Maharashtra

Kolhapur

CC/10/649

Mahesh Chaturing Bhat. - Complainant(s)

Versus

Indian Railway.( Gagjit Ranjit Nandale.) - Opp.Party(s)

Pradnya V.Mahajan

01 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/649
1. Mahesh Chaturing Bhat.Ambedkarnagar.Ichalkaranji Tal - Hatkanangale.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Indian Railway.( Gagjit Ranjit Nandale.) Hatkanangale Railway Station.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Pradnya V.Mahajan, Advocate for Complainant

Dated : 01 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आदेश :- (दि.01/12/2010) ( श्री एम.डी.देशमुख,अध्‍यक्ष)
 
(01)       प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारदाराने हातकणंगले रेल्‍वेस्‍टेशनवर स्‍टेशनमास्‍तराना कर्जत येथे जाणेसाठी तिकीट मागितले. रक्‍कम रु.100/- ची नोट दिली व रक्‍कम रु.3/- परत मागितले. त्‍यावेळेस गाडीची वेळ झालेली आहे, तिकीट दिलेले आहे असे सांगून गाडीत बसून जाणेस सांगितले. त्‍यानंतर सामेनवाला यांनी तक्रारदारांचे विरुध्‍द दि.27/11/2007 रोजी मिरज रेल्‍वे आर.पी.एफ. व कोल्‍हापूर पोलीस जी.आर.पी. यांचेकडे फौजदारी केस केली. त्‍याचा निकाल दि.13/03/2010 रोजी लागून तक्रारदारांची त्‍यातून निर्दोष मुक्‍तता झालेली आहे. सामनेवाला यांनी खोटी केस दाखल करुन तक्रारदारांना शारिरीक व मानसिक व आर्थिक त्रास दिलेला आहे. सामनेवाला यांनी खोटी केस दाखल करुन तिकीटाचे उर्वरित पैसे दिलेले नाहीत. त्‍यामुळे तिकीटाची येणे रक्‍कम रु.3/- खोटी तक्रार केलेमुळे न्‍यायालयीन खर्च रु.10,000/- सेवेत त्रुटी ठेवलेमुळे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.2,00,000/- व्‍यावसायिक नुकसान रक्‍कम रु.2,50,000/- इत्‍यादी सामनेवालांनी तक्रारदारास देणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती सदर मंचास केलेली आहे.
 
(02)       या मंचाने प्रस्‍तुत तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने दि.19/11/2007 रोजी हातकणंगले रेल्‍वेस्‍टेशनवर कर्जतला जाणेसाठी तिकीट घेतलेले आहे व उर्वरित रक्‍कम रु.3/- दिले नसलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24-ए यातील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे असा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे. तसेच हातकणंगले रेल्‍वे स्‍टेशनचे स्‍टेशनमास्‍तर यांनी खोटी फिर्याद दाखल केली म्‍हणून नुकसान भरपाई मागितलेली आहे. सदरची बाबही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींचा विचार करता ग्राहक वाद होत नाही इत्‍यादी बाबींचा विचार करता प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                     आदेश
 
1. प्रस्‍तुतची तक्रार अस्विकृत करणेत येत आहे.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER