Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/11/14

Sudhir Chilya Jadhav - Complainant(s)

Versus

IRCTC - Opp.Party(s)

21 Mar 2011

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/11/14
1. Sudhir Chilya Jadhav302, b wing, MSEDCO.Colony, Nr Swastik Chamber, Mumbai 71 ...........Appellant(s)

Versus.
1. IRCTCmumbai ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. S P Mahajan ,PRESIDENTHONORABLE G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 21 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

          
निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्‍हाण, सदस्‍य               ठिकाणः बांद्रा
  
निकालपत्र
 
तक्रारीचे संक्षिप्‍त स्‍वरुप खालीलप्रमाणेः-
 
      तक्रारदाराने दि.01.02.2008 रोजी चेंबूर स्‍टेशन नजीकच्‍या एका इंटरनेट कॅफेवरुन दि.10.02.2008 च्‍या नागपूर ते एलटीटी मुंबई दरम्‍यानच्‍या प्रवासासाठी संगणकावरुन रेल्‍वे तिकिट आरक्षित केले. त्‍याची तपशीलवार माहिती तक्रार अर्जात देण्‍यात आलेली आहे. तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे दि.13.02.2008 रोजी तक्रारदाराला क्रेडिट कार्डाचे मासिक विवरणपत्र प्राप्‍त झाले तेव्‍हा वरील तिकीटाचे भाडे दोनवेळा त्‍याच्‍या खात्‍यातून वजाती झाल्‍याचे दिसून आले. या प्रकरणी इंटरनेटवरुन सदर तिकीटाचे दोनदा नोंदणी झाल्‍याचे लक्षात आले. तेव्‍हा आयआरसीटीसी च्‍या वेबसाईटवरील त्‍याच्‍या खात्‍याची फेरतपासणी केली असता दि.01.02.2008 रोजी 5 ते 6 मिनीटाच्‍या फरकाने तक्रारदाराच्‍या नागपूर ते मुंबई प्रवासाचे तिकीट दोनवेळा नोंदणी झाल्‍याचे दिसून आले. तक्रारदाराचे म्‍हणणे कि, संगणक प्रणालीमध्‍ये असे घडायला नको होते, याचे कारण संगणक प्रणालीमध्‍ये दोष असून तो दोष सामनेवाला यांनी दुर करणे ही त्‍यांची जबाबदारी आहे. संगणक प्रणाली सदोष असल्‍यामुळे इंटरनेटवरुन तिकीटाची नोंदणी / आरक्षण करताना दोन वेळा तक्रारदाराच्‍या खात्‍यातील रक्‍कमेचे वजातीकरण झाले, यामध्‍ये सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. या प्रकरणी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे पत्रव्‍यवहार केला, त्‍यांनी त्‍यांच्‍या बँकेकडे पत्रव्‍यवहार केला. सामनेवाला यांचेशी संपर्क साधला त्‍यांना विनंती केली परंतु सामनेवाला यांचेकडून तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण करण्‍यात आले नाही. तक्रारदाराचे म्‍हणणे कि, सामनेवाला यांच्‍या व्‍हीटी येथील कार्यालयात जाऊन प्रत्‍यक्ष चौकशी केली असता ई-तिकिटाच्‍या संदर्भातील तक्रारीचे निवारणासाठी मुंबईत कोणतीही यंत्रणा उपलब्‍ध नसल्‍याचे सांगण्‍यात येऊन दिल्‍लीचा रस्‍ता दाखविण्‍यात आला. तक्रारदाराने दुस-यांदा झालेल्‍या प्रदानाची रक्‍कम त्‍यांना परत मिळावी म्‍हणून कसोशीने प्रयत्‍न केला. परंतु सामनेवाला यांचेकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, त्‍यामुळे त्‍यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी न्‍याय मिळावा म्‍हणून त्‍यांनी या मंचासमोर अर्ज दाखल करुन खालीलप्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
अ    मंचाने व्‍यापक जनहिताच्‍या दृष्‍टीने आयआरटीसीला
योग्‍य निर्देष द्यावेत.
 
ब     सामनेवाले यांनी तिकीटाचे दुस-यांदा झालेल्‍या प्रदानाची रक्‍कम रु.1,462.80पैसे तक्रारदाराला परत करावे व नुकसान भरपाई रक्‍कम रु.10,000/- मिळावी. तसेच क्रेडिट कार्डचा विलंब आकार रक्‍कम रु.230/- मिळावा व अन्‍य दाद मिळावी.
 
2          सामनेवाला यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. तक्रार खोटी असून तक्रारीस कोणतेही कारण उदभवलेली नसल्‍यामुळे ती खर्चासहीत रद्द करण्‍यात यावी अशी सामनेवाला यांची विनंती आहे. सामनेवाला हे तिकीट विक्रेते (vendor) असून त्‍यांनी त्‍यांची संगणक प्रणाली तक्रारदारांना ई-तिकीट आरक्षण करण्‍यासाठी उपलब्‍ध करुन दिली होती, त्‍यावरुन तक्रारदाराने रेल्‍वेचे तिकीट आरक्षित करताना आवश्‍यक ती दक्षता घेणे, ही त्‍यांची जबाबदारी होती तशी दक्षता त्‍यांनी घेतली नाही आणि त्‍यांच्‍याच निष्‍काळजीपणामुळे ई-तिकीट माध्‍यमातून दोनवेळा आरक्षण झाले आणि त्‍यांच्‍या क्रेडिट कार्डावरुन त्‍यानुसार दोनवेळा आरक्षणाच्‍या तिकीटाची रक्‍कम वजाती झाली यासाठी सामनेवाला हे जबाबदार नाहीत. यामध्‍ये सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता नाही. तक्रारदाराने चेंबुर येथील इंटरनेट कॅफेमधून संगणकावरुन ई-तिकीटाचे आरक्षण केले याचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.  तक्रारदारांनी इंटरनेटवरुन स्‍वतःच संबंधित तिकीटाचे आरक्षण केलेले होते,  सामनेवाले यांचे म्‍हणणे कि, आरक्षण दि.31.01.2008 रोजी करण्‍यात आले होते. तक्रारदाराने 8 ते 9 मिनिटाच्‍या फरकाने तिकीटाचे आरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न केला होता हेही त्‍यांनी त्‍यांच्‍या तक्रार अर्जात नमूद केलेले आहे आणि तक्रारदारानेच   दुस-यांदा ई-तिकीट आरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न केला होता त्‍यांच्‍या या कृती नुसार संबंधीत तिकीटाचे दोनवेळा आरक्षण झाल्‍यामुळे त्‍याप्रमाणे प्रदानाचे वजातीकरण झाले.
 
3            संगणकावरुन तिकीटाचे आरक्षण झाले किंवा नाही हे पाहण्‍यासाठी त्‍यांच्‍या संगणक साईटवर जनरल या मथळयाखाली माहिती दिलेली आहे तसेच तपासावा किंवा आयआरसीटीसीश यांचेशी संपर्क साधावा असा सल्‍ला दिला जातो किंवा तिकीट आरक्षणामध्‍ये काही दोष असल्‍यास व आवश्‍यक वाटल्‍यास आयआरसीटीसीशी संपर्क साधावा असेही सांगितले जाते परंतु त्‍याप्रमाणे तक्रारदाराने कृती केल्‍याचे दिसून येत नाही.  याप्रकरणी तक्रारदाराचाच निष्‍काळजीपणा असल्‍याचे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. कारण तक्रारदाराला त्‍याच्‍या क्रेडिट कार्डाचे मासिक विवरणपत्र दि.13.02.2008 रोजी मिळाले, त्‍यावेळी दुस-यांदा प्रदान झाल्‍याचे लक्षात आले. परंतु तत्‍पूर्वी तिकीटाचे आरक्षण योग्‍य प्रकारे झाले आहे किंवा कसे यासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍या ई-मेलची पाहणी केलेली नाही किंवा त्‍यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क केलेला नाही. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍यानुसार, आरक्षणाच्‍या दोनवेळच्‍या व्‍यवहारात 9 मिनीटापेक्षा अधिक कालावधीचे अंतर आहे. तक्रारदाराने तिकीटाच्‍या आरक्षणाच्‍या पूर्वमाहितीचा तपशील पडताळून पाहिलेला नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे त्‍यांनी त्‍यांच्‍या बॅंकेशी जो पत्रव्‍यवहार केला त्‍याची माहिती सामनेवाला यांना नाही, म्‍हणून याबाबतचा आरोप त्‍यानी नाकारला. संबंधीत तक्रारीवरुन तक्रारदाराने सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता असल्‍याचे दाखवून दिलेले नाही, त्‍यामुळे सदरहू तक्रार खोटी, बिनबुडाची असल्‍यामुळे ती खर्चासह रद्द करण्‍यात यावी अशी सामनेवाला यांची विनंती आहे.
 
4           तक्रार अर्ज, त्‍यासोबत जोडण्‍यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, प्रतिनिवेदन, सामनेवाला यांची कैफियत व लेखी युक्‍तीवाद व नियमावली, इत्‍यादी कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकला.
 
5                      तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्रांसह ई-तिकीट आरक्षित केल्‍याबाबतची काही कागदपत्रं दाखल केलेली आहेत तसेच त्‍यांच्‍या संबंधीत बँकेशी केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या प्रतीं दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या वेबासाईटचा वापर करन दि.01.02.2008 रोजी चेंबुर स्‍टेशन नजीकच्‍या एका इंटरनेट कॅफेमधील संगणकामधून ई-तिकीटाचे आरक्षण केले, त्‍याबाबतची तपशीलवार माहिती त्‍यांनी तक्रार अर्जात नमूद केली आहे. आरक्षण झाल्‍यानंतर, क्रेडिट कार्डाचे दि.13.02.2008 चे मासिक विवरणपत्र तक्रारदाराला मिळाल्‍यानंतर वर नमूद केलेल्‍या संगणक तिकिट आरक्षणाच्‍या संदर्भात दोनवेळा तिकटीची रक्‍कम वजाती केल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतर, सामनेवाला यांच्‍या वेबसाईटवरील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या खात्‍याची फेरतपासणी केली असता   5 ते 6 मिनीटाच्‍या अंतराने दोनवेळा तिकिट आरक्षित झाल्‍याचे दिसून आले. त्‍याअर्थी, तक्रारदाराने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे 5 ते 6 मिनीटाच्‍या अंतराने तिकीटाचे आरक्षण केल्‍याचे नाकारता येणार नाही. तक्रारदारांनी या प्रकरणी सामनेवाला यांच्‍या वेबसाईटचा दोष असल्‍याचे कथन केले आहे.  परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या वेबसाईटमध्‍ये निश्चित कोणता दोष होता याविषयी त्‍या क्षेत्रातील संबंधीत तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदाराने चेंबुर स्‍टेशन नजीकच्‍या इंटरनेट कॅफेमधून संगणक ति‍कीट आरक्षित केले, त्‍यावेळी इंटरनेट कॅफेच्‍या संगणकाची सर्वसाधारण स्थिती निश्चित काय होती याबाबत तक्रारदाराने काहीही भाष्‍य केलेले नाही, कारण तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे क्रेडिट कार्डाचे मासिक वि‍वरणपत्र मिळाल्‍यानंतर वेबसाईटच्‍या तक्रारदाराच्‍या खात्‍यासंबंधी फेरतपासणी केल्‍यानंतर 5 ते 6 मिनिटाच्‍या अंतराने दोनदा आरक्षण झाल्‍याचे तक्रारदाराचे कथन आहे. याचा अर्थ, वर नमूद केलेल्‍या संगणकावरुन सामनेवाला यांच्‍या वेबसाईटचा वापर करताना तक्रारदाराने कळतनकळत दोनवेळा आरक्षणाची कृती केल्‍यामुळे दोनवेळा आर‍क्षण झाले हे नाकारता येणार नाही. सुरुवातीला पहिल्‍यांदा आरक्षणाची कार्यवाही केल्‍यानंतर त्‍यानुसार, तिकिट आरक्षित झाले किंवा नाही याची खातरजमा तक्रारदाराने केली किंवा नाही याचा ऊहापोह तक्रार अर्जात केलेला नाही. मशीनच्‍या चुकीमुळे आरक्षण झालेले नाही असे गृहीत धरुन तक्रारदाराने दुस-यांदा आरक्षण केल्‍याचे नाकारता येणार नाही तसेच पहिल्‍यांदा आरक्षण केल्‍यानंतर त्‍याबाबतची छायांकित प्रत तक्रारदाराला मिळाली किंवा नाही याचेही स्‍पष्‍टीकरण तक्रार अर्जात केलेले नाही, त्‍यामुळे सामनेवाला यांची या प्रकरणी चुक आहे म्‍हणता येत नाही. तसेच तक्रारदाराने संबंधीत इंटरनेट कॅफेला पक्षकार केलेले नाही. त्‍याचप्रमाणे, कॅफेच्‍या संगणक कार्यप्रणालीमध्‍ये काही दोष होता कि नाही याबाबतही काही उल्‍लेख न करता सामनेवाला यांची वेबसाईट सदोष आहे असे कथन केले आहे परंतु त्‍या पृष्‍ठर्थ त्‍यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही, त्‍यामुळे त्‍यांच्‍या सेवेत कमतरता आहे असे म्‍हणता येणार नाही.
 
6           सामनेवाला यांनी वेबसाईटचा वापरासंबंधीच्‍या नियमावलीची प्रत दाखल केलेली आहे, त्‍यातील, जनरल क्र.2 मधील उतारा खालीलप्रमाणे आहे.
 
General No.2:- “Following terms and conditions will apply if you wish to use the Indian Railways online ticket booking service offered through the IRCTC website.   Please go through the conditions carefully and if you accept them, you may register and transact on the site no.user can register more than once on the site. Please note that once you register yourself on the IRCTC site, you are deemed to have agreed to the terms and conditions set forth below. If You do not agree with all these terms and conditions, you must not transact on this Website. Once you have clicked the ‘I Agree’ buttons at the bottom of these Terms and Conditions you have entered into a formal agreement with IRCTC for the purpose of transactions on this website”.
 
After pressing the “Buy” button, if the “Ticket reservation output page” is not displayed on your monitor due to power failure or Internet link failure, please click the “Booked Tickets” menu on the left side of the screen. This page contains all the details of the tickets booked by you. If the reservation desired by you finds a place in the above page, you can note down the transaction id, PNR and other details. The tickets will be delivered by you. You are also advised to check you e-mail or contract IRCTC, if necessary. In case user fails to check his “booked tickets”, does a repeated transaction, also falls to cancel the ticket. The user shall have no right to claim the amount. The loss on this account shall not be borne either by IRCTC or by the Banks/ Payments Gateways”. 
 
For detailed guidelines regarding booking of tickets, click below How to Book tickets online –A Guide.
                       
 
General No.2.6 :- CANCELLATION/REFUND /MODIFIACTION OF TICKETS I-tickets Cancellation : For I-tickets, cancellation is not possible on the Internet. To cancel a ticket, the customer will have to submit the ticket at a PRS counter. The fare paid by the customer will be refunded electronically (as credit to the relevant credit card / account used for the transaction) after deducting cancellation charges. Bank charges that are being levied by the Payment. gateways/ Banks are not subject to refund in the event of cancellation of tickets by the Customer. The Cancellation charge is determined by the Indian Railway’s rules for cancellation and is based on the time of cancellation and the status of the ticket. The service charge is not refunded PRS counter will issue a cancellation ticket/receipt and IRCTC will credit the amount of refund due, to the customer’s account. No cash refund will be given to the passenger. For details please refer to the Indian Railways’ rules for Cancellation.                       
 
7           सामनेवाला यांच्‍या वेबसाईटचा वापर ई-तिकिट आरक्षणांसाठी करताना त्‍यांची नियमावली संबंधीतांना मान्‍य आहे असे नमूद केल्‍यानंतरच ई-तिकीटाचे आरक्षण करता येते. तिकिटाचे आरक्षण करताना आरक्षण करणा-याला संबंधीत नियमावलीचे पालन करणे ही त्‍यांची जबाबदारी आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्‍या वेबसाईटचा वापर ई-तिकिट आरक्षणासाठी केलेला असल्‍याने संबंधीत नियमावलीमध्‍ये करण्‍यात आलेली तरतूद त्‍यांना अमान्‍य आहे असे म्‍हणता येणार नाही. संबंधीत तरतुदीनुसार, तिकिटाचे आरक्षण करणे हि, तक्रारदाराची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्‍याने व्‍यवस्थित पार पाडल्‍याचे दिसून येत नाही. कारण तक्रारदाराने स्‍वतःच संबंधीत तिकिटाचे आरक्षण केलेले असल्‍यामुळे या प्रकरणी जी काही घटना घडली, त्‍यासाठी तक्रारदार स्‍वतः जबाबदार आहेत. त्‍यामुळे तक्रारदाराला दुस-यांदा आरक्षित झालेल्‍या तिकिटाची रक्‍कम परत मागता येणार नाही, कारण सदर तिकिटाची रक्‍कम ही सामनेवाला यांच्‍या खात्‍यात जमा न होता, ती रेल्‍वेच्‍या खात्‍यात जमा होत असल्‍यामुळे त्‍याबाबतचा परतावा मागावयाचा असल्‍यास त्‍याबाबत तक्रारदाराने विहीत कार्यपध्‍दती अवलंबून रेल्‍वेच्‍या संबंधीत प्राधिका-यांकडे परतावा मागणे आवश्‍यक होते. तसे त्‍यांनी केलेले नाही, म्‍हणून तक्रार अर्जात काही तथ्‍य असल्‍याचे दिसून येत नाही व त्‍यांनी सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता असल्‍याचेही सिध्‍द केलेले नाही.
 
            तक्रार अर्ज हा रद्दबातल करण्‍यास पात्र असल्‍याचे मंचाचे मत आहे, म्‍हणून या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
                        
आदेश
(1)   तक्रार क्र.14/2011(138/2009) रद्दबातल करण्‍यात येते.
 
(2)   या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
 
(3)   आदेशाच्‍या प्रमाणिंत प्रतीं दोन्‍हीं पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

[HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT