Maharashtra

Osmanabad

cc/166/2012

MALHARI KHANDU SARVADAY - Complainant(s)

Versus

INFO TOKIYO GENERAL INSURANCE CO. LTD - Opp.Party(s)

V.L.PATIL

16 Jan 2015

ORDER

Heading1
Heading2
 
Complaint Case No. cc/166/2012
 
1. MALHARI KHANDU SARVADAY
YAMGARVADI, TAL.TULJAPUR, DIST. OSMANABAD.
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                          ग्राहक तक्रार  क्र.  166/2012

                                          अर्ज दाखल तारीख : 13/07/2012

                                          अर्ज निकाल तारीख: 16/01/2015

                                       कालावधी: 02 वर्षे 6 महिने 16 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद

1.   श्री. मल्‍हारी खंडू सरवदे,

    वय-35 वर्षे, धंदा –शेती व व्‍यवसाय,

    रा.यमगरवाडी, ता. तुळजापूर, जि.उस्‍मानाबाद.             ....तक्रारदार

                        

वि  रु  ध्‍द

 

1.   इफ्को टोकियो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.

    व्‍दारा. शाखा व्‍यवस्‍थापक,

    इक्‍फो टोकियो इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

    इनानी बिल्‍डींग, पहिला मजला, लातूर सारी सेंटरच्‍या वर,

 जुनी कापडलाईन, लातूर.                         ....विरुध्‍द  पक्षकार

 

 कोरम :         1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                      2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍य.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍.

 

                    तक्रारदारातर्फे विधीज्ञ         :   श्री.व्‍ही.एल.पाटील.

                          विरुध्‍द पक्षकारा तर्फे विधीज्ञ   :  श्री.पी.व्‍ही.सराफ.

                  निकालपत्र

मा. सदस्‍य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्‍दारा :

1)    अर्जदार मल्‍हारी खंडू सरवदे हे मौजे यमगरवाडी ता. तुळजापूर जि. उस्‍मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्‍यांनी विरुध्‍द पक्षकार (संक्षिप्त रुपात विरुध्‍द पक्षकार) विमा कंपनी यांचे विरुध्‍द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.

 

      अर्जदार यांनी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्‍टर मॉडेल क्र. 575 ज्‍याचा क्र. एम.एच.37/07 खरेदी केला व विरुध्‍द पक्षकार विमा कंपनीकडे दि.08/11/2010 रोजी ओ.डी. करीता रक्कम रु.7,585.65 व थर्डपार्टी करीता रक्‍कम रु.9,387.25 भरुन उतरविला त्‍यानुसार विमा कंपनीने अर्जदार यांना पॉलिसी कव्‍हर नोट क्र.70982414 दिली ज्‍याची वैधता दि.07/11/2011 पर्यंत होती.

 

    दि.14/08/201 रोजी 10.30 वा सुमारास अर्जदार हे त्‍याचे मालकिचे ट्रॅक्‍टरचा टॉली जोडून माती घेऊन जात होते. तेव्‍हा कसई पाटी जवळ आले त्‍यावेळी नांदूरी गावाकडून एक महिद्रा मॅक्‍स जीप वेगात आली व सदर जीप पुढे एक मोटारसायकल होती. मोटरसायकलला ओव्‍हर टेक करुन सदरील जीप वेगाने चूकीच्‍या दिशेने आली व अर्जदाराचे ट्रॅक्‍टरला उजव्‍या दिशेने जोराची धडक दिली. अर्जदाराचे ट्रॅक्‍टर मध्‍यभागातून दुभागून ट्रॅक्‍टरची मोडतोड होऊन पुर्ण नुकसान झाले. त्‍याबाबत अर्जदाराने विरुध्‍द पक्षकार विमा कंपनीला कल्‍पना दिली व सर्व्‍हेअर ने अर्जदाराच्‍या ट्रॅक्‍टरचा सर्व्‍हे केला व ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीचा संपूर्ण खर्च देण्‍याचे मान्‍य केले.

 

      अर्जदार यांनी त्‍यानुसार ट्रॅक्‍टरची अॅथोराईज्‍ड सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये दुरुस्‍ती केली व त्‍यासाठी त्‍यांना रक्‍कम रु.50,0000/- खर्च आला सर्व आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता करुन नुकसान भरपाईची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षकार विमा कंपनीने रक्‍कम देण्‍याचे नाकारले

     

      दि.14/03/2012 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू नोटीसचे उत्‍तर ही दिले नाही किंवा रक्‍कम ही दिली नाही. अर्जदार यांनी विमा कंपनीकडे विमा उतरविलेला असतांना अपघात विमा कालावधीत घडलेला असतांना देखील अर्जदार यांना ट्रॅक्‍टरचे दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च रक्‍कम रु.50,000/- देणे बंधनकारक असतांना नुकसान भरपाई देण्‍याचे नाकारुन फसवणूक केली आहे. दूस-या ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्याने करावे लागेल. त्‍यासाठी रक्‍कम रु.20,000/- खर्च आला त्‍यामुळे अर्जदार यांनी ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीपोटी रक्कम रु.50,0000/- द.सा.द.शे. 12 दराने व्‍याज आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- तक्रार खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. अशी विनंती अर्जदार यांनी केलेली आहे.

 

2)    विरुध्‍द पक्षकार विमा कंपनी यांनी त्‍याचे म्हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराची तक्रार असत्‍य, काल्‍पनीक विधानावर खारीज होणे न्‍याय व योग्य आहे. Cause of action नसल्याने अर्जदाराची तक्रार खारीज करणे योग्‍य आहे. न्‍यायालयाच्‍या कार्यक्षेत्रात झालेले नसल्‍याने तक्रार खारीज करणे योग्‍य आहे. दि.26/03/2012 रोजी विरुध्‍द पक्षकार विमा कपंनीने अर्जदारास सांगितले होते की सदर अपघातात विठ्ठल लाटे हा ट्रॉलीसह माती सहीत ट्रॅक्‍टर चालवत होता व मातीची वाहतूक करत होता. त्‍यास फक्‍त अपघातादिवशी ट्रॅक्‍टरचे हेड चालविण्‍याचा परवाना होता अपघाता दिवशी सदर ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह माती भरुन जात होता. व ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह चालविण्‍याचा परवाना नसल्याने व विमा कंपनीने विमा देतांनाच कलम 3 मोटार अपघात नुकसान भरपराई कायदयान्‍वये चालकास अपघात दिवशी वाहन चालविण्‍याचा वैध परवाना असणे आवश्‍यक आहे परवाना नसतांना देखील विमा कपंनीने नमूद केलेल्‍या अटी व शर्ती यांचा भंग अर्जदाराने केल्‍याने नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाही. दि.26/03/2012 रोजी अर्जदारास नुकसान भरपई देता येत नाही असे पत्राव्‍दारे नमूद केले होते अर्जदाराने रामविलास हेडडा या सर्व्‍हेअर कडून अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे केला असून अपघातावेळेस विठठल लाटे ट्रॅक्‍टर चालवत होत असे नमूद केले आहे व दि.1,44,526/- चे नुसान झाले असे नमूद केले आहे. त्‍यामुळे अर्जदाराचे म्‍हणणे की रक्कम रु.50,0000/- चे नुकसान झाले हे धांदट खोटे आहे व ते विरुध्‍द पक्षकार विरुध्‍द पक्षकार कंपनी यांना मान्‍य नाही. अर्जदारास रु.20,000/- चे शेतातील काम करण्‍यासाठी दुस-या ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्याने खर्च आला याबाबत देखील काहीही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही ते खर्च देण्‍यास विमा कंपनी जबाबदार नाही. त्‍यामुळे अर्जदाराने विरुध्‍द पक्षकार विमा कंपनी योचं विरुध्‍द दाखल केलेली तक्रर खर्चासह खारीज करावी अशी विनंती करुन रु.10,000/- खर्चासाठी हुकुम व्‍हावा असे म्‍हंटले आहे.

 

3)    अर्जदाराने तकारी सोबत प्रथम माहीती अहवाल (फिर्याद) घटनास्‍थळ पंचनामा, policy परवाना, विमा कंपनीचे क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र, दि.17/02/2012, अर्जदारचा अर्ज लेखी कैफियत, आणि काही न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहे आणि अर्जदाराने ट्रॅक्‍टर दुरुस्‍ती केलेल्‍या पावत्‍या इ. कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले तसेच विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुदये अपस्थित होतात.

              मुददे                                   उत्‍तर

1)   तक्रारदाराजवळ वैध परवाना होता काय ?                       होय

 

2)   विरुध्‍द पक्षकार यांनी सेवेत त्रूटी केली आहे काय ?              ­ होय.

 

3)   तक्रारदार विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय ?                होय.

 

4)   काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                             

                       कारणमिमांसा:

मुद्दा क्र. 1

      तक्रारदाराने तक्रारीत सांगितल्‍यानुसार तक्रारदार त्‍यांच्‍या मालकीच्‍या ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडून माती घेवून जात होते व विरुध्‍द बाजूने आलेल्‍या जीपने धडक देऊन ट्रॅक्‍टरचे नुकसान झाले. त्‍यानुसार सदर बाबीची विप ला कल्‍पना देऊन आवश्‍यक ती पोलीस कार्यवाई करुन विप स कळवून पुढील कार्यवाहीसाठी दावा दाखल केला व त्‍या अनुषंगाने तक्रारदाराचा दावा हा दि.17/02/2012 रोजी नाकारण्‍यात आला व त्‍यामध्‍ये परवाना हा फक्‍त ट्रॅक्‍टरचा असल्‍याने ट्रेलर जोडले असेल तर वेगळय प्रकारच्‍या परवान्‍याची आवश्‍यकता असल्‍याने व तसा परवाना तक्रारदाराकडे नसल्याने नाकारण्‍यात येत आहे. त्‍याच्‍या अनुषंगाने 14/03/2012 रोजी तक ने आपला परवाना वैध असल्‍याने दावा मंजूर करावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे मुख्‍य मुददा परवान्‍याच्‍या वैधतेविषयी निर्माण होतो. त्‍या अनुषंगाने विपने दाखल केलेले न्‍यायीक निवाडे दि.06/08/2014 रोजी उपप्रादेशीक कार्यालयाने दिलेल्या. माहीतीच्‍या अधिकाराचे अवलोकन केले असता. विप ने दाखल केलेला F.A. No 1141/2012 जो न्‍यायनिवाडा आहे त्‍यामधील टॅक्‍टर हे ऊस वाहतूक करीत होते व त्‍या संदर्भाने या न्‍यायमंचात ते व्‍यापारी कारण तसेच तक्रारीतील माती वाहणे या कारणाशी जुळत नाहीत त्‍यामुळे उच्‍च न्‍यायालयाचा योग्‍य तो आदर राखून सदर न्‍यायनिवाडा विचारासाठी घेता येणार नाही. दुसरा न्‍याय निवाडा सिव्‍हील अपील 4631/2000 सुप्रीम कोर्ट नटवर पारीक विरुध्‍द स्‍टेट ऑफ कर्नाटका यामध्‍ये मा. सर्वेाच्‍च न्‍यायालयापुढे कर्नाटक टॅक्‍सेशन अॅक्‍ट नुसार कर लावण्‍यासंदर्भातला विवाद आहे किंवा करामधील सुटीसंदर्भात भाष्‍य आहे. तथापि परिवहन (ट्रान्‍सपोर्ट) हा विषय केंद्र आणि राज्‍य सरकाच्‍या संयुक्‍त सुचीमधील असल्‍याने केंद्र व राज्‍य आपापल्‍या अखत्‍यारित व कर हा विषयही संयुक्‍त सुचीमधील असल्‍याने त्‍या त्‍या विषयात त्‍या त्‍या राज्‍यातले वेगवेगळे कायदे असू शकतात. त्यामुळे हा न्‍याय निवाडा कर्नाटक राज्‍यातील असल्‍याने व ही तक्रार महाराष्‍ट्र राज्‍यातील असल्‍याने मा. सर्वौच्‍च न्‍यायालयाचा योग्‍य तो आदर राखून या प्रकरणी लागू करणे संयुक्तिक होणार नाही.

मोटर व्‍हीकल अॅक्‍ट मधील  

 

(44) "tractor" means a motor vehicle which is not itself
constructed to carry any load (other than equipment used
for the purpose of propulsion); but excludes a road-roller;

(46) "trailer" means any vehicle, other than a semi-trailer
and a side-car, drawn or intended to be drawn by a motor
vehicle;

(47) "transport vehicle" means a public service vehicle, a
goods carriage, an educational institution bus or a private
service vehicle."

Section 2 is a comprehensive definition of the words "motor vehicle". Although, a
"trailer" is separately defined under section 2. to mean any vehicle drawn or intended to
be drawn by motor vehicle, it is still included into the definition of the words "motor
vehicle" under section 2. Similarly, the word "tractor" is defined in section .2 to mean a
motor vehicle which is not itself 'constructed to carry any load. Therefore, the words
"motor vehicle" have been defined in the comprehensive sense by the legislature.
Therefore, we have to read the words "motor vehicle" in the broadest possible sense
keeping in mind that the Act has been enacted in order to keep control over motor
vehicles, transport vehicles etc. A combined reading of the aforestated definitions under
section 2, reproduced hereinabove, shows that the definition of "motor vehicle" includes
any mechanically propelled vehicle apt for use upon roads irrespective of the source of
power and it includes a trailer. Therefore, even though a trailer is drawn by a motor

vehicle, it by itself being a motor vehicle, the tractor- trailer would constitute a "good:
carriage" under section 2 and consequently, a "transport vehicle" under section 2. Th:
test to be applied in such a case is whether the vehicle is proposed to be used fo
transporting goods from one place to another. When a vehicle is so altered or preparec
that it becomes apt for use for transporting goods, it can be stated that it is adapted for the
carriage of goods. Applying the above test, we are of the view that the tractor-trailer
in the present case falls under section 1. as a "goods carriage" and consequently, it
falls under the definition of "transport vehicle" under section 2 of the M.V. Act
1988.

 

 Corresponding Law. - Section 2 (27) corresponds to section 2 (17) of the

Motor Vehicles Act, 1939.

 

(28) “motor vehicle” or “vehicle” means any mechanically propelled vehicle adapted for use upon roads whether the power of propulsion is transmitted thereto from an external or internal source and includes a chassis to which a body has not been attached and a trailer ; but does not include a vehicle running upon fixed rails or a vehicle of a special type adapted for use only in a factory or in any other enclosed premises or a vehicle having less than four wheels fitted with engine capacity of not exceeding 4[twenty-five cubic centimeters] ; 4. Substituted for “thirty-five cubic centimetres” by Act 54 of 1994,S.2 (w.e.f.14-11-1994)

 

     म्‍हणजेच वरील व्‍याख्‍येनुसार ट्रॅक्‍टर ट्रॉलीसहीत ट्रान्‍सपोर्ट या श्रेणीत येत असले तरीसुध्‍दा 35 क्‍यूबीक सेंटीमिटर क्षमतेचे ट्रॅक्‍टर यातून वगळलेले आहेत. तक्रारदाराने व विपनेही ट्रॅक्‍टरच्‍या क्षमतेचा उल्‍लेख कुठेही केलेला नसल्‍याने व आक्षेपातही विपकडून हा उल्‍लेख नसल्‍याने तक्रारीतील ट्रॅक्‍टर हे त्‍या क्षमतेपेक्षा जास्‍त होते असे समजता येणार नाही. त्‍याच सोबत तक्रारीतील ट्रॅक्‍टर हे माती वाहत होत व ते शेती सुधारणेकरीता वापरात येत होता या अनुष्‍ंगाने enclosed premises चा अर्थ शेतीमध्‍ये घेतांना फॅक्‍ट्री सारखा घेता येणार नाही. त्यामुळे त्‍याचा अर्थ फक्‍त शेती वापराकरीता असा घेतला तर ट्रॅाली ही इतर अवजारे जसे की नांगर, मोगडा या सारख्‍या जोडण्‍या सारखीच होईल त्‍यामुळे तसेच इंजीन व ड्रायव्‍हींग पावर व ड्रायव्‍हींग कंपोनंन्‍टस जसे की स्‍टेअरींग ब्रेक इत्‍यादी फक्‍त ट्रॅक्‍टरला असतात व त्‍यासाठीच ड्रायव्‍हींगचे कौशल्‍य आवश्‍यक असते व तसा परवाना ट्रॅक्‍टर चालकाकडे होता. त्‍यामुळे अटॅचमेंटचा व्‍यापक अर्थ घेऊन तक्रारदार  जवळचा परवाना हा अवैध ठरवून त्‍याच्‍या न्‍याय हक्कापासून दुर करता येणार नाही.  

 

     विप यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये अपघाता वेळेस विठठल लाटे ट्रॅक्‍टर चालवत होता हि बाब मान्‍य केलेली आहे आणि अर्जदाराने विठठल लाटे यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स ही अभिलेखावर दाखल केलेले आहे.

 

     अर्जदार यांनी तक्रारदाराला रु.5,00,000/-(रुपये पाच लाख फक्‍त) ची मागणी केलेली आहे परंतू सदर पाच लाख याचा खूलासा दिलेला नाही. तसेच अभिलेखावर ट्रॅक्‍टर दुरुस्‍तीचे बिले दाखल केलेली आहेत ती बिले रु.98,676/- ची आहेत. तसेच विप यांनी त्‍यांच्‍या कैफियतीमध्‍ये अर्जदाराचे रु.1,44,526/- चे नुकसान झाल्‍याचे नमूद केलेले आहे. परंतु त्‍याबबात कोणताही पुरवा अभिलेखावर दाखल नाही. त्‍यामुळे अर्जदाराने अभिलेखावर दाखल केलेली बिले त्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास अर्जदार पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे मुददा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देऊन आम्‍ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करतो.

आदेश

1)    तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

 

2)    विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रादार यांना क्‍लेम रक्‍कम रु.98,676/- (रुपये अठयांन्‍नव हजार सहाशे शहात्‍तर फक्‍त) दि.17/02/2012 पासून 9 टक्‍के व्‍याज दराने आदेश दिनांकापासून 30 दिवसात दयावी.

3)    विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रु.1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावा.

 

4)   उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन      तीस दिवसात करुन विरुध्‍द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षकार यांनी न केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.

 

5)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

            Sd/-                                                                                     Sd/-

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                 (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                              सदस्‍या 

               जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद

 

 

 

 

 

वरील मतास मी सहमत नसून मी माझे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे मांडत आहे.

 

 

मुददे                                  उत्‍तर

1)   वाहन चालकाजवळ वैध परवाना होता काय ?                     नाही.

2)   विरुध्‍द पक्षकार यांनी विमा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे का ?     ­ नाही.

3)   तक्रारदार विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय ?                नाही.

4)   काय आदेश ?                                       शेवटी दिल्‍याप्रमाणे.

मुददा क्र. 1 ते 3 :

1)   तक्रारदाराने आपला ट्रॅक्‍टर चालक विठठल लाटे यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स बददल  आर.टी.ओ. चा दाखला हजर केला असून लायसेन्‍स ट्रॅक्‍टर चालवण्‍यासाठी 16.10.2006 ते 31.05.2017 या कालावधीसाठी होते. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे तसेच प्रथमखबर प्रमाणे ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडून त्‍यात माती भरुन भ्‍डकपणी येथील पांडुरंग बनसोडे यांचे वीट भट्टीवर माती टाकणेसाठी ट्रॅक्‍टर चालला होता. तक हा यमगरवाडीचा आहे. कसई पाटीपासून उत्‍तरेस 2 कि.मी. अंतरावर अपघात झाला म्‍हणजेच हे उघड आहे की ट्रॅक्‍टरमध्‍ये मालवाहतूक करण्‍यात येत होती तसेच चालकाकडे ट्रॉलीतून माल वाहतूक करण्‍याचे लायसेन्‍स नव्‍हते. आर.टी.ओ. चे पत्राप्रमाणे ट्रॅक्‍टर ट्रेलरच्‍या लायसेन्‍सची आवश्‍यकता असते.

 

2)   मा. सदस्‍यांनी ना. मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा F.A.1141/2012  या प्रकरणात लागू  नाही म्‍हंटले कारण तेथे ट्रॅक्‍टरच्‍या ट्रॉलीमध्‍ये ऊस नेला जात होता केवळ प्रस्‍तुत प्रकरणात ट्रेलरमध्‍ये माती वाहीली जात होती म्‍हणून त्याबददलचे लायसेन्‍स ड्रायव्‍हरला आवश्‍यक नव्‍हती असा निष्‍कर्ष माझे मते योग्‍य नाही.

 

3)   ना. सर्वोच्‍च न्‍यायालयाने चेअरमन राजस्‍थान स्‍टेट रोड ट्रान्‍सपोर्ट कार्पोरेशन विरुध्‍द श्री. संतोष व इतर SLP3265 of 2012 प्रकरणी म्‍हंटले आहे की ‘जुगाड’ हे मोटर व्‍हेईकलच्‍या व्‍याख्‍येत येते ते फक्त शेती उपयोगासाठी वापरले तरच रजिष्‍ट्रेशन करणेसाठी सुट देण्‍याबददल स्‍टॅटूटटरी अथॅारीटीला नोटीफिकेशन/सर्क्‍यूलर काढता येईल.

 

4)   ना. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कं. विरुध्‍द अंगाद कोळ सिव्‍हील अपील क्र.1102/09 MA NO.SC/248 /2009 प्रकरणी असे म्‍हंटले आहे की ज्‍या माणसाला लाईट मोटर व्‍हेइकल चालवण्‍याचे लायसेन्‍स आहे त्‍याला ट्रान्‍सपोर्ट व्‍हेइकल चालवता येणार नाही.

 

5)    वरील कायद्याच्‍या अन्‍वयाने प्रस्‍तुत प्रकरणात ड्रायव्‍हरकडे योग्‍य ते लायसेन्‍स नव्‍हते त्‍यामुळे विरुध्‍द पक्षकार (विप) ने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे मी मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देतो व खालील आदेश करतो.         

                                आदेश

1)   तक्रारकत्‍यांची तक्रार रदद करणेत येते.

2)   खर्चाबदददल कोणताही हुकुम नाही.

3)   उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

                                                             Sd/-

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

 

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                 (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                               सदस्‍या 

              जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.