निकालपत्र :- (दि.17.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील सामनेवाला क्र.1 ही पतसंस्था असून सामनेवाला क्र.2 हे सदर पतसंस्थेचे चेअरमन असून सामनेवाला क्र.2 ते 14 हे संचालक आहेत व सामनेवाला क्र.15 हे सेक्रेटरी आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे: अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | तक्रार दाखल तारखेपर्यन्त देय रक्कम | 1. | 2112 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 18300/- | 2. | 2120 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 18300/- | 3. | 2065 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2004 | 37325/- | 4. | 44 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 23510/- | 5. | 2124 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 18300/- | 6. | 2119 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2004 | 18300/- | 7. | 2066 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2004 | 37325/- | 8. | 45 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 23510/- | 9. | 2111 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 18300/- | 10. | 2117 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 18300/- | 11. | 48 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 23510/- | 12. | 2113 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2004 | 18300/- | 13. | 2116 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 18300/- | 14. | 47 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 23510/- | 15. | 2115 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 18300/- | 16. | 2118 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 18300/- | 17. | 2067 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2003 | 37325/- | 18. | 0046 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 23510/- | 19. | बचत खाते क्र.871 | 67320/- | -- | -- | 83477/- | 20. | बचत खाते क्र.913 | 138920/- | -- | -- | 172261/- | 21. | बचत खाते क्र.1562 | 43410/- | -- | -- | 53828/- |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सदर रक्कमांची वसुली होणेची असलेने रोजच्या रोज कारण घडत आहे, कारणे सदर तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही. तसेच, प्रस्तुत तक्रारीस या मंचाच्या स्थलसिमेत कारण घडले असलेने प्रसतुत अर्ज चालविणेस या मंचास क्षेत्रिय अधिकारिता आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.1 व 15 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलेप्रमाणे वेळोवेळी ठेवी ठेवलेल्या आहेत. सामनेवाला क्र.2 हे विद्यमान चेअरमन असून त्यांची निवड तक्रारदारांनी ठेवी ठेवल्यानंतर व मुदती संपल्यानंतर झालेली आहे. तसेच, सामनेवाला क्र.2 ते 14 पैकी सामनेवाला क्र.4, 6, 8, 10, 14 हेच फक्त विद्यमान संचालक आहेत. उर्वरित सामनेवाला हे संचालक असलेबाबतचा तक्रारदारांचे कथन खोटे आहे. वास्तविक, सर्व ठेवीदारांच्या मुदत बंद ठेवीच्या मुदती संपल्यानंतर सर्व ठेवीदारांना त्यांच्या मुदत बंद ठेवी व्याजासह परत देणेविषयी संस्थेने नोटीस बोर्ड, पोस्टाने व पेपर जाहिरात द्वारा दि.07.11.2008 रोजी आवाहन केले होते. परंतु, सदर ठेवी नेणेस प्रस्तुत तक्रारदार आले नाहीत. त्यांच्या सर्व ठेवी सेंव्हिंग्ग खात्यावर वर्ग करणेत आले आहेत. त्यानंतर संस्थेच्या नियमाप्रमाणे सेव्हिंग व्याजदर नियमाप्रमाणे जास्तीत जास्त रुपये 10,000/- वर वार्षिक नियमाप्रमाणे 2 टक्के व्याज आकारणी करावयास पाहिजे होती, परंतु संस्थेच्या आर्थिक अडचण व थकबाकीमुळे सेव्हिंग व्याज आकारणी केलेली नाही. संस्थेची वसुली प्रक्रिया जोरदार सुरु असून वसुलीनंतर टप्प्याटप्प्याने ठेवरक्कम तक्रारदारांना देता येईल. त्याचबरोबर संस्थेने जप्त केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव तक्रारदार यांनी घेतलेस त्यांना एकाचवेळी सर्व ठेव परत मिळू शकेल. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रार कलम क्र. 7 मधील ठेवींबाबतचा मजकूर चुकीचा असून तक्रारदार क्र.1 ते 5 यांना आजअखेर मिळणेची रक्कम पुढीलप्रमाणे आहे :-
अ.क्र. | ठेवीदाराचे नांव | ठेव प्रकार | एकूण मुद्दल | मुदतीपर्यन्तचे व्याज | एकूण | 1. | कृष्णात मंगसुळीकर | मुदतबंद ठेव | 56000 | 3850 | 59850 | सेव्हिंग खाते | 67320 | 1313 | 68833 | 2. | सौ.कांचन मंगसुळीकर | मुदतबंद ठेव | 56000 | 3850 | 59850 | सेव्हिंग खाते | 138920 | 1200 | 140120 | 3. | दिपक मंगसुळीकर | मुदतबंद ठेव | 56000 | 3850 | 59850 | सेव्हिंग खाते | 43414 | 661 | 44071 | 4. | निलेश मंगसुळीकर | सेव्हिंग खाते | 39850 | 131 | 39981 | 5. | स्नेहा मंगसुळीकर | सेव्हिंग खाते | 39850 | 131 | 39981 |
(6) सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे.
(7) प्रस्तुत सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दैनिक सत्यवादी मधील दि.07.11.2008 रोजीची जाहिर नोटीस, संस्थेचा सेव्हिंग खात्याबाबतचा ठराव, सन 2001 ते 13.02.2006 व आजअखेर संचालक मंडळाची यादी इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
(8) सामनेवाला क्र.2 ते 14 यांनी एकत्रित म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.3 हे मयत आहेत. तसेच, सामनेवाला क्र.5, 7, 9, 12 व 13 हे संचालक असलेबाबत चुकीचे नमूद केले आहे. दि.07.11.2008 रोजी दै.सत्यवादी या वर्तमानपत्रामधून जाहिर निवेदन देवून व प्रत्यक्ष माहिती देवून तसेच पोष्टाद्वारे नोटीस पाठवून अर्जदारांनी ठेव रक्कमा घेवून जाणेविषयी कळविले होते. परंतु, जास्त व्याजाचे लालसेपोटी अर्जदारांनी ठेव रक्कमा परत घेतल्या नाहीत. यातील सामनेवाला यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावा व सामनेवाला यांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- तक्रारदारांकडून देवविणेत यावा अशी विनंती केली आहे.
(9) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे बारकाईने अवलोकन केले आहे. प्रस्तुतची तक्रार ही तक्रारदारांच्या ठेव रक्कमा सामनेवाला यांनी व्याजासह परत केल्या नसल्याबाबतची आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या ठेव पावत्या या मुदत बंद ठेवी आहे तसेच, सेव्हिंग खातीदेखील आहेत. सदर मुदतबंद ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत. सदर ठेव रक्कमा सामनेवाला यांना मान्य आहेत. इत्यादी बाबी निर्विवाद आहेत. परंतु, सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदर ठेव रक्कमा घेवून जाणेबाबत ठेवीदारांना दि.07.11.2008 रोजीच्या दैनिक सत्यवादीमध्ये जाहिर निवेदन केले होते व त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदारांनी ठेवी घेवून गेले नसल्याचे कथन केले आहे. तसेच, सामनेवाला यांनी तक्रारदारांनी त्यांच्या ठेवीवर केलेल्या व्याजदराप्रमाणे रक्कमा देता येणार नसल्याचे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्ठयर्थ सामनेवाला यांनी वर्तमानपत्रातील कात्रणाची प्रत दाखल केली आहे. सदर कथन तक्रारदारांनी प्रतिउत्तर दाखल करुन खंडन केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत बंद ठेव रक्कमा ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजदराने व मुदत संपले तारखेपासून दि.07.11.2008 पर्यन्त द.सा.द.शे.6 टक्के व्याजदराने व तदनंतर प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 या बचत खात्याच्या व्याजदराने मिळणेस पात्र राहतील या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तसेच, सामनेवाला क्र.1 व 15 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सामनेवाला क्र.4, 6, 8, 10, 14 हेच फक्त विद्यमान संचालक आहेत व सामनेवाला क्र.2 ते 14 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सामनेवाला क्र. 5, 7, 9, 12 व 13 हे संचालक नाहीत असे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्ठयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मागणीवरुन दाखल केलेली सन 2001 पासूनच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे. सदर यादीचे अवलोकन केले असता प्रस्तुत तक्रारीतील सामनेवाला हे तक्रारदारांनी ठेव ठेवतेवेळी संचालक म्हणून कार्यरत असलेचे दिसते. सदर संचालक यादीमध्ये सामनेवाला क्र.3-दत्तात्रय गोपाळ जकाते हे मयत असलेचे नमूद केले आहे. त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा अदा करणेच्या जबाबदारी टाळता येणार नाही. सबब, सामनेवाला क्र.1 (संस्था), क्र.2 व सामनेवाला क्र.4 ते 14 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1-मुख्य अधिकारी व सामनेवाला क्र.15-व्यवस्थापक यांना केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा देणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 871, 916 व 1562 वर अनुक्रमे दि.22.10.2007, दि.30.06.2006 व दि.30.06.2006 रोजीअखेर अनुक्रमे रुपये 67,320/-, रुपये 1,38,920/- व रुपये 43,410/- अशा रक्कमा जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यांवरील रक्कमा द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.1 (संस्था), 2, 4 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1 (मुख्य अधिकारी) व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व मुदत संपलेनंतर दि.07.11.2008 रोजीपर्यन्त द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | 1. | 2112 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 2. | 2120 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 3. | 2065 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2004 | 4. | 44 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 5. | 2124 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 6. | 2119 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2004 | 7. | 2066 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2004 | 8. | 45 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 9. | 2111 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 10. | 2117 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 11. | 48 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 12. | 2113 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2004 | 13. | 2116 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 14. | 47 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 | 15. | 2115 | 12000/- | 03.04.2004 | 03.05.2007 | 16. | 2118 | 12000/- | 03.04.2004 | 03.04.2006 | 17. | 2067 | 20000/- | 27.02.2003 | 27.02.2003 | 18. | 0046 | 12000/- | 04.04.2003 | 04.04.2005 |
(3) सामनेवाला क्र.1 (संस्था), 2, 4 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1 (मुख्य अधिकारी) व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकात नमूद त्यांच्या सेव्हिंग्ज खात्यावरील कोष्टकात नमूद तारखेपासूनपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | व्याज देय तारीख | 1. | बचत खाते क्र.871 | 67320/- | 22.10.2007 | 2. | बचत खाते क्र.913 | 138920/- | 30.06.2006 | 3. | बचत खाते क्र.1562 | 43410/- | 30.06.2006 |
(4) सामनेवाला क्र.1 (संस्था), 2, 4 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1 (मुख्य अधिकारी) व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |