Maharashtra

Nagpur

CC/14/248

Awantika Gangadhar Chitnavis - Complainant(s)

Versus

Indigo Airlines. - Opp.Party(s)

07 Sep 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/248
 
1. Awantika Gangadhar Chitnavis
309 Sir Sir Gangadharrao Chitnis marg, Civil lines Village,nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Indigo Airlines.
Leval 1. tower c, global business Park.Mehrauli-Gaurgaon road,
Gurgaon
Hariyana
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

                          आ दे श  -

 

 (पारित दिनांक – 04 सप्‍टेंबर, 2015)

 

1.                तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या  कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण असे की, तक्रारकर्ती अवंतिका चिटणविस आणि सहप्रवासी रश्‍मी टिक्‍कू यांनी मिळून वि.प. इंडिगो एयरलाईन्‍स यांचेकडून दि.09 डिसेंबर 2013 रोजी नागपूर ते दिल्‍ली आणि दिल्‍ली ते नागपूर अशा जाण्‍या-येण्‍याचा प्रवासाचे संयुक्‍त तिकिट एकूण रु.15,214/- देऊन खरेदी केले होते. त्‍याचा बुकींग रेफरंस Z94PTV असा होता.

 

प्रवासाचे दिवस आणि फ्लाईट क्र. खालीलप्रमाणे होते.

 

       फ्लाईट नं.               प्रवास                    प्रवासाची तारीख

 

1)     6E 136           नागपूर ते नवि दिल्‍ली                  16 जानेवारी 2014

2)    6E 136          नवि दिल्‍ली ते नागपूर                  22 जानेवारी 2014

 

वरील तिकिटावर तक्रारकर्ती व सहप्रवाशी रश्‍मी टिक्‍कू यांनी ठरल्‍याप्रमाणे दि. 16 जानेवारी 2014 रोजी प्रवास केला असून त्‍याबाबत काहीही तक्रार नाही.

 

दि.22 जानेवारी 2014 रोजी तक्रारकर्तीची सहप्रवासी रश्‍मी टिक्‍कू नवी दिल्‍ली विमानतळावर तक्रारकर्तीच्‍या आधी पोहचली आहे. संयुक्‍त तिकिट असल्‍याने दोघींसाठी बोर्डिंग पासेसची वि.प.च्‍या काऊंटरवर मागणी केली. परंतू बोर्डिंग पास घेण्‍यासाठी तक्रारकर्ती स्‍वतः हजर पाहिजे असे सांगून तक्रारकर्तीचे बोर्डींग पास दिले नाही. बोर्डींग पास घेण्‍यासाठी तक्रारकर्ती स्‍वतः हजर पाहिजे असे असे वि.प.ने कधीही कळविले नसल्‍याने बोर्डींग पास घेण्‍यासाठी तक्रारकर्तीने संयुक्‍त तिकिटधारक सहप्रवासी रश्‍मी टिक्‍कू यांच्‍यावर अवलंबून राहिली. तक्रारकर्तीकडे सामानाच्‍या बॅगा नसल्‍यामुळे त्‍यांना चेकईन बॅगेजची आवश्‍यकता नसून तक्रारकर्तीला सिक्‍युरीटी चेक इन म्‍हणून जावे लागणारच आहे, म्‍हणून तक्रारकर्तीचे बोर्डींग पास तिच्‍याकडे द्यावे अशी रश्‍मी टिक्‍कूने वारंवार विनंती करुनही वि.प.च्‍या काऊंटरवर बोर्डींग पास देण्‍यास आले नाही.

 

                  तक्रारकर्ती नवी दिल्‍ली विमानतळावर गेली, तेव्‍हा चेन इन काऊंटर बंद झाल्‍याबाबत वि.प.च्‍या कर्मचा-यांकडून कोणतीही घोषणा केली नसल्‍याने ती चेक इन काऊंटरकडे जाण्‍यासाठी रांगेत उभी राहीली. ती काऊंटरवर पोहचली तेव्‍हा फ्लाईटच्‍या उड्डाणासाठी 45 मिनिटापेक्षा कमी अवधी शिल्‍लक असल्‍याने तिला फ्लाईटने जाता येणार नाही असे सांगितले. फ्लाईटमध्‍ये प्रवाशी बसणे अद्याप सुरु झाले नाही म्‍हणून तिला विमानात बसण्‍यासाठी जाऊ द्यावे अशी विनंती तक्रारकर्ती व तिची सहप्रवाशी यांनी केली. परंतू वि.प.च्‍या कर्मचा-यांनी ती मानली नाही. उलट वि.प.च्‍या कर्मचा-यांनी तक्रारकर्तीस सांगितले की, तिचे तिकिट जप्‍त (confiscate) करण्‍यात आले आहे. शेवटी तक्रारकर्तीने तिची सहप्रवासी रश्‍मी टिक्‍कू हिला एकटीने विमानात प्रवेश घेण्‍यासाठी जाण्‍यास सांगितले. रश्‍मी टिक्‍कू हिचे बाजूचे तक्रारकर्तीचे आसन रिकामे होते.   

 

वि.प.च्‍या कर्मचा-यांनी दुस-या दिवशी सकाळी 5-45 वाजताच्‍या विमानाचे तिकिट खरेदी करावी असे तक्रारकर्तीस सांगितले. परंतू इतक्‍या लवकर विमानतळावर पोहोचणे तक्रारकर्तीस शक्‍य नव्‍हते. त्‍यामुळे त्‍याच दिवशी अन्‍य विमान नागपूरसाठी उपलब्‍ध आहे काय याची तक्रारकर्तीने चौकशी केली. परंतू ते उपलब्‍ध झाले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती दुस-या दिवशी दि.23.01.2014 रोजी ‘’गो एयर फ्लाईटने’’ दुपारी नागपूर येथे पोहोचली.

 

                  तक्रारकर्तीने दि.16.01.2014 रोजी वि.प.च्‍याच विमानाने नागपूर नवि दिल्‍ली प्रवास केला तेव्‍हा घरीच वेब चेक इन करुन तिकिट प्रींट केले आणि चेक इन काऊंटरवर न जाता सरळ सिक्‍युरीटी चेक पूर्ण करुन विमानात बसण्‍यासाठी गेली. तक्रारकर्तीने रश्‍मी टिक्‍कु बरोबर संयुक्‍त तिकिट काढले असल्‍याने तिला केवळ बोर्डींग पास मिळविण्‍यासाठी स्‍वतः चेक इन काऊंटरवर जाण्‍याची गरज नव्‍हती व रश्‍मी टिक्‍कू ही चेक इन काऊंटरवरुन बोर्डींग पास काऊंटरवर पोहोचल्‍यामुळे संयुक्‍त तिकिटप्रमाणे दोन्‍ही बोर्डींग पास तिच्‍याकडे देणे आवश्‍यक असतांना वि.प.च्‍या कर्मचा-यांनी ते दिले नाही व त्‍यामुळे दिल्‍ली ते नागपूर विमान प्रवासाचे पैसे देऊनही तक्रारकर्तीस नियोजित विमानाने प्रवास करता आला नाही, त्‍यामुळे तिचा किंमती वेळ वाया गेला. तसेच विमान तळावरुन परत जाऊन पुन्‍हा दुस-या दिवशी यावे लागले व यासाठी शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागला. यास वि.प.ची सेवेतील न्‍यूनता कारणीभूत असल्‍याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

1)    तक्रारकर्तीचे इंडिगोचे तिकिट                         रु.3,803.50

2)    विमानतळावर जाण्‍याचे टॅक्‍सीचे भाडे                   रु.  500.00

3)    टर्मिनल 1 वरुन राहण्‍याचे ठिकाणापर्यंत                रु.  550.00

4)    गो एयर तिकिट                                   रु.8,080.00

5)    एयरपोर्टवर जाण्‍याकरीता टॅक्‍सीचे भाडे                 रु.  200.00

6)    कायदेशीर सल्‍लाबाबत भरपाई                              रु.25,000.00

7)    मानसिक त्रासाबाबत भरपाई                          रु.25,000.00

....................

रु.63,133.50

 

तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ इंडिगो एयरलाईनचे तिकिट, इंडिगोसोबत केलेला पत्रव्‍यवहार आणि नागपूरकरीता घेतलेले गो एयरचे तिकिट यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 

 

2.                वि.प.ने लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. त्‍यांचा प्राथमिक आक्षेप असा की, तक्रारकर्तीने मंचापासून सत्‍यस्थिती लपवून ठेवल्‍याने व स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आली नसल्‍याने कोणतीही दाद मिळण्‍यास पात्र नाही. तसेच संयुक्‍त तिकिट धारक रश्‍मी टिक्‍कू हिला सदर तक्रारीत पक्ष सामिल न केल्‍याने नॉन जाईंडर ऑफ नेसेसरी पार्टीजचे तत्‍वाने सदरची तक्रार बाधीत असल्‍याने खारिज होण्‍यास पात्र आहे.

 

 

                  वि.प.कंपनीचे मुख्‍यालय किंवा शाखा कार्यालय नागपूर येथे नसल्‍यामुळे नागपूर जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला ग्रा.सं.अ.चे कलम 11 प्रमाणे तक्रार चालविण्‍याची क्षेत्रिय अधिकार कक्षा नाही.

 

                  त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारकर्तीने वि.प.कडून विमान प्रवासासाठी तिकिट बुक केले असल्‍याने त्‍यासंबंधीच्‍या सर्व अटी व शर्तीचे पालन करण्‍याचे तिच्‍यावर बंधन आहे. सदर विमा प्रवासाच्‍या अटी व शर्तीमध्‍ये खालील अटींचा समावेश आहे.

 

“7.1-Checking-in

 

………………….IndiGo recommends that Customers report for Check-in at least 2 hours prior to the departure of the scheduled flight. The Customer’s journey will be smoother if they allow themselves ample time to comply with the Check-in timelines. IndiGo reserves the right to cancel a Customer’s reservation if he/she does not comply with the Check-in timelines.

 

Check-in closes 45 minutes prior to the scheduled departure of the flight.

 

Customer Check-in at our Website begins 48 hours and closes 2 hours prior to the scheduled departure.

 

Failure to complete the check in formalities within the stipulated time limit would result in forfeiture of the Booking amount. The Booking would be declared a “No Show” and the Customer would not be entitled to a refund or a credit shell. However, only the PSF and UDF may be refunded upon request by the Customer by writing t IndiGo.

 

 

7.3-Failure To Comply

 

IndiGo will not be liable to the Customer for any loss or expense incurred due to their failure to comply with the provisions of this Article.”

 

                  तक्रारकर्ती दि.22.01.2014 रोजी वि.प.च्‍या बोर्डींग काऊंटरवर निर्धारित वेळेच्‍या आत म्‍हणजे विमानाच्‍या उड्डाण वेळेच्‍या 45 मिनिट आधी पोहचली नाही आणि स्‍वतःच विमान प्रवासाच्‍या नियमावलीतील अटी व शर्तीचा भंग केला. त्‍यामुळे तक्रारकर्तीला वि.प.विरुध्‍द सेवेतील न्‍यूनतेबाबत आरोप करण्‍याचा अधिकार नाही.

 

                  प्रवासाच्‍या नियमावलीप्रमाणे तक्रारकर्तीस वैध फोटो ओळखपत्रातून सुट देण्‍याची वि.प.ची जबाबदारी नाही. वेब चेक इनमध्‍ये देखील वेब बोर्डींग पास फोटो ओळखपत्रासह विमानतळ सिक्‍युरीटी फोर्सला दाखवावी लागते आणि त्‍यानंतरच प्रवाश्‍याला सिक्‍युरीटी चेकसाठी जाता येते. तक्रारकर्तीसोबत संयुक्‍त तिकिट असलेल्‍या सहप्रवाश्‍याला विमानात बसण्‍यासाठी बोर्डींग पास देण्‍यात आली. परंतू तक्रारकर्ती उशिरा आल्‍याने तिला ती देण्‍यात आली नाही.

 

                  तक्रारकर्तीबरोबर संयुक्‍त तिकिट धारण करणारी सहप्रवाशी रश्‍मी टिक्‍कू ही विमान तळावर तक्रारकर्तीपूर्वी आली आणि संयुक्‍त तिकिट असल्‍याने तक्रारकर्तीसाठी बोर्डींग पासची मागणी केल्‍याचे नाकबूल केले आहे. सुरक्षेच्‍या कारणासाठी प्रत्‍येक प्रवाशाने स्‍वतःची बोर्डींग पास स्‍वतः घेणे आवश्‍यक असून एका प्रवाशाची बोर्डींग पास दुस-या प्रवाशास देण्‍याची तरतूद नाही. सदर नियम प्रत्‍येक प्रवाशाला तोंडी सांगण्‍याची आवश्‍यकता नाही. तिकिटावर तशी अट छापलेली आहे. 5:25 P.M. च्‍या विमानासाठी तक्रारकर्ती विमानतळावर 4:55 P.M. ला हजर झाल्‍यामुळे आणि विमान सुटण्‍याच्‍या निर्धारित वेळेच्‍या 45 मिनीटे आधी हजर न झाल्‍याने नियमानुसार बोर्डींग पास नाकारण्‍यात आला. विमानाचे निर्धारित वेळेवर वेळेवर न येणा-याला व उशिरा येणा-याला बोर्डींग पास देण्‍यात येत नाही. तक्रारकर्ती विमानतळावर पोहोचली होती याचा कोणताही पुरावा नाही. ती अन्‍य कारणासाठी विमानतळावर आलीच नाही आणि दिल्‍लीत मुक्‍काम करुन दुस-या दिवशी नागपूरला आली, परंतू खोटी कथा रचून वि.प.कडून पैसे उकळण्‍यासाठी खोटी तक्रार दाखल केली असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 

                  नागपूर दिल्‍ली प्रवासासाठी तक्रारकर्तीने वेब चेक इन करुन बोर्डींग पास घरीच प्रींट केला आणि त्‍यामुळे तिला विमान तळावर चेक इन काऊंटरला जावे लागले नाही हे नाकबूल केले आहे. संयुक्‍त तिकिट असल्‍याने एक प्रवाशी सर्व प्रवाशाचे बोर्डींग पास मिळवू शकतो हे नाकबूल केले आहे. वेब इन चेक बोर्डींग पास असली तर चेक इन काऊंटरवर काऊंटर साईन आणि स्‍टॅम्‍प लावला जातो. गर्दीमुळे अपवादात्‍मक स्थितीत कधी-कधी प्रवाशास सरळ सिक्‍युरीटी चेक काऊंटरला जाऊ दिले जाते. तक्रारकर्तीकडे वेब चेक इन बोर्डींग पास नसल्‍याने तिने नियमाप्रमाणे 45 मिनिट आधि विमानतळावर येणे आणि स्‍वतः बोर्डींग पास घेणे अनिवार्य होते, परंतू तिने तसे केले नाही यास सर्वस्‍वी तक्रारकर्ती जबाबदार आहे.

 

                  जरी विमानात बोर्डींग सुरु झाले नसले तरी चेक ईन काऊंटरवरुन बोर्डींग गेटपर्यंत जाण्‍यास 15-25 मिनिट लागतात, म्‍हणून उशिरा आलेल्‍या प्रवाश्‍यांना परवानगी देता येत नाही. तक्रारकर्तीने 10 मिनिटपर्यंत वि.प.च्‍या कर्मचा-यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला आणि ती बोर्डींगसाठी वेळेवर पोहोचू शकेल एवढा वेळ शिल्‍लक असल्‍याचे नाकबूल केले आहे.

 

                  वि.प.कंपनी चेक इन काऊंटर बंद झाल्‍यावर देखील प्रवाश्‍यांना बोर्डींगसाठी परवानगी देते किंवा अशी परवानगी कोणासही दिली असल्‍याचे नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीच्‍या ई-मेलला वि.प.ने योग्‍य उत्‍तर दिले आहे. तक्रारकर्तीची तक्रार खोटी असल्‍याने खारीज करावी अशी वि.प.ने विनंती केली आहे.

 

3.          प्रकरणाच्‍या निर्णितीसाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले, त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                                   निष्‍कर्ष

 

1) सदरची तक्रार चालविण्‍याची मंचाला अधिकार कक्षा आहे काय ?           होय.

2) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?               होय. 

3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?                अंशतः.

4) आदेश ?                                               अंतिम आदेशाप्रमाणे.

 

               

  •  कारणमिमांसा

 

4.        मुद्दा क्र. 1 बाबत – सदरच्‍या प्रकरणात विरुध्‍द पक्षाकडे तक्रारकर्तीने नागपूर येथून ऑन लाईन बुकींग केले आणि नागपूर येथे पैसे दिले आहेत. तसेच सदर तिकिटावर करावयाचा प्रवास नागपूर नवि दिल्‍ली आणि नवि दिल्‍ली नागपूर असा करावयाचा होता. तिकिट असतांना वि.प.ने तक्रारकर्तीस विमानाने नवि दिल्‍लीवरुन नागपूर गंतव्‍यस्‍थानी पोहोचविले नाही, म्‍हणून सदर तक्रारीस अंशतः कारण नागपूर येथे घडले असल्‍याने ग्रा.सं.अधि. 1986 चे कलम 11 अन्‍वये नागपूर जिल्‍हा ग्राहक मंचास सदर तक्रार चालविण्‍याची अधिकार कक्षा आहे.

 

                  तक्रारकर्तीने रश्‍मी टिक्‍कू हिचे बरोबर संयुक्‍त तिकिट काढले होते, परंतू तिकिटावर तक्रारकर्तीस नवि दिल्‍ली नागपूर प्रवास करता आला नाही. यांस रश्‍मी टिक्‍कू जबाबदार नाही आणि त्‍यासंबंधाने तक्रारीत तिच्‍याविरुध्‍द कोणतेही आरोप केलेले नाहीत किंवा दाद मागितलेली नाही, म्‍हणून रश्‍मी टिक्‍कू सदर तक्रारीस आवश्‍यक पक्ष नाही व तिला तक्रारीत पक्ष बनविले नाही, म्‍हणून सदरची तक्रार नॉन जाईंडर ऑफ नेसेसरी पार्टीजच्‍या तत्‍वाने बाधीत असल्‍याचा वि.प.चा आक्षेप अग्राह्य आहे.

 

                  वरील कारणामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे. 

 

5.          मुद्दा क्र. 2 बाबत – सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्ती अवंतिका चिटणविस आणि तिची सहप्रवासी रश्‍मी टिक्‍कू यांनी वि.प.कडून तक्रारीत नमूद नागपूर नवि दिल्‍ली आणि नवि दिल्‍ली नागपूर प्रवासाचे तिकिट नागपूर येथून ऑन लाईन बुक केले होते व त्‍यासाठी रु.15,214/- विमान भाडे दिले होते. याबाबत उभय पक्षात वाद नाही. तिकिटाची प्रत दस्‍तऐवज क्र. 1 वर आहे. सदर तिकिटावर दोघींनीही नागपूर नवि दिल्‍ली प्रवास केला. तक्रारकर्तीचा युक्‍तीवाद असा की, दि.22.01.2014 रोजी नवि दिल्‍ली नागपूर प्रवासासाठी विमानाची वेळ 5:25 P.M. होती. तक्रारकर्तीची सहप्रवाशी संयुक्‍त तिकिटधारक रश्‍मी टिक्‍कू आधी विमानतळावर गेली आणि दोघींसाठी बोर्डींग पासची मागणी केली. वि.प.च्‍या अधिका-यांनी केवळ रश्‍मी टिक्‍कूला बोर्डींग पास दिली आणि तक्रारकर्तीची बोर्डींग पास दिली नाही. तक्रारकर्तीच्‍या युक्‍तीवाद असा की, दोघींनी मिळून तिकिट काढले असल्‍याने व सदर संयुक्‍त तिकिटधारक रश्‍मी टिक्‍कूने स्‍वतःची ओळख पटविली असल्‍याने त्‍याच तिकिटावर प्रवास करणा-या तक्रारकर्तीची बोर्डींग पासदेखील रश्‍मी टिक्‍कूकडे देणे आवश्‍यक होते. तिकिटावर टर्म अँड कंडीशन्‍स छापल्‍या आहेत, त्‍यात संयुक्‍त तिकिट असल्‍यास प्रत्‍येक प्रवासी बोर्डींग पास घेण्‍यासाठी स्‍वतः हजर पाहिजे असा कोणताही नियम नाही. केवळ बोर्डींग पास घेण्‍यासाठी सिक्‍युरीटी चेक इनची आवश्‍यकता नाही. कोणत्‍याही सिक्‍युरीटी चेक इन शिवाय घरीदेखील बोर्डींग पास प्रींट करणे शक्‍य असल्‍याने सहप्रवाशाजवळ मागणी करुनही तक्रारकर्तीचा बोर्डींग पास न देणे ही सेवेतील त्रुटी आहे.

 

                  फक्‍त रश्‍मी टिक्‍कूलाच बोर्डींग पास दिल्‍यामुळे ती तक्रारकर्तीची वाट पाहत चेक इन काऊंटरजवळ उभी होती. तक्रारकर्ती 16:55 P.M.  ला तिथे पोहचली तेव्‍हा रश्‍मी टिक्‍कूने तक्रारकर्तीची बोर्डींग पास दिले नसल्‍याचे सांगितले असता तक्रारकर्तीने वि.प.च्‍या कर्मचा-यांना अजून विमानाची बोर्डींग सुरु होण्‍यास वेळ आहे, म्‍हणून तिला बोर्डींग पास द्यावी अशी विनंती केली. परंतू वि.प.च्‍या कर्मचा-यांनी ती उशिरा आल्‍याचे कारण सांगून बोर्डींग पास दिला नाही आणि तिचे तिकिटाचे पैसे जप्‍त करण्‍यात आल्‍याचे सांगितले. तक्रारकर्ती व रश्‍मी टिक्‍कू यांच्‍याकडे बॅगेज चेकींग नव्‍हते. त्‍यानंतर नाईलाज होऊन रश्‍मी टिक्‍कू एकटीच सिक्‍युरीटी चेक इन काऊंटरलागेला आणि एकटीच सदर तिकिटावर नवि दिल्‍लीवरुन नागपूरला आली. वि.प.च्‍या अडेलतट्टू वर्तणूकीमुळे तक्रारकर्तीने नवि दिल्‍ली नागपूर विमान भाडे देऊनही तिला सहकार्य न करता विमा प्रवासापासून वंचित ठेवून सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे.

 

                  याऊलट, वि.प.चे अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले की, प्रत्‍येक विमान प्रवाश्‍याला कंपनीच्‍या नियमाप्रमाणे विमान तळावर विमान सुटण्‍याच्‍या निर्धारित वेळेच्‍या 45 मिनिट आ‍धी हजर राहण्‍याची अट क्र. 3 तिकिटावर छापलेली आहे. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने प्रत्‍येक प्रवाशाला चेक इन काऊंटरवर जाऊन आपले बोर्डींग पास स्‍वतः घेणे अत्‍यावश्‍यक आहे. तक्रारकर्तीची सहप्रवाशी रश्‍मी टिक्‍कू वेळेवर चेक इन काऊंटरवर आल्‍यामुळे तिला तिची बोर्डींग पास देण्‍यात आली. परंतू तक्रारकर्ती 16.55 वा. म्‍हणजे विमान सुटण्‍याच्‍या केवळ 30 मिनिट आधी विमानतळावर आल्‍याने चेक इन काऊंटर बंद झाल्‍यामुळे तिला बोर्डींग पास देण्‍यात आला नाही ही कृती कंपनीच्‍या नियमाप्रमाणेच आहे. सदर नियमावलीची प्रत वि.प.ने लेखी जवाबासोबत दाखल केली असून त्‍यात क्‍लॉज 7.1 प्रमाणे प्रत्‍येक प्रवाशाने चेक इन काऊंटरवरुन दस्‍तऐवज सादर करुन बोर्डींग पास घेणे आवश्‍यक आहे व त्‍यासाठी विमानाच्‍या निर्धारित वेळेच्‍या 45 मिनिट आधी विमानतळावर पोहचणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्ती नियमाप्रमाणे वेळेत आली नसल्‍याने तिला बोर्डींग पास दिली नाही यात वि.प.कडून कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार घडलेला नाही.

 

                  सदर प्रकरणात तक्रारकर्तीने रश्‍मी टिक्‍कू हिचेबरोबर संयुक्‍त तिकिट घेतलेले होते. रश्‍मी टिक्‍कू वेळेच्‍या आत चेक इन काऊंटरवर गेली आणि तिने दोघींचीही बोर्डींग पास मागितली. त्‍यावेळी दोन्‍ही तिकिटांची माहिती रश्‍मी टिक्‍कूकडे उपलब्‍ध होती, त्‍यामुळे दोन्‍ही बोर्डींग पास देणे वि.प.ला अशक्‍य नव्‍हते. कारण जर वेब चेक इन केले तर प्रत्‍यक्ष प्रवाशाच्‍या हजेरीशिवाय बोर्डींग पास प्रींट होऊ शकते. याचाच अर्थ प्रत्‍येक प्रवाशाने चेक इन काऊंटरवर बोर्डींग पास घेण्‍यासाठी हजर असणे अनिवार्य दिसत नाही. सदरच्‍या प्रकरणात केवळ रश्‍मी टिक्‍कू बोर्डींग काऊंटरवर निर्धारित वेळेपूर्वी हजर झाली, म्‍हणून तिला बोर्डींग पास देण्‍यात आला. मात्र त्‍याच तिकिटात समाविष्‍ट असलेल्‍या तक्रारकर्तीचा बोर्डींग पास रश्‍मी टिक्‍कू हिच्‍याकडे सोपविण्‍यात आला नाही. तक्रारकर्तीचा 16.55 वा. पोहोचली तेव्‍हा विमान सुटण्‍यास 30 मिनिटे अवधी होता. म्‍हणून रश्‍मी टिक्‍कू आणि तक्रारकर्ती यांनी विनंती केल्‍यावर जर वि.प.ने तक्रारकर्तीचा बोर्डींग पास दिला असता तर तिला सदर तिकिटावर दिल्‍ली ते नागपूर प्रवास करता आला असता. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या तिकिटावर अट क्र. 3 मध्‍ये बोर्डींग पास घेण्‍यासाठी 45 मिनिटे अगोदर न आल्‍यास तिकिट रद्द करण्‍यात येईल आणि भाड्याची रक्‍कम ठेवून घेण्‍यात येईल असे नमूद आहे. परंतू संयुक्‍त तिकिटाच्‍या बाबतीत प्रत्‍येक प्रवाश्‍याने बोर्डींग पास घेण्‍यासाठी स्‍वतः हजर असण्‍याबाबत असा कोणताही उल्‍लेख नाही. जर वि.प.ने रश्‍मी टिक्‍कू हिला तिकिटांचा बोर्डींग पास दिला असता तर सदर बोर्डींग पासवर रश्‍मी टिक्‍कू आणि तक्रारकर्ती पुढे सिक्‍युरीटी चेक इन काऊंटरवर गेली असता आणि तेथून बोर्डींग गेटवर जाऊ शकली असती. त्‍यासाठी तक्रारकर्ती विमानतळावर पोहोचल्‍यापासून विमानाच्‍या उड्डाणासाठी 30 मिनिटांचा अवधी पूरेसा होता. परंतू वि.प.ने रश्‍मी टिक्‍कू हिला तक्रारकर्तीचा बोर्डींग पास दिला नाही आणि तक्रारकर्ती विमान उड्डाणाच्‍या 30 मिनिटापूर्वी आल्‍यानंतर तिने स्‍वतःदेखील त्‍यासाठी विनंती करुनही 45 मिनिटाच्‍या आत न आल्‍याचे कारण सांगून बोर्डींग पास न देता तिच्‍या तिकिटाची रक्‍कम वि.प.ने जप्‍त केली आहे. वि.प.ची सदर कृती ही ग्राहकांप्रती सेवेतील न्‍यूनता आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

6.          मुद्दा क्र. 3 व 4 बाबत – सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्तीने दिल्‍ली ते नागपूर प्रवासाकरीता वि.प.कडे रु.3,803.50 जमा केले होते. परंतू सदरच्‍या तिकिटावर तिला दिल्‍ली ते नागपूर प्रवास करता आला नाही, म्‍हणून ती रक्‍कम परत मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र ठरते. याशिवाय, तक्रारकर्तीला त्‍यादिवशी दुसरे विमान उपलब्‍ध नसल्‍याने परत जावे लागले म्‍हणून यासाठी झालेला टॅक्‍सी भाड्याचा खर्च रु.1050/- मिळण्‍यास देखील तक्रारकर्ती पात्र आहे. तक्रारकर्तीचे विमान चुकल्‍यामुळे तिला दुस-यादिवशी अन्‍य विमानाचे रु.8080/- चे तिकिट काढून नागपूर येथे प्रवास करावा लागला व त्‍यासाठी रु.4276.50 इतके अधिक भाडे द्यावे लागले, म्‍हणून ती फरकाची रक्‍कम मिळण्‍यास देखील तक्रारकर्ती पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 3 व 4 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहे. वरील निष्‍कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.  

 

  • आ दे श

 

तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालिल तक्रार वि.प. विरुध्‍द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

1)    वि.प.ने तक्रारकर्तीला तिकिटाची जप्‍त केलेली रक्‍कम रु.3,803.59 आणि दुस-या       विमानासाठी द्यावे लागलेले अधिकचे प्रवास भाडे रु.4,276.50, तसेच टॅक्‍सी भाडे    रु.1,050/- असे एकूण रु.9,130/- तक्रार दाखल दिनांकापासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह अदा करावे.

2)    वि.प.ने तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा.

3)    विरुध्‍द पक्षाने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासून 1 महिन्‍याचे आंत करावी.

4)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

5)    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.