(मा.अध्यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना 1 महिन्याच्या आत नाशिक येथे योग्य पगाराच्या नोकरीचा कॉल सामनेवालाकडून यांचेकडून देववावा आणि जो पर्यंत अर्जदार यांना सामनेवाला यांनी कबूल केल्याप्रमाणे नोकरी मिळत नाही तो पर्यंत इन्शुरन्स क्षेत्रात प्लेसमेंटची सुविधा देण्यात यावी असे आदेश द्यावेत, वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला चुकल्यास अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे भरलेली फीची रक्कम रु.40,000/- परत मिळावी. मानसिक त्रासापोटी रु.40,000/- मिळावेत व वरील रकमेवर 15% दराने व्याज मिळावे, अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांना या तक्रार अर्जाची जाहीर नोटीस दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामधून 10 जुलै 2011 रोजी पान क्र.32 प्रमाणे पाठवण्यात आली होती. ही नोटीस मिळूनही सामनेवाला हे मंचासमोर गैरहजर राहीलेले आहेत यामुळे सामनेवाला यांचेविरुध्द दि.17/08/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेले आहेत. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून व्याजासह रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत काय?- होय 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांचे वतीने अँड.वाय.बी.वाडेकर यांनी युक्तीवाद केलेला आहे. याकामी अर्जदार यांनी पान क्र.5 लगत सामनेवाला यांचे जाहीरात पत्रक, पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 लगत पैसे भरल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 ची कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपण नाकारलेली नाहीत. पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 चे पावतीनुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.40,000/- जमा केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कागदपत्रांचा व विवेचनाचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. पान क्र.5 चे सामनेवाला यांचे जाहीरातपत्रकामध्ये 100% रिप्लेसमेंट गॅरंटी असा स्पष्ट उल्लेख असून एकूण 4 वेगवेगळया शेक्षणिक कोर्सेसना अँडमिशन असाही उल्लेख आहे. पान क्र.9 लगत सामनेवाला यांचे दि.07/02/2010 रोजीचे पत्र दाखल आहे. या पत्रामध्ये किती पगार मिळणार व कसल्या प्रकारची नोकरी मिळणार याचा उल्लेख आहे. पान क्र.10 लगत अर्जदार यांना सामनेवाला यांनी दिलेले सर्टिफिकेट व पान क्र.10अ लगत अर्जदार यांना सामनेवाला यांनी दिलेले पासिंग सर्टिफिकेट अशी कागदपत्रे दाखल आहेत. पान क्र.5 ची जाहीरातीनुसार व पान क्र.9 चे पत्रानुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांना योग्य त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करुन दिलेली नाही ही बाब अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथनावरुन स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये सामनेवाला यांचेकडून नोकरी मिळावी किंवा रक्कम रु.40,000/- परत मिळावे अशी मागणी केलेली आहे. पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 चे पावत्यानुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे एकूण रक्कम रु.40,000/- जमा केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.6, पान क्र.7 व पान क्र.8 चे पावतीनुसार अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.40,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना योग्य त्या वेळेत नोकरी मिळालेली नाही तसेच रक्कम रु.40,000/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना परत मिळालेली नाही. याचा विचार होता निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणाचा विचार होता अर्जदार हे मंजूर रक्कम रु.40,000/- या रकमेवर पान क्र.8 ची पावतीची तारीख दि.03/04/2010 या तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून नोकरी मिळावी किंवा रक्कम परत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचाकडे दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.7500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे काळात अर्जदार यांना सामनेवाला यांनी पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 2अ) रक्कम रु.40,000/- (रुपये चाळीस हजार) द्यावेत. व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रक्कम रु.40,000/-वरती दि.03/04/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज द्यावे. 2ब) मानसिक त्रासापोटी रु.7500/-द्यावेत. 2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत. (आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः-31/12/2011 |