DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/396/2017 | ( Date of Filing : 21 Sep 2017 ) |
| | 1. ADV. RACHANA DATTATRAYA JOSHI | R/O. 164, OM APRT., PANDE LAYOUT, KHAMLA, NAGPUR-25. | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. INTEX TECHNOLOGIES (I) LTD. , THROUGH MANAGING DIRECTOR, MR. NARENDRA BANSAL | A-61, OKHLA INDUSTRIES AREA, PHASE-II, DELHI-110020 | DELHI | WEST BENGAL | 2. AREA SERVICE MANAGER, INTEX TECHNOLOGIES (I) LTD. MR. SATISH TRIPATHI | C/O. PRATHAM SERVICES, BLOCK NO. 301, IMPERIAL PLAZA, SOMWAR BAZAR ROAD, NEAR AMBEDKAR PUTLA, SITABULDI, NAGPUR-440012 | Nagpur | Maharashtra | 3. PRATHAM SERVICES, THROUGH CENTRE MANAGER, MR. SUMIT BONKILE | BLOCK NO. 301, IMPERIAL PLAZA, SOMWAR BAZAR ROAD, NEAR AMBEDKAR PUTLA, SITRABULDI, NAGPUR-440012 | Nagpur | Maharashtra | 4. CITY COLLECTION, THROUGH OWNER/ PROPRIETOR | CITY COLLECTION SHOP NO. 2, NEEL KAMAL COMPLEX, MAHAJAN MARKET, SITABULDI, NAGPUR-12 | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
Dated : 10 Jul 2019 |
Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा - श्री एस.आर.आजने, मा. सदस्य ) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 हा निर्माता असुन विरुध्द पक्ष क्रमांक 2 हा विरुध्द पक्ष क्रमांक 1 चा सर्विस मॅनेजर आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 3 हा विरुध्द पक्ष क्रमांक 1 चे अधिकृत सर्विस सेंटर आहे. तक्रारकर्त्याला नविन मोबाईल सेट विकत घ्यायचा असल्यामुळे त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 4 च्या दुकानात जावुन नविन इंटेक्स अक्वा मोबाईल ज्याचा आय.एम.ई.आय. नंबर 91147175150728 हा असून तो त्याने नगदी रुपये 9750/- देऊन दिनांक 10/2/2017 ला विकत घेतला. तक्रारकर्त्याला त्याने विकल घेतलेल्या मोबाईल मध्ये 3 महिण्यात आवाजामध्ये दोष आढळला आणि तक्रारकर्त्याने सदर मोबाईल विरुध्द पक्ष क्रमांक 3 या अधिकृत सर्विस सेंटरला दुरुस्तीकरीता दिनांक 18/5/2017 ला दिला. दिनांक 18/5/2017 ते दिनांक 31/5/2017 दरम्यान तक्रारकर्त्याने 2-3 वेळा सेर्विस सेंटरला भेट दिली परंतू मोबाईल मधील दोष दुरुस्त झाला नाही. विरुध्द पक्ष क्रमांक 3 ने मोबाईल मधील मदरबोर्ड व स्पीकर तीन ते चार वेळा बदलविले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दुरुस्त केलेला मोबाईल घेण्यास विनंती केली परंतू तक्रारकर्तीने मोबाईल हॅन्डसेट घेण्यास नकार दिला कारण मोबाईल मधील मदरबोर्ड काढून त्याऐवजी दुसरा मदरबार्ड त्यामध्ये स्थापीत केला होता. त्यानंतर विरुध्द पक्ष क्रमांक 2 आणि 3 यांनी तक्रारकर्तीला नादुरुस्त मोबाईल ऐवजी नविन मोबाईल हॅन्डसेट दिला त्याबाबतची नोंद खरेदी बिलावर दिनांक 13/6/2017 ला विरुध्द पक्षाने घेतली आहे.
- त्यानंतर दिनांक 10/8/2017 ला तक्रारकर्तीच्या मोबाईल हॅन्डसेट मध्ये पुन्हा बिघाड झाला त्यानंतर तक्रारकर्तीने पुनःश्च विरुध्द पक्ष क्रमांक 3 च्या मोबाईल सर्विस सेंटरला दिनांक 11/8/2017 ला मोबाईल दुरुस्ती करीता दिला तसेच तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला दुरध्वनी आणि मेल द्वारे सुचित केले. त्यानंतर वारंवार तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला मोबाईल मधील बिघाड बाबत विचारणा केली. परंतू विरुध्द पक्ष क्रमांक 2 व 3 यांनी मोबाईल बंद होण्याचे कारण तक्रारकर्तीला कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 4 यांना दिनांक 23/8/2017 रोजी नोटीस पाठविली व दोषपूर्ण मोबाईल सेट पुरविल्यामुळे मोबाईलच्या किंमतीची मागणी केली. दिनांक 23/8/2017 ला पाठविलेल्या मेल च्या संदर्भात विरुध्द पक्ष क्रमांक 2 श्री ञिपाठी कडून तक्रारकर्तीला फोन आला व मोबाईल दुरुस्त केल्याबाबत कळविले व तो घेऊन जाण्याबाबत कळविले. विरुध्द पक्ष यांनी दुरध्वनी द्वारे मदरबोर्ड बदलवून मोबाईल दुरुस्त केल्याचे कळविले परंतू तसे लेखी तक्रारकर्तीला कळविले नाही. तक्रारकर्तीला मोबाईल दुरुस्ती करीता दिलेल्या जॉब शिटवर नमुद केले आहे की, “ Guarantee of the service and parts used in this repair is limited to 30 days only from the date of repair.” तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला मोबाईल चे बिघाडीचे कारणबाबत वारंवार विचारणा केली परंतू विरुध्द पक्ष क्रमांक 2 व 3 यांनी मोबाईल मधील बिघाडी बाबत तक्रारकर्तीला लेखी कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दिनांक 5/9/2017 ला कायदेशीर नोटीस पाठविली परंतू त्याबाबत विरुध्द पक्षाने काहीही दखल घेतली नाही व उत्तर दिले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण मोबाईल आणि न्युनतम सेवा दिल्यामुळे तक्रारकर्तीला आर्थिक, मानसिक व शारीरीक ञास झाला आहे व तिला गैरसोय झाली आहे. करीता तक्रारकर्तीला मंचात तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्तीने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला मोबाईल ची किंमत रुपये 9,750/- 18 टक्के व्याजासह द्यावी. मानसिक व शारीरीक ञासाकरीता रुपये 10,250/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्याचे आदेश करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1,2 व 3 चे कथनानूसार विरुध्द पक्षाने वॉरंटी अंतर्गत द्यावयाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व निष्काळजीपणा न दाखविता सेवा दिली आहे. तक्रारकर्ती विरुध्द पक्षाविरुदध तक्रार दाखल करण्यात तक्रारीचे कारण दाखविण्यात अपयशी ठरली आहे. तक्रारकर्तीच्या चुकीच्या हाताळण्यामुळे मोबाईल हॅन्डसेट मध्ये दोष निर्माण झाला आहे. मोबाईल च्या वॉरंटीमध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला मोबाईल हॅन्डसेट मधील दोषी पार्ट ला काढून मोबाईल दुरुस्त करुन दिला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षावर जे आरोप लावलेले आहे ते सर्व चुकीचे आहे व त्याबाबत तक्रारकर्तीजवळ कोणताही पुरावा नाही आहे. त्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 4 चे कथनानूसार तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 4 चे दुकानातुन विरुध्द पक्ष क्रमांक 1 याने निर्मीत केलेला मोबाईल हॅन्डसेट विकत घेतला. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 1 याने निर्मित केलेल्या मोबाईल हॅन्डसेटमधील दोषाबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक 2 व 3 याने दिलेल्या न्युनतम सेवे बाबत तक्रार दाखल यांनी केलेली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 4 यांनी कोणत्याही प्रकारची न्युनतम सेवा दिलेली नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक 4 हा तक्रारकर्तीस मानसिक व शारीरीक ञासापोटी रक्कम देण्यास जबाबदार नाही आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 4 विरुध्द दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार त्यासोबत दाखल केलेले दस्ताऐवज तसेच विरुध्द पक्षाने दाखल केलेला जबाब व इतर दस्तावेज व उभय पक्ष वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकून घेतल्यावर मंचाने खालिल मुद्दे विचारात घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमूद करीत आहे.
अ.क्र. मुद्दे उत्तर 1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1.2 व 3 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 4 यांचे कडून विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी निर्मीत केलेला मोबाईल हॅन्डसेट रुपये 9750/- देऊन खरेदी केला. तक्रारकर्ताने निशानी क्रमांक 2(1) वर सादर केलेल्या रिटेल इनवॉइस प्रमाणे हे स्पष्ट होते की तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्तीने मोबाईल हॅन्डसेट विकत घेतल्यानंतर अवघ्या तीन महिण्यात तक्रारकर्तीच्या मोबाईल मध्ये दोष आढळल्यामुळे विरुध्द पक्षाकडे दुरुस्तीकरीता सादर केला. त्यासंबंधीची जॉब शिट तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक 2 (2,3 व 4) वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या दोषी मोबाईल मधील मदरबोर्ड व स्पीकर 3-4 वेळा बदलविल्यामुळे तक्रारकर्तीने दोषपूर्ण मोबाईल घेण्यास नकार दिला व नव्या मोबाईलची मागणी केली. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या मागणीप्रमाणे तक्रारकर्तीने खरेदी केलेल्या मोबाईल ऐवजी दिनांक 13/6/2017 ला दुसरा मोबाईल तक्रारकर्तीला दिला. त्याबाबतची नोंद तक्रारकर्तीने मोबाईल खरेदी केलेल्या रिटेल इनवॉइस वर घेतली आहे व त्याचा आय.एम.ई.आय. नंबर 911471751030520 हा आहे. तक्रारकर्तीला नव्याने दिलेल्या मोबाईल दिनांक 10/8/2017 ला बंद पडला. तक्रारकर्तीने बंद पडलेला मोबाईल विरुध्द पक्ष क्रमांक 3 यांचेकडे दिनांक 11/8/2017 ला सादर केला त्यासंबंधीची जॉबशिट तक्रारकर्तीने नि शानी क्रमांक 2(8) वर दाखल केली आहे. त्या जॉबशिट वर Problem Reported या शि र्षकाखाली Hand set dead हा शेरा विरुध्द पक्षाने लिहिलेला आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला मोबाईल हॅन्डसेट मधील दोषाबाबत वारंवार विचारणा केली व मोबाईल हॅन्डसेट बंद होण्याचे कारण विचारले परंतू त्याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला लेखी कळविले नाही. विरुध्द पक्षाने मंचामध्ये दाखल केलेल्या लेखी जबाबात नमुद केले आहे की विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन दिल्याबाबतचे कळविण्यात आले परंतु तिने मोबाईल हॅन्डसेटची विरुध्द पक्षाचे दुकानातुन उचल केली नाही परंतु विरुध्द पक्षकार दुरुस्त मोबाईल हॅन्डसेट मंचासमक्ष दाखल करण्यास अपयशी ठरला आहे. विरुध्द पक्ष यांचेच रिपोर्टप्रमाणे नविन मोबाईल सुद्धा थोड्याच दिवसात डेड (Dead) झाला यावरुन असे दिसुन येते की, नविन मोबाईल मध्ये सुद्धा निर्मिती दोष आहे आणि नविन मोबाईल योग्य प्रकारे दुरुस्त केला आहे आणि तो पुन्हा नादुरुस्त होणार नाही या बाबत विरुध्द पक्ष यांनी कोणत्याही प्रकारे खुलासा केला नाही आणि तो योग्य प्रकारे चालु असल्याबाबत मंच आणि तक्रारदारासमक्ष प्रात्यक्षिक दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची मोबाईल ची किंमत देण्याबाबची मागणी हे मंच मान्य करीत आहे व खालिलप्रमाणे आदेश करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्षाला आदेश देण्यात येते की, विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या तक्रारकर्तीला मोबाईल ची किंमत रुपये 9,750/- मंचाचे अंतिम आदेशाच्या तारखेपासून द.सा.द.शे 7 टक्के व्याजासह प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 4 यांना वैयक्तीक व संयुक्तपणे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला शारीरीक व मानसिक ञासाकरीता रुपये 3,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 2,000/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL] | PRESIDENT
| | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| |