Maharashtra

Nagpur

CC/605/2021

PRAKASH TAMBOLI - Complainant(s)

Versus

IRIS HOSPITALITY ACTING THROUGH SHRI. ADITYA NANIWADEKAR - Opp.Party(s)

ADV. HARSHAD PURANIK

22 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/605/2021
( Date of Filing : 18 Oct 2021 )
 
1. PRAKASH TAMBOLI
R/O. PLOT NO.26, SWAMI SWARUPANAND SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. IRIS HOSPITALITY ACTING THROUGH SHRI. ADITYA NANIWADEKAR
R/O. PLOT NO.P-115, WADI MIDC, OPP.JAGUAR SHOWROOM, NAGPUR-28
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. HARSHAD PURANIK, Advocate for the Complainant 1
 
Dated : 22 Sep 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1. वि.प. इरीस हॉस्पीटॅलीटी ही भागीदारी संस्था असून वि.प. यांचा सॉलीटेअर बॅक्वेट अॅन्ड हॉटेल या नावाने लग्नसमारंभ व इतर सेवा देण्‍याचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने त्यांचा मुलगा परिमल तांबोलीचे लग्नसमारंभ कार्यक्रमाकरिता व इतर कार्यक्रमाकरिता वि.प.शी संपर्क सांधला. वि.प. ने लग्न समारंभाकरिता हॉल दिनांक 24.4.2021 व 25.4.2021 ला उपलब्ध असल्याचे सांगीतल्यावर तक्रारदाराने त्यांचे मुलाचे लग्नाकरिता वि.प.चा हॉल दिनांक 24.4.2021 व 25.4.2021 या  दोन दिवसांकरिता रुपये 2,36,000/- मध्‍ये आरक्षीत  केला. तक्रारदाराने वि.प.चे लग्नसमारंभाचे हॉलपोटी व २८ खोल्यांचे आरक्षणापोटी धनादेश क्रं. 079667 दिनांक 15.2.2021 अन्वये रुपये 1,18,000/- व धनादेश क्रं.,079668, दिनांक 15.2.2021 रुपये 1,18,000/-, विनिता कॅटरर्सचे यांचे नावाचा धनादेश वि.प.ला कॅटरिगंचे सेवेपोटी दिला त्यामध्‍ये दिनांक-२४.४.२०२१ ला 400 लोकांचे व दिनांक २५.४.२०२१ रोजी 200 लोकांचे जेवणाचा समावेश होता. वि.प. चे लग्न समारंभाच्याहॉलचे नोंदणीचे वेळी तक्रारदाराने वि.पक्षाला कोव्हीड-१९ पॅंन्डॅमिक काळात लग्नसमारंभ 400 लोकांचे उपस्थीत साजरा करु शकतो काय याबाबत विचारणा केली असता, साजरा करु शकता असे वि.प. ने सांगीतले. जर शासनाने कोव्हीड १९ लॉकडॉऊन घोषीत केल्यास व निर्बंध घातल्यास , लग्नसमारंभ रद्द झाल्यास आरक्षणाचे पैस परत करण्‍यात येतील असे सांगीतले.महाराष्‍ट्र शासनाने  कोव्हीड-१९, पॅन्डमिक परिस्थीमूळे दिनांक 13.4.2021 आणि दिनांक 21.4.2021 चे पत्रान्वये लग्नसमारंभ कार्यक्रमांवर आणि लग्नसमारंभ कार्यक्रमात उपस्थीत राहणा-या संख्‍येबाबत निर्बंध घातले त्यामूळे निर्धारित तारखेला लग्न समारंक्ष करणे शक्य नव्हते. महाराष्‍ट शासनाने घातलेल्या निर्बधामूळे वि.प.ने आरक्षण रद्द केले व त्यानंतर तक्रारदाराने वि.प.बरोबर दि.16.4.2021 ला संपर्क साधुन जमा केलेल्या रक्कमेची मागणी केली असता वि.प.ने नकार दिला. त्यानंतर तक्रारदाराने वि.प. ला रक्कम परत करण्‍याबाबत वारंवार विनंती केली. परंतु वि.प.ने रक्कम परत केली नाही. वि.प..ने तक्रारदाराला नोंदणी करतेवेळी कबुल केल्याप्रमाणे कोणतीही सेवा दिली नाही व मागणी करुनही रक्कम परत केली नाही ही वि.प.ची तक्रारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा आहे. त्यामूळे तक्रारदाराने वि.प. ला दिनांक 27.6.2022 ला कायदेशिर नोटीस पाठविली परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प.ने लग्नसमारंभाचे हॉलचे आरक्षणापोटी दिलेली रक्कम रुपये 2,36,000/-, दिनांक १५.२.२०२१ पासुन द.सा.द.शे.  १८ टक्के  व्याजासह परत करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  2. तकारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प. यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस मिळुन वि.प. मंचासमक्ष हजर झाले  नाही व लेखी उत्तर दाखल केले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक    12.8.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                           उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?   होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                 होय

  1. काय आदेश                                अंतिम आदेशानुसार

 

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प.चा लग्नसमारंभ हॉल दिनांक 24.4.2021  व दिनांक 25.4.2021 या दिवशी होणा-या लग्न समारंभाकरिता व दोन दिवसाचे जेवणापोटी वि.प.ला रुपये 2,36,000/- अदा करुन आरक्षीत केल्याचे नि.क्रं.2 वरील ( 1,2) दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते व उर्वरित रक्कम अदा करावयाची होती हे दाखल दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे स्पष्‍ट होते. परंतु महाराष्‍ट्र शासनाचे दिनांक 13.4.2021 व 21.4.2021 ला पत्रान्वये लग्नसमारंक्ष कार्यक्रमावर व लग्न समारंभाला उपस्थीत राहण्‍या-या संख्‍येवर निर्बंध घातले त्यामूळे निर्धारित तारखेला लग्न समारंभ करणे शक्य नव्हते. मा.आयुक्त महानगर पालीका यांचे कार्यालयाचे पत्र दिनांक 11.3.2021 व  दिनांक १९.४.२०२१ चे आदेशान्वये नागपूर शहरातील लग्न कार्यक्रमांवर निर्बंध घालण्‍यात आले होते. त्यामूळे वि.प.ने लग्नसमारंभाचे त्या कालावधीतील कार्यक्रम रद्द्र केले. त्यामूळे तक्रारदाराला मूलाचे लग्नाकरिता आरक्षीत केलेला वि.प.चा हॉल रद्द करण्‍याशिवाय पर्याय नव्हता. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 16.4.2021 ला वि.पक्षासी संपर्क साधुन नोंदणीपोटी जमा केलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतु वि.प.ने रक्कम परत केली नाही. मार्च 2021 मध्‍ये कोव्हीड-19 महामारीमूळे तक्रारकर्ता व वि.प. यांचेमधील करार अमंलात येवू शकला नाही. त्यामूळे तक्रारकर्ता वि.प.कडुन अदा केलेली रक्कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. ने तक्रारदाराकडुन लग्नसमारंभाच्या हॉलचे आरक्षणापोटी स्वि‍कारलेली रक्कम रुपये 2,36,000/-, तक्रारदाराला परत करावी. सदर रक्कमेवर दि.15.2.2021 पासुन  द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे.
  3. वि.प ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.