Maharashtra

Jalgaon

CC/08/770

Shashikant Bhaidas Shinde - Complainant(s)

Versus

Indus Ind Bank Ltd - Opp.Party(s)

Adv.pawar

13 Aug 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/770
 
1. Shashikant Bhaidas Shinde
At.Kawathi
Dhule
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Indus Ind Bank Ltd
Jalgaon
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                  तक्रार क्रमांक 770/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 31/07/2008
                  सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 29/08/2008.
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-  13/08/2009
 
 
 
 
 
      श्री.शशिकांत भाईदास शिंदे,
उ.व.सज्ञान, धंदाः व्‍यापार व शेती,
      रा.मु.पो.कावठी, पो.मेहरगांव,
ता.जि.धुळे.                                 ..........      तक्रारदार
      विरुध्‍द
1.     व्‍यवस्‍थापक,
इंडयुसनिड बँक लि., शाखा जळगांव,
49/50, फर्स्‍ट फलोअर, सुरेशदादा जैन कॉम्‍प्‍लेक्‍स,
अजंठा रोड, एम.आय.डी.सी., जळगांव.
2.    व्‍यवस्‍थापक,
101/102, ममता हाऊस, फर्स्‍ट फलोअर,
231, एस.व्‍ही.रोड, बांद्रा (वेस्‍ट)
मुंबई 400 050.                            .......    सामनेवाला.
        
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदार तर्फे श्री.राजेश ए.पवार वकील हजर
सामनेवाला क्र. 1 व 2 तर्फे श्री.आनंद शरद मुजूमदार वकील हजर.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         तक्रारदार हा शेती तसेच टॅक्‍सी चालविण्‍याचा व्‍यवसाय करतो तसेच त्‍यातुन आलेल्‍या उत्‍पन्‍नातुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो.   तक्रारदाराला उदरनिर्वाहासाठी स्‍वतःची गाडी आवश्‍यक असल्‍याने त्‍याने मारुती ओमनी हे वाहन घेण्‍याचे ठरविले.   त्‍यानंतर सामनेवाला क्र. 1 यांचे प्रतिनधीने तक्रारदाराला कर्जासंबंधी मोघम अटी सांगुन कागदपत्रांची पुर्तता करण्‍यास सांगीतले.  सामनेवाला क्र. 1 चे प्रतिनिधी कडे संपुर्ण कागदपत्रे देऊन डाऊन पेमेंट रु.58,204/- भरुन तक्रारदाराकडुन सामनेवाला क्र. 1 चे प्रतिनिधी ने बँकेच्‍या फॉर्मवर व इतर कागदपत्रांवर सहया घेऊन दि.28/12/2004 रोजी गाडीची डिलेव्‍हरी दिली असुन सदर मारुती ओमनी वाहनाचा रजिस्‍ट्रेशन नंबर एम.एच.18/एन 5533 असा आहे.   सामनेवाला क्रमांक 2 यांनी तक्रारदाराचे संपुर्ण कागदपत्रे सामनेवाला क्र. 1 कडे वर्ग करुन तक्रारदाराला एकुण रक्‍कम रु.1,74,000/- चे कर्ज अदा केले.   कर्जाचा मासिक हप्‍ता रु.5,978/- मात्र दि.8/1/2005 पासुन सुरु करण्‍यात आलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडुन कर्ज सुरक्षीतता म्‍हणुन 36 कोरे चेक्‍स तक्रारदाराकडुन घेतले आहेत तसेच तक्रारदाराचा संबंधीत कर्ज कॉन्‍ट्रॅक्‍ट नंबर एमजेऐऐ 20776 असा आहे.   तक्रारदाराचे कर्जाचे हप्‍ते सुरळीत चालु असतांना अचानक दि.8/10/2007 रोजी दुपारी 3.00 वाजता सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे प्रतिनिधी श्रीराम एजन्‍सी, धुळे यांनी सुमारे 10 ते 12 लोकांना घेऊन तक्रारदाराचे भावास अडवुन बळजबरीने कर्जाऊ वाहनाचा ताबा घेऊन वाहन घेऊन गेले.   सामनेवाला यांनी अनधिकृतपणे वाहन जप्‍त केल्‍याने तक्रारदारास उदरनिर्वाह करणे अशक्‍य झाले आहे.   त्‍यानंतर तक्रारदार हे कर्जाऊ वाहन सोडवणेसाठी सामनेवाला यांचे कार्यालयात गेले असता सामनेवाला यांनी अवाजवी हिशोब दाखवुन दि.11/9/2007 रोजी नोटीस पाठवुन रक्‍कम रु.28,766/- भरण्‍यास सांगीतले.   त्‍याप्रमाणे तक्रारदार रक्‍कम भरण्‍यास सामनेवाला यांचेकडे गेले असता सामनेवाला यांनी रक्‍कम रु.38,126/- थकबाकी असल्‍याचे सांगुन ते भरल्‍याशिवाय वाहन सोडणार नाही असे सांगुन तक्रारदारास दमबाजी केली.   सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या ताब्‍यातुन कर्जाऊ वाहनाचा ताबा बेकायदेशीरपणे घेऊन तक्रारदारास सदोष सेवा प्रदान केलेली आहे.   सबब तक्रारदार हे आजही रक्‍कम रु.28,766/- कायदेशीररित्‍या भरण्‍यास तयार असल्‍याने सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांनी बेकायदेशीररित्‍या जप्‍त केलेली मारुती ओमनी त्‍वरीत तक्रारदारास परत करण्‍याचे आदेश सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांना देण्‍यात यावेत. नुकसान भरपाईपोटी रु.25,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- इत्‍यादी रक्‍कमा द.सा.द.शे.24 टक्‍के व्‍याजासह मिळाव्‍यात अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. 
            2.    सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची  तक्रार नाकारली आहे.     तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन कर्ज घेऊन तक्रारदार व सामनेवाला यांचेत दि.29/12/2004 रोजी झालेल्‍या करारातील अटी व शर्तीप्रमाणे परतफेड केले नाही.   कर्जाची परतफेड नियमीतपणे करण्‍यासाठी सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.7/10/2007, दि.5/6/2007, दि.22/2/2007 व दि.6/12/2006 रोजी पत्रे पाठविली परंतु तक्रारदाराने तरीही कर्ज नियमीतपणे फेडले नाही.    त्‍यामुळे नाईलाजास्‍तव सामनेवाला यांनी दि.8/10/2007 रोजी तक्रारदारास पुर्व सुचना देऊन तक्रारदाराच्‍या भावाच्‍या ताब्‍यातून वाहन जप्‍त केले.    सामनेवाला यांनी वाहन जप्‍त केल्‍यानंतर दि.29/1/2008 रोजी तक्रारदारास पत्र पाठवुन कर्जाची उर्वरीत रक्‍कम भरुन गाडी सोडवुन घेऊन जाणेबाबत पत्रही पाठविले होते तथापी तरीही तक्रारदार कधीही सामनेवाला यांचे ऑफीसला आले नाहीत किंवा कधीही कर्ज रक्‍कम भरण्‍याची तयारी दाखविली नाही.   त्‍यानंतर सामनेवाला यांनी 6 महीने वाट पाहुन दि.15/2/2008 रोजी कायदेशीरपणे कोटेशन मागवुन सर्वात जास्‍त किंमत रक्‍कम रु.1,30,000/- या रक्‍कमेस वाहन विकले.    सदरची रक्‍कम सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या कर्ज खात्‍यात जमा करुन उर्वरीत रक्‍कम रु.61,114/- तक्रारदारास दि.15/3/2008 रोजीच्‍या एच.डी.एफ.सी.बँकेच्‍या चेक क्रमांक 503683 अन्‍वये पोस्‍टाने चेक पाठवुन परत केली.   त्‍यामुळे आता सामनेवाला व तक्रारदार यांचेत कोणत्‍याही प्रकारचे नाते राहीले नसल्‍याने तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (डी) नुसार ग्राहक नाही.    सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य होण्‍यास पात्र आहे.   तसेच तक्रारदार हा शेतीकाम करुन वाहनाचा वापर टॅक्‍सी म्‍हणुन करुन व्‍यावसायीक कारणासाठी वाहनाचा वापर केल्‍याने तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होऊ शकत नाही.    सबब सामनेवाला यास या तक्रारीत विनाकारण गोवलेप्रकरणी तक्रारदाराकडुन तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- मिळावे व तक्रारदाराची तक्रार नामंजुर करावी अशी विनंती सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांनी केली आहे.
            3.    तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे,  त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1)    सामनेवाला यांनी तक्रारदारास त्रृटीयुक्‍त सेवा दिली आहे
      अगर कसे ?                                      नाही.
2)    असल्‍यास आदेश ?                                 शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्या क्र.1
            4.    तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक 1 कडुन कर्ज घेऊन तसेच डाऊन पेमेंट पोटी रक्‍कम रु.58,204/- भरणा करुन मारुती ओमनी वाहन रजिस्‍ट्रेशन क्रमांक एम.एच.18/एन 5533 खरेदी घेतले ही बाब विवादीत नाही.    तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन हायर परचेस अग्रीमेंटव्‍दारा एकुण रक्‍कम रु.1,74,000/- चे कर्ज घेतले.   निर्वादीतपणे सामनेवाला यांनी हायर परचेस अग्रीमेंट नुसार तक्रारदाराकडुन कर्ज सुरक्षीतता म्‍हणुन 36 कोरे चेक्‍स घेतले व दोघात कर्ज कॉन्‍ट्रॅक्‍ट क्रमांक एमजेएए 20776 असा अस्‍तीत्‍वात आला.   तथापी सामनेवाला व तक्रारदार यांचेत दि.29/12/2004 रोजी झालेल्‍या करारात नमुद अटी व शर्ती नुसार तक्रारदाराने नियमीत कर्ज परतफेड न केल्‍याने सामनेवाला यांनी करारात नमुद अटी शर्ती नुसार कर्जाऊ वाहनाचा ताबा घेऊन योग्‍य ती कायदेशीर कारवाई केल्‍याचे प्रतिपादन केलेले आहे.    सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यासोबत दिनांक 17/10/2008 रोजी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास अनुक्रमे दि.29/1/2008, दि.7/10/2007, दि.5/6/2007, दि.22/2/2007 व दि.6/12/2006 रोजी पत्र वजा नोटीस पाठवुन थकीत हप्‍ते भरणा करण्‍याबाबत कळविलेले असल्‍याचे दिसुन येते.    तक्रारदाराला थकीत हप्‍ते भरणा करण्‍याचे कळवुनही त्‍याने ते सामनेवाला यांचेकडे भरणा न केल्‍याने सामनेवाला यांनी दि.8/10/2007 रोजी तक्रारदारास पुर्व सुचना देऊन सदरचे वाहन ताब्‍यात घेतल्‍याचे प्रतिपादन केलेले आहे.     सामनेवाला यांनी वाहन जप्‍त केल्‍यानंतर दि.29/1/2008 रोजी तक्रारदारास पत्र पाठवुन थकीत कर्ज हप्‍ते भरणा करण्‍याबाबत कळवुनही तक्रारदाराने कर्ज रक्‍कम भरण्‍याची तयारी दर्शविलेली नाही त्‍यामुळे सामनेवाला यांनी 6 महीने वाट पाहुन दि.15/2/2008 रोजी कायदेशीरपणे कोटेशन मागवुन सर्वात जास्‍त रक्‍कमेस वाहन विक्री केल्‍याचे प्रतिपादन केलेले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला यांनी दि.6/5/2009 रोजी दाखल केलेल्‍या Irrevocable Power of Attorney (for Vehicles ) चे अवलोकन केले असता त्‍यात नमुद कलम 3 व 4 खालीलप्रमाणेः
03. To take delivery & re-possession of the hypothecated vehicle in case of default as per terms of loan agreement and as and when deemed necessary by the COMPANY
04. To sell the said vehicle on my behalf and in my name to anyone for any price which he may negotiate on my behalf and to receive the consideration by sale of the aforesaid vehicle and to apply to the Regional Transport Authority or any other Competent Authority or Officer for the transfer of the said vehicle.  
 
      वर पॉवर आफ अटॉर्नीत नमुद कलमानुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्जाऊ वाहनाबाबत योग्‍य ती कारवाई केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.     सामनेवाला यांनी तक्रारदार व त्‍यांचेत झालेल्‍या हायर परचेस करारात नमुद अटी व शर्ती नुसार कर्जाऊ वाहनाबाबत योग्‍य ती कारवाई केल्‍याचे प्रतिपादन केलेले असुन सोबत वरीष्‍ठ न्‍यायालयांनी दिलेले निवाडे दाखल केलेले आहेत ते खालीलप्रमाणेः
1) III (2006) CPJ 250 (NC) मा.राष्‍ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली
यांनी सुशील कुमार देव // विरुध्‍द // बी.सी.एल.फायनान्‍सीयल सर्व्‍हीसेस लि. आणि इतर यात नमुद महत्‍वाचा मुद्या खालीलप्रमाणेः
Consumer Protection Act, 1986—Section 2(1) (g) Banking and Financial Services    Hire Purchase Agreement --- Instalment cheque dishonoured ---Vehicle repossessed by financier, disposed of on as is where is basis    No deficiency in service proved—No relief entitled. 
2) II (2007) CPJ 45 (SC) मा.सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया यांनी ओरिक्‍स ऍटो फायनान्‍स (इंडीया) लि. // विरुध्‍द // जगमंदेर सिंग आणि इतर यात नमुद महत्‍वाचा मुद्या खालीलप्रमाणेः
In which it is held that if agreement permits the financier to take possession of the financed vehicles, there is no legal impediment on such possession being taken. 
 
      तक्रारदार व सामनेवाला यांचेत झालेल्‍या हायर परचेस ऍग्रीमेंटचे अटी व शती प्रमाणे व उपरोक्‍त न्‍याय निवाडयाचे आधारे तक्रारदार हा थकबाकीदार झाल्‍याने त्‍याने नियमीत कर्ज हप्‍ते न भरल्‍याने सामनेवाला यांना तक्रारदाराची गाडी जप्‍त करण्‍याचा अधिकार आहे. 
      दुसरी बाब अशी की, तक्रारदाराने सदरील तक्रार दाखल करुन सदरील गाडीचा ताबा परत मागीतलेला आहे.   याबाबतीत मंचाचे लक्ष सामनेवाला यांनी दाखल केलेले खुलाशावरुन स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदाराची गाडी लिलावात विक्री करुन सदरील रक्‍कम तक्रारदाराच्‍या कर्ज खात्‍यात जमा केलेली आहे.   सबब तक्रारदार यांना त्‍यांची गाडी मागण्‍याचा अधिकार नाही.   सबब तक्रारदार यांना त्‍यांची गाडी परत मिळण्‍याची विनंती या मंचास विचारात घेता येणार नाही.  
      उपरोक्‍त दाखल केलेल्‍या कागदपत्रांचा कारणांचा व उपरोक्‍त वरीष्‍ठ न्‍यायालयांच्‍या निवाडयांचा विचार करता सदरील मंच या निष्‍कर्षाप्रत आले आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदाराची गाडी जप्‍त करुन व त्‍याची विक्री करुन आपल्‍या सेवेत कसुर केलेला नाही.   सबब मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्‍यात येतो.
      ( ब )       खर्चाबाबत आदेश नाही.
      ( क )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत
निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 13/08/2009
                  (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )        ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.