नि. ३५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३१६/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २६/११/२००८
तक्रार दाखल तारीख : ०३/१२/२००८
निकाल तारीख : १७/११/२०११
----------------------------------------------------------------
अमोल अशोकराव कळसकर
उ.व.३०, धंदा – शेती,
रा.क्रांतीसिंह नाना पाटील नगर,
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. कार्यकारी संचालक,
इंडो अमेरिकन हायब्रीड सिड्स (इंडिया) प्रा.लि.
७ केएम, बनाशंकरी केनगेरी लिंक रोड,
चन्ना सुंदरा व्हिलेज, सुबरमन्यापुरा,
पोस्ट उत्तराहळ्ळी, हुबळी बेंगलोर ५६००६१
२. श्री हेमंत वसंत सुर्यवंशी,
प्रोप्रा. राज +ìग्रो एजन्सीज, मार्केट यार्ड,
इस्लामपूर, ता.वाळवा जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.ए.एस.मोहिते
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷.श्री.आर.ए.पाटील
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज बियाणामधील दोषाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे इस्लामपूर येथील गट नं.९२७/१अ या जमीनीत भात पिक घेण्यासाठी जाबदार क्र.२ यांचेकडून जाबदार क्र.१ यांनी उत्पादित केलेले बियाणे खरेदी केले. सदर बियाणाची तक्रारदार यांनी त्यांच्या जमीनीत पेरणी केली असता बियाणाची उगवण व्यवस्थित झाली नाही. सदरची बाब तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारदार यांनी जिल्हा परिषद सांगली यांचेकडील कृषी तज्ञांना दि.२१/६/२००८ रोजी लेखी कळविले. जिल्हा परिषद सांगली यांनी जाबदार क्र.२ सोबत तक्रारदार यांच्या क्षेत्राची दि.२/७/२००८ रोजी पाहणी केली असता सदरच्या बियाणामध्ये दोष असल्यामुळे केवळ १० टक्के उगवण झाली असल्याचा पंचनामा केला. तसेच जाबदार क्र.१ यांचे प्रतिनिधी दत्तात्रय मगर यांनी देखील पाहणी करुन सविस्तर तपशील जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. बियाणामधील दोषांमुळे उगवण न झाल्यामुळे उत्पन्न होणार नाही ही बाब लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडून नुकसान भरपाई मागितली. परंतु जाबदार यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने १३ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवूनही आपले म्हणणे दाखल न केल्यामुळे त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला होता तथापि सदरचा आदेश रद्द करुन घेवून जाबदार क्र.१ यांनी नि.२६ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी दि.२७/६/०८ रोजी शेतक-याचे मनोगत या स्वरुपात लेखी लिहून देतेवेळी वादातील बियाणांची उगवण १० टक्के कमी प्रमाणात झालेली असल्याचे व खरेदी केलेल्या बियाणापैकी दीड किलो बियाणे बहिणीस पेरण्यास दिले असल्याचे लिहून दिले आहे. बियाणाची उगवण ही जमीनीची प्रत, हवामान, पाऊस, लागवड या बाबींवर अवलंबून असते. या गोष्टींमध्ये थोडा जरी बदल झाल्यास बियाणाची उगवण व उत्पादन कमी येते. अशा गोष्टींना बियाणे कंपनी जबाबदार नसते. तक्रारदार यांनी दाखल केलेला सातबारा पाहता तो त्यांचे मालकीचा आहे किंवा कसे व त्यामध्ये बियाणे पेरले किंवा कसे ही बाब दिसून येत नाही त्यामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाई मागता येणार नाही. कृषी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी दि.२/७/२००८ रोजी चुकीचा पंचनामा केला आहे. वादातील बियाणाबाबत जाबदार क्र.१ यांचेकडे सांयटिफिक रिपोर्ट आहे. त्यामध्ये कोणताही दोष नाही. तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ १ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.३२ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.३४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. जाबदार यांचे विधिज्ञ युक्तिवादाचे वेळी उपस्थित नव्हते. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.२ यांचेकडून दि.७/६/०८ रोजी बियाणे खरेदी केले असे नमूद केले आहे. सदर बियाणाची पावती तक्रारदार यांनी नि.५/२ वर दाखल केली आहे. सदर पावतीवर तक्रारदार यांचे नाव व बियाणाचा तपशील हा वेगवेगळया शाईमध्ये लिहिलेला आहे व हस्ताक्षरामध्येही फरक दिसून येतो. सदर पावतीवर कोणतीही तारीख नाही. विक्रेत्याची सही नाही. बियाणाची किंमत दर ६००/- दर्शविला असताना ६००/- रक्कम खोडून ती ५०० केली आहे व ४०० रु. जमा दर्शवून रु.१०० येणे बाकी दर्शविली आहे. ही खाडाखोड कोणी केली ? का केली ? याबाबत कोणताही ऊहापोह तक्रारदार यांनी तक्रारअर्जात केलेला नाही. सदर बियाणे वापरल्याबाबतचे बियाणाचे रिकामे पाकीट तक्रारदार यांनी नि.५/४ वर दाखल केले आहे. सदर पाकीटवर रोशनी इंडॉम ९८५५ असे नमूद आहे. तर वर नमूद केलेल्या पावतीवर मात्र इंडो अमेरिका ९५८८ भात असे नमूद आहे. त्यामुळे पावतीवर व प्रत्यक्ष पाकीटावर असलेल्या बियाणाच्या वर्णनामध्ये व किंमतीमध्ये तफावत आढळून येते. पावतीवर असलेल्या लॉट नंबरमध्येही व प्रत्यक्षात असलेल्या पाकीटावरील लॉट नंबरमध्येही फरक आढळून येतो, त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडून खरेदी केलेल्या बियाणाबाबत साशंकता निर्माण होते. तक्रारदार यांनी याकामी नि.५/१ वर सर्व्हे नं.९२७/१अ चा सातबारा उतारा दाखल केला आहे. सदर सातबारावर तक्रारदार यांचे नाव दिसून येत नाही. सदर सातबारा हा कोणाचे नावे आहे हे तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये नमूद केले नाही. सदरचे क्षेत्र हे त्यांचे वडिलार्जित मालकीचे आहे असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. सदर सातबारावर अशोक विठ्ठल कळसकर यांची एकत्रात ५ आणे ४ पै इतक्या क्षेत्रास नोंद आहे. सदर अशोक कळसकर यांच्या बरोबरच एकूण १६ लोकांची सातबाराला ५ आणे ४ पै क्षेत्रास नोंद आहे. सदर सातबाराचे एकूण क्षेत्रफळ हे २ हेक्टर ३६ आर आहे. त्यातील तिस-या हिश्श्यास म्हणजे साधारणत: ७९ आर क्षेत्रास एकूण १६ जणांची नोंद आहे त्यामुळे तक्रारदार यांचे क्षेत्र ३० गुंठे कसे याबाबतही कोणताही खुलासा होत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या मालकी वहिवाटीमध्ये असलेल्या ३० आर क्षेत्रामध्ये भाताच्या बियाणाची लागवड केली होती ही बाब मंचासमोर येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १७/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११