Maharashtra

Gadchiroli

CC/10/39

Shri. Atul Prabhakar Bomanwar, Age- 29yr., Occu.- Business. - Complainant(s)

Versus

Info-Tokiyo General Insurance Co. LTD. Chandrapur - Opp.Party(s)

Adv. R.S.Khobre

24 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/39
 
1. Shri. Atul Prabhakar Bomanwar, Age- 29yr., Occu.- Business.
At. Camp Area, Gadchiroli, Tah. Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Info-Tokiyo General Insurance Co. LTD. Chandrapur
Sai Heritese, Second Floor, Old Warora Naka, Civil Line, Chandrapur, Tah. Chandrapur
Chandrapur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्‍यक्ष(प्रभारी))

       (पारीत दिनांक : 24 ऑगष्‍ट 2011)

                                      

1.           अर्जदार यांनी, स्‍वतःचे मालकीची मारुती ओमनी कार क्र.एम.एच.31/सी पी 2059 जळाल्‍याने त्‍याची किंमत व नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

2.          अर्जदाराने सदर गाडी पॉलिसी क्र.42061098 मर्यादा दि.25.2.09 ते 24.2.2010 या करारानुसार गैरअर्जदाराकडे विमाकृत केलेली आहे.  गैरअर्जदार हा व्‍यवसायीक असून गैरअर्जदाराचा व्‍यवसाय गाड्यांचा विमा उतरविण्‍याचा व त्‍याबदल्‍यात विमा पञानुसार परिपुर्तता करुन नुकसान भरपाईची पुर्तता करण्‍याचा आहे.  अर्जदार हा व्‍यवसायीक असून त्‍याचा व्‍यवसाय गडचिरोली जिल्‍ह्या अंतर्गत संपूर्ण शासकीय ऑफीसचे कंञाट घेणे व कंञाटानुसार सेवा देणे असा आहे.  अर्जदाराने सदर कामे करण्‍याकरीता स्‍वतःच्‍या सुखसोईकरीता दि.24.2.2007 ला सेवा आटोमोटिव्‍ह प्रायव्‍हेट लिमिटेड, अमरावती रोड वाडी

... 2 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

नागपूर यांचेकडून मारुती कंपनीची कार विकत घेतली होती.  अर्जदाराने आपले मालकीची सदर गाडी क्र.एम.एच.31/सी.पी. 2059 ही दि.25.2.09 ते 24.2.2010 या कालावधी करीता गैरअर्जदार कंपनीला विम्‍याचा हप्‍ता रुपये 5,558/- देवून पॉलिसी क्र.42061098 नुसार विमाकृत करुन घेतले. अर्जदाराने सदर कार विमाकृत करतांना संपूर्ण बाबीची शहानिशा करुन, तसेच संबंधीत अधिका-यांशी आवश्‍यक ती चर्चा करुन, आवश्‍यक त्‍याबाबी विमाकृत करण्‍याविषयी विमा मंडळाने ठरविलेल्‍या दारानुसार विमा कंपनीला देय असणारी रक्‍कम देवून व त्‍या संबंधीच्‍या देणीचे हमीपञ दिल्‍यानंतर सदर कार गैरअर्जदाराकडे विमाकृत करुन घेतली. 

 

3.          अर्जदार हे दि.30.6.09 रोजी मारुती कार एम.एच.31/सी.पी.2059 मधून व्‍यवसाया संबंधाने गडचिरोली वरुन चामोर्शी कडे जात होते.  सदर कार अर्जदाराचे नियमित वाहन चालक पुरुषोत्‍तम मोतीराम जेंगठे हे चालवित होते.  त्‍याचेकडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना असून त्‍याचा क्रमांक एम.एच.33/20080000019 दि.23.1.2008 आहे.  अर्जदाराची कार शिवणी गावाचे पोटफोडी नदीचे जवळ पोहचली असता, कार मधील वायरिंगमध्‍ये तांञीक बिघाड निर्माण होऊन शार्ट सर्किट झाल्‍याने कारने पेट घेतला.  कार पेट घेतल्‍याने त्‍यामध्‍ये बसलेले अर्जदार व कारचा चालक पुरुषोत्‍तम मोतीराम जेंगठे यांनी कसाबसा आपला जीव वाचविला आणि घटनेची माहिती पोलीस स्‍टेशन, गडचिरोलीला दिली. अर्जदाराची कार संपूर्ण जळाल्‍याने दुरुस्‍ती योग्‍य राहिली नाही.  अर्जदाराची कार घटनेच्‍या वेळेस गैरअर्जदार कंपनीकडे विमाकृत होती.  त्‍यामुळे, अर्जदाराने त्‍याचे झालेल्‍या कारचे नुकसानी करीता कारच्‍या किंमतीच्‍या भरपाई करुन मिळण्‍यास दि.23.12.2009 रोजी गैरअर्जदार कंपनीकडे अर्ज करुन आवश्‍यक सर्व मुळ कागदपञ सादर केले. परंतु, गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराला कसलीही नुकसान भरपाई केली नाही. त्‍यामुळे, अर्जदाराला दि.24.12.09 पासून रुपये 700/- प्रमाणे भाड्याने कार घेवून आपला व्‍यवसाय करावा लागत आहे. गैरअर्जदार कंपनीने विम्‍याच्‍या रकमेची मागणी वेळीच मंजूर झाली असती तर अर्जदाराने त्‍यातून नवीन कार खरेदी केली असती व सुरळीत व्‍यवसाय चालवीला असता.  परंतू, गैरअर्जदार कंपनीकडून कोणतीही मागणी मंजूर न झाल्‍याने अर्जदाराला आर्थिक भुर्दंड, शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदार विमा कंपनीकडून मारुती ओमणी कारची किंमत रुपये 2,32,198/- देण्‍यात यावी.  अर्जदारास दि.24.12.09 पासून 15.6.10 पर्यंत रोज रुपये 700/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍यात यावी.  दि.15.6.10 पासून रकमेच्‍या वसुली पावेतो प्रती दिवस रुपये 700/- नुकसान भरपाई दाखल देण्‍याचा आदेश व्‍हावा. मानसिक ञासाबद्दल रुपये 20,000/- अर्जदारास देण्‍यात यावे.  विमा रकमेवर तसेच नुकसान भरपाईवर प्रचलित व्‍याज दाराने व्‍याज देण्‍यांत यावे, अशी प्रार्थना केली आहे.

 

4.          अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 8 दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.14 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.15 सोबत 7 दस्‍ताऐवज यादीसह दाखल केले. 

 

... 3 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

5.          गैरअर्जदाराने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराच्‍या मारुती ओमनी कार क्र. एम.एच.31 सीपी 2059 च्‍या रजिस्‍ट्रेशन बुकमध्‍ये नागपूर आर.टी.ओ. दिलेला आहे.  सदर गाडीची पॉलिसी क्र.21061098 मर्यादा दि.25.2.09 ते 24.2.10 अन्‍वये गैरअर्जदाराकडे विमाकृत केली होती हे मान्‍य, त्‍यामुळे तो गैरअर्जदाराचा ग्राहक हे मान्‍य, तसेच, गैरअर्जदार ग्राहकाला विमा पञानुसार सेवा पुरविणारा व कायदेशीररित्‍या नुकसान भरपाई देणारा आहे, हे मान्‍य केले आहे.  अर्जदाराने दि.30.6.09 रोजी कार व्‍यवसायीक कामासाठी केले हे अर्जदारानेच मान्‍य केले आहे.  म्‍हणजे, गैरकानून वापर केला, तसेच पॉलिसीचा भंग केला.  पॉलिसी व्‍यावसायीक कार वापरासाठी नव्‍हती, तर खाजगी वापरासाठी होती.  त्‍या कारचा चालक श्री पुरुषोत्‍तम मोतीराम जेंगठे कडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना होता ही बाब माहिती अभावी अमान्‍य केली आहे. अर्जदाराने दि.23.12.09 ला गैरअर्जदार कंपनीकडे अर्ज केला, पण आवश्‍यक सर्व मुळ कागदपञ पेश केले हे अमान्‍य केले. गैरअर्जदाराने उर्वरीत कथन अमान्‍य केले आहे.

 

6.          गैरअर्जदाराने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, सदर मारोती कार वैयक्‍तीक वापरासाठी विमाकृत होती.  परंतु, अर्जदाराचा त्‍या कारचा उपयोग व्‍यावसायीक (Commercial) कामासाठी केला ही बाब घटना स्‍थळ पंचनाम्‍यावरुन दिसून येते. म्‍हणजेच बिम्‍याचा अटीचा उपयोगाचा भंग केला. तसेच, बेकायदेशीर कार वापरली.  करीता अर्जदार नुकसान भरपाईस पाञ नाही.  अर्जदाराने घटनेची माहिती ताबडतोब गैरअर्जदाराला कळविलेली नाही.  विमा पॉलिसीमध्‍ये गैरअर्जदाराचा टोल फ्री नंबर दिला आहे, परंतु, अर्जदाराने फोनवर घटनेची माहिती गैरअर्जदाराला दिलेली नाही.  त्‍यामुळे, कलम 154 मो.वा.का चे सुध्‍दा पालन केलेले नाही.  जवळ-जवळ 6 महिन्‍यानंतर सदर घटनेची माहिती गैरअर्जदाराला पञाने दिली, तसेच या उशिरा माहिती देण्‍याचे संयुक्‍तीक व योग्‍य कारण दिलेले नाही. गैरअर्जदाराला माहिती 6 महिने उशिरा दिल्‍याने विमा पॉलिसी अट क्र.1 चे अर्जदाराने पालन केले नाही. या सर्व बाबीमुळे अर्जदाराचा नुकसान भरपाईचा अर्ज खारीज करण्‍यांत यावा, अशी विनंती केली आहे. 

 

7.          अर्जदाराने नि.क्र.20 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी उत्‍तर, अर्जदाराचा लेखी युक्‍तीवाद व गैरअर्जदार यांचे वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.         

 

//  कारणे व निष्‍कर्ष  //

 

8.          अर्जदाराने मारुती ओमनी या वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडून काढला होता. विमा पॉलिसीचा क्रमांक 42061098 असा असून विमा कालावधी दि.25.2.09 ते 24.2.2010 या कालावधीत वैध होता, हे गैरअर्जदार यांनी मान्‍य केले आहे.  विमा काधावधीत अर्जदाराचे वाहन दि.30.6.09 रोजी गडचिरोली वरुन चामोर्शीकडे जात असतांना मौजा शिवणी गावाचे

 

... 4 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

 

पोटफोडी नदी जवळ वाहन जळून नुकसान झाले, त्‍याची नुकसान भरपाई मिळण्‍याची मागणी अर्जदाराने केली आहे.  गैरअर्जदार यांनी, लेखी उत्‍तरात असा मुद्दा उपस्थित केला की, विमाकृत वाहन हे व्‍यावसायीक वापराकरीता उपयोगात आणत असल्‍यामुळे (Commercial purpose)  पॉलिसीच्‍या अटीचा भंग केला. वाहन हे बेकायदेशीरपणे वापर केला असल्‍याने नुकसान भरपाईस पाञ नाही.  गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेल्‍या मुद्यावर अर्जदार यांनी लेखी युक्‍तीवाद नि.क्र.20 मध्‍ये असे सांगीतले आहे की, वाहन खाजगी वापराकरीताच उपयोगात आणले आहे, त्‍यामुळे गैरअर्जदारानी घेतलेला आक्षेप संयुक्‍तीक नाही.  परंतु, अर्जदाराचे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  अर्जदाराने नि.क्र.4 च्‍या यादीसोबत घटनास्‍थळ पंचनाम्‍याची प्रत दाखल केली.  सदर घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये असे नमूद केले आहे की, वाहनाच्‍या मागील बाजूस गॅस सिलेंडर तसेच गॅस किट जळलेली असून सिलेंडर काळा पडला आहे.  असे नमूद केले आहे त्‍याचप्रमाणे व्‍हॅनमध्‍ये भरलेला ब्‍लीचींग पावडरच्‍या पिशव्‍यांमधून धूर निघून व्‍हॅन जळल्‍याचे पुरुषोत्‍तम मोतीराम जेंगठे, वाहन चालक यांनी सांगीतले.  वाहनात अपघाताचे वेळी ब्‍लीचींग पावडरच्‍या बॅग भरल्‍या होत्‍या व त्‍या जळत असल्‍याचे घटनास्‍थळी आढळून दिसून आले.  अर्जदाराने आपले तक्रारीत हे मान्‍य केले आहे की, गडचिरोली जिल्‍ह्या अंतर्गत संपूर्ण शासकीय ऑफीसचे कंञाट घेणे व कंञाटनुसार सेवा देण्‍याचा व्‍यवसाय करतो.  अर्जदाराला ठिक-ठिकाणी भेटी देवून कंञाट घेणे व कंञाटनुसार कामे करणे, पर्यावेक्षण करणे व कंञाटची पुर्तता करणे इत्‍यादी कामे करावी लागतात.  अर्जदाराने सदर कामे करण्‍याकरीता स्‍वतःच्‍या सोईकरीता दि.24.2.07 ला मारुती कंपनीची कार विकत घेतली.  या अर्जदाराच्‍या कथनावरुन मारुती कारचा वापर हा व्‍यवसायाकरीता करीत होता.  जेंव्‍हा की, वाहन हे खाजगी वापराकरीता नोंदणीकृत करण्‍यात आले आहे.  यावरुन, अर्जदार यांनी मारुती कारचा वापर अवैध केला हे सिध्‍द होतो.  अर्जदाराने, वाहनाचा वापर  ब्‍लीचींग पावडरच्‍या व्‍यावसायाकरीता उपयोग केला या सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेला आक्षेप ग्राह्य धरण्‍यास पाञ आहे. 

 

            अर्जदार यांनी वाहनाचा वापर हा व्‍यावसायाकरीता केला असल्‍याने पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही. अर्जदार यांनी वाहनाचा उपयोग व्‍यापाराकरीता केला आणि व्‍यापार करीत असतांनी वाहन जळून नुकसान झाले त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार मंचाचे अधिकार क्षेञात येत नाही, या एकमेव कारणावरुनच तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही.  मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे.  त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.

 

Consumer – Service – Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(d) – Section amended by the Amendment Act, 2002 (62 of 2002) with effect from 15.3.2003 by adding the words “but does not include a person who avails of such services for any commercial purpose” in the definition of ‘consumer’ – Therefore, if the service of a carrier is availed for any commercial purpose, the person availing the

 

... 5 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

service will not be a ‘consumer’ – Consequently, a complaint in such a case will not be maintainable under the Act.

 

            Economic Transport Organization –Vs.-Charan Spinning Mills (P) Ltd.and another

                                    2010 CTJ 361 (Supreme Court)(CP)

 

 

9.          अर्जदाराच्‍या वाहनाचा अपघात दि.30.6.09 ला झाल्‍यानंतर त्‍याची सुचना विमा कंपनीला ताबडतोब दिली नाही.  गैरअर्जदार यांनी आपले विशेष कथनात असा आक्षेप घेतला आहे की, विमा पॉलिसीवर टोल फ्री क्रमांक दिला असून त्‍या क्रमांकावर अपघातासंबंधी माहिती देण्‍याचे नमूद आहे, तरी अर्जदाराने कुठलीही सुचना विमा कंपनीला दिली नाही आणि 6 महिन्‍यानंतर घटनेची माहिती पञाने दिली.  विमा पॉलिसीच्‍या अट क्र.1 नुसार अपघात झाल्‍यानंतर त्‍याची सुचना ताबडतोब (Immediately) देणे आवश्‍यक आहे.  अर्जदाराने आपले तक्रारीत हे मान्‍य केले आहे की, अपघात 30.6.09 ला झाल्‍यानंतर विमा कंपनीला दि. 23.12.09 ला कागदपञ सादर केले.  अर्जदाराचे म्‍हणणे नुसार अपघातानंतर विमा कंपनीला तोंडी कळविले, परंतु अर्जदाराचे हे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही.  अर्जदाराने अपघातानंतर विमा कंपनीला त्‍याची सुचना देण्‍यास अक्षम्‍य विलंब करुन अट क्र.1 चा भंग केला.  गैरअर्जदार यांनी, नि.क्र.15-अ च्‍या यादीनुसार पॉलिसीच्‍या शर्ती व अटीची प्रत दाखल केली आहे, त्‍यातील पान नं.5 वर अट क्र.1 दिली आहे, त्‍या अटीनुसार अपघाताची सुचना ताबडतोब देणे आवश्‍यक आहे.  परंतु, अर्जदाराने 30.6.09 पासून 23.12.09 पर्यंत कोणतीही सुचना विमा कंपनीला दिली नाही.  हा अर्जदाराचा निष्‍काळजीपणा असून गैरअर्जदाराच्‍या सेवेत न्‍युनता नाही.  गैरअर्जदाराच्‍या वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळी मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी प्रथम अपील क्र.426/2004  न्‍यु इंडिया इंशुरन्‍स कंपनी लि. नवी दिल्‍ली –विरुध्‍द- धरमसिंग व इतर 1, आदेश दि.4 जुलै 2006 च्‍या आदेशाची प्रत सादर केली.  तसेच, अपील क्र.321/2005 न्‍यु इंडिया इंशुरन्‍स कंपनी –विरुध्‍द – ञिलोचन जाणे, आदेश दि.9.12.09 या प्रकरणाचा हवाला दिला.  सदर प्रकरणात चोरी, अपघातानंतर विमा कंपनीला द्यावयाचे सुचनेबाबत आपले मत दिले आहे त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडतो. 

 

10.         अर्जदाराने, लेखी युक्‍तीवादासोबत खालील प्रमाणे न्‍यायनिवाडयाचा हवाला दिला. 

 

(1)        Rajan Baburao Patil and Another-Vs.-Smt.Nagarbai Sadhu Pawar, 2007 (1) T.A.C.86 (Bombay High Court)

(2)        Kamala Mangalal Vayani and other-Vs.- United India Insurance Co.Ltd. and others, 2010 AC 701 (SC)

(3)        United India Company Limited –Vs.- Ahmadi Begum and other, 2010 (4) T.A.C. 785 (A.P)

(4)        United India Insurance Co. Ltd.-Vs.- Rehana Begum and other, 2009 ac 396 (Bom) (N.B)  

 

 

... 6 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

            वरील न्‍यायनिवाड्यात दिलेला रेशो या प्रकरनाला लागू पडत नाही.  सदर न्‍यायनिवाडे हे मोटार अपघात लवादा संदर्भातील असून, ग्राहक संरक्षण संदर्भातील नाही.

 

11.          गैरअर्जदार यांनी असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराने प्रथम सुचना रिपोर्ट सादर केली नाही.  गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता, अर्जदाराने क्‍लेम फार्म 9.12.09 ला भरुन दिला, त्‍यामध्‍ये प्रथम सुचना रिपोर्ट दिली काय ?  या रकान्‍यात ‘होय’ (Yes) म्‍हणून उत्‍तर दिले आहे.  परंतु, प्रत्‍यक्षात प्रथम सुचना रिपोर्ट दिली नाही व तक्रारीतही दाखल केले नाही.  अर्जदार हा स्‍वच्‍छ हाताने तक्रार घेवून आला नाही, असा दाखल दस्‍ताऐवजावरुन निष्‍कर्ष निघतो, त्‍यामुळे तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही.

12.         अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने विमा दावा मंजूर केला नाही व कोणताही प्रतिसाद न दिल्‍यामुळे रोज रुपये 700/- भुर्दंड सोसून आपली कामे करणे भाग पडले आहे.  त्‍यामुळे दि.24.12.09 पासून 700/- भाड्याने कार घेवून आपला व्‍यवसाय करावा लागत आहे.  त्‍यामुळे, गैरअर्जदाराने रुपये 1,21,800/- ची नुकसान भरपाई द्यावी.  अर्जदाराने ही केलेली मागणी धांदात खोटी असल्‍याचे दिसून येते.  वाहनाचा वापर व्‍यवसायासाठी करण्‍याकरीता भाड्याने वाहन घेतले, परंतु त्‍याची कुठलीही पावती रेकॉर्डवर दाखल केली नाही. दुसरी महत्‍वाची बाब अशी की, दि.30.6.09 ला अपघात झाल्‍यानंतर गैरअर्जदाराकडे 23.12.09 क्‍लेम सादर केला आणि त्‍याची दुसरे दिवसापासून म्‍हणजेच दि.24.12.09 पासून वाहन भाड्याने घेतल्‍याचा किराया मागत आहे. यावरुन, अर्जदार 23.12.09 पर्यंत वाहन भाड्याने घेतले नाही आणि लगेच विमा कंपनीकडे क्‍लेम सादर होताच भाड्याची मागणी करणे यात अर्जदाराचा वाईट हेतु असून, स्‍वच्‍छ हाताने तक्रार घेवून आला नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने, तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही.    

 

13.         गैरअर्जदाराचे वकीलांनी असे सांगीतले की, अर्जदाराने ज्‍या गोष्‍टी आपले तक्रारीत नमूद केल्‍या नाहीत, त्‍या गोष्‍टी आपले लेखी युक्‍तीवादात नमूद केलेल्‍या आहेत.  अर्जदाराने तक्रारीत तोंडी सुचना दिल्‍याचे कथन केले नाही, जेंव्‍हा की लेखी युक्‍तीवादात कथन केले आहे.  त्‍यामुळे, कायदेशीर दृष्‍टया प्लिडींगच्‍या (Pleading) बाहेर जाता येत नाही, यामुळेही अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

14.         अर्जदारानेच स्‍वतः पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला, वाहनाचा वापर व्‍यापाराकरीता (Commercial)  केला आणि अपघातानंतर जवळपास 6 महिन्‍याचा विलंब सुचना देण्‍यास केला.  या सर्व बाबीवरुन, अर्जदाराने निष्‍काळजीपणा केला असून, गैरअर्जदाराने सेवा देण्‍यात न्‍युनता केली नाही, ही बाब दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होत असल्‍याने, तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  

 

 

... 7 ...                 (ग्रा.त.क्र.39/2010)

 

15.         गैरअर्जदाराच्‍या वकीलाने असे युक्‍तीवादात सांगीतले की, अर्जदाराने तक्रार ही शपथपञावर दाखल केले नाही.  तसेच, तक्रारीच्‍या कथना पृष्‍ठयर्थ शपथपञही दाखल केला नाही.  तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रार शपथपञावर दाखल केली नाही.  अर्जदारास पुरेपूर संधी देवूनही पुरावा शपथपञ दाखल केला नाही.  त्‍यामुळे, प्रकरण अर्जदार व गैरअर्जदाराचे शपथपञाशिवाय पुढे चालविण्‍यात यावे, असा आदेश नि.क्र.1 वर दि.25.2.11 ला पारीत करण्‍यांत आला.  अर्जदारास पुरेपूर संधी देवूनही युक्‍तीवाद केला नाही, त्‍यामुळे प्रकरण प्रलंबीत राहीले. शेवटी अर्जदाराची बाजू बंद करुन, गैरअर्जदाराचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, तेंव्‍हा लेखी युक्‍तीवाद सादर केला.  या सर्व बाबीवरुन अर्जदार स्‍वच्‍छ हाताने तक्रार घेवून आला नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

 

            वरील कारणे व निष्‍कर्षावरुन तक्रार मंजूर करण्‍यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने, तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.    

                       

              //  अंतिम आंदेश  //

(1)   अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

(2)   अर्जदार व गैरअर्जदारानी आपआपला खर्च सहन करावा.

(3)   अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.  

 

     

गडचिरोली.

दिनांक :-24/8/2011.  

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.