(आदेश पारित व्दारा- श्री शेखर पी मूळे मा. अध्यक्ष)
- आदेश -
( पारित दिनांक – 10 सप्टेबर 2015 )
1.वरील दोन्ही तक्रारी विरुध्द पक्षा विरुध्द एकाच वस्तुस्थितीवर व एकाच मुद्दयावर असल्याकारणाने एकत्रित आदेशान्वये निकाली काढण्यात येत आहे.
2.दोन्ही तक्रारी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केल्या असुन त्याव्दारे तक्रारकर्त्याने त्यांचे कब्जात असलेल्या भुखंडाचे नोंदणीकृत खरेदी खत करुन द्यावे व त्यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
3.तक्रारीचे थोडक्यात मागणी अशी आहे की, विरुध्द पक्ष baइंद्रप्रस्थ रिअल इस्टेट डेव्हलपर्स, बिल्डर्स अॅण्ड कन्सल्टंन्ट या नावाने शेत जमिनीवर भुखंड पाडुन ते विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा मौजा – वागदरा , ता.हिंगणा, प.ह.नं.46, खसरा नं.113, मधील काही भुखंड विक्रीकरिता उपलब्द असल्याचे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याना सांगीतले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याना आश्वासन दिले की, कायदेशिर बाबींची पुर्तता करुन व भुखंड विकसित करुन त्यांना देण्यात येतील. त्याप्रमाणे तक्रारकर्ता प्रकाश रमेश माने यांने भुखंड क्रमांक 52 व 53 एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट व तक्रारकर्ता विजय रमेश माने याने भुखंड क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट प्रत्येकी 36,000/- रुपयामधे विकत घेण्याचा करार दिनांक 2/12/1998 ला केला. त्यादिवशी दोन्ही तक्रारकर्त्यांनी प्रत्येकी रुपये 5000/- बयाणा रक्कम विरुध्द पक्षाला दिली. त्याबाबत दोन्ही तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्षाने सौदा पावती लिहून दिली ज्यावर विरुध्दपक्ष व तक्रारकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत. उर्वरित रक्कम रुपये 31,000/- दिनांक 1/12/2001 पर्यत हप्त्याने देण्याचे ठरले होते. तसेच विरुध्द पक्षाने त्या जमिन अकृषक करुन मुलभूत सुविधेंसह तक्रारकर्त्यांना भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याचे आश्वासन दिले. तक्रारकर्ता प्रकाश माने यांनी दिनांक 20/12/2003 पर्यत विरुध्द पक्षाला 33,101/- व तक्रारकर्ता विजय रमेश माने यांनी रुपये 18,500/- इतकी रक्कम दिलेली आहे. त्याबाबत विरुध्द पक्षाने त्यांचे स्वाक्षरीसह रितसर पावत्या तक्रारकर्त्यांना दिल्या आहेत.
4.विरुध्द पक्षाने त्यानंतर करारातील अटी व शर्ती चे पालन केले नाही. तक्रारकर्त्यांनी त्याला उर्वरित रक्कम घेऊन भुखंडाचे नोंदणीकृत खरेदी खत करुन मागीतले होते. विरुध्द पक्षाने त्यावर काहीच कारवाई केली नाही. दिनांक 20/12/2003 पर्यत ती जमिन अकृषक झालेली नव्हती. परंतु विरुध्द पक्षाने नोव्हेंबर -2014 मधे तक्रारकत्यांना त्यांचे सदर भुखंडाचा ताबा दिला. तेव्हा पासून तक्रारकर्त्यांचे भुखंड त्यांच्या कब्जात आहे. विरुध्द पक्षाने आजही त्या भुखंडाचे नोंदणीकृत खरेदी खत करुन न दिल्याने तक्रारकर्त्यांनी या तक्रारीव्दारे वरील प्रमाणे मागणी केली आहे.
5.विरुध्द पक्षाला पक्षाला मंचामार्फत दोन्ही प्रकणात नोटीस काढण्यात आली होती. विरुध्द पक्षाने ती घेण्यास नोटीस नकार दिल्याने ती “ नॉट क्लेम ” या शे-यासह परत आली. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाला सकाळ या दैनिक वर्तमानपत्रात जाहिर नोटीस दिली परंतु ती त्यांनोटीसवर ही विरुध्द हजर झाले नाही. त्यामुळे दिनांक 1.7.2015 रोजी दोन्ही प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले.
6.दोन्ही तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारीत सौदा पावती प्रत दाखल केली आहे.तसेच त्यांनी दिलेल्या रक्कमेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांनी भुखंडाचे ठेव खाते पुस्तिका व ज्यामधे ज्या ज्या वेळी तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षाला रक्कम दिली त्याची नोंद त्यात करण्यात आलेली आहे. त्या खाते पुस्तिकेची प्रत अभिलेखावर दाखल आहे. तक्रारकर्त्याकडुन करण्यात आलेला युक्तीवाद एैकल्यानंतर व तक्रारीतदाखल कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर खालीलप्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो.
ज्या अर्थी विरुध्द पक्षाने दोन्ही तक्रारीत नोटीस मिळूनही ती स्विकारली नाही. त्यावरुन असे गृहीत धरण्यास काहीच हरकत नाही की त्यांचे विरुध्द केलेल्या तक्रारीला विरुध्द पक्षाचा काहीच आक्षेप नाही. त्याशिवाय तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सौदा पावती व रक्कम पावतीवरुन व करारनाम्यावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाकडुन भुखंड खरेदी करण्याचा करार केला. त्याबद्दल 50टक्के पेक्षा जास्त रक्कम विरुध्द पक्षाला दिली आहे. तसेच तक्रारकर्त्यांनी हे नमुद केले आहे की, ज्या भुखंडाचा त्यांनी करार केला होता त्याचा ताबा त्यांना
मिळालेला आहे. परंतु असे दिसुन येते की, विरुध्द पक्षाने जमिन अकृषक केलेली नसुन त्यांनी प्रस्तावित प्रन्यासचा नकाशा मंजूर करुन घेतलेला नाही ही विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रुटी आहे.
वरील कारणास्तव तक्रारकर्त्यांच्या दोन्ही तक्रारी मंजूर होण्यास पात्र आहे सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- अं ती म आ दे श -
1. तक्रारर्त्यांच्या वरील दोन्ही तक्रारी अंशतः मंजूर करण्यात येतात.
2. विरुध्द पक्षाने मौजा– वागदरा, ता.हिंगणा, प.ह.नं.46, खसरा नं.113, मधील तक्रारकर्ता प्रकाश रमेश माने यांना त्यांच्या ताब्यातील भुखंड क्रमांक 52 व 53 एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट व तक्रारकर्ता विजय रमेश माने यांना त्यांच्या ताब्यातील भुखंड क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्रफळ 2000 चौ.फुट भुखंडांचे अकृषक रुपांतरण करुन व नकाशा मंजूर करुन नोंदणीकृत खरेदी खत करुन द्यावे. तक्रारकर्त्यांनी त्यासाठी उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाला अदा करावी.
3. तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रुपये 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी प्रत्येकी रुपये 2,000/-असे एकुण रुपये 5,000/-(एकुण रुपये पाच हजार फक्त) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना अदा करावे.
4. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना निशुल्क पाठविण्यात याव्या.
6. आदेशाची प्रत तक्रार क्रं.30/2015 मधे ठेवावी.