Maharashtra

Sangli

cc/09/1990

Mr. Birappa Satyappa Mali - Complainant(s)

Versus

Indusland Bank Ltd. Branch Kolhapur - Opp.Party(s)

M.A. Magdum

18 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. cc/09/1990
 
1. Mr. Birappa Satyappa Mali
Udgaon Ves, Patil Galli, Miraj
...........Complainant(s)
Versus
1. Indusland Bank Ltd. Branch Kolhapur
Vasantprabha Chambers, 1125, Opp.Parekh Bridge, Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  K.D. Kubal MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                         नि.22


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

मा.सदस्‍य - श्री के.डी.कुबल


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1990/2009


 

तक्रार नोंद तारीख   : 20/07/2009


 

तक्रार दाखल तारीख  :  28/07/2009


 

निकाल तारीख         :  18/04/2013


 

----------------------------------------------


 

 


 

श्री बिराप्‍पा सत्‍याप्‍पा माळी


 

वय 40 वर्षे, धंदा – ट्रक व्‍यवसाय


 

रा.उदगांव वेस, पाटील गल्‍ली, मिरज                   ....... तक्रारदार


 

 


 

विरुध्‍द


 

 


 

1. दी मॅनेजर


 

   इंडसलॅंड बँक लि. शाखा कोल्‍हापूर


 

   वसंतप्रभा चेंबर्स, 1125,


 

   इ सेकेस एक्‍स्‍टेंशन एरिया,


 

   पारेख ब्रिजसमोर, एस.टी.स्‍टँडजवळ,


 

   कोल्‍हापूर 416 001


 

2. श्री महादेव धोंडी पवार


 

   रा.उंटवाडी, ता.जत. जि.सांगली                      ...... जाबदार


 

 


 

                                    तक्रारदार तर्फे : अॅड एम.ए.मगदूम


 

                              जाबदारतर्फे  :  अॅड बी.एस.पाटील


 

 


 

 


 

 


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  


 

 


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्‍वये तक्रारदाराने, जाबदार बँकेने दिलेल्‍या कथित सदोष सेवेबद्दल नुकसान भरपाई मागण्‍याकरिता दाखल केलेली आहे.



 

2.  थोडक्‍यात हकीकत अशी की, जाबदार क्र.1 बँकेने जाबदार क्र.2 यास ट्रक खरेदी करण्‍याकरिता कर्ज दिले होते. त्‍या कर्जाच्‍या सहाय्याने जाबदार क्र.2 यांनी एमए 010-झेड 1203 या नंबरचा ट्रक विकत घेतला. तथापि त्‍यास कर्ज परतफेड करणे शक्‍य न झाल्‍याने ते कर्ज थकीत झाले. त्‍या कर्जाचे वसूलीकरिता जाबदार क्र.1 बँकेने तो ट्रक जप्‍त केला व त्‍याचा लिलाव केला. त्‍या लिलावात तक्रारदाराने तो ट्रक रु.4,25,250/- या रकमेस विकत घेतला व सदरची रक्‍कम तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेत भरली. त्‍यावेळेस बँकेने तक्रारदाराचे नावे खरेदीपत्र करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले. तथापि, जाबदार क्र.1 बँकेने कोणतेही प्रयत्‍न केले नाहीत. दि.12/2/2009 रोजीच्‍या नोटीशीने कळवून देखील जाबदार क्र.1 बँकेने काही हालचाल केली नाही म्‍हणून सरतेशेवटी नाईलाजाने तक्रारदाराने मूळ ट्रक मालकास भेटून वाटाघाटी केल्‍या व आपल्‍या नावावर तो ट्रक ट्रान्‍स्‍फर करुन घेतला. दरम्‍यानचे काळात तो ट्रक तक्रारदारास वापरता आला नाही, भाडयाने लावून उत्‍पन्‍न कमविता आले नाही व तो ट्रक थांबवून ठेवावा लागला. ट्रक थांबवून ठेवल्‍यामुळे दि.3/11/08 ते दि.12/3/2009 पर्यंत तक्रारदाराचे दररोजचा कमीत कमी रु.500/- नुकसान झाले आहे व त्‍या रकमेवर व्‍याजदेखील चढलेले आहे. तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. त्‍यापोटी रक्‍कम रु.10,000/- तक्रारदारास जाबदार क्र.1 यांचेकडून येणे लागते. अशा कथनांवरुन तक्रारदाराने जाबदार बँकेकडून नुकसान व व्‍याजाची मागणी तसेच मानसिक त्रासापोटीची रक्‍कम वसूल करुन मिळावी अशी मागणी केली आहे.


 

 


 

3.    तक्रारीसोबत तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.3 ला दाखल करुन नि.4 सोबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.



 

4.    जाबदार बँकेने आपली लेखी कैफियत नि.8 ला दाखल करुन संपूर्ण तक्रार व त्‍यातील कथने व मागण्‍या स्‍पष्‍टपणे अमान्‍य केल्‍या आहेत. जाबदार क्र.1 बँकेचे स्‍पष्‍ट कथन असे आहे की, सदरच्‍या तक्रारीत नमूद केलेले वाहन तक्रारदार व्‍यापारी कारणाकरिता वापरीत असलेने व तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख तक्रारीत केला असल्‍याने प्रस्‍तुतचे तक्रारीस Commercial purposeचा बाध येतो. त्‍यामुळे तक्रार मंचापुढे चालू शकत नाही. तक्रारीत नमूद केलेले वाहन जाबदार क्र.1 बँकेने त्‍यांचे पूर्वीचे कर्जदाराचे थकीत कर्जाचे वसूलीकरिता जप्‍त केले होते व ते वाहन जाहीर लिलाव करुन विकण्‍यात आले होते. सदर लिलावात तक्रारदाराने सदरचे वाहन कोटेशन भरुन खरेदी केलेले आहे. लिलावाच्‍या वेळी ठरविण्‍यात आलेल्‍या सर्व अटी व नियम तक्रारदार यांचेवर बंधनकारक होत्‍या व आहेत. तक्रारदार या मंचाची दिशाभूल करुन काही आदेश घेऊ इच्छितात. लिलावातील अटी व व शर्तीनुसार विक्रीस काढलेले वाहन स्‍वतःचे नावे करुन घेण्‍याची जबाबदारी ही तक्रारदार यांचीच होती व तसे त्‍यांनी मान्‍यदेखील केलेले आहे. त्‍यामुळे सदरचे वाहन त्‍यांचे नावावर करुन दिले नाही म्‍हणून तक्रारदार जाबदार क्र.1 बँकेकडे कोणतीही भरपाईची रक्‍कम मागू शकत नाही. सदर वाहन तक्रारदार यांचे नावे ट्रान्‍स्‍फर करण्‍याबाबतची सर्व आवश्‍यक कागदपत्रे जाबदार क्र.1 बँकेने त्‍यांना वेळीच पूर्ण करुन दिलेली आहेत व त्‍या वाहनाचा ताबादेखील तक्रारदारास त्‍याचवेळी दिलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे कोणत्‍याही प्रकारचे नुकसान होण्‍याचा कोणताही प्रश्‍न उद्भवत नाही. कसेही असले तरी तक्रारदाराचे व्‍यवसायासंबंधी किंवा धंदयासंबंधी झालेल्‍या तथाकथित नुकसानीसाठी या मंचापुढे दाद मागता येणार नाही. सदरचे तक्रारीस Remoteness of Damagesया तत्‍वाचादेखील बाध येतो. अशा प्रकारच्‍या नुकसानीची रक्‍कम केवळ दिवाणी न्‍यायालयात मागता येते, ती मंचापुढे मागता येत नाही. सबब तक्रारदार हा जाबदार क्र.1 चा ग्राहक होऊ शकत नाही आणि म्‍हणून ही तक्रार चालणेस पात्र नाही तशी ती खर्चासह खारीत करावी. हे वादाचे मुद्दे उपस्थित करुन जाबदार क्र.1 ने तक्रारीतील सर्व कथने स्‍पष्‍टपणे अमान्‍य केलेली आहेत आणि तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केलेली आहे.



 

5.    जाबदार क्र.1 ने आपल्‍या लेखी कैफियतीसोबत शपथपत्र व नि.11 सोबत काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 


 

 


 

6.    जाबदार क्र.2 हे प्रस्‍तुत कामी हजर झालेले नाहीत.


 

 


 

7.    प्रस्‍तुत कामी आम्‍ही तक्रारदारांचे वकील व जाबदार क्र.1 चे वकील यांचा युक्तिवाद ऐकूण घेतला. दोन्‍ही वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद देखील मंचासमोर सादर केलेला आहे.



 

      सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षाकरिता उपस्थित होतात.



 

      मुद्दे                                                           उत्‍तरे


 

 


 

1. तक्रारदार हा जाबदार क्र.1 यांचा ग्राहक होतो काय ?                         नाही.


 

 


 

2. तक्रारदाराने उपस्थित केलेला वाद हा ग्राहक तक्रार होऊ शकतो काय ?          नाही


 

 


 

3. अंतिम आदेश                                                   खालीलप्रमाणे.


 

 


 

      आमच्‍या वरील निष्‍कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.



 

कारणे


 

 


 

8.  मुद्दा क्र.1 ते 3


 

 


 

      प्रस्‍तुत तक्रारीतील बाबींवरुन हे स्‍पष्‍ट होते की, जाबदार क्र.1 व तक्रारदार यांचेमध्‍ये केवळ बँकेने जप्‍त केलेल्‍या वाहनाच्‍या विक्रीचा व्‍यवहार झालेला आहे. बँकेस ग्राहक म्‍हणून अभिप्रेत असणारी सेवा ही तक्रारदारास बँकेने दिलेली नाही. तक्रारदार आणि जाबदार क्र.1 यांचेमधील व्‍यवहार हा केवळ खरेदी विक्रीचा व्‍यवहार आहे त्‍यामुळे ती ग्राहक सेवा होऊ शकत नाही. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने U.P. Chandigarh Administrative Vs. Amarjeet Sijgh & Ors. (2009 (3) CPR 1997) यान्‍यायनिर्णयातखालीलनिवाडा दिलाआहे.


 

Where there is a public auction without assuring any specific or particular amenities, and the prospective purchaser/lessee participates in the auction after having an opportunity of examining the site, the bid in the auction is made keeping in view the existing situation, position and condition of the site. If all amenities are available, he would offer a higher amount. If there are no amenities, or if the site suffers from any disadvantages, he would offer a lesser amount, or maynot participate in the auction. Once with open eyes, a person participates in an auction, he cannot thereafter be heard to say that he would not pay the balance of the price/premium or the stipulated interest on the delayed payment, or the ground rent, on the ground that the site suffers from certain disadvantages or on the ground that amenities are not provided. With reference to a public auction of existing sites (as contrasted from sites to be formed), the purchaser/lessee is not a consumer, the owner is not a ‘trader’ or ‘service provider’ and the grievance does not relate to any matter in regard which a complaint can be filed. Therefore, any grievance by the purchaser/lessee will not give rise to a complaint or consumer dispute and the fora under the Act will not have jurisdiction to entertain or decide any complaint by the auction purchaser/lessee against the owner holding the auction of sites. 


 

 


 

      मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे वरील दंडकानुसार तक्रारदाराने या प्रकरणात उपस्थित केलेला वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नाही आणि तक्रारदार हा ग्राहक होऊ शकत नाही. त्‍यामुळे वरील मुद्दा क्र.1 याचे उत्‍तर नकारार्थी द्यावे लागेल व तसे ते आम्‍ही दिले आहे.



 

9.    ज्‍याअर्थी तक्रारदार हा ग्राहक होऊ शकत नाही आणि त्‍याने निर्माण केलेला वाद हा ग्राहकवाद होऊ शकत नाही, त्‍याअर्थी त्‍यांना या मंचासमोर तक्रार दाखल करुन कोणतीही मागणी करता येणार नाही. त्‍यांचे जे काही कथित नुकसान झाले आहे त्‍या नुकसानीकरिता त्‍यांना वेगळा मंच किंवा यंत्रणा उपलब्‍ध आहे. सदरचा वाद हा ग्राहक तक्रार होत नसल्‍याने तक्रार खारिज करावी लागेल असे आम्‍ही जाहीर करतो आणि खालील आदेश पारीत करतो.


 

 


 

- आ दे श -


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार ही रक्‍कम खर्चासह नामंजूर करण्‍यात येत आहे, ती दफ्तरी दाखल करण्‍यात यावी.



 

2.     या तक्रारीचा खर्च रु.500/- तक्रारदाराने जाबदार क्र.1 यांना द्यावा.


 

 


 

 


 

सांगली


 

दि. 17/04/2013                        


 

 


 

            


 

         ( के.डी.कुबल )                                 ( ए.व्‍ही.देशपांडे )


 

            सदस्‍या                                                  अध्‍यक्ष           


 

 
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ K.D. Kubal]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.