Maharashtra

Akola

CC/15/289

Ms.Indian Coldrink through Mohammad Hafiz - Complainant(s)

Versus

Indo Uropiun Brivrij Ltd. - Opp.Party(s)

Sagar Deshmukh

23 Sep 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/289
 
1. Ms.Indian Coldrink through Mohammad Hafiz
Bhandpura chowk,Old City, Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Indo Uropiun Brivrij Ltd.
B 74/2, MIDC Valuj,Aurangabad
Aurangabad
Maharashtra
2. Jaibhole Agencies
Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Sep 2016
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :  23/09/2016 )

आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार

 

1.                ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर  करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .

 

           तक्रारकर्ता हा शितपेयाचा व्यवसाय स्वत:चे उदर निर्वाहासाठी करतो. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 19/5/2015 रोजी थम्सअप, माजा या बाटल्या विकत घेतल्या.  सदर थम्सअप वाटली पैकी एका बाटलीमध्ये त्याच्या ग्राहकाला विमल गुटख्याचा पाऊच आढळले,  त्यामुळे सदर ग्राहकाने ती बॉटल उघडण्यापुर्वीच तक्रारकर्त्याला परत केली व सदर ग्राहकाने तक्रारकर्त्याचा अपमाप केला.  त्यामुळे तक्रारकर्त्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला व समाजामध्ये त्याची प्रतीष्ठा मलीन झाली.  या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 शी संपर्क साधला व विरुध्दपक्ष क्र. 2 ने खात्री दिली की, तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यात येईल. तक्रारकर्त्याने दि. 6/8/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना कायदेशिर नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली.  परंतु विरुध्दपक्षांनी सदर नोटीसची दखल घेतली नाही.  तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक असल्यामुळे योग्य सेवा पुरविण्याची त्यांची जबाबदारी आहे.  पंरतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवा देण्यामध्ये न्युनता दर्शविली.  तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यास शारी‍रिक मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 5,00,000/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा. 

            सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून  जोडण्यात आले आहेत.

 

विरुध्दपक्ष 1 यांचा लेखीजवाब :-

2.     विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.  त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील आरोप नाकबुल केले  व प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या 2(ड) प्रमाणे ग्राहक या व्याख्येमध्ये बसत नाहीत, म्हणून तक्रार ही अधिकार क्षेत्राच्या अभावामुळे चालविली जावू शकत नाही.  दि. 7/1/2014 चे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नोंदणी प्रमाणपत्र पाहीले असता, तक्रारदार हे मे. इंडियन कोल्ड्रींक्स या नावाने एक उपहार गृह चालवतात आणि ते एक शितपेय किरकोळ विक्रेता आहेत.  तक्रारदार हे शितपेय बऱ्याच कमी दराने विकत घेतात व ग्राहकांना विकतांना नफा मिळवतात, त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986  च्या कलम 2 (ड) नुसार ग्राहक नाहीत.  विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पुढे असे नमुद केले की,  तक्रारदाराने एका शितपेय बाटलीच्या फोटो शिवाय कुठलाही अन्य पुरावा, जे बाटलीमध्ये काही बाह्य घटक असल्याचे दाखवतो, असा पुरावा प्रकरणात दाखल केला नाही.  विरुध्दपक्ष क्र. 1 हे दर्जा आणि स्वच्छता सांभाळण्यासाठी सर्वोत्तम साधनांचा वापर करतात आणि त्यामुळे एखाद्या शितपेय बाटलीमध्ये बाह्य घटक असणे आणि ती बाटली प्लॉन्ट मधुन बाहेर पडणे केवळ अश्यक्य आहे. तसेच ती बाटली प्रयोगशाळेतील तपासणीसाठी विरुध्दपक्षाकडे पाठविली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेमध्ये कुठलीली त्रुटी दर्शविली नाही.

विरुध्दपक्ष 2 यांचा लेखीजवाब :-

   विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.  त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील आरोप नाकबुल केले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र.2 हे विरुध्दपक्ष क्र.1 यांनी निर्मित केलेले शितपेयाचे उत्पादने ठोक विक्रेत्याला विकतो.  विरुध्दपक्ष क्र. 2 हा कसल्याही प्रकारे कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करीत नाही.  तसेच तक्रारकर्त्याकडे कोणत्याही प्रकारचा उपहार गृह किंवा शितपेय चालविण्याचा कोणताही परवाना नाही.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केली, या बाबत कोणताही पुरावा‍ दिला नाही.  तक्रारकर्त्याची जबाबदारी आहे की, ग्राहकांना माल देतांना तो माल पडताळुन बघण्याची जबाबदारी तक्रारकर्त्यावर आहे. तक्रारकर्त्याने जोडलेले कागदपत्रे हे शितपेय किंवा कोणत्याही पेय विक्री संबंधीत नाही.  सदर प्रमाणपत्र हे अन्न व औषधाची संबंधीत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे कोणतेही कसलेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.

3.   त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल  केले व विरुध्दपक्ष क्र.1 यांनी युक्तीवाद दाखल केला, तसेच तक्रारकर्त्याने तोंडी युक्तीवाद केला.

::: का णे    नि ष्क र्ष :::

4.      सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज,  विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा स्वतंत्र लेखी युक्तीवाद व तक्रारकर्त्याचा  तोंडी युक्तीवाद, या सर्वांचे अवलोकन करुन मंचाने खालील निष्कर्ष, कारणे देवून पारीत केला, तो येणे प्रमाणे.

     तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 19/5/2015 ला थम्सअप, माजा या बाटल्याचा माल विकत घेतला, ते दस्त मंचात दाखल केले आहे.  त्या थम्सअप बाटली पैकी एका बाटली मध्ये ग्राहकाला विमल गुटख्याचा पाऊच आढळला व ती बॉटल तक्रारकर्त्याला परत केली व तुम्ही डुप्लीकेट माल ठेवता म्हणून अवहेलना केली. त्यामुळे इतर ग्राहकांनी थम्सअप घेणे थांबविले,  नंतर या सर्व घटनेमुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याशी संपर्क साधला असता विरुध्दपक्ष क्र. 2 ने झालेले नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले.  परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 ने दिलेले आश्वासन पाळले नाही.  म्हणून तक्रारकर्त्याने दि. 6/8/2015 ला कायदेशिर नोटीस पाठविली व सदर प्रकरण मंचात दाखल केले.

     विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारीमधील मजकुराचा गुणवत्तेवर नोंद घेण्याआधी प्रतिवादी क्र. 1 हे माननीय मंचाच्या तक्रार चालविण्याच्या अधिकार क्षेत्रासंबधी प्राथमिक स्वरुपाचा आक्षेप घेवू इच्छित आहेत.  तक्रारदार हे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या 2(ड) प्रमाणे ग्राहक या व्याख्येमध्ये बसत नाहीत, म्हणून तक्रार ही अधिकार क्षेत्राच्या अभावामुळे चालविली जावू शकत नाही.  दि. 7/1/2014 चे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नोंदणी प्रमाणपत्र पाहीले असता, तक्रारदार हे मे. इंडियन कोल्ड्रींक्स या नावाने एक उपहार गृह चालवतात आणि ते एक शितपेय किरकोळ विक्रेता आहेत.  तक्रारदार हे शितपेय बऱ्याच कमी दराने विकत घेतात व ग्राहकांना विकतांना नफा मिळवतात, त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986  च्या कलम 2 (ड) नुसार ग्राहक नाहीत. तक्रारदाराने एका शितपेय बाटलीच्या फोटो शिवाय कसलाही अन्य पुरावा, जे बाटलीमध्ये काही बाह्य घटक असल्याचे दाखवतो, असा पुरावा रेकॉर्डवर आणला नाही.  प्रतिवादी क्र. 1 हे दर्जा आणि स्वच्छता सांभाळण्यासाठी सर्वोत्तम साधनांचा वापर करतात आणि त्यामुळे एखाद्या शितपेय बाटलीमध्ये बाह्य घटक असणे आणि ती बाटली प्लॉन्ट मधुन बाहेर पडणे केवळ अश्यक्य आहे.  तसेच ती बाटली प्रयोगशाळेतील तपासणीसाठी विरुध्दपक्षाकडे पाठविली नाही.  त्यामुळे पुरविलेल्या कसल्याही सेवेमधील त्रुटीचा प्रश्नच येत नाही.

       विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार  विरुध्दपक्ष क्र.1, तंतोतंत निर्मित केलेले शितपेयाचे उत्पादने ठोक विक्रेत्याला विकतो.  विरुध्दपक्ष क्र. 2 हा कसल्याही प्रकारे कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करीत नाही.  तसेच तक्रारकर्त्याकडे कोणत्याही प्रकारचा उपहार गृह किंवा शितपेय चालविण्याचा कोणताही परवाना नाही.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केली, या बाबत कोणताही पुरावा‍ दिला नाही.  तक्रारकर्त्याची जबाबदारी आहे की, ग्राहकांना माल देतांना तो माल पडताळुन बघण्याची जबाबदारी तक्रारकर्त्यावर आहे. तक्रारकर्त्याने जोडलेले कागदपत्रे हे शितपेय किंवा कोणत्याही पेय विक्री संबंधीत नाही.  सदर प्रमाणपत्र हे अन्न व औषधाची संबंधीत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे कोणतेही कसलेही नुकसान झालेले नाही.

     तक्रारकर्त्याचा लेखी व तोंडी युक्तीवाद,  विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी युक्तीवाद व विरुध्दपक्ष क्र. 2 चा लेखी जबाब या सर्वांचे अवलोकन करुन सदर मंचाने असा निष्कर्ष काढला आहे की,

       तकारकर्ता याने दि. 19/5/2015 ला विरुध्दपक्ष क्र.2 कडून थम्सअप माजा शितपेयाचा माल विकत घेतला.  विरुध्दपक्ष क्र. 1 हा सदर मालाची निर्मिती करतो आणि तक्रारकर्ता हा इंडियन कोल्ड्रींक्स शितपेय गृहातुन सदर बॉटलची विक्री करतो.  विरुध्दपक्ष क्र. 2 कडून कमी दरात खरेदी करतो आणि इंडियन कोल्डींक्स शितपेय गृहातुन विक्री करुन सदर बॉटलवर नफा मिळवतो.  विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आक्षेप घेतल्याप्रमाणे  तक्रारदार हा व्यवसाय करण्यासाठी व नफा मिळवण्यासाठी सदर बॉटलची खरेदी करतो.  त्यामुळे तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 (ड) नुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक होऊ शकत नाही.

ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 2(ड) खालील प्रमाणे आहे..

2 (d)

“Consumer” means any person who-

  1. Buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose;  

      तक्रारकर्ता यांनी थम्सअप बॉटलमध्ये विमल गुटख्याचे पाऊच असलेले बॉटलचे छायाचित्र मंचात दाखल केले आहे.  या व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा मंचात दाखल केला नाही.  विरुध्दपक्ष यांनी मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांचे न्याय निवाडे खालील प्रमाणे दाखल केले.

  1. I (2016)CPJ 165 (NC)
  2. II (2008)CPJ 210(NC)

     त्यातील तथ्ये सदरहू प्रकरणात लागु पडतात, म्हणून त्याचा विचार करण्यात आला आहे.  सबब तक्रारकर्त्याची तक्रार ही  खारीज करण्यात येत आहे.

     म्हणुन अंतीम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे.

::: अं ति म  दे   :::

  1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
  2. प्रकरणाच्या खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. सदर आदेशाच्या प्रति उभय पक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.
 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.