द्वारा – श्रीमती. स्नेहा म्हात्रे, अध्यक्षा
तक्रारदार गैरहजर. सामनेवाला 1 व 2 एकतर्फा. प्रकरण आज तक्रारदाराच्या पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादासाठी नेमण्यात आले होते. प्रस्तूत प्रकरण तक्रारदाराच्या पुरावा शपथपत्रासाठी व लेखी युक्तिवादासाठी दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. तक्रारदार प्रस्तूत प्रकरणामध्ये दि. 23/07/2015 पासून 17/08/2015, 28/09/2015, 07/12/2015, 20/01/2016, 04/04/2016, 01/06/2016, 07/07/2016, 09/08/2016, 18/10/2016, 04/01/2017, 16/03/2017, 14/06/2017, 16/08/2017, 26/12/2017, 21/02/2018, 09/04/2018, 05/07/2018, 01/08/2018, 04/09/2018, 05/10/2018, 12/11/2018, 09/01/2019, 01/03/2019, 27/05/2019, 16/07/2019, 21/10/2019, 06/12/2019 रोजी सातत्याने गैरहजर असल्याचे दिसून येते. सबब तक्रारदाराच्या सततच्या गैरहजरीमुळे प्रस्तूत तक्रार ग्रासंका कलम 13 (2) (क) अन्वये खारीज करण्यात येतात. खर्चाबद्दल आदेश नाहीत. प्रकरणात हाच अंतिम आदेश समजण्यात यावा. प्रकरण निकाली.