Maharashtra

Nagpur

CC/448/2022

AKSHAY YOGESH PANDE - Complainant(s)

Versus

INDUSIND BANK, THROUGH ITS BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. JYOTI DONGRE

12 Jul 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/448/2022
( Date of Filing : 27 Jun 2022 )
 
1. AKSHAY YOGESH PANDE
R/O. BUTI CHAWL, SITABARDI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. INDUSIND BANK, THROUGH ITS BRANCH MANAGER
RAMDASPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. JYOTI DONGRE, Advocate for the Complainant 1
 ADV. GANESH P. SHINDE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 12 Jul 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याचा JND Export Company  या नावाने सिताबर्डी मेनरोड येथे व्‍यवसाय असून त्‍याचा विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या बॅंकेत खाते क्रं. 2572765622227 आहे. तक्रारकर्त्‍याला Champala Yuganda  येथून Human Hair ची मागणी प्राप्‍त झाली.  तक्रारकर्ता व खरेदीदार या दोघांमध्‍ये दि. 20.09.2021 ला  deal finalised होऊन व्‍यवहार रुपये 9,500/- USD Doller  मध्‍ये निश्‍चित झाले. त्‍याबाबतचे इन्‍व्‍हाईस खरेदीदाराला पाठविण्‍यात आले. त्‍यामुळे खरेदीदाराने रुपये 9,500/- USD Doller  चा धनादेश तक्रारकर्त्‍याला पाठविला व सदरचा धनादेश तक्रारकर्त्‍याने वटविण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे दि. 19.07.2021 ला जमा केला. सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात 54 दिवसानी जमा झाली.
  2.      तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने मागणी केलेली वस्‍तू खरेदीदाराला दि. 20.09.2021 ला पाठविली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या वडिलांकडून प्राप्‍त झालेली रक्‍कम रुपये 4,45,000/- दि. 30.03.2022 ला तक्रारकर्त्‍याने खात्‍यात जमा केली. दि. 25.04.2022 पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रुपये 3,46,444/- एवढी रक्‍कम शिल्‍लक होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही नोटीस/ पूर्व सूचना  न देता तक्रारकर्त्‍याचे खाते गोठविले. तेव्‍हा याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विचारणा केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे अनेक वेळा त्‍याचे गोठविलेले खाते पुन्‍हा सुरु करण्‍याकरिता विनंती करुन ही त्‍याचा उपयोग झाला नाही. दोन बॅंकेतील चुकि मुळे तक्रारकर्त्‍याचे खाते गोठविण्‍यात आले.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सिताबर्डी पोलिस स्‍टेशन येथे तक्रार नोंदविली, तरी देखील त्‍याचे गोठविलेले खाते सुरु करण्‍यात आले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे रुपये 5,00,000/- चे नुकसान झाले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याचे गोठविलेले खाते त्‍वरित सुरु करावे व तक्रारकर्त्‍याला रक्‍कम रुपये 3,46,444/- काढण्‍याची परवानगी देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.
  3.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्ता  अक्षय पांडे हा मेसर्स JND Export Company  चा मालक असून त्‍याचे विरुध्‍द पक्षाकडे चालू खाते क्रं. 2572765622227 आहे. तक्रारकर्त्‍याने विदेशी मुद्रा असलेला USD$ 9500/- इतक्‍या रक्‍कमेचा सिक्‍युरटी फस्‍ट बॅंक सिडनीचा  धनादेश विरुध्‍द पक्ष 2  बॅंकेत दि. 02.08.2021 ला जमा केला. सदर धनोदश विरुध्‍द पक्ष 2 यांनी वटविण्‍याकरिता दि. 07.08.2021 ला Fargo Bank Philadelphia US   ला सादर केला.  सदरच्‍या धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष 2 कडे असलेल्‍या बॅंक खात्‍यात दि. 03.09.2021 ला जमा करण्‍यात आली होती.  दि. 18.04.2022 ला  विरुध्‍द पक्ष बॅंकेला Well’s Fargo Bank  यांच्‍याकडून मॅसेज प्राप्‍त झाला की, विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या बॅंक खात्‍यात जमा रक्‍कम रुपये 7,40,500/- वर चिन्‍हांकिंत धारणाधिकार (marked Lien)  ठेवावा.  कोणताही फोरेन धनादेश बॅंकेत जमा करण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष बॅंक ग्राहकांकडून  Indemnity विनंती अर्जासह घेते.  सदर प्रकरणी विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याची Indemnity फॉर्मवर स्‍वाक्षरी घेतली आहे. विरुध्‍द पक्ष 2 ला Well’s Fargo Bank  यांच्‍याकडून दि. 27.04.2022 ला माहिती प्राप्‍त झाली की, धनादेश क्रं. 018367 हा बनावट (Counterfeit)  धनादेश आहे. तक्रारकर्त्‍याचे  IND Export Co.  या नावाने असलेल्‍या खात्‍यात रक्‍कम परत करण्‍याबाबत सूचविण्‍यात आले. यावरुन दिसून येते की, विरुध्‍द पक्ष बॅंकेला फसविले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची जबाबदारी आहे की, संपूर्ण रक्‍कम रुपये 7,40,500/- विरुध्‍द पक्षाला परत करावी.  तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार स्‍वतःची जबाबदारी टाळण्‍याकरिता दाखल केली आहे.
  4.  त.क.ने प्रथम धनादेश वि.प. कडे जमा केला व सदर धनादेश दि. 03.09.2021 ला वटविण्‍यात आला आणि त्‍यानंतर 8 महिन्‍यानी  Well’s Fargo Bank  च्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर धनादेश क्रं. 018367 हा बनावट असल्‍याचे सांगण्‍यात आले. याचा अर्थ एक तर बॅंकेने फसवणूक केली अथवा तक्रारकर्ता यापैकी कुणी तरी एकाने फसवणूक केली आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्ता माहिती लपवित आहे. सदर प्रकरण विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ई-मेल पाठ‍वून कळविले होते की, जर तक्रारकर्त्‍याला त्‍याचे खाते वापरावयाचे असल्‍यास त्‍याला धनादेशाबाबत स्‍पष्‍टीकरण द्यावे लागेल. तसेच त्‍याच्‍या खात्‍यात रुपये 7,40,500/- पैक्षा जास्‍त रक्‍कम असणे आवश्‍यक आहे.
  5.  विरुध्‍द पक्ष बॅंक आर.बी.आय.च्‍या रेग्‍युलेशन अंतर्गत स्‍थापित झाली आहे व विरुध्‍द पक्षाचा व्‍यवहार हा आर.बी.आय.च्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार चालतो. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने लावलेले आरोप चुकिचे आहे. विरुध्‍द पक्षाने कोणत्‍याही प्रकारे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही, त्‍यामुळे  वि.प. बॅंकेने त.क.च्‍या खात्‍यावरील शिल्‍ल्‍क रक्‍कमेवर लावलेला चिन्‍हांकिंत धारणाधिकार  हटवू शकत नाही, जो पर्यंत प्रश्‍न निकाली निघत नाही. वि.प. बॅंकेने पोलिस स्‍टेशनला तसेच संबंधित बॅंकेला चौकशी करण्‍याबाबत विनंती केली आहे. त्‍यामुळे त.क.ने दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.      
  6.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तावेजाचे व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय? नाही

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याचा JND Export Company  या नावाने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या बॅंकेत खाते क्रं. 2572765622227 आहे याबाबत उभय पक्षात वाद नसल्‍याने तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याला मेसर्स हबीब एन्‍टप्रायझेस Yuganda यांच्‍याकडून हयुमन हेअरचा पुरवठा करण्‍याचा  USD$ 9500/- एवढया किंमतीत ऑर्डर प्राप्‍त झाल्‍याचे तसेच मेसर्स हबीब इन्‍टरप्रायझेस यांच्‍याकडून धनादेश प्राप्‍त झाल्‍यानंतर सदरचा धनादेश वटविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या बॅंकेतील खाते क्रं. 2572765622227 मध्‍ये जमा केल्‍याचे नि.क्रं. 2(B&C) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विदेशी मुद्रा असलेला USD$ 9500/- इतक्‍या रक्‍कमेचा असलेला धनादेश सिक्‍युरटी फस्‍ट बॅंक सिडनीचा  धनोदश वि.प. 2 च्‍या बॅंकेत दि. 19.07.2021 ला जमा केला व सदर धनादेश वि.प. 2 बॅंकेने वटविण्‍याकरिता दि. 07.08.2021 ला Well’s Fargo Bank  यांच्‍याकडे सादर केला. सदरच्‍या धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष 2 च्‍या बॅंकेत असलेल्‍या खात्‍यात दि. 03.09.2021 ला जमा करण्‍यात आली असल्‍याचे नि.क्रं. 2 (F) वरुन दिसून येते. वि.प. 2 यांना Well’s Fargo Bank  यांच्‍याकडून तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आलेला धनादेश क्रं. 018367 दि. 06.01.2021 रुपये 9500/- USD$ बनावट  (Counterfeit)  असल्‍याबाबतचा मॅसेज प्राप्‍त झाल्‍याचे विरुध्‍द पक्षाने लेखी जबाबा सोबत दाखल ई-मेल (पत्र) वरुन दिसून येते. तसेच सध्‍याच्‍या प्रचलित दरानुसार खातेधारकाच्‍या खात्‍यातील रक्‍कमेवर धारणाधिकार (Lien)  ठेवण्‍याबाबत सूचित केल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कमेवर धारणाधिकार प्रकरणाचा तपास लागेपर्यंत ठेवला असल्‍याचे विरुध्‍द पक्षाने अभिलेखावर दाखल दस्‍तावेज तसेच पोलिस तक्रारीतील दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाने आर.बी.आय.च्‍या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करुन तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कमेवर धारणाधिकार ठेवला आहे यावरुन विरुध्‍द पक्षाने कोणत्‍याही प्रकारचा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नसल्‍याचे दिसून येते.      

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज .

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.