Maharashtra

Nagpur

CC/401/2017

SHRI. ANANDA MORESHWAR MESHRAM - Complainant(s)

Versus

INFRATECH REAL ESTATE PVT. LTD, THROUGH GENERAL MANAGER / PROPRIETOR - Opp.Party(s)

ADV. MAHESH WAGH

28 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/401/2017
( Date of Filing : 22 Sep 2017 )
 
1. SHRI. ANANDA MORESHWAR MESHRAM
R/O. HOUSE NO. 1235, MURMADI, POST LAKHNI, THA. LAKHNI, BHANDARA-441804
BHANDARA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. INFRATECH REAL ESTATE PVT. LTD, THROUGH GENERAL MANAGER / PROPRIETOR
OFF. MAHATMA FULE NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025/ CORPORATE OFFICE- 47, ANANDVAN, GAWANDE LAYOUT, RING ROAD, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Feb 2020
Final Order / Judgement

                 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षा सोबत मौजा- पिपरी, प.ह.न. 01, सेक्‍टर XIII, रामदासपेठ पिपरी,  तह. कुही, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 1763.76 चौ.फु. (161.99 चौ.मी.) हा एकूण रककम रुपये 7,84,692/- मध्‍ये विकत घेण्‍याचा   दिनांक 24.11.2010 रोजी करार केला होता व याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे वेळोवेळी मिळून एकूण रुपये 6,13,524/- एवढी रक्‍कम नगदी/ धनादेशा द्वारे अदा केलेली आहे व याकरिता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याच्‍या पावत्‍या दिलेल्‍या आहेत. विरुध्‍द  पक्षाने करारपत्रात नमूद केले होते की, तो तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या   भूखंडाकरिता आवश्‍यक असलेल्‍या मुलभूत सोयीसुविधा जसे डांबरी रस्‍ते, रस्‍त्‍यावरील लाईट, मंदिर, वीज पुरवठा, पाणीपुरवठा, सांडपाण्‍याची व्‍यवस्‍था, इत्‍यादी पुरविण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तक्रारकर्त्‍याला स्‍वतःचे घर बांधावयाचे असल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाला उर्वरित रक्‍कम रुपये 1,71,169/- स्‍वीकारुन उपरोक्‍त भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन त्‍याचा ताबा देण्‍याची विनंती केली असता  सदरच्‍या भूखंडाचे ले-आऊटचे शासना तर्फे अद्याप मंजुरी प्राप्‍त नसल्‍यामुळे भूखंडाचे विक्रीपत्र करुन देऊ शकत नसल्‍याचे कळविले. त्‍यानंतर ही याबाबत अनेक वेळा विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ केली.
  2. तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, दि. 18.01.2012 पर्यंत विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या ले-आऊटचे विकसन कार्याची सुरुवात सुध्‍दा केली नव्‍हती. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला  दि. 02.08.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदरची नोटीस “Left the Place” या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍याकडे तक्रारकर्त्‍याची जमा असलेली रक्‍कम रुपये 6,13,524/-  व  त्‍यावर 18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई  व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही  आदेश व्‍हावा.
  3. विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 03.06.2019 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

         अ.क्र.                     मुद्दे                                                            उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?       होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

            अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ?   होय

  1. काय आदेश ?                         अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्षे

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- पिपरी, प.ह.न. 01, सेक्‍टर XIII, रामदासपेठ पिपरी, तह. कुही, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 1763.76 चौ.फु. (161.99 चौ.मी.) हा एकूण रुपये 7,84,692/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा दिनांक 24.11.2010 रोजी करार केला असल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते. तसेच याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे वेळोवेळी मिळून एकूण रक्‍कम रुपये 6,13,524/- एवढी नगदी/ धनादेशा द्वारे अदा केलेली आहे व त्‍याबाबतच्‍या  पावत्‍या देखील जोडलेल्‍या आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द  पक्षाने करारपत्रात नमूद केले होते की, तो तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या   भूखंडाकरिता आवश्‍यक असलेल्‍या मुलभूत सोयीसुविधा जसे डांबरी रस्‍ते, रस्‍त्‍यावरील लाईट, मंदिर, वीज पुरवठा, पाणीपुरवठा, सांडपाण्‍याची व्‍यवस्‍था, इत्‍यादी पुरविण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तसेच तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला उर्वरित रक्‍कम रुपये 1,71,169/- देण्‍यास तयार असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला उपरोक्‍त  भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम सुद्धा आजतागायत परत केली नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍याने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केले असल्‍याचे दिसून येते.   

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाकडे तक्रारकर्त्‍याची जमा असलेली रक्‍कम रुपये 6,13,524/- व त्‍यावर तक्रारकर्त्‍याने शेवटचा भरलेला हप्‍ता म्‍हणजेच दिनांक 18.01.2012 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजसह तक्रारकर्त्‍यास परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 50,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.