपये 5,00,000/- भुखंडाचे खरेदी पोटी वि.प ला अदा केले. तसेच उर्वरित रक्कम रुपये 3,25,000/- वेळोवेळी अदा करण्‍याचे ठरले. करारानुसार भुखंडाचे विक्रीपत्र नोंदणी दिनांक ३०.८.२०१७ ला किंवा त्यापूर्वी करुन देण्‍याचे ठरले व भुखंडाचे विक्रीकरता लागणारा पूर्ण खर्च तक्रारदारास करावा लागेल असे करारात नमुद करण्‍यात आले व तक्रारदाराला भुखंडाचा ताबा मोकळया स्वरुपात देण्‍याचे ठरले.
  2. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्‍याचे वचन दिलेले आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ले-आऊटचा नकाशा तक्रारदाराला दिलेला आहे. म्हणुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s. Narne Construction P.Ltd. Etc. Union of India and Ors. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चा‍लविण्‍याचे अधिकार आहे.
  3. तक्रारदाराने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निर्देशनास आले की तक्रारकर्ता हा वि.प. चा ग्राहक आहे. 
  4. वि.प. ने तक्रारदाराकडुन भुखंडाचे विक्रीपोटी रुपये 5,00,000/- स्वीकारुन तक्रारदाराला भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही व सदरचा भुखंड अन्य व्यक्तीला विकुन तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.
  5.  
  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 यांना आदेशीत करण्‍यात येते की त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीपणे मौजा- मंगरुळ, ख.नं.१०६/१, १०७/१, प.ह.न. ७३, ता.जि.नागपूर येथील जगदंबा प्राईड मधील भुखंड क्रं.६५७(बी) एकुण क्षेत्रफळ १५०० चौ.फुट चे विक्रीपत्र उर्वरित रक्कम रुपये ३,२५,०००/- स्वीकारुन तक्रारदाराला करुन द्यावे व भुखंडाचा प्रत्यक्ष ताबा द्यावा. विक्री नोंदणीचा खर्च तक्रारदाराने स्वतः सोसावा.
  3.  वि.प.क्रं. 1 व 2 यांना मौजा- मंगरुळ, ख.नं.१०६/१, १०७/१, प.ह.न.७३ त.जि.नागपूर येथील जगदंबा प्राईड मधील भुखंड क्रं.६५७(बी) एकुण क्षेत्रफळ १५०० चौ.फुट (१३९.५८ चौ.मि.) चे विक्रीपत्र करुन देणे कायदेशीररित्या शक्य नसल्यास वि. प. क्रं.1 व 2 यांनी भुखंडाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 5,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के दराने दिनांक १२.३.२०१७ पासून प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगीपावेतो व्याजासह येणारी रक्कम तक्रारदारास अदा करावी.
  4. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 30,000/- (रुपये तीस हजार) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- (रुपये वीस हजार) वि.प. क्रं.1 व 2 ने तक्रारदारास अदा करावी.
  5. वरील आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 यांनी संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या आदेश पारित दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावे.
  6. तक्रारकर्त्‍याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.