Maharashtra

Nagpur

CC/11/482

Shri Satyanarayan Malu - Complainant(s)

Versus

Infinity Cars Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv.Ujwal P. Akare

12 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/482
 
1. Shri Satyanarayan Malu
1186, Radha Niwas, Bhawsar Chowk, Gandhibagh
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Infinity Cars Pvt. Ltd.
Dr. Annie Besant Road, Opp. Nehru Centre, Worli,
Mumbai 400 018
Maharashtra
2. BMW India Pvt. Ltd.
Blog No. 8, Twoer B-7th floor, DLF Cyber City Ph-2,
Gurgaon
Haryana 122001
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv.Ujwal P. Akare, Advocate
For the Opp. Party:
ORDER

तक्रारकर्त्‍यांतर्फे      :     अॅड. पंकज गुप्‍ता.

विरुध्‍द पक्षातर्फे          :           अॅड. शबनम लाटीवाला, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 तर्फे.                                      

 

        (मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

 

 (पारित दिनांकः 12/09/2014)

                  तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण थोडक्‍यात येणेप्रमाणे...

 

1.          विरुध्‍द पक्ष क्र.1 हे बी.एम.डब्‍ल्‍यू कारचे उत्‍पादक असुन विरुध्‍द पक्ष क्र.2 हे विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारा निर्मीत वाहनाची विक्री, दुरुस्‍ती आणि व्‍यवस्‍थापन करतात. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे.

 

2.          तक्रारकर्त्‍याने दि.26.05.2010 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारे निर्मीत बी.एम.डब्‍ल्‍यू. मॉडल कं.5251 रु.40,00,000/- देऊन खरेदी केली. सदर वाहनाचा आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक एम.एच.31/डी.एफ.0101 असा आहे. सदर कार तक्रारकर्ताच चालवित असुन एका दिवसात 20 ते 30 किलोमीटर चालवतो व ती फक्‍त 1500 कि.मी. चालविली आहे. सदर वाहनाचे समोरील बाजूचे टायरमध्‍ये काही दोष असल्‍याचे व सदर टायरच्‍या पृष्‍ठ भागावर हवेचे फूग्‍गे आल्‍याचे आणि मागील बाजूच्‍या चाकातील अलॉय व्‍हील मधून सरकल्‍याचे व जोड कटल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले. याची सुचना तक्रारकर्त्‍याने दि.09.12.2010 रोजी विरुध्‍द पक्षाला दिली, सदर पत्र मिळाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या गैरसोयीबद्दल विरुध्‍द पक्षाने दिलगीरी व्‍यक्‍त केली.

 

3.          विरुध्‍द पक्षाने दि.21.10.2012 रोजी ई-मेल नुसार सदर त्रुटी ही उत्‍पादनातील नसुन बाहेरील मार/ आघात अथवा अन्‍य कारणांमुळे निर्माण झाल्‍याचे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कळविले. आणि त्‍याकरता तक्रारकर्त्‍याने विमा दावा सादर करण्‍याचा सल्‍ला दिला. सदर सुचनेला तक्रारकर्त्‍याने दि.23.12.2010 रोजी पाठविलेल्‍या उत्‍तराला नकार दिला. तक्रारकर्त्‍याने दि.08.01.2011 रोजी विरुध्‍द पक्षांना स्‍मरणपत्र पाठविले आणि चांगल्‍या स्थितीतील दोन नवीन टायर्स मोफत पाठविण्‍यांस व जुने सदोष टायर परत घेण्‍यांस सांगितले. सदर टायर्स आणि अलॉयव्‍हीलमधील दोष उत्‍पादन दोष नसुन खराब रस्‍त्‍यांमुळे दोष उत्‍पन्‍न झाल्‍याचे विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याला दि.10.01.2011 रोजीच्‍या पत्रान्‍वये कळविले आणि नवीन टायर व अलॉयव्‍हीलकरीता रक्‍कम रु.71,881/- द्यावे लागेल असे कळविले. तसेच तक्रारकर्त्‍याला सदरची कार विरुध्‍द पक्षांचे सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये स्‍वतःच्‍या खर्चाने मुंबई किंवा इंदोर येथे न्‍यावे लागेल असेही विरुध्‍द पक्षांनी सुचित केले. यानंरत तक्रारकर्त्‍याने सदर कार घेऊन जाण्‍यांस तयार झाला परंतु, कार घेऊन जाण्‍याचा खर्च व इतर खर्च अंदाजे रु.40,000/- विरुध्‍द पक्षांनी नाकारला.

 

4.          तक्रारकर्त्‍याने दि.20.01.2011 रोजी वकीलामार्फत विरुध्‍द पक्षांना नोटीस बजावली परंतु त्‍यांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही. यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.09.03.2011 रोजी पाठविलेले स्‍मरणपत्र विरुध्‍द पक्षांना दि.15.03.2011 रोजी प्राप्‍त झाले. विरुध्‍द पक्षांनी दि.30.04.2011 रोजी वकीलामार्फत नोटीसचे उत्‍तर पाठवुन तक्रारकर्त्‍याच्‍या मागण्‍या नाकारल्‍या. करीता सदर कारचे दोन्‍ही टायर्स आणि अलॉयव्‍हील मोफत नव्‍याने मिळावे किंवा त्‍याचा खर्च रु.71,881/- व्‍याजासह द्यावा तसेच इतर मागण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

 

5.          मंचाने जारी केलेल्‍या नोटीसची बजावणी झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्रकरणात हजर होऊन लेखी उत्‍तर दाखल केले. तक्रारकर्ता आणि विरुध्‍द पक्षांच्‍या दरम्‍यान झालेल्‍या करारातील अटी व शर्तींनुसार सदर व्‍यवहात उत्‍पन्‍न झालेला वाद अथवा तक्रार मुंबई येथील न्‍यायालयाचे अधिकार क्षेत्राचे अधीन राहतील असे उभय पक्षाने स्‍पष्‍टपणे मान्‍य केले असल्‍याने मंचाला अधिकारक्षेत्र नसल्‍याचा प्राथमिक आक्षेप विरुध्‍द पक्षाने उपस्थित केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून बी.एम.डब्‍ल्‍यू. कार विकत घेतल्‍याचे त्‍यांनी मान्‍य केले. त्‍यांचे कथनानुसार सदर कार पूर्ण कार्यरत स्थितीमध्‍ये तक्रारकर्त्‍याला दि.18.05.2010 रोजी सुपूर्द करण्‍यांत आली होती. त्‍यांनी पुढे कथन केले आहे की, सदर कारच्‍या टायरमधे समस्‍या असल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याचे पत्र मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांनी त्‍वरीत त्‍यांचे प्रतिनिधीस सदर समस्‍येची तपासणी करण्‍याकरता पाठविले. सदर कार निष्काळजीपणे चालविण्‍यांत आली असल्‍याचे आणि बाहेरील आघातामुळे सदरहू टायरमधे फुगा तयार झाल्‍याचे प्रतिनिधीस आढळून आले. यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी त्‍वरीत तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधला आणि बाह्य आघातामुळे सदर टायरमधे खुंट तयार झाल्‍याबाबत कळविले, तसेच खर्च घेऊन सदर टायर बदली करण्‍यांत येईल असेही कळविले. आणि सोबतच आवश्‍यक दुरुस्‍ती अंदाजपत्रक (Estimate)  देखिल पाठविले. विरुध्‍द पक्षांच्‍या कथनानुसार उत्‍पादनातील दोषाबाबत तक्रार करण्‍यापूर्वी जवळपास सात महिने तक्रारकर्त्‍याने सदर कारचा पूर्णपणे वापर केला व सदर कार 3500 कि.मी. पर्यंत चालविली. विरुध्‍द पक्षांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याचे दि.09.02.2010 रोजीची तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 मार्फत श्री. प्रशांत जाधव नामक त्‍यांचे प्रतिनिधीस दि.16.12.2010 रोजी स्‍थळ तपासणी आणि अहवाल तयार करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याकडे पाठविले, सदर प्रतिनिधीने तक्रारकर्त्‍याच्‍या चालकाच्‍या उपस्थितीत छायाचित्रे काढली. तक्रारकर्त्‍याने उत्‍पादनासंबंधाने केलेले आरोप बरोबर नसुन रस्‍त्‍यावरील जोखीम आणि बाहेरील आघातामुळे सदरहू टायरची फुगा निघाल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला कळविण्‍यांत आले. तसेच वारंटीच्‍या कक्षेत मोडत नसल्‍यामुळे शुल्‍क आकारुन टायर बदली करण्‍यांस तयार असल्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने नमुद केले आहे.

 

6.          टायरमध्‍ये उत्‍पादनातील दोष असता तर तक्रारकर्त्‍याला 7 महिने कार चालवणे शक्‍य झाले नसते, असे नमुद करुन व उत्‍पादनातील दोष तसेच सेवेतील कमतरता नाकारुन विरुध्‍द पक्षांनी तक्रार खारिज करण्‍याची विनंती केली आहे.

 

7.          तक्रारीतील कथनाचे पृष्‍ठयर्थ तक्रारकर्त्‍याने प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तिवाद दाखल केला, परंतु वारंवार संधी देऊनही विरुध्‍द पक्षांनी प्रकरणात हजर होऊन युक्तिवाद सादर केला नाही. करीता प्रकरण आदेशाकरीता बंद करण्‍यांत आले होते. मात्र दरम्‍यानचे कालावधीत मा. अध्‍यक्षांचे जागी नविन अध्‍यक्ष रुजू झाल्‍यामुळे सदर प्रकरणी उभय पक्षांना पुर्नयुक्तिवादाकरीता नोटीस पाठविण्‍यांत आली. सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍यातर्फे त्‍यांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असून विरुध्‍द पक्षांना संधी देऊनही ते हजर झाले नाही व त्‍यांनी युक्तिवाद केला नाही.

 

8.          तक्रारकर्त्‍याचा लेखी युक्तिवाद वाचला, त्‍यांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकला, अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. प्रस्‍तुत प्रकरणी मंचाच्‍या निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालिल प्रमाणे नोंदविले आहेत.

           

                  मुद्दे                                निष्‍कर्ष

 

  1. प्रस्‍तुत तक्रारीची दखल घेण्‍याचे अधिकारक्षेत्र

   या मंचाला आहे काय ?                             नाही.

  1. विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारा निर्मीत सदर कारमधे

   उत्‍पादनाचे दोष असल्‍याचे सिध्‍द होते काय  ?            नाही.

3. आदेश ?                                      तक्रार खारिज.

 

  • // कारणमिमांसा // -

 

9.          मुद्दा क्र. 1 बाबतः- तक्रारकर्ता आणि विरुध्‍द पक्षाचे दरम्‍यान झालेल्‍या विक्री करारनाम्‍याची प्रत विरुध्‍द पक्षांच्‍या लेखी उत्‍तरासोबत पृष्‍ठ क्र.70 अन्‍वये दाखल केली आहे. सदर करारनाम्‍यावर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले प्रतिज्ञालेखात सदरचा करारनामा व त्‍यावरील स्‍वाक्षरी नाकारले नाही. सदर करारनाम्‍यातील अट क्र.7 खालिल प्रमाणे आहे...

      Jurisdiction: Subject to clause 6 above no other court except at Mumbai shall have jurisdiction in any proceedings arising out or of relating to this contract.

                       

                        सदर करारनाम्‍यातून निर्माण होणा-या कोणत्‍याही कारवाईमधे मुंबई व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही न्‍यायालयाला अधिकारक्षेत्र असणार नाही अशी अट करारनाम्‍यात नमुद असली तरीही केवळ त्‍यामुळेच मंचाचे अधिकारक्षेत्र बाद होत नाही, हे खरे असले तरी तक्रारीचे कारण कुठे उद्भवले हे पाहणे महत्‍वाचे ठरते. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे कार्यालय मुंबई येथे असुन विरुध्‍द पक्ष क्र.2 चे कार्यालय हरियाणा येथे आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे शाखा कार्यालय नागपूर येथे कार्यरत असल्‍याचे तक्रारकर्त्‍याने लेखी युक्तिवादात नमुद केले असले तरीही सदर शाखा कार्यालयास प्रस्‍तुत प्रकरणात पक्षकार केलेले नाही. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी हरियाणा येथे उत्‍पादित केलेली कार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून मुंबर्इ येथे घेतली आहे. सदर कार दुरुस्‍तीकरीता मुंबई किंवा इंदोर येथील विरुध्‍द पक्षांचे सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये न्‍यावयाची होती. नागपूर येथे टायर बदली करणे शक्‍य नव्‍हते, असे विरुध्‍द पक्षांनी लेखी उत्‍तरात नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याला सदर वाहन चालवित मुंबई येथे येणे शक्‍य व्‍हावे म्‍हणून म्‍हणून विरुध्‍द पक्षाने त्‍यांचेकडील सुटे टायर्स तक्रारकर्त्‍याला पाठविले. परंतु तक्रारकर्त्‍याने सदर टायर स्विकारण्‍यांस नकार दिला, अशाप्रकारे प्रस्‍तुत प्रकरणी वादाचे कारण नागपूर येथे निर्माण झालेले  नाही त्‍यामुळे मंचाला अधिकारक्षेत्र नाही असे मंचाचे मत आहे. प्रस्‍तुत प्रकरणी मंचाला अधिकारक्षेत्र असल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने मा. राज्‍य ग्राहक आयोग, केरळ यांचा “ A.M. Dinesh Kumar –v/s- Hindusthan Motor & Others”,  या प्रकरणात दिलेल्‍या निकालाचा हवाला दिला आहे. सदर प्रकरणातील कारची नोंदणी कोझीकोड शाखेमधे करण्‍यांत आली होती. तसेच नोंदणी केलेली कार तक्रारकर्त्‍याला कोझीकोड येथे देण्‍यांत आली होती. करीता सदर प्रकरणी तक्रारीचे कारण अंशतः कोझीकोड येथे निर्माण झाले असल्‍याने राज्‍य आयोगास कार्यक्षेत्र असल्‍याचे मत मा. राष्‍ट्रीय आयोगाने व्‍यक्‍त केले आहे. परंतु प्रस्‍तुत प्रकरणी मात्र तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची नोंदणी मुंबई येथे केली असुन त्‍याला वाहन मुंबई येथेच सुपूर्द केल्‍याबाबत कोणताही वाद नाही. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने हवाला दिलेल्‍या प्रकरणातील आणि प्रस्‍तुत प्रकरणातील तथ्‍ये व परिस्थिती भिन्‍न असल्‍याने सदरचा निकाल प्रस्‍तुत प्रकरणात लागू होत नाही, असे मंचाचे मत आहे.

 

10.         उपरोक्‍त नमुद परिस्थितीत मंचाला कार्यक्षेत्र नसुन तक्रार केवळ याच मुद्यावर खारिज होण्‍यांस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.

 

11.         मुद्दा क्र. 2 व 3 बाबतः- माहे मे-2010 मधे वाहन खरेदी केल्‍यानंतर माहे डिसेंबर-2010 मधे सदर वाहनाचे टायरमधे दोष असल्‍याचे तक्रारकर्त्‍याला आढळून आले. सदर टायर विरुध्‍द पक्षांकडून मोफत बदलवुन मिळावे अथवा त्‍याची किंमत मिळावी अशी मागणी तक्रारकर्त्‍याने केली आहे. बाहेरील आघातामुळे व वाहन काळजीपूर्वक चालविण्‍यांत न आल्‍याने टायरमधे फुगा निघाल्‍याचे आणि वारंटीच्‍या कक्षेत तक्रारकर्त्‍याची मागणी मोडत नसल्‍याचे विरुध्‍द पक्षाने नमुद केले आहे. वारंटी कार्डाची प्रत विरुध्‍द पक्षाने पृष्‍ठ क्र.72 अन्‍वये अभिलेखावर दाखल केली आहे. त्‍यामधे खालिल अटी नमुद आहेत...

            IMPORTANT  NOTICE:

            It is the user’s responsibility to operate the vehicle in a careful manner on all types of road surface. BMW warranty does not cover user induced damages such as damaged tyres (punctures, cuts, carcass damage and bulges), bent wheel rims and bent suspension components. For such repairs the BMW  Dealer shall provide the user with a retail cost estimate.

             सदर वाहनात उत्‍पादनाचे दोष असल्‍याचा आरोप तक्रारकर्त्‍याने केला असता तरी त्‍याचे पृष्‍ठयर्थ ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 13(1)(ब) नुसार कोणताही तज्ञ अह‍वाल अभिलेखावर दाखल केला नाही. प्राप्‍त परिस्थितीत सदर वाहनाच्‍या टायरमधे उत्‍पादनाचे दोष तसेच विरुध्‍द पक्षांचे सेवेतील कमतरता सिध्‍द होत नाही, असे मंचाचे मत आहे. परिणामी तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करणे न्‍यायोचित ठरते, करीता आदेश पुढील प्रमाणे...

 

- // आदेश //-

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करण्‍यांत येते.

2)    उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.

3)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

4)    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.