Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/16/240

Shri. Rajkumar Dharmaji Gadpayle - Complainant(s)

Versus

Infratech Real Estate Pvt. Ltd. Through Its Managing Director Shri. Vijay Shelke - Opp.Party(s)

Adv.C.H.Funde

06 Dec 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/16/240
 
1. Shri. Rajkumar Dharmaji Gadpayle
R/o Qtr. No. 2/1, Type-II, Jawahar Nagar, Ordinance Factory Area, Ta.Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Infratech Real Estate Pvt. Ltd. Through Its Managing Director Shri. Vijay Shelke
Having Office At Pipri, Umred Road Tah-Kuhi Dist-Nagpur And Also at Plot No. 47, AAnandwan Gawande Lay-out, Ring Road Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Dec 2017
Final Order / Judgement

                        ::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या )

(पारीत दिनांक06 डिसेंबर, 2017)

 

01.   तक्रारकर्त्‍याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष बिल्‍डर विरुध्‍द करारा प्रमाणे सदनीकेचे विक्रीपत्र व ताबा न दिल्‍याचे कारणावरुन दाखल केली आहे.

 

02.   तक्रारकर्त्‍याचे संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे-

       तक्रारकर्ता हा आर्डीनन्‍स फॅक्‍टरी भंडारा येथे नौकरीस आहे आणि तो कुटूंबाच्‍या निवासासाठी नागपूर येथे सदनीकेच्‍या शोधात होता. विरुध्‍दपक्ष फर्मचा निवासी सदनीका बांधून विक्रीचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याला स्‍वतःचे कुटूंबियांना राहण्‍यासाठी निवासी सदनीकेची आवश्‍यकता असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्षाशी संपर्क साधला. विरुध्‍दपक्ष फर्मचे  मौजा पिपरी, तहसिल कुही, जिल्‍हा नागपूर खसरा क्रं-31 व 32, पटवारी हलक क्रं-1 येथील      जमीनीवर प्रस्‍तावित बांधण्‍यात येणारी योजना मार्व्‍हल (MARVEL) SECTOR-XII VENKATESH CITY-IV मधील व्‍हीला क्रं-27, ज्‍यामध्‍ये  839.59 चौरसफूट (77.99 चौरसमीटर) भूखंडाचे क्षेत्रफळ आणि त्‍यावरील बांधकाम 926 चौरसफूट (86.02 चौरसमीटर)  राहणार होते, एकूण किम्‍मत   रुपये-15,65,395/- एवढया किमतीत विकत घेण्‍याचे ठरविले, त्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक-22/11/2009 रोजी रुपये-30,000/-,दि.-29/11/2009 रोजी रुपये-1,83,080/- त्‍याच बरोबर दिनांक-04/12/2009 रोजी    रुपये-1,00,000/- अशाप्रकारे एकूण आंशिक 20% रक्‍कम रुपये-3,13,080/- विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केली आणि विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात. विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारकर्त्‍याला व्‍हीला क्रं-27 संबधाने  दिनांक-09/06/2010 रोजी अलॉटमेंट लेटर  सुध्‍दा देण्‍यात आले. अलॉटमेंट लेटर मध्‍ये उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे व्‍हीला क्रं 27 चे वर्णन करण्‍यात येऊन सदर व्‍हीलाची एकूण किम्‍मत रुपये-15,65,395/-असल्‍याचे नमुद करण्‍यात आले तसेच तक्रारकर्त्‍या कडून आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/- मिळाल्‍याची बाब सुध्‍दा विरुध्‍दपक्षा तर्फे मान्‍य करण्‍यात आली. उर्वरीत रक्‍कम ही कन्‍हेयन्‍स डिड जी उभय पक्षां मध्‍ये नोंदविल्‍या जाईल त्‍यामध्‍ये नमुद केलेल्‍या पेमेंट शेडयुल प्रमाणे देण्‍याचे विरुध्‍दपक्षा तर्फे नमुद केले.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने बांधकामासाठी काही मंजूरी प्राप्‍त व्‍हावयाची असल्‍याने ते मिळविण्‍यासाठी काही वेळ लागणार असल्‍याने बांधकम हे 06 ते 07 महिन्‍यात पूर्ण होईल असे आश्‍वासन दिले. 06 महिन्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात भेट देऊन बांधकामा बाबत विचरणा केली असता त्‍याने एन.आय.टी.कडून मंजूरी प्राप्‍त होण्‍यासाठी आणखी 06 महिन्‍याचा कालावधी लागणार असल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याने मोक्‍यावर जाऊन पाहिले असता तेथे बांधकाम सुरु असल्‍याचे दिसले. तेथील विरुध्‍दपक्षाचे कर्मचा-याने  बांधकामाची परवानगी 7 ते 8 महिन्‍यात मिळेल आणि कन्‍व्‍हेयन्‍स डीड ही ऑक्‍टोंबर, 2014 मध्‍ये नोंदवून देण्‍यात येईल असे सांगितले.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की,त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्षाचे गावंडे ले आऊट, नागपूर येथील कार्यालयास भेट दिली असता तेथे कार्यालय बंद असून कोणीही आढळून आले नाही. चौकशी केली असता कार्यालय हे पिपरी, उमरेड रोड, नागपूर येथे हलविल्‍याचे समजले त्‍यानुसार ऑक्‍टोंबर-2014 मध्‍ये संपर्क केला असता तेथील कर्मचा-यांनी योग्‍य  तो प्रतिसाद दिला नसल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्षाच्‍या भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु  संपर्क होऊ शकला नाही. तक्रारकर्ता हा उर्वरीत रक्‍कम देण्‍यास तयार होता परंतु विरुध्‍दपक्षाचे  बांधकामात कोणतीही प्रगती दिसून आली नाही.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित व्‍हीला बांधकामास शासना कडून मंजूरी प्राप्‍त झाली नसताना सदनीका विक्रीचे आश्‍वासन देऊन त्‍याच्‍या कडून बुकींग पोटी आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/-  स्विकारुन आणि पुढे तेथे बांधकामात कोणतीही प्रगती न करुन त्‍याची फसवणूक केलेली आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. त्‍याने विरुध्‍दपक्षाचे दोन्‍ही कार्यालयीन पत्‍त्‍यावर वकीलांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने विरुध्‍दपक्षास दिनांक-13/06/2016 रोजी नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्षाने नोटीस न स्विकारल्‍यामुळे ती परत आली.

     म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्षा विरुध्‍द पुढील मागण्‍या केल्‍यात.

 

(1)   विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे दिनांक-09/06/2010 रोजी दिलेल्‍या अलॉटमेंट लेटर प्रमाणे विरुध्‍दपक्ष फर्मचे  मौजा पिपरी, तहसिल कुही, जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-31 व 32, पटवारी हलक क्रं-1 या जमीनीवर प्रस्‍तावित बांधण्‍यात येणारी योजना मार्व्‍हल (MARVEL) SECTOR-XII VENKATESH CITY-IV मधील व्‍हीला क्रं-27, ज्‍यामध्‍ये  839.59 चौरसफूट (77.99 चौरसमीटर) भूखंडाचे क्षेत्रफळ आणि त्‍यावरील बांधकाम 926 चौरसफूट (86.02 चौरसमीटर)  एकूण किम्‍मत रुपये-15,65,395/- पैकी तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी दिलेली आंशिक रक्‍कम रुपये-3,13,088/- वजा जाता उर्वरीत रक्‍कम             रुपये-12,52,307/- त्‍याचे कडून स्विकारुन व्‍हील क्रं-27 चे विहित मुदतीत विक्रीपत्र/ कन्‍व्‍हेयन्‍स डिड तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

(2)  विरुध्‍दपक्षाला अलॉटमेंट मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे व्‍हीला क्रं-27  चे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने सदर व्‍हीला पोटी विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेली आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/- त्‍या भागातील क्षेत्रात असलेले बाजारमुल्‍य लक्षात घेऊन रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

(3) तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/-  विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(4)   तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

                            

03.  विरुध्‍दपक्षाचे नाव आणि पत्‍त्‍यावर त्‍याने दिलेल्‍या निरनिराळया पत्‍त्‍यांवर मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीसस काढण्‍यात आल्‍यात परंतु  त्‍या नोटीस विरुध्‍दपक्ष राहत नाही, नॉट क्‍लेम्‍ड या पोस्‍टाचे शे-यासह परत आल्‍यात. शेवटी विरुध्‍दपक्षाचे नावे दैनिक देशोन्‍नती दिनांक-06/04/2017 रोजीच्‍या अंकातून जाहिर नोटीस प्रकाशित करण्‍यात आली परंतु ग्राहक मंचाची नोटीस प्रकाशित होऊनही विरुध्‍दपक्ष हा मंचा समक्ष हजर झाला नाही वा त्‍याने आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्षा विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात मंचाने दिनांक-07/07/2017 रोजी पारीत केला.

 

 

04.   तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती  दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्‍याचे नावे लिहून दिलेल्‍या व्‍हीला क्रं 27 चे अलॉटमेंटची प्रत, विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे पेमेंट मिळाल्‍या बद्दल तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रती,   विरुध्‍दपक्षा तर्फे बांधकामास उशिर होत असल्‍या बाबत तक्रारकर्त्‍याला दिलेले पत्र, प्राईसलिस्‍ट, ले आऊट मॅप, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसची प्रत, विरुध्‍दपक्षा तर्फे नोटीस न स्विकारल्‍यामुळे परत आलेले पॉकीट अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात तसेच शपथपत्र दाखल केले.

 

05.   तक्रारकर्त्‍या तर्फे अधिवक्‍ता श्री चेतन फुंडे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

            

06.   तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्‍ध व्‍हीला अलॉटमेंटची  प्रत, विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पेमेंट मिळाल्‍या बद्दल  काही पावत्‍यांच्‍या प्रती, बांधकामास उशिर होत असल्‍या बाबत विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास पाठविलेली नोटीस, तक्रारकर्त्‍याचा प्रतिज्ञालेख इत्‍यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

                        

               ::निष्‍कर्ष::

 

07.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष फर्म (विरुध्‍दपक्ष म्‍हणजे  मे.इन्‍फ्राटेक रियल इस्‍टेट प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे (व्‍यंकटेश सिटी-4)    तर्फे- मॅनेजींग डॉयरेक्‍टर, विजय शेळके असे समजण्‍यात यावे)  सोबत विरुध्‍दपक्ष फर्मचे  मौजा पिपरी, तहसिल कुही, जिल्‍हा नागपूर खसरा क्रं-31 व 32, पटवारी हलक क्रं-1 येथील जमीनीवर प्रस्‍तावित बांधण्‍यात येणारी योजना मार्व्‍हल (MARVEL) SECTOR-XII VENKATESH CITY-IV मधील व्‍हीला क्रं-27, ज्‍यामध्‍ये  839.59 चौरसफूट (77.99 चौरसमीटर) भूखंडाचे क्षेत्रफळ आणि त्‍यावरील बांधकाम 926 चौरसफूट (86.02 चौरसमीटर)  राहणार होते, एकूण किम्‍मत रुपये-15,65,395/- एवढया किमतीत विकत घेण्‍याचे ठरविले,या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक-22/11/2009 रोजी रुपये-30,000/-,   दिनांक-29/11/2009 रोजी रुपये-1,83,080/- त्‍याच बरोबर   दिनांक-04/12/2009 रोजी रुपये-1,00,000/- अशाप्रकारे एकूण   आंशिक 20% रक्‍कम रुपये-3,13,080/- विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केली आणि विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात. विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारकर्त्‍याला व्‍हीला क्रं-27 संबधाने दिनांक-09/06/2010 रोजी अलॉटमेंट लेटर  सुध्‍दा देण्‍यात आले. अलॉटमेंट लेटर मध्‍ये उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे व्‍हीला क्रं 27 चे वर्णन करण्‍यात येऊन सदर व्‍हीलाची एकूण किम्‍मत  रुपये-15,65,395/- असल्‍याचे नमुद करण्‍यात आले तसेच तक्रारकर्त्‍या कडून आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/- मिळाल्‍याची बाब सुध्‍दा विरुध्‍दपक्षा तर्फे मान्‍य करण्‍यात आली. उर्वरीत रक्‍कम ही कन्‍हेयन्‍स डिड जी उभय पक्षां मध्‍ये नोंदविल्‍या जाईल त्‍यामध्‍ये नमुद केलेल्‍या पेमेंट शेडयुल प्रमाणे देण्‍याचे विरुध्‍दपक्षा तर्फे नमुद केले.

 

 

08.     तक्रारकर्त्‍याने आपल्‍या उपरोक्‍त कथनाचे पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष फर्मचे वतीने दिनांक-09 जुन, 2010 रोजी त्‍याचे नावे करुन दिलेल्‍या व्‍हीला क्रं-27 ची अलॉटमेंटची प्रत दाखल केली, त्‍यावरुन त्‍याचे उपरोक्‍त‍ कथनास पुष्‍टी मिळते. या व्‍यतिरिक्‍त त्‍याने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये प्रस्‍तावित व्‍हीला खरेदीपोटी  दिनांक-22/11/2009 ते दिनांक-04/12/2009 रोजी एकूण आंशिक 20% रक्‍कम रुपये-3,13,080/- विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केली आणि विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केल्‍यात  यावरुन त्‍याने एवढया रकमेचा भरणा केल्‍याची बाब सिध्‍द होते. तसेच विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे दिलेल्‍या अलॉटमेंट लेटर मध्‍ये सुध्‍दा उपरोक्‍त नमुद रक्‍कम रुपये-3,13,080/- मिळाल्‍याची बाब मान्‍य करण्‍यात आलेली आहे.

09.   विरुध्‍दपक्षाचे पेमेंट शेडयुलची प्रत अभिलेखावर दाखल आहे, त्‍यामध्‍ये बुकींग अमाऊंट-20%, प्लिंथ लेव्‍हल-20%, प्रथम स्‍लॅब-15%, व्दितीय स्‍लॅब-15%, ब्रिक वर्क, इलेक्ट्रिकल, प्‍लम्‍बींग-10%, प्‍लॅस्‍टर वर्क-10%,फ्लोअरींग-5%, पझेशन-5%या प्रमाणे रकमा देण्‍याचे नमुद केलेले आहे थोडक्‍यात हे काम जसे जसे प्रगतीपथावर राहिल त्‍या प्रमाणे रकमा द्दावा लागतील. परंतु ही सर्व कामे कोणत्‍या निश्‍चीत कालावधी पर्यंत पूर्ण होतील तो कालावधी देण्‍याचे विरुध्‍दपक्षाने टाळलेले आहे.

 

10.   दिनांक-04 जुन, 2011 रोजी विरुध्‍दपक्षा तर्फे संबधित ग्राहकांचे नावे एक पत्र देण्‍यात आले, त्‍यामध्‍ये एन.आय.टी.कडे मंजूरीसाठी दस्‍तऐवज सादर केलेले आहेत व ती मंजूरी मिळाल्‍या नंतर लवकरात लवकर बांधकाम सुरु करण्‍याचे आश्‍वासन दिलेले आहे, म्‍हणजेच दिनांक-04 जुन, 2011 पर्यंत कुठल्‍याही बांधकामास सुरुवात झाली नसल्‍याची बाब सिध्‍द होते.

 

11.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे विरुध्‍दपक्षाने बांधकामासाठी मंजूरी प्राप्‍त व्‍हावयाची असल्‍याने बांधकाम 06 ते 07 महिन्‍यात पूर्ण होण्‍याचे आश्‍वासन दिले होते, त्‍या 06 महिन्‍या नंतर त्‍याला विरुध्‍दपक्षा कडून एन.आय.टी.कडून मंजूरी प्राप्‍त होण्‍यासाठी आणखी 06 महिन्‍याचा कालावधी लागणार असल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍याने मोक्‍यावर जाऊन पाहिले असता तेथील विरुध्‍दपक्षाचे कर्मचा-याने  कन्‍व्‍हेयन्‍स डीड ही ऑक्‍टोंबर, 2014 मध्‍ये नोंदवून देण्‍यात येईल असे सांगितले. त्‍याने विरुध्‍दपक्षाचे गावंडे ले आऊट, नागपूर येथील कार्यालयास भेट दिली असता तेथील कार्यालय बंद असल्‍याचे दिसून आले, ते कार्यालय हे पिपरी, उमरेड रोड, नागपूर येथे हलविल्‍याचे समजले त्‍यानुसार ऑक्‍टोंबर-2014 मध्‍ये संपर्क केला असता तेथील कर्मचा-यांनी योग्‍य तो प्रतिसाद दिला नसल्‍याने विरुध्‍दपक्षाशी भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु  संपर्क होऊ शकला नाही. तक्रारकर्ता हा उर्वरीत रक्‍कम देण्‍यास तयार होता परंतु विरुध्‍दपक्षाचे  बांधकामात कोणतीही प्रगती दिसून आली नाही. त्‍याने विरुध्‍दपक्षाचे दोन्‍ही कार्यालयीन पत्‍त्‍यावर वकीलांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने विरुध्‍दपक्षास दिनांक-13/06/2016 रोजी नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्षाने नोटीस न स्विकारल्‍यामुळे ती परत आली.

 

 

12.   तक्रारकर्त्‍याने आपल्‍या या म्‍हणण्‍याच्‍या पुराव्‍यार्थ त्‍याने विरुध्‍दपक्षास पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍या, परत आलेले रजिस्‍टर पोस्‍टाचे पॉकीट अभिलेखावर दाखल केले, त्‍यामुळे त्‍याचे उपरोक्‍त कथनास पुष्‍टी मिळते.

 

 

13.   अतिरिक्‍त ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्‍दपक्षाचे नाव आणि पत्‍त्‍यावर निरनिराळया पत्‍त्‍यांवर मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीसस काढण्‍यात आल्‍यात परंतु  त्‍या नोटीस विरुध्‍दपक्ष राहत नाही, नॉट क्‍लेम्‍ड या पोस्‍टाचे शे-यासह परत आल्‍यात. शेवटी विरुध्‍दपक्षाचे नावे दैनिक देशोन्‍नती   दिनांक-06/04/2017 रोजीच्‍या अंकातून जाहिर नोटीस प्रकाशित करण्‍यात आली परंतु ग्राहक मंचाची नोटीस प्रकाशित होऊनही विरुध्‍दपक्ष हा मंचा समक्ष हजर झाला नाही वा त्‍याने आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्‍हणून त्‍याचे विरुध्‍द एकतर्फी प्रकरण चालविण्‍यात आले. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे उपस्थित न होऊन आपले म्‍हणणे मांडले नाही वा तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील विधाने खोडून काढलेली नाहीत.

 

 

14.   विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित व्‍हीला बांधकामास शासना कडून मंजूरी प्राप्‍त झाली नसताना सदनीका विक्रीचे आश्‍वासन देऊन तक्रारकर्त्‍या कडून बुकींग पोटी आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/- स्विकारुन आणि पुढे तेथे बांधकामात कोणतीही प्रगती न करुन त्‍याची फसवणूक केलेली आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

15. तक्रार मुदतीत दाखल आहे  या संदर्भात अतिरिक्‍त  ग्राहक मंच पुढील मा.वरिष् न्यायालयाच्या निवाडयांवर आपली भिस् ठेवीत आहे-

 

 

  1. Special Leave Petition No.-CC/8481/2012, Decided on-09/05/2012 (S.C.) “Meerut Development Authority -Versus-Mukeshkumar  Gupta”

 

 

  1. “Haryana Urban Development Authority-Versus- Tej Refigeration”- IV (2012) CPJ-12 (N.C.)

 

 

  1. “Raju Tank-Versus-Bindraben Bharat kumar

          Mavani-2014 (2) CPR 32 (N.C.)

 

 

  1. NEW GENERATION REAL ESTATE LTD.-

VERSUS- RAMESH CHANDRA  KHURANA”      -I (2015) CPJ 567  (NC)

                    LIMITATION-Until or unless sale deed is

                                            executed the cause of action

                                            continues.

 

           (5)  “HARPREET SINGH KOHLI & ANR.-VERSUS-

                     NELU EXTATE & MOVERS PVT.LTD.”

                    -I (2015)    CPJ 573 (NC)

                   LIMITATION-  Continuous cause of action till

                                                possession is given and sale deed

                       is executed.

 

 

       (6)   “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti

                Kumar & Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).

 

       उपरोक्‍त मा.वरिष्‍ट न्‍यायालयाचे निवाडयां ध्‍ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्‍जा संबधित ग्राहकास ग्राहकास देण्‍यास किंवा त्‍याने जमा केलेली रक्‍कम परत करण्‍यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात  असेही  नमुद  केले  आहे की,  जर  भूखंडाचा  विकास  करण्यास विकासक/बांधकाम व्‍यवसायिक काही प्रयत्‍न करीत नसेल किंवा त्‍याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्‍ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्‍यामुळे असा आक्षेप जर विरुध्‍दपक्ष घेत असेल तर त्‍या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्‍याची गरज नसते.

 

 


16.   अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे विशेषत्‍वाने असे नमुद करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष मे.इन्‍फ्राटेक रियल इस्‍टेट  प्रा.लि. तर्फे- मॅनेजींग डॉयरेक्‍टर, विजय शेळके याचा नागपूर शहरात भूखंड आणि सदनीका विक्री संबधीचा व्‍यवसाय असून या फर्म विरुध्‍द यापूर्वी सुध्‍दा याच अतिरिक्‍त ग्राहक मंचात खालील तक्रारी दाखल झालेल्‍या होत्‍या आणि त्‍या सर्व तक्रारीं मध्‍ये निकाल पारीत झालेले असून त्‍या अंशतः मंजूर सुध्‍दा झालेल्‍या आहेत, त्‍या तक्रारी पुढील प्रमाणे आहेत- ग्राहक तक्रार क्रं-CC/16/94 तक्रारकर्ता श्री सुभाष भगवानदास कोठे, तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/16/166  तक्रारकर्ती श्रीमती शिला संतोष नाहटा, दोन्‍ही तक्रारीत निकाल पारीत दिनांक-30 जुन, 2017 आहे. तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/15/156 तक्रारकर्ती श्रीमती वनिता लिचडे निकाल पारीत दिनांक-27/04/2017, ग्राहक तक्रार क्रं-CC/16/220 तक्रारकर्ता पत्रुजी धनीराम खोब्रागडे तसेच ग्राहक तक्रार क्रमांक-CC/16/273 तक्रारकर्ता श्री मुरलीधर देवाजी देवगडे, दोन्‍ही तक्रारीं मध्‍ये निकाल पारीत दिनांक-16/03/2017 या सर्व तक्रारीं वरुन विरुध्‍दपक्षाची कामकाजाची पध्‍दती कशी आहे हे दिसून येते. विरुध्‍दपक्षाचा उद्देश्‍य हा फक्‍त संबधित ग्राहकांना आमीष दाखवून पैसे जमा करणे व त्‍यानंतर भूखंड अथवा सदनीके संदर्भात कोणतीही कार्यवाही न करता पैसे हडपण्‍याचा दिसून येतो.

 

 

17.   उपरोक्‍त नमुद परिस्थितीत तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष फर्म कडून दिनांक-09/06/2010 रोजीचे करुन दिलेल्‍या अलॉटमेंट लेटर प्रमाणे  मौजा पिपरी, तहसिल कुही, जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-31 व 32, पटवारी हलक क्रं-1 या जमीनीवर प्रस्‍तावित बांधण्‍यात येणारी योजना मार्व्‍हल (MARVEL) SECTOR-XII VENKATESH CITY-IV मधील व्‍हीला क्रं-27, ज्‍यामध्‍ये  839.59 चौरसफूट (77.99 चौरसमीटर) भूखंडाचे क्षेत्रफळ आणि त्‍यावरील बांधकाम 926 चौरसफूट (86.02 चौरसमीटर)  एकूण किम्‍मत रुपये-15,65,395/- पैकी तक्रारकर्त्‍याने दिलेली आंशिक रक्‍कम                      रुपये-3,13,088/- वजा जाता उर्वरीत रक्‍कम रुपये-12,52,307/- देऊन सदर व्‍हील्‍याचे विक्रीपत्र विरुध्‍दपक्षा कडून नोंदवून मिळण्‍यास पात्र आहे. परंतु काही कायदेशीर व तांत्रिक कारणामुळेच जर भविष्‍यात विरुध्‍दपक्षास सदर फर्मचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास त्‍याने व्‍हीला पोटी जमा केलेली एकूण आंशिक रक्‍कम रुपये-3,13,080/- शेवटचा हप्‍ता जमा केल्‍याचा दिनांक-04.12.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/-  विरुध्‍दपक्षा कडून परत मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

 

 

18.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन  ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

               ::आदेश::

 

1)    तक्रारकर्ता श्री राजकुमार धर्माजी गडपायले यांची, विरुध्‍दपक्ष मे.इन्‍फ्राटेक रियल इस्‍टेट प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे मॅनेजिंग डायरेक्‍टर विजय शेळके याचे विरुध्‍दची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)   विरुध्‍दपक्षाला आदेशित करण्‍यात येते की, दिनांक-09/06/2010 रोजीचे विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेल्‍या अलॉटमेंट लेटर प्रमाणे  मौजा पिपरी, तहसिल कुही, जिल्‍हा नागपूर येथील खसरा              क्रं-31 व 32, पटवारी हलक क्रं-1 या जमीनीवर प्रस्‍तावित बांधण्‍यात येणारी योजना मार्व्‍हल (MARVEL) SECTOR-XII VENKATESH CITY-IV मधील व्‍हीला क्रं-27, ज्‍यामध्‍ये  839.59 चौरसफूट (77.99 चौरसमीटर) भूखंडाचे क्षेत्रफळ आणि त्‍यावरील बांधकाम 926 चौरसफूट (86.02 चौरसमीटर)  एकूण किम्‍मत रुपये-15,65,395/- पैकी तक्रारकर्त्‍याने दिलेली आंशिक रक्‍कम रुपये-3,13,088/- वजा जाता उर्वरीत रक्‍कम रुपये-12,52,307/- (अक्षरी उर्वरीत रक्‍कम रुपये बारा लक्ष बावन्‍न हजार तीनशे सात फक्‍त) तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन सदर व्‍हील्‍याचे माहितीपत्रकात नमुद केल्‍या नुसार संपूर्ण बांधकाम त्‍यातील सोयी व सुविधांसह करुन देऊन नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्दावे तसेच प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर मोजमाप करुन देऊन लेखी ताबापत्र व योजने संबधीचे सर्व दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍याला पुरवावेत. विक्रीपत्र नोंदणीचा खर्च म्‍हणून नोंदणी फी व मुद्रांक शुल्‍काचा खर्च तक्रारकर्त्‍याने स्‍वतः सहन करावा.

 

3)   परंतु काही कायदेशीर व तांत्रिक कारणामुळेच जर भविष्‍यात विरुध्‍दपक्षास सदर व्‍हील्‍याचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास त्‍या परिस्थितीत तक्रारकर्त्‍याने                  व्‍हीला पोटी  जमा  केलेली  एकूण  आंशिक  रक्‍कम रुपये-3,13,080/-(अक्षरी रुपये तीन लक्ष तेरा हजार ऐंशी फक्‍त) शेवटचा हप्‍ता जमा केल्‍याचा दिनांक-04.12.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्षाने परत करावी.

4) तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल                      रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त)  व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला द्दावेत.

5)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.

6)   निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन  देण्‍यात  याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.