( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
आदेश
( पारित दिनांक : 16 नोव्हेबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्यांनी गैरअर्जदार बँकेचे, पारशिवनी जि.नागपूर येथील अधिकृत विक्रेता श्री मोहन बेलसरे यांच्या अॅटो टेक कडुन डाऊन पेमेंट रुपये 12,500/- देऊन दिनांक 28/12/2004 रोजी हिरो होडा पॅशन हे वाहन विकत घेतले. गैरअर्जदार क्रं.4 यांनी दिलेल्या आश्वासनानुसार रुपये 1292/- किंवा रुपये 1300/- चा हप्ता दरमहा गैरअर्जदाराकडे जमा करण्याचे ठरले. त्यानंतर दिनांक 10/12/2007 ला संपुर्ण हप्ते देऊन झाल्यानंतर तक्रारदाराने सदर वाहनाची एनओसी व आरसी बुकची मागणी केली असता, त्यांनी गैरअर्जदार क्रं.1 बँकेकडुन मिळतील असे सांगीतले. त्यानुसार तक्रारदार गैरअर्जदार बँकेकडे गेला असता त्याच्या कर्मचा-यांनी त्याला रुपये 6,000/- ची मागणी केली. तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदार क्रं.1 व 3 यांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकले नाही व त्यास सदर वाहनाचे NOC, RC बुक दिले नाही. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला व गाडीचा ट्रॅफिक नियमांमुळे उपयोग करता आला नाही. गैरअर्जदाराच्या पुणे चेन्नई मधील कार्यालयांनी सुध्दा तक्रारदारास उततर दिले नाही. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदाराचे कायदेशिर नोटीसला उत्तर दिले परंतु उत्तर अपुर्ण आहे व तक्रारदाराकडे रुपये 4908/- थकीत आहे असे म्हटले. परंतु तक्रारदाराचे मते त्यांचे कडे काही देणे नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या सदर वाहनाचे NOC व RC BOOKन दिल्यामुळे नाराज होऊन तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करुन ती द्वारे गैरअर्जदाराने तक्रारदारास त्यांचे वाहनाचे NOC व RC BOOK मिळावे. तसेच मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 50,000/- मिळावे अशी मागणी केली.
यात गैरअर्जदार क्रं.1 ते 4 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी आपल्या कथनात मान्य केले की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.4 ऑटो टेक, पारशिवनी यांचेकडुन हिरो होडा दुचाकी वाहन विकत घेतले व त्याकरिता गैरअर्जदार इंडयुसिंड बॅकेकडुन कर्ज घेतले. परंतु गैरअर्जदाराने तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेत. गैरअर्जदाराचे मते तक्रारदाराने गैरअर्जदाराला अदा केलेले धनादेश अनादरित झाल्यामुळे व मासीक हप्त्यांची परतफेड नियमीत न केल्यामुळे त्याच्याकडे रुपये 4098/-ची थकीत रक्कम निघते. त्यांनी त्या थकीत रक्कमेचा भरणा करावा व त्यांचे NOC व RC BOOKघेऊन जावे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे सेवेत कुठलीही कमतरता नाही व सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्रं.4 यांच्या कथनानुसार सदर वाहनाचा आर्थिक व्यवहार, तक्रारदार व गैरअर्जदार क्रं.1 व 3 च्या दरम्यान झाला होता. गैरअर्जदार क्रं.4 यांनी 4 ते 5 वेळा तक्रारदाराचे विनंतीवरुन गैरअर्जदार क्रं.1 चे हप्ते नागपूरला जाऊन भरले. वास्तविक ही जबाबदारी तक्रारदाराची होती. तेव्हा गैरअर्जदार क्रं.4 यांनी तक्रारदारास कुठलीही सेवेतील कमतरता दिली नाही.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 8 कागदपत्रे दाखल केलीत. उभयपक्षकारांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
प्रकरणातील उभय पक्षांनी सादर केलेले म्हणणे, प्रतिज्ञालेख व इतर दस्तऐवज यावरुन असे दिसते की, निर्वीवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.4 यांचेकडुन रुपये 12,500/- आगाऊ रक्कम (डाऊन पेमेंट) देऊन हिरो होंडा कंपनीची दुचाकी विकत घेतली होती व गैरअर्जदार क्रं.4 चे माध्यमातुन इंडयुसिंड बँकेकडुन अर्थसहाय्य घेतले होते.
गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदारास दिलेल्या दिनांक 22/10/2010 च्या नोटीसच्या उत्तरात(कागदपत्र क्रं.16 व 24)म्हटले आहे की, तक्रारदाराने रुपये 46,512/- या करारनाम्यातील रक्कमेपैकी रुपये 36,600/- अर्थसहाय्य आहे आणि रुपये 9912/- हे व्याज आहे. यापैकी तक्रारदाराने 1292/- चे 6 धनादेश प्रमाणे रुपये 7752/- भरलेत व 37,284/- वेळोवेळी रोख पैसे भरलेत म्हणजेच 1476/- उर्वरित शिल्लक आहे. यावर गैरअर्जदाराने 7 अनादरित झालेल्या धनादेशाचे रुपये 1776/- शुल्क लावलेत व उशीरा प्राप्त झालेल्या रक्कमेचे रुपये 1656/- अतिरिक्त शुल्क लावले. अशा त-हेरे गैरअर्जदाराचे मते तक्रारदारकडे रुपये 4908/- शिल्लक ( outstanding ) आहेत.
सदर तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी तक्रारदाराने सदर रक्कम गैरअर्जदार यांना अदा करण्यास तयार असल्याचे या मंचासमोर सांगीतले ते पाहता रुपये 4908/- तक्रारदार गैरअर्जदारास देण्यास जबाबदार आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
गैरअर्जदार क्रं.4 यांनी दिलेल्या सेवेत कमतरता दिसुन येत नाही. तसेच तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गैरअर्जदार क्रं.4 विरुध्द तक्रारदाराचा काही आक्षेपही दिसुन येत नाही. सबब आदेश.
// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 1 यांना रुपये 4908/- अदा करावे. सदर रक्कम प्राप्त होताच 8 दिवसांचे आत गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदारास वाहनाचे NOC व RC BOOKपरत करावे.
3. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.