::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24/06/2013)
1) तक्रारदाराने तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणप्रमाणे.
अर्जदार हे बल्लारपुर जि. चंद्रपूर येथील रहिवासी असुन सरकारी नोकरीतुन सेवानिवृत्त झाले आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे रिअल इस्टेट चा व्यवसाय करीत असुन त्यांचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. तसेच गैरअर्जदार क्र 1 चे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे असुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडुन एक्साहिका, सेक्टर 6, मौजा पिपरी, तह. कुही, जि. नागपूर येथील प्लॉट नंबर 81 बंगला 752 चौ.फुट असलेला फलॅट रुपये 1,768,000/- ला बुक केला. सदर किंमतीपैकी 20 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणुन स्विकारुन गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास अॅग्रीमेंट ऑफ कंस्ट्रक्शन बांधकामचे तपशिलसह व मुदतीसह लिहुन देण्याचे तोंडी कबुल केले होते. त्यानुसार अर्जदाराने फलॅट बुक केल्यानंतर गैरअर्जदारांना फलॅटचे एकुण किंमतीचे रक्कमेपैकी 20 टक्के अनामत रक्कम रुपये 3,53,000/- दिले परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास बांधकामाबाबतचा कोणताही लेखी करारनामा करुन न देता प्लीन्थ लेव्हल पर्यंतचे कामाची आणखी रुपये 3,53,600/- ची मागणी केली परंतु गैरअर्जदाराने ठरल्याप्रमाणे करारनामा न करुन दिल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारांना पुढील रक्कम देण्यास नकार दिला तसेच भविष्यात गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराकडुन कोणताही करारनामा शर्ती, अटी न ठरविता रक्कम वसुल करण्याच्या प्रयत्नात असल्याची शंका आल्याने अर्जदाराने दिनांक 26/09/2011 रोजी स्वतः रजिस्टर्ड पोष्टाने गैरअर्जदार क्र. 1 ला पञ पाठविले सदर पञ गैरअर्जदार क्र. 1 ला मिळुनही गैरअर्जदाराने अर्जदाराचे पञाची दखल घेतली नाही, उत्तर पाठविले नाही व करारनामा करुन देणार किंवा नाही याबाबत कळविले नाही यावरुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे अर्जदाराची दिशाभुल व फसवणुक करीत असल्याचे अर्जदारास लक्षात आल्यावरुन अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले अनामत रक्कम रुपये ,353,600/- परत करण्यास यावे म्हणुन कळविले परंतु गैरअर्जदारने त्याचे सुद्धा उत्तर पाठविले नाही यावरुन गैरअर्जदाराकडुन, अर्जदाराची धोकेबाजी व फसवणुक होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने संबंधीत अनामत रक्कम परत मिळणेसाठी तसेच झालेल्या मानसिक व शारिरीक ञासामुळे तक्रार दाखल केली आहे.
2) प्रस्तुत प्रकरण नोंदणीकृत करुन गैरअर्जदार 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आल्या. सदर नोटीस गै.अ. 1 यांना निशानी 9 प्रमाणे व गै.अ. 2 यांना निशानी 8 प्रमाणे बजावणी झाली. विद्यमान मंचाची नोटीस बजावणी होऊनही गै.अ. 1 व 2 हे विद्यमान मंचात हजर झाले नाहीत किंवा लेखीउत्तर दाखल केले नाही म्हणुन दिनांक 08/01/2013 रोजी गै.अ. 1 व 2 यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशानी 1 वर पारीत करण्यात आले.
3) अर्जदाराने तक्रार अर्जाचे पृष्ठर्थ निशानी 4 कडे एकुण 11 कागदपञे दाखल केलेली आहे. गै.अ. विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविलेचा आदेश निशानी 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कगदपञे, तक्रारकर्त्याची तक्रार त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व निशानी 10 वरील लेखी युक्तीवाद यावरुन प्रकरण निकाली करणे करीताकरीता ठेवण्यात आले. अर्जदाराची तक्रार, दाखल कागदपञे व युक्तीवाद यावरुन खालिल कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
4) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापञावर दाखल केलेली आहे. गै.अ. 1 व 2 विरुद्ध एकतर्फा आदेश असल्याने त्यांना अर्जदाराचे तक्रार विषयक मुद्दे मान्य असल्याचे समजण्यात येते.
अर्जदाराने (त.क.) ने निवृत्तीनंतर गै.अ. 1 व 2 यांचेकडुन आर्कषक प्लॅन, साईट व सर्व साईची माहिती घेवुन एक्साहिका, सेक्टर 6, मौजा पिपरी, तह. कुही, जि. नागपूर येथील प्लॉट नंबर 81 बंगला 752 चौ.फुट असलेला बंगला रुपये 17,68000/- चा बुक केला. त्यापोटी अनायत रक्कम म्हणुन 1,00,000/- दिनांक 28/12/10 रोजी स्विकारली. हे निशानी 4(1) वरील गै.अ. यांनी दिलेल्या पावतीवरुन दिसुन येते त्यानंतर दिनांक 07/01/11 रोजी 1,00,000/- गै.अ.यांना दिले हे निशानी 4(2) वरील पावती वरुन दिसुन येते त्यानंतर त.क. यांनी रुपये 1,53,600/- गै.अ. यांना दिले हे निशानी 4(3) वरील पावतीवरुन दिसुन येते. अशाप्रकारे एकुण 3,53,600/- माञ गै.अ. यांनी त.क. यांचेकडुन स्विकारलेले निशानी 4(1) ते 4(3) वरील पावती वरुन सिद्ध होते. यावरुन त.क. हे गै.अ. 1 व 2 यांचे ग्राहक ठरतात. हे सिद्ध होते.
निशानी 4 (4) प्रमाणे गै.अ. यांनी त.क. यांना ना हरकत प्रमाणपञ दिले व निशानी 4(5) प्रमाणे उर्वरीत 20 टक्के बांधकामाचे एकुण रुपये 3,53,600/- ची मागणी केली परंतु त्यावेळी त.क. यांनी सदर ठरले व्यवहाराप्रमाणे करारपञ करुन देणेची विनंती गै.अ. यांना केली कारण सदर बांधकामाचा व्यवहार हा रुपये 17,68000/- एवढया मोठया रकमेचा होता व त्यासाठी आवश्यक असे करारपञ गरजेचे होते परंतु गै.अ. यांनी सदर करारपञ करणेचे टाळाटाळ केली असल्याचे दिसुन येते त्यामुळे त.क. यांना गै.अ. यांचे पुर्ण व्यवहाराची संशय निर्माण झाल्याने त्यांनी गै.अ. यांचे मागणीप्रमाणे रुपये 3,53,600/- रक्कम गै.अ. यांना अदा केली नाही व निशानी 4(6) नुसार त.क. यांनी गै.अ. यांना स्वतः नोटीस पाठवुन करारपञ करुन न दिलेबाबत तसेच अचानक उर्वरीत रकमेबाबत जाब विचारला व झालेला व्यवहार रद्द करुन त.क. ने गै.अ. यांना दिलेली रक्कम रुपये 3,53,600/- परत मागितले. सदर नोटीस गै.अ. यांना निशानी 4(7) मिळाली तरीही गै.अ. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणुन निशानी 4(8) प्रमाणे त.क. यांनी आपले वकीलामार्फत नोटीस पाठविली. केलेला व्यवहार रद्द करुन गै.अ. यांनी स्विकारलेली रक्कम परत मागितली. सदर नोटीस निशानी 4(10) प्रमाणे गै.अ. यांना मिळुनही गै.अ. यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व त.क. यांचे नोटीसला उत्तर दिले नाही. तसेच गै.अ. हे विद्यमान मंचाची नोटीस मिळुनही या कामी हजर झाले नाही यावरुन गै.अ. यांची नकारात्मक मानसिकता दिसुन येते.
अशाप्रकारे गै.अ. यांनी त.क. यांचे मागणी प्रमाणे ठरलेल्या व्यवहाराचा कोणताही करारनामा करुन न देणे ही दुषित व ञुटीची सेवा दर्शविते तसेच कोणताही लेखी करार न करता फक्त पैसे स्विकारणे व मागणेही गंभीर अनुचित व्यापार प्रथा आहे व त्याचा गै.अ. यांनी वापर केला असल्याचा या विद्यमान मंचास वाटते.
सर्व सामान्य नागरीक आपल्या सेवानिवृत्ती नंतर हक्काचे घर असावे म्हणुन सेवानिवृत्ती नंतर आलेल्या पैशातुन एक घर शोधत असतात व अशा गरजु लोकांचा गै.अ. सारखे व्यापारी लोक फायदा उठवतात परंतु प्रस्तुत तक्रारीतील अर्जदार हे जागरुक आहेत हे दिसुन येते त्यांनी वेळीच गै.अ. यांचा हेतु ओळखला व आपला ठरलेला व्यवहार रद्द केला तरीही गै.अ. यांनी अर्जदार यांचेकडुन वेळोवेळी स्विकारलेली रक्कम रुपये 3,53,600/- परत मिळण्यास अर्जदार हे पाञ आहेत व सदर रक्कम गै.अ. यांनी वापरलेली असलेली असल्यामुळे त्यावर 12 टक्के दराने व्याज मिळणेस अर्जदार हे पाञ आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
गैरअर्जदार यांचे दुषित व ञुटीचे सेवेमुळे तसेच अर्जदारांनी रक्कम गुंतवणुक करुनही त्यांना त्यांचे उपभोगापासुन वंचित राहावे लागल्यामुळे अर्जदारांना झालेला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2,000/- दयावेत असे या मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) अर्जदाराचा तक्रारी अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) गै.अ. यांनी अर्जदारांचे कडुन ठरलेल्या व्यवहारापोटी स्विकारलेली एकुण रक्कम रुपये 3,53600/- व त्यावर शेवटी स्विकारलेली रक्कम दिनांक 01/03/2011 पासुन संपूर्ण रक्कम रुपये 3,53,600/- या रकमेवर 12 टक्के दराने संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत व्याज द्यावे.
3) गै.अ. यांनी वरील आदेशाचे पालन 30 दिवसात करावे अन्यथा उपरोक्त कलम 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिनांक 01/03/2011 पासुन पूर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के ऐवजी 15 टक्के दराने व्याज द्यावे लागेल याची नोंद घ्यावी.
4) गै.अ. यांनी अर्जदाराला मानसिक व शारीरीक ञासापोटी 5,000 व तक्रार अर्ज खर्च रुपये 2,000 द्यावे.
चंद्रपूर
दिनांक - 24 /06/2013