ग्राहक तक्रार अर्ज क्र.326/2010
तक्रार अर्ज दाखल दि.18/11/2010
अंतीम आदेश दि.30/03/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
1. श्री.सिताराम शंकर फाफाळे, अर्जदार
रा.सर्व्हे नं.93, लासलगाव, (अॅड.प्रशांत ठाकरे)
ता.निफाड,जि.नाशिक.
2. श्री.प्रमोद बनेचंद बागमर,
रा.सर्व्हे नं.93, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
3. श्री.पद्माकर प्रभाकर साखरे,
रा.सुमतीनगर, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
4. श्री.राजेंद्र नानासाहेब काळे,
रा.गुरुसावली, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
5. श्री.अनिल शंकरराव सोनवणे,
रा.किल्ल्यामागे, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
6. श्री.दत्तात्रय वसंत दंडवते,
रा.दुर्गानगर, स्टेशनरोड, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
7. श्री.संजय पोपटराव काळे
रा.टाकळी, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
विरुध्द
1) जाधव गॅस एजन्सी, सामनेवाला नं.1 तर्फे
लासलगाव तर्फे श्री.जयवंत भिकाजी जाधव, (अॅड.एस.वाय.देशमुख)
रा.आशिर्वाद नगर, स्टेशनरोड, लासलगाव,
ता.निफाड,जि.नाशिक.
तक्रार क्र.326/2010
2) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., सामनेवाला नं.2 तर्फे
पत्ताः एल.पी.जी. क्षेत्रीय कार्यालय, (अॅड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे)
एच/1, एम.आय.डी.सी. चिखलठाणा,
औरंगाबाद.431210.
(मा.सदस्या अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी आदेश पारीत केला)
अर्जदार यांना सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत गॅस सिलेंडर वितरणाचे नुतनीकरण करुन तक्रारदार यांना पुर्ववत योग्य त-हेने वेळेवर गॅस सिलेंडर वितरणाचे कार्य करण्याचा हुकूम व्हावा, आर्थीक नुकसान व मानसिक त्रासापोटी रु.5000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत, या मागणीसाठी अर्जदार यांनी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाला नं.1 यांनी पान क्र.83 लगत लेखी म्हणणे, सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.67 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व पान क्र.पान क्र.68 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्दे
1. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? –नाही.
3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला विरुध्द नामंजूर करण्यात येत
आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार व त्यांचे वकील युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.164 लगत लेखी युकतीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला नं.1 व त्यांचे वकील हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत.
सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार क्र.1 ते 7 हे सामनेवाला नं.1 व 2 यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला नं.1 यांचेमार्फत अर्जदार नं.1 ते 7 यांना गॅस सिलेंडरचा पुरवठा होत होता ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान नं.5 ते पान नं.11 लगत अर्जदार नं.1 ते 7 यांच्या गॅस
तक्रार क्र.326/2010
कार्डाच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. सामनेवाला नं.1 व 2 याचे लेखी म्हणणे व पान नं.5 ते पान नं.11 लगतची कागदपत्रे याचा विचार होता अर्जदार नं.1 ते 7 हे सामनेवाला नं.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला नं.2 यांनी सामनेवाला नं.1 यांना डिलर म्हणून नियुक्ती केलेले होते. त्यांचा करार दि.15/10/1994 रोजी संपलेला आहे. कराराचे नुतनीकरण न केल्यामुळे कराराचे कलम 28 अ प्रमाणे गॅस सिलेंडर रिफीलचा पुरवठा बंद केलेला आहे. सामनेवाला नं.2 यांनी दि.7/1/2010 रोजीच्या पत्रान्वये सामनेवाला नं.1 यांचे बरोबरचा दि.15/10/1994 चा करार रद्द केलेला आहे. सामनेवाला नं.1 मार्फत गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे सामनेवाला नं.2 यांनी मे.सी.डी.पटनी यांना लासलगाव ता.निफाड जि. नासिक येथे अॅडव्हॉक गॅस डिलर म्हणून दि.6/1/2010 रोजी नियुक्त केलेले आहे. अर्जदार नं.1 ते 7 यांना व ज्या ग्राहकांना सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडून गॅस पुरवठा होत होता त्या सर्व ग्राहकांना मे.सी.डी. पटनी यांचेमार्फत गॅस सिलेंडर पुरवठा केलेला आहे, सेवेत कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
या कामी सामनेवाला नं.2 यांनी पान नं.21 ते पान नं.63 लगत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. या सर्व कागदपत्रांचा विचार होता सामनेवाला नं.2 यांनी सी.डी.पटनी गॅस डिलर यांचेमार्फत अर्जदार नं.1 ते 7 यांना व अन्य ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरु केलेला आहे ही बाब स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी पान नं.79 लगत जगदीश शेवंतीलाल पटनी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे व पान नं.81 व 82 लगत गॅस पुरवठयाबाबतची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या प्रतिज्ञापत्रांचा व पान नं.81 व पान नं.82 लगतच्या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार नं.1 ते 7 यांना व अन्य ग्राहकांना सी.डी.पटनी या डिलरमार्फत गॅस सिलेंडर पुरवठा होत आहे असे दिसून येत आहे.
सामनेवाला नं.1 यांनी या कामी त्यांचे लेखी म्हणणे व तुर्तातुर्त मनाई अर्जास म्हणणे दाखल केलेले आहे व त्यासोबत पान नं.85 ते पान नं.104 लगत कागदपत्रांच्या झेंरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. या कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला नं.1 व त्यांचे बंधु श्री.सुरेश भिकाजी जाधव व वडील श्री. लक्ष्मण भिकाजी जाधव यांचेमध्ये जाधव गॅस एजन्सी यांबाबत वाद सुरु आहेत व याबाबत निफाड येथील मा.दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांचे कोर्टात सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे बंधु सुरेश जाधव व वडील भिकाजी जाधव यांचेविरुध्द रेग्युलर दिवाणी मुकदमा क्र.31/2009 चा दिवाणी दावा केलेला आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु प्रस्तुत
तक्रार क्र.326/2010
तक्रार अर्जातील अर्जदार यांचा व सामनेवाला नं.1 यांचे बधु यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असा कोणताही संबंध येत नाही.
तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार नं.1 ते 7 यांना मंचाकडून त्यांनी मंचासमोर स्वतः हजर राहाण्याबाबत वेळोवेळी सुचना देवूनही आजतारखेपर्यंत अर्जदार क्र.1 ते 7 हे मंचासमोर गैरहजर राहीलेले आहेत. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आजतारखेपर्यंत अर्जदार नं.1 ते 7 यांना गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नाही हे स्पष्ट करण्याकरीता अर्जदार नं.1 ते 7 यांनी मंचासमोर कोणतेही प्रतिज्ञापत्र तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर आजपर्यंत दाखल केलेले नाही.
अर्जदार नं.1 ते 7 यांना व अन्य ग्राहकांना सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची जबाबदारी सामनेवाला नं.2 यांचेवर आहे. सामनेवाला नं.1 व 2 यांचेमधील करार संपलेला असल्यामुळे सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार व अन्य ग्राहकांना सी.डी. पटनी या गॅस डिलरमार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा केलेला आहे. अर्जदार नं.1 ते 7 व अन्य ग्राहकांना गॅस सिलेंडर पुरवठा वेळेवर होणे ही बाब महत्वाची आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा कोणत्या डिलरमार्फत करावयाचा हा संपुर्ण अधिकार सामनेवाला नं.2 यांचा होता व आहे. वरील सर्व कारणांचा व कागदपत्रांचा विचार होता अर्जदार नं.1 ते 7 व अन्य ग्राहकांना सी. डी. पटनी या डिलरमार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर व योग्य प्रकारे होत आहे हेच स्पष्ट झालेले आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला नं.1 यांचे बंधु श्री.सुरेश भिकाजी जाधव यांनी या तक्रार अर्जामध्ये त्यांना सामनेवाला नं.3 म्हणून सामील करावे या मागणीसाठी पान नं.138 लगत दि.02/05/2011 रोजी अर्ज दिलेला आहे. या अर्जास सामनेवाला नं.1 व 2 यांनी सविस्तर लेखी म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला नं.1 यांनी दाखल केलेल्या पान नं.85 ते पान नं.104 लगतच्या कागदपत्रांचा विचार होता सामनेवाला नं.1 व त्यांचे बंधु सुरेश भिकाजी जाधव व वडील श्री.भिकाजी लक्ष्मण जाधव या तिघांमध्ये जाधव गॅस एजन्सी बाबत दिवाणी कोर्टामध्ये वाद सुरु आहे हे स्पष्ट होत आहे. तक्रार अर्जामध्ये कोणास सामनेवाला म्हणून सामील करावयाचे याचा संपुर्ण अधिकार अर्जदार यांना आहे. तसेच अर्जदार नं.1 ते 7 यांचेमध्ये व सुरेश भिकाजी जाधव यांचे मध्ये ग्राहक व सेवा पुरवठा करणारे असे कोणतेही नाते अस्तित्वात नाही यामुळे श्री.सुरेश जाधव यांनी पान नं.138 लगत दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात येत आहे.
तक्रार क्र.326/2010
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला नं.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला नं.2 यांचा लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अर्जदार क्र.1 ते 7 यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-30/03/2012