Complaint Case No. CC/390/2019 | ( Date of Filing : 11 Jul 2019 ) |
| | 1. SHRI. SAMEER DELANSINGH GAUTAM | R/O. NIRMAN ENCLAVE, PLOT NO. 86/A, FLAT NO. 204, GAJANAN NAGAR, NAGPUR-440015 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SHRI. NITIN DELANSINGH GAUTAM | R/O. NIRMAN ENCLAVE, PLOT NO. 86/A, FLAT NO. 204, GAJANAN NAGAR, NAGPUR-440015 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. INFRATECH REAL ESTATE PVT. LTD., THROUGH DIRECTOR SHRI. VIJAY SHELKE | OFF. AT, MAHATMA FULE NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SHRI. VIJAY SHELKE DIRECTOR OF INFRATECH REAL ESTATE PVT. LTD. | OFF. AT, MAHATMA FULE NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजने, मा. सदस्य - तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे.
- वि.प.चा जमिन खरेदी करुन त्याचे विकसन करुन, भुखंड विक्रीचा, बहूमजली इमारती, व्हीला व बंगले बांधण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार क्रं.1 व 2 यांचे वडील देलमसिंग गौतम यांनी वि.प.चे मौजा-पिंपरी ख.कं. 134/2,134/3,134/4,134/5, प.ह.नं. 1, ता.कुही,जि.नागपूर येथील 1392 चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर बांधलेल्या व्हीला-नं.1-बंगला, एकुण क्षेत्रफळ 1676 चौ.फुट एकुण रुपये 27,00,000/- एवढया किंमतीत विकत घेण्याचा करार वि.प.शी दिनांक 4.2.2009 रोजी केला. तकारदाराचे वडीलांनी कराराचे वेळी वि.प.ला रुपये 5,40,000/- अदा केले व उर्वरित रक्कम बांधकामाच्या टप्प्याप्रमाणे वि.प.ला अदा करावयाचे होते.
- करारानुसार वि.प.ला बांधकामाला सुरुवात करावयास पाहिजे होती. परंतु वि.पने बांधकामास सुरुवात केली नाही. तक्रारदाराने वि.प.ला बांधकाम सुरु करण्याबाबत विनंती केली असता प्रत्येक वेळी वि.प.ने तक्रारदाराचे वडीलांना आश्वासन दिले परंतु प्रत्यक्ष बांधकाम सुरु केले नाही. तक्रारदाराचे वडीलांचे दिनांक 7.2.2017 रोजी निधन झाले. त्यानंतर तकारदाराने वि.प.ला करारानुसार बांधकाम सुरु करण्यास विंनती केली असता वि.प.ने बांधकाम केले नाही.त्यामूळे तक्रारदाराने वि.प. दिनांक 9.3.2017 ला पत्र पाठवून वि.प.सोबत 4.2.2009 ला केलेला विक्रीकरारनामा रद्द करण्याबाबत विनंती केली व व्हीला नोंदणीपोटी अदा केलेल्या रक्कमेची मागणी करुनही वि.प.ने रक्कम परत केली नाही. वि.प.ने तक्रारदाराशी केलेल्या विक्री करारनामा दिनांक 4.2.2009 मधील शर्ती व अटीचे पालन केले नाही व कराराचा भंग केला. त्यामूळे तक्रारदाराने वकीलामार्फत वि.प.ला दिनांक 25.4.2019 कायदेशीर नोटीस पाठविली. पंरतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारदाराने मा. मंचासमक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, वि.प.ने तक्रारदाराला व्हीला खरेदीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 5,40,000/-,दिनांक 4.2.2009 पासुन द.सा.द.शे 18टक्के व्याजासह, परत करावी. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
- तकारदाराची तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली परंतु नोटीस मिळूनही वि.प.क्रं.1 व 2 मंचासमक्ष उपस्थीत झाले नाही म्हणुन दिनांक 9.3.2020 रोजी वि.प.क्रं.1 व 2 विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजांचे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ? होय
- विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय? होय
- काय आदेश अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - तक्रारदार क्रं.1 व 2 यांचे वडील देलमसिंग गौतम यांनी वि.प.चे मौजा-पिंपरी ख.कं.134/2, 134/3,134/4, 134/5, प.ह.नं. 1, ता.कुही,जि.नागपूर या जमिनीवरील 1392 चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर बांधलेल्या व्हीला-नं.1 बंगला एकुण क्षेत्रफळ 1676 चौ.फुट एकुण रुपये 27,00,000/- एवढया किंमतीत विकत घेण्याचा करार वि.प.शी दिनांक 4.2.2019 रोजी केला असल्याचे व व्हीला क्रं.1 या बंगल्याचे नोंदणीपोटी रुपये 5,40,000/- वि.प.ला अदा केल्याचे नि.क्रं.2 वरील दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराच्या वडीलांचे दिनांक 7.2.2017 ला निधन झाल्याचे नि.क्रं.2 वर दाखल मृत्यु प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते. त्यामूळे तक्रारदार क्रं.1 व 2 सदर मिळकतीचे कायदेशीर वारस असल्याने वि.प.क्रं.1 व 2 चे ग्राहक आहेत.
- वि.प.ने तक्रारदाराचे वडीलांकडुन गार्डन व्हीला क्रं.1 चे विक्रीपोटी रुपये 5,40,000/- स्विकारुनही करारातील शर्ती व अटीनुसार बंगल्याचे बांधकामास सुरुवात केली नाही त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला बांधकाम पूर्ण करण्यास विनंती केली परंतु वि.प.ने बंगल्याचे बांधकामास सुरुवात न केल्यामूळे वि.प.ला दिनांक 19.3.2017 ला पत्राव्दारे दिनांक 4.2.2009 ला करारनामा रद्रद करुन व्हीला नोंदणीपोटी स्विकारलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतु वि.प.ने तक्रारदाराला रक्कम परत केली नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्याचे वचन दिलेले आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ले-आऊटचा नकाशा तक्रारदाराला दिलेला आहे. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिवाडयातील Soumitra Kumar Shaw Vs. Lokhandwala Kataria Constructions Pvt.Ltd. ,2019 NCJ 517(NC) व Pratima Rajpal and Anr. Parsvnath Developers Ltd. 2019 NCJ 903 (NC)या न्यायनिवडयातील वस्तुस्थीती सदर प्रकरणात लागू होते. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s. Narne Construction P.Ltd. Etc. Union of India and Ors. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकार आहे. वि.प.ची ही कृती तक्रारदाराचे प्रती सेवेतील त्रुटी आहे व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब होय असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- वि.प.1 व 2 ला आदेशीत करण्यात येते, त्यांनी तक्रारदाराकडुन भुखंडाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 5,40,000/- तक्रारदाराला 18टक्के व्याजासह दिनांक 4.2.2009 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो येणारी रक्कम परत करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 20,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. | |